थंडीपासुन बचाव

अवलिया काथ्याकूट
राम राम मंडळी सध्या मरणाची थंडी पडली आहे.. कुड कुड करत रात्रभर थंडी वाजते.. दातावर दात आपटतात दिवसा सुद्धा गारठा जाणवतो शरीर नुसतं गार पडतं. बोट वाकडी होतात नुसतं बसुन रहावंसं वाटतं असं वाटत की आता संपला कार्यभाग... छ्या ! या थंडीपासुन बचाव करण्याचे साधे सोपे, कठीण अवघड जे जे काही उपाय असतील ते सांगा बरे... आपलाच (गारचटलेला) नाना

60 टिप्पण्या 10,377 दृश्ये

Comments

चिंतामणी नवीन

काय हो. तुम्हाला काय उपाय सुचवायचे थंडी घालवायचे. :( आणि ते सुध्दा जाहीरपणे????? :-/ ;)

छोटा डॉन नवीन

In reply to by परिकथेतील राजकुमार

+१ हेच म्हणतो, अजुन काही बोलण्यासारखे रहात नाही :) - छोटा डॉन

परिकथेतील राजकुमार नवीन

In reply to by अवलिया

मी थंडीपासुन बचाव मागितला होता... जन्मठेप नाही. कॉलिंग युयुत्सु !
मग ह्यापुढे असले प्रश्न विचारताना नको असलेल्या उत्तरांची यादी पण देत जा. हरामखोर माणूस ! उगाच आमचे टंकनश्रम फुकट घालवले.

अवलिया नवीन

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>>मग ह्यापुढे असले प्रश्न विचारताना नको असलेल्या उत्तरांची यादी पण देत जा. ओके >>>हरामखोर माणूस ! संपादक कृपया लक्ष द्या ! शिवीगाळ चालायला मिपा हे प्रगल्भ संस्थळ नाही. >>>उगाच आमचे टंकनश्रम फुकट घालवले. खवमधे तांदुळ नव्हते पाठवले.. प्रतिसाद द्या म्हणुन,

परिकथेतील राजकुमार नवीन

In reply to by अवलिया

संपादक कृपया लक्ष द्या ! शिवीगाळ चालायला मिपा हे प्रगल्भ संस्थळ नाही.
प्रगल्भ संस्थळ म्हणजे काय? आणि मिपा प्रगल्भ नाही हे ठरवणारे तुम्ही कोण ? साधे फेसबुक म्हणजे काय हे माहिती नसणार माणूस अशी विधाने करुच कशी शकतो ?
खवमधे तांदुळ नव्हते पाठवले.. प्रतिसाद द्या म्हणुन,
धागा सार्वजनीक काढलात ना? ह्यापुढे तुमच्या लेखनावर कोणी प्रतिसाद द्यावेत आणि कोणी नाही त्याची पण यादी देत जा.

अवलिया नवीन

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>>प्रगल्भ संस्थळ म्हणजे काय? अभ्यास वाढवा. >>>आणि मिपा प्रगल्भ नाही हे ठरवणारे तुम्ही कोण ? अभ्यास झाला की तुमचे तुम्हाला कळेल. >>>साधे फेसबुक म्हणजे काय हे माहिती नसणार माणूस अशी विधाने करुच कशी शकतो ? असंबध्द तुलना. तस्मात दुर्लक्ष. >>>धागा सार्वजनीक काढलात ना? ह्यापुढे तुमच्या लेखनावर कोणी प्रतिसाद द्यावेत आणि कोणी नाही त्याची पण यादी देत जा. संपादक मंडळास विनंती आहे त्यांनी धाग्यामधे प्रतिसाद कुणी द्यावे याची निवड करण्याची सोय उपलब्ध करुन द्यावी. धन्यवाद

चिंतामणी नवीन

In reply to by परिकथेतील राजकुमार

शेक्सीपरच्या शब्दात बोलायचे तर परा You too?????????? (चाणाक्ष मिपाकरांनी योग्य तो अर्थ घ्यावा) ;)

गणपा नवीन

लगीन कर रे नाना . आणि हो बायको आयटीतली कर म्हणजे बायकोने सांगीतलेली घरकाम करण्यात सगळी थंडी कुठच्या कुठे पळुन जाईल. (बायको नॉन आयटी वाल असुनही अणुभवी)-गणा उप्स पर्‍याने आधीच सुचवल आहे मनावर घ्याचं आता ;)

अवलिया नवीन

In reply to by गणपा

च्यामारी ! अर्धी लाकडं मसणात गेली.. आता कशाला लगीन करुन व्याप वाढवायचा ! बाकी उपाय सुचवा मंडळी ! अघोरी उपाय नको..

केशवसुमार नवीन

In reply to by अवलिया

म्हणजे नानाशेठ, मसणात लाकड कमी पडता आहेत !!.. तरीच तुम्हाला थंडी वाजतेय.. परा-गणपा ने सुचवलेला उपाय करा ..उरलेली लाकडपण पोचतील मसणात.. मग थंडी वाजायची नाही.. बाकी चालू दे.. (अघोरी)केशवसुमार

सुहास.. नवीन

In reply to by केशवसुमार

उरलेली लाकडपण पोचतील मसणात.. मग थंडी वाजायची नाही.. >>> अगगगग !! टिपीकल गुर्जींचा आहेर ! बाकी लाकडांची पचाइत झाली. नान्या गेला, असा उसासा टाकुन, दोन ब्रॅन्डीचे थेंब, कावेरीतुन पुर्व दिशेला उडविल्या जातील याची नोंद घ्यावी

अवलिया नवीन

In reply to by सुहास..

>>>नान्या गेला, असा उसासा टाकुन, दोन ब्रॅन्डीचे थेंब, कावेरीतुन पुर्व दिशेला उडविल्या जातील याची नोंद घ्यावी तुम्हाला पोहचवुन त्याची क्वार्टर मारुन मगच आम्ही मरु ! काळजी नसावी.

अवलिया नवीन

In reply to by केशवसुमार

केसुशेट तुम्ही तर आम्हाला मसणात पोचवायला देव पाण्यात घालुनच बसला आहात हे माहित आहे. एकदाचे मेलो म्हणजे सुटले तुम्ही... करा मग रोज मजाकरा ! मटार उसळ खा ! शिकरण करुन खा !!

केशवसुमार नवीन

In reply to by अवलिया

नानाशेठ, आम्ही देव पाण्यात घालून प्रॉब्लेम सुटले असते तर मग काय... पण तसं होत नाही ना.. आम्ही आपलं 'लग्न करा' हा थंडीवरचा उपाय कसा असू शकेल ह्याचे विश्लेषण केले.. बाकी चालू दे.. (बर्फातला)केशवसुमार

छोटा डॉन नवीन

In reply to by केशवसुमार

>>आम्ही देव पाण्यात घालून प्रॉब्लेम सुटले असते तर मग काय... पण तसं होत नाही ना.. एवढं मात्र पटलं. च्यायला नाना जाईल म्हणुन एवढा वेळ देव पाण्यात घालुन ठेवले आहेत की आता त्यांना थंडी वाजत असेल, जाऊ देत, असो. बरं, नान्या आता बरं आहे का रे ? बाकी चालु द्यात ( सौजन्य : आजानुकर्ण ) - छोटा डॉन

अवलिया नवीन

In reply to by छोटा डॉन

>>>च्यायला नाना जाईल म्हणुन एवढा वेळ देव पाण्यात घालुन ठेवले आहेत की आता त्यांना थंडी वाजत असेल, जाऊ देत, असो. स्वेटर घाला त्यांना !! >>>>बरं, नान्या आता बरं आहे का रे ? जरा बरे आहे.. गणपाशेटने दिलेला उपाय केला आहे बाकी तुम्हाला गजकर्ण कसा काय झाला?

विंजिनेर नवीन

इकडे या. :) लगेच मुंबईतला उन्हाळा का संपला असे वाटेल :) (-५ सें) विंजिनेर. आणी हो, ते लग्नाचे वगैरे मनावर घेऊनच येणार असाल तर येताना जरा फराळाचं तरी घेऊन या. (फुक्टा पण पौष्टिक) विंजिनेर

यकु नवीन

अंगावरचे कपडे काढून टाका आणि अंगाला राख फासून थंडीत राहाण्याचा सराव करा.. ;-) तुमच्या नावावरून तुम्हाला हे सांगण्याची तसे पाहाता काही आवश्यकता नाही..

चिंतामणी नवीन

In reply to by यकु

मी एकटाच सभ्य निघालो. नाना, माझा पहीला पोस्ट बघुन टॉपिक डिलीटायची रीक्वेश्ट सं.मं.ला पाठवली असती अशी वेळ आली नसती. :(

नावातकायआहे नवीन

>>आता कशाला लगीन करुन व्याप वाढवायचा ! थंडीपुरती टेंपरवारी सोय बघा. इंडस्ट्रियल ग्रेड 'हिटर' आना. ;-)

विजुभाऊ नवीन

लग्न करा आता. नान्या... परा आणि डॉन्या या अनुभवी लोकानी तुला सल्ला दिलाय ना. रामदासानी बोहोल्यावरुन पलून गेल्यानन्तर देखील " प्रपंच करावा नेटका" असे लिहीले. रामदासांच्या नन्तर असे म्हणू शकणारे हे दोघेच. अवांतरः रामदास स्वामी ज्या गडावर रहायचे त्या गडाचे नाव सज्जन गड होते. परा आणि डॉन्या ज्या गडावर रहातील त्या गडाचे नाव काय ठेवायचे

सुहास.. नवीन

In reply to by पर्नल नेने मराठे

स्वेत्र विनुन पाथ्वला असेल गनपाने >>> ही चुचु आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त हुशार आहे ! नान्या आता बोल !! तुला पुर्वेकडचा कावळा शिवेल ब्वा आता !! ;)

utkarsh shah नवीन

घ्या २ घोट (थंडी जाण्यासाठी आणि बाकीची तुमच्या जबाबदारीवर)

विनायक प्रभू नवीन

लग्न करायची काहीही गरज नाही. तो पिक्चर बघितला नाहीत का? तो हो, श शी कपुर, शत्रुघन शिन्हा, श र्मिला टॅगोर. ते गाणे आठवा हो. तेरा मुझसे था पहीलेसे नात कोई.

विनायक प्रभू नवीन

आल ध्यानात. 'आ गले लग जा' पिक्चर मधे थंडी शर्मिला ला वाजते. आणि ती घालवायचे श्रम शशी ला करावे लागतात.

आत्मशून्य नवीन



बिडी जलायलेsssssssss
जीगरसे अवलीयाsssssssss
जीगरमा बडी आग है..........


सुधीर काळे नवीन

नानासाहेब, भेसळविरहित (म्हणजे पाणी वगैरे न घालता) ब्रँडी किंवा कोनियकचे ६० मि.लि.चे दोन शॉट मारा! म्हणजे हळू-हळू नाहीं तर "उचलला ग्लास ओतला घशात" या स्टाईलवर! यशाची खात्री!! पण त्या आधी काश्मीरपासून मात्र मैल-मैल दूर जा हं!

देवदत्त नवीन

घरात शेकोटी करा. जास्तच थंडी वाटल्यास त्या आगीतच (जवळ नाही) हात शेका. कधीच थंडी लागणार नाही. बाकी मूळ मुद्यावर.. लहानसा हीटर विकत मिळतो तो आणा.

परिकथेतील राजकुमार नवीन

In reply to by देवदत्त

घरात शेकोटी करा. जास्तच थंडी वाटल्यास त्या आगीतच (जवळ नाही) हात शेका. कधीच थंडी लागणार नाही.
शक्यतो शेजार्‍याच्या घरालाच आग लावता आली तर उत्तम.

देवदत्त नवीन

In reply to by परिकथेतील राजकुमार

शक्यतो शेजार्‍याच्या घरालाच आग लावता आली तर उत्तम. :D आपले घर खेटून नको त्या घराला. (आणि Love Thy Neighbour चे काय?)

पंगा नवीन

In reply to by देवदत्त

(आणि Love Thy Neighbour चे काय?)
शेजार्‍याच्या/शेजारणीच्या घराला आग लावून, मग ते भस्मसात झाल्यावर त्याला/तिला आपल्या घरात (कायमचे?) आणून मग त्याच्यावर/तिच्यावर प्रेम करायला कोणीही नाही म्हटलेले नाही, असे वाटते. डिस्क्लेमरः हा सल्ला नाही. नाहीतर आमच्या त्या मूर्ख पेलिनबाईने वीस खासदारांच्या मतदारसंघांवर बंदुकीच्या क्रॉसहेअरचे चित्र लावल्यावर एका महामूर्खाने खरोखरच त्यांपैकी एका खासदारणीवर गोळी झाडली, त्याचप्रमाणे अवलियाने (अवलियाला महामूर्ख म्हणण्याचा हेतू नाही. निदान अजूनतरी. म्हणजे, दुसर्‍याच्या सल्ल्यावरून खरोखरच तिसर्‍याच्या घराला आग लावत नाही, तोपर्यंत तरी.) जर खरोखरच शेजार्‍याचे/शेजारणीचे घर जाळून त्याला/तिला आपल्या घरी कायमचे राहायला बोलावले, तर चिथावणीचा आळ आमच्यावर यायचा. सार्वजनिक मंचांवर - मग ते वेबसाइटवर असो, ट्वीटमधून, प्रतिसादांतून, खरडवहीत, किंवा आणखी कोठे किंवा कसे - काहीबाही बेजबाबदारपणे लिहिल्यास (किंवा चित्रे डकवल्यास, वगैरे) त्याचे सार्वजनिक परिणाम असतात, ते असे! (अर्थात, मूर्ख पेलिनबाईला हे कधी कळण्याची अपेक्षा नाही म्हणा. आणि आता कळून उपयोगही नाही. द डॅमेज हॅज़ बीन डन.)

गांधीवादी नवीन

अवलिया साहेब, इथे एक उपाय सुचविलेला आहे. असे धार्मिक ग्रंथांचे ज्वलन केल्याने काही जातींच्या/लोकांच्या मनातील काही क्लेश दूर होणार असतील तर हि नक्कीच काही मोठी किंमत नाही. तथापि त्यांनी ग्रंथ ज्वलन करण्याअगोदर खालील बाबींचा विचार करावा. १) ज्वलन काळजीपूर्वक करावे. ज्वलन केल्याने उपस्थित असलेल्या कोणाही बांधवास इजा होऊ नये. २) ज्वलन करण्यास काही प्रती कमी पडत असतील तर कळवावे, आमच्याकडे काही प्रती आहेत, त्या आणून देऊ. ३) विनाकारण जास्त प्रतींचे ज्वलन करू नये. (ग्लोबल वार्मिंग धोक्याची घंटा देत आहे) ४) जर काही लोक आजकालच्या थंडीत कुडकुडत असतील तर प्रतींचे ज्वलन त्यांच्या इथे करावे, जेणेकरून त्यांना त्याची उब मिळेल.