भाषाशुद्धी, शुद्धलेखन, मते-मतांतरे वगैरे वगैरे...
In reply to मस्त मुद्दे उपस्थित by मन
शुद्धलेखन, भाषाशुद्धी इ. इ. संदर्भात मिसळपाव वर चाललेल्या वेगवेगळ्या चर्चा लक्षात घेता बरीचशी मते पूर्वग्रहदूषित आहेत हे मला जाणवते. एकीकडे शुद्धलेखनाचा आग्रह नको म्हणताना दुसरीकडे मात्र रुळलेल्या फारसी, इंग्रजी शब्दांऐवजी मात्र सहज वापरता न येण्याजोगे शब्द सुचवणे असा विरोधाभास इथे दिसतो.स्स्सही!! आपला तो बाब्या आणि दुसर्यांचे ते कार्टे हा मराठी बाणा येथेही दिसला. १) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का? मुद्दा पहिला: केवळ संस्कृत भाषेचा आहे असे वाटत नाही. मराठी भाषा हे अनेक संस्कृत, प्राकृत आणि परदेशी भाषांचे मिश्रण असावे. तसे म्हणायला गेले तर संस्कृत भाषा तरी स्वदेशी का म्हणावी? अफगाणिस्तान आणि त्याही पलीकडील प्रदेशातून अवेस्तासदृश भाषा तथाकथित आर्यांनी भारतात आणली असावी. तिला संस्कृत म्हणण्याचे धाडस करणे मला अयोग्य वाटते. आता, या भटक्या लोकांची मानसिकता बघू किंवा त्या आधी तिथून पुढे वसलेल्या लोकांची मानसिकता बघा. द. आशियात आणि भारताच्या पूर्व किनार्यावर येथिल लोक वसल्याचे सांगितले जाते. उदा. ख्मेर घराणे किंवा पल्लव राजघराणे. दोघांचा इतिहास असा की येथे स्थलांतरित झालेले हे तथाकथित आर्य/ ब्राह्मण इ. मूळ लोकांत मिसळून गेले. त्यांनी स्थानिक बायकांशी लग्न केले आणि स्थानिक राजकारणात-समाजकारणात भाग घेऊ लागले. भाषा, कला, साहित्य यांना त्यांनी आपलेसे केले. त्यानंतर हजारो वर्षांनी आलेल्या पारशांनी स्थानिक बायकांशी लग्न केले नसले तरी ते येथील संस्कृतीत मिसळून गेले. भाषा शिकले. याच प्रमाणे आर्यांच्या टोळ्याही भारतात येऊन वसल्या आणि येथील लोकांत मिसळल्या. कोठेही घनघोर युद्ध इ. झालेले दिसत नाही. दौपदी, तात्यांचे लाडके कृष्णद्वैपायन व्यास ;), कृष्ण इ. यामुळेच रंगाने सावळे आहेत. हा फाफटपसारा सोडून पुढे पाहिले तर त्यांनी आणलेली भाषा येथील स्थानिक भाषेशी मिळून संस्कृत भाषेची निर्मिती झाली असावी असे मला वाटते आणि हा निष्कर्ष खरा मानला तर संस्कृत ही भाषा स्वदेशी म्हणता यावी पण मग प्राकृत तिची आई असे म्हणणे अयोग्य ठरू नये. असो, मला मराठी ही भाषा केवळ संस्कृत भाषेतून जन्मली हे पटत नाही. प्राकृत भाषांचा प्रभाव मराठी आणि संस्कृत दोहोंवर असावा. मुद्दा दुसरा: मध्ययुगीन काळात सैन्यात असणे ही एक महत्त्वाची नोकरी गणली जाई. भाषांचे संकर सैन्याच्या छावणीत झाले असे म्हणणे अयोग्य ठरू नये. मराठी भाषेत फारसी, उर्दू, अरबी शब्द येण्यास येथे सुरूवात झाली असावी. मुद्दा तिसरा: ब्रिटिश येऊन काही शे वर्षे झाली. परंतु, मराठी भाषेत मिसळलेले इंग्रजी शब्द पाहता आणखी हजार वर्षांनी मराठी भाषा ही आंग्लोत्भव आहे असा आडाखा बांधणे अशक्य ठरणार नाही आणि जर कोणी तसा आडाखा बांधू इच्छित नसेल त्यांनी संस्कृत आपली आपली म्हणून घोष का करावा? २) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का? हो असे जाणवते. उदा. परवाच एका स्नेह्यांनी प्रत्युत्त्पन्नमती या (मराठी?) शब्दाचा अर्थ विचारला. वाक्य वाचले असता त्याचा अर्थ मला हजरजबाबी असा वाटला. माझ्यामते प्रत्युत्त्पन्नमती या टंगट्विस्टरपेक्षा हजरजबाबी हा शब्द वापरणे मला आवडेल. ३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का? नेहमीच नाही आणि बोलताना नाही पण कधीतरी लिहिताना ध्यानात येते. ४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का? अजिबात नाही आणि तसे करणार्या महाभागांवर मला नेहमी हसू येते. जो शब्द मुळात भाषेत नाहीच, तो संस्कृतातून हुडकून आणण्याची कला मला नाही आणि शिकायचीही नाही. ५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का? जर ते शब्द सोपे सुटसुटीत असतील तर हो. मागे एका महाशयांनी सिगरेटला श्वेतवर्णीधूम्रकंडिका असा शब्द सुचवला होता, तर दुसर्या एका ठिकाणी कॉजवे साठी काजवाट हा शब्द सुचवला होता. मला काजवाट हा शब्द आवडला. ६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? ) एकदाच वाचला. कुडोस टू मराठी वेबसाईट्स! मी टीव्हीवर अर्ध्या तासाची सिरिअल पाहते. ७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय? हो! मागच्या हिवाळ्यात बाहेर ४ डी फॅ. असताना टायर बदलले आहे. ८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का? नाही. ९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का? नाही १०) तुम्ही काल घरी फोन केला होता का? नाही पण माझ्या डॉक्टर भाचीला जी इथे टुरिस्ट विसावर आली आहे तिला सेलफोन वरून लॉग डिस्टन्स कॉल केला होता. ११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का? नाही आता मी स्वत्:ची कार वापरते. १२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ' स्वतःच्या करमणुकीसाठी अवांतरः माझ्या उत्तरांत जे मराठी आहे तेच मराठी मी ही चार संकेतस्थळे सोडून सहसा बोलते.
In reply to शुद्धलेखन, by प्रियाली
In reply to अवांतर by विकास
In reply to स्थलांतर by प्रियाली
In reply to यस्स! by मन
In reply to अरे मनोबा by प्रियाली
In reply to टायर by मनस्वी
In reply to पण तसं रुढ by मन
केलं तसच मराठित बिघडलं कुठं बॉस?नाही बिघडलं, चालून जाईल. :)
In reply to पास- नापास by विजुभाऊ
In reply to भाषाविकास by विकास
शेवटी भाषा ही वापरण्याने मोठी होते.हेच सत्य असेल आणि इंग्रजी भाषा इतर भाषीक शब्द सामावून घेत असेल तर ते नवे शब्द आपणही सामावून न घेता संस्कृतप्रचूर आणि संस्कृतोद्भव शब्द "नव्याने" तयार करण्याचा अट्टहास का ते कळेल का?
In reply to जर by प्रियाली
In reply to सहमत by कोलबेर
In reply to जर by प्रियाली
In reply to अट्टहास by विकास
संस्कृत असण्याच्या अट्टहासापेक्षा (तो करणारे आहेतच पण) उगाच नसण्याचाच जास्त अट्टहास होत असल्यासारखे दिसते.हे मात्र पटले नाही. मूळ मुद्दा आहे इतर भाषेतील शब्द मराठीत येण्याचा. ते शब्द इतर संस्कृत सोडून इतर कुठल्याही भाषेतील असले तर लगेच बर्याच जणांचा झिनोफोबीया बळावतो आणि तेच जर संस्कृतमधले असले तर मात्र लगेच 'संस्कृत ही मराठीची जननी' असा युक्तिवाद करुन स्विकारण्याकडे कल असतो. त्यामूळे 'संस्कृत हवे' हा अट्टहास (मला तरी) अधिक वाटतो.
In reply to अट्टहास by विकास
संस्कृतप्रचूर शब्द हे मुद्दामून संस्कृत म्हणून केले जात नाहीत तर तो तुम्हाला आवडो-न-आवडो, पटो - न पटो, मराठी आणि भारतीय भाषांतील मूळ भाग आहे.हे शब्द का आले? लक्षात घ्या, संस्कृताशी आणि संस्कृत शब्दांशी मला काहीही वाकडे नाही परंतु साधे मराठी शब्द मिळत असता संस्कृतातून अवजड शब्द शोधणे, प्रचलीत आणि नव्याने आलेल्या इंग्रजी शब्दांना संस्कृतच वाचवू शकते असा ग्रह करणे (करून ठेवणे) हे अयोग्य वाटते.
म्हणून वाटते की संस्कृत असण्याच्या अट्टहासापेक्षा (तो करणारे आहेतच पण) उगाच नसण्याचाच जास्त अट्टहास होत असल्यासारखे दिसते.दुर्दैवाने, आपल्याला असे वाटते म्हणजे इतर काय म्हणतात याकडे आपले दुर्लक्ष होऊन फक्त चर्चा भरकटली, इतरांनी विरोध केला याकडेच आपले लक्ष केंद्रित झालेले वाटले.
In reply to संस्कृतप्रचुर शब्द by प्रियाली
In reply to सिगारेट ला by विजुभाऊ
In reply to विडी आणि सिगरेट by कोलबेर
In reply to भाषाविकास by विकास
In reply to ट्यांव ट्यांव! by विसोबा खेचर
In reply to ट्यांव ट्यांव! by विसोबा खेचर
नायतर जा वेलणकरकडे! तिथे सगळे तुटून पडतील भाषा व व्याकरणविषयक चर्चांवर! 'आम्हाला तात्याने तुझ्याकडे पाठवलंय!' असं सांगा हवं तर वेलणकरलाअहो मिसळपावावरचे छुपे मनोगती कोण हे शोधण्यासाठीच अशा चर्चा करत होतो =)) कधी हाकलपट्टी करायची सांगा.
साला ज्याला ज्या भाषेत बोलायचं असेल, जसं बोलायचं असेल तसं तो बोलेल!! भाषा ही कुणाच्या मालकीची नाही! ती प्रत्येकाची आहे! च्यामारी आमच्या बहिणाबाईं जळ्ळ्या कुठे गेल्या होत्या हो भाषाविषयक भसाभसा चर्चा करायला?हो ना आणि कधी संस्कृतप्रचुर प्रतिशब्द शोधत होत्या असेही ऐकलेले नाही :P :))
In reply to माझी उत्तरं!.. by विसोबा खेचर
In reply to मते by चित्रा
In reply to भाषांचे उष्टे खरकटे by तळेकर
मस्त मुद्दे उपस्थित