ढेकणांचा अड्डा
काव्यरस
ढब्बूनानांच्या बिछान्यातले, एकूण एक ढेकूण
भरल्या पोटी, जरा पहुडले, सतरंजीला टेकून
पडल्या पडल्या ढेकूण करती, सुखदु:खाच्या गप्पा
फारच वाईट रात्री आल्या, आपल्यावरती यंदा
झोपत नाहीत पूर्वीसारखे, ढब्बूनाना सध्या
अर्ध्या-सोंडी उठती ढेकूण, भलताच झाला वांदा
आधीच घोरणे, ऎकुन त्यांचे, दडपून जाई छाती
त्यातून हर्बल पेस्ट-कंट्रोलची, सदैव राही भीती
तरिही नाना बरे, कितीही आली संकटे जरी
दिवसागणती त्यांची वाढे, जाडी-ढब्बी ढेरी
भरल्या वजनी कुशी बदलणे, नाही राहिले सोपे
नानांना मुळी कळतच नाही, आम्ही चावलो कोठे
पुरेत गप्पा, झोपा आता, ढेकणोबा भरती रागे
गोंधळ तुमचा ऎकून नाना, खाडकन झाले जागे
वाचने
5381
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
मस्त :)
सहीच रे दोस्ता !!
ढेकुण डास आणि झुरळ, तिनही कविता एका दमात वाचल्या. सगळ्याच मस्त आहेत.
:)
In reply to ढेकुण डास आणि झुरळ, तिनही by गणपा
अरे वा !! आज चायनिज बेत होता तर.. :)
ही ही ही.
पुण्यातील होस्टेलची आठवण आली. :)
कविता छान.
- नीलकांत
गणेशा आणि प्रकाश१११ ह्यांनी डॉमीनेट केलेल्या काव्य प्रकारात तुमचे डास ढेकूण आणि झुरळे क्रांती करतील आणि आमची सुटका करतीत अशी अपेक्षा.
मस्त कविता :)
अमोल
In reply to ढेकूण by विजुभाऊ
कसला गोड दिसतोय !!
संपादन किंवा अन्य कुठल्याही बाबतीत संपादकीय कारवाईचा उल्लेख टाळावा. यापुढे असे प्रतिसाद काढून टाकले जातील.
- नीलकांत
In reply to कसला गोड दिसतोय !! विजुभाउ by अवलिया
व्वा @@ काय टवटवीत ढेकुण आहे ? .. विकांताचा मेणु पक्का झाला ...
"मसाला ढेकुण्स ... घासु स्टाईल "
- टेकुण
In reply to व्वा @@ काय टवटवीत ढेकुण आहे by टारझन
घरी करुन खानार हायेस की भायेर जाउन खानार हायेस ?
घरी करनार असशील तर फटु सहीत ढेकृ आली पायजे.
In reply to ढेकूण by विजुभाऊ
विजुभाउ तुमच्या घरचा काय? नाही गुज्जु थाळ्या खाउन एकदम गुटगुटीत झालेला दिसतो आहे म्हणुन विचारतोय.
In reply to विजुभाउ तुमच्या घरचा काय? by Nile
नाही विजुभाऊ सध्या फिरतीवर आहेत त्यामूळे घरच्या ढेकणांचे फोटू काढू शकत नाहीत.
खूप हसले
=)) =)) =))
ही ढेकणी कविता दाखवल्याबद्दल वल्लियाना जोन्स यांचे बहुत आभार!!!! वर काहाडत हाये :)
=))
:)) :)) :))
मस्त