मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ढेकणांचा अड्डा

अमित करकरे · · जे न देखे रवी...
काव्यरस
ढब्बूनानांच्या बिछान्यातले, एकूण एक ढेकूण भरल्या पोटी, जरा पहुडले, सतरंजीला टेकून पडल्या पडल्या ढेकूण करती, सुखदु:खाच्या गप्पा फारच वाईट रात्री आल्या, आपल्यावरती यंदा झोपत नाहीत पूर्वीसारखे, ढब्बूनाना सध्या अर्ध्या-सोंडी उठती ढेकूण, भलताच झाला वांदा आधीच घोरणे, ऎकुन त्यांचे, दडपून जाई छाती त्यातून हर्बल पेस्ट-कंट्रोलची, सदैव राही भीती तरिही नाना बरे, कितीही आली संकटे जरी दिवसागणती त्यांची वाढे, जाडी-ढब्बी ढेरी भरल्या वजनी कुशी बदलणे, नाही राहिले सोपे नानांना मुळी कळतच नाही, आम्ही चावलो कोठे पुरेत गप्पा, झोपा आता, ढेकणोबा भरती रागे गोंधळ तुमचा ऎकून नाना, खाडकन झाले जागे

वाचने 5380 वाचनखूण प्रतिक्रिया 19

आमोद शिंदे Sat, 01/29/2011 - 08:33
गणेशा आणि प्रकाश१११ ह्यांनी डॉमीनेट केलेल्या काव्य प्रकारात तुमचे डास ढेकूण आणि झुरळे क्रांती करतील आणि आमची सुटका करतीत अशी अपेक्षा.

विजुभाऊ Sat, 01/29/2011 - 12:19
1 टीपः हे चित्र विकीवर पूर्वप्रकाशीत आहे. तेथूनच हे इथे चढवले गेलेले आहे.

In reply to by विजुभाऊ

अवलिया Sat, 01/29/2011 - 12:26
कसला गोड दिसतोय !! संपादन किंवा अन्य कुठल्याही बाबतीत संपादकीय कारवाईचा उल्लेख टाळावा. यापुढे असे प्रतिसाद काढून टाकले जातील. - नीलकांत

In reply to by टारझन

नरेशकुमार Sun, 01/30/2011 - 08:08
घरी करुन खानार हायेस की भायेर जाउन खानार हायेस ? घरी करनार असशील तर फटु सहीत ढेकृ आली पायजे.