१. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे
तो दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे १९९५ ऑक्टोबर ला आल्यापासून मग अनेक वर्षे की काय तो एका थिएटराला चालला... आम्ही १९९५ मध्ये सुट्टीत पाहिल्यानन्तर पुन्हा कॉलेज ग्रुपबरोबर परत पाहिला... इतरांना जाम आवडला... पण कथेच्या दृष्टीने दोन तीन घटना तर अजिबात डोक्यात गेल्या...
माझ्या माहितीप्रमाणे लग्नघरातल्या वधूवर डोळा ठेवून तिथे स्वतःचे लग्न तिच्याशी लावण्यासाठी उपस्थित राहण्याची फ्याशन या सिनेमाने सुरू केली...जी पुढे कुकुहोहै, जप्याकिहोहै सारख्या अनेक सिनेमांमध्ये सुद्धा दिसली. ते जाऊदे...
आणि ती हिरॉईन तरी कसली हो... अहाहा......म्हणजे बापाला वाईट वाटू नये म्हणून त्या दुसर्या नवर्याच्या फ्यामिलीची आणि त्या नवर्याचीच वाट लावायची, आणि त्यांच्या नकळत प्रियकराबरोबर गुण उधळायचे, प्रेमगाणी गात शेतांमध्ये हिंडायचे...च्यायला टू टायमिंग करणारी , शुद्ध फसवणूक करणारी (आणि त्याचे उदात्तीकरण करणारी) ही हिरॉईन.... प्रेमं करायची अक्कल आहे पण ते बापाला सांगायची, त्याला ते पटवून द्यायची अक्कल नाही, त्यासाठी जे काही सहन करावे लागेल , त्रास भोगावा लागेल त्याची भीती वाटते म्हणून ही बापाने ठरवलेल्या भारतातल्या मुलाशी लग्न करायला परवानगी देते ...आणि आपला यार आला की मग लपून छपून करा मज्जा... तिची आई त्यातल्या त्यात बरी, की ती म्हणते " पळून जा बाबा इथून या पोरीला घेऊन " पण हा हीरो तरी काय हो, तिच्या आईला वर तोंड करून सांगतो की " जगात अडचणी आल्या की सोपे आणि कमी कष्टाचे मार्ग असतात पण ते चुकीचे असतात "वगैरे वगैरे , म्हणजे तात्पर्य काय की हा तिच्या बापाला आपल्या चांगल्या वागण्याने जिंकून घेईल... आणि त्याच्याकडूनच लग्नाला परवानगी मिळवेल...
...
ठीक आहे, आता कथा इथपर्यंत चढवत नेलीय ना, तर शेवटी काहीतरी अजबच घडते....
-------------ती रेल्वे स्टेशनातली मारामारी घडते मग हा आपल्या बापाला म्हणतो की चला परत जाऊ...गाडीत चढतो , गाडी स्पीड पकडते आणि मग तिचा बाप तिचा घट्ट धरलेला हात सोडून देतो आणि म्हणतो जा...मग ती पळत जाऊन गाडी पकडते वगैरे...
----------------------- पण इथे मुख्य प्रश्न हा की बापाने तिला जायची परवानगी का दिली असेल??
आमचा अंदाज ...........त्या १५ २० सेकंदातले अमरीश पुरीचे स्वगत
" याला आधीच चांगला पिटून काढला बरे झाले....ही ही पोरगी पण एक नंबरची अडाणी...आमच्या या मूर्ख पोरीने इतके गुण उधळले आहेत की सगळ्या गावात आता बदनामी झाली आहे.... कोण बोंबलायला आता हिच्याशी लग्न करणार आहे देव जाणे...
आणि हा भडवा तर बापाबरोबर चालला...ह्याच्यायला ह्याच्या... हा कसला जातोय? हा थांबणार... थांबायलाच पाहिजे यानं... अरे महिनाभर बोंबलत इथे रंगढंग केलेस ना आमच्या नकळत ? तुला भाड्या आता जबाबदारी नको घ्यायला ? खुशाल हिला अशीच टाकून जातोस ? काय की... अरे गाडी सुटली की रे...उतर रे उतर...चाललाच वाटतं...जरासा वेडझवाच दिसतो हा ... हं.... किंवा भलताच पोचलेला आहे ... साल्याला माझी गोची कळलीय वाटतं... खरंतर असल्या मूर्ख, नालायक, वेंधळ्या आणि फ़सवणूक करणार्या या माणसाची अजिबात लायकी नाही...पण आता आपल्या मूर्ख आणि बदनाम पोरीला तरी कोण मिळणार याच्यापेक्षा बरा?? खोटारडा असला तरी पैसेवाला एकुलता एक लंडनचा आहे... आता सोडावं झालं पोरीला..."....
जा बाई जा...
म्हणजे आता काय झालं ?
मुलाचा चांगुलपणा, हुशारी, सचोटी , मेहनती वृत्ती , प्रामाणिकपणा वगैरे आवडून बाप प्रभावित झाला नाही तर " माझ्या बदनाम पोरीशी लग्न करायला कोण येणार आता?" या भावनेने नाईलाजाने तो यांच्या लग्नाला तयार झाला असे वाटते...
मग हीरोने हिरॊईनच्या आईपुढे मारलेले डायलॊग सगळे गेले ना बाराच्या भावात... मग सिनेमाचा संपूर्ण दुसरा भाग ज्या गोष्टीसाठी बिल्ड अप केला आहे त्याचीच वाट लागली... आणि आम्हाला येडा का बनवले?
महिलांनी चिडण्याच्या आत हे सांगू इच्छितो की आमचा आक्षेप हीरॊईनच्या ( इंटर्वलच्या आधीच्या ) उदात्त वगैरे प्रेमावर नसून तिच्या फ़सवाफ़सवीच्या वर्तनावर आहे... कोणावर कसे ( मानसिक आणि शारिरिक वगैरे ) प्रेम करायचे हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु तिला बापाची भीती वाटते म्हणून एका संपूर्ण कुटुंबाची तिने फ़सवणूक करावी हे अगदीच वाईट...
( अवांतर : माझ्या कॊलेजातील ओळखीच्या एका मुलाच्या साखरपुड्यानंतर लग्नाच्या आधी काही दिवस ती मुलगी तिच्या प्रियकराबरोबर घरातून पळून गेली...या प्रचंड मनस्तापाला कोण जबाबदार ? दिदुलेजा या सिनेमात हीरॊईनचे काही चुकले नाही असे मानणारी ती पोरगी असावी )..
वाचने
50240
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदि
पण
In reply to अगदि by मन
अगदी सहमत
In reply to पण by अन्या दातार
अशा काही कथा परिचितांत झालेल्या आहेत
खोटे बोलून
In reply to अशा काही कथा परिचितांत झालेल्या आहेत by धनंजय
मोकॅम्बो खुष हुआ.....
खूप छान लिहिलं आहे मास्तर...
:)
मुलीचा हात
आमची अजून
हेच
In reply to आमची अजून by भडकमकर मास्तर
सिनेमा नव्हे, पण स्फूर्तिदायक लोककथा
In reply to आमची अजून by भडकमकर मास्तर
अगदी नेमके
In reply to सिनेमा नव्हे, पण स्फूर्तिदायक लोककथा by धनंजय
जबरा!
साथिया च्या राणी मुखर्जी बद्दल काय मत?
मस्त रे
मैं मां बननेवाली हुं.
चुम्माचाटी! :)
In reply to मैं मां बननेवाली हुं. by वेताळ
मास्तुरे...जब्बराट
हा हा हा हा हा
आणि हो
In reply to हा हा हा हा हा by झकासराव
काय रे ?
In reply to हा हा हा हा हा by झकासराव
मास्तर..... ज
सहमत
In reply to मास्तर..... ज by राजे (verified= न पडताळणी केलेला)
'हम दिल दे चुके सनम'
हे...हे...हे....
In reply to 'हम दिल दे चुके सनम' by मेघना भुस्कुटे
एकदम खरंय...
In reply to 'हम दिल दे चुके सनम' by मेघना भुस्कुटे
:)
In reply to एकदम खरंय... by भडकमकर मास्तर
सुधारणा
In reply to :) by विसोबा खेचर
(हाच
In reply to सुधारणा by मन
हाच
In reply to सुधारणा by मन
मास्तर.. हा
In reply to एकदम खरंय... by भडकमकर मास्तर
मस्तच!!!
हाण तिच्यामारी......
In reply to मस्तच!!! by चावटमेला
धम्या शी
In reply to हाण तिच्यामारी...... by धमाल मुलगा
साजन
सही.
मस्त आहे...
मस्त आहे...
हम दिल दे चुके सनम...
++१
In reply to हम दिल दे चुके सनम... by मनिष
फारच छान
In reply to हम दिल दे चुके सनम... by मनिष
नाही पटले खरे
In reply to हम दिल दे चुके सनम... by मनिष
मला समजते आहे....
In reply to नाही पटले खरे by मेघना भुस्कुटे
कभी अलविदा ना केहना
In reply to मला समजते आहे.... by मनिष
कभी अलविदा ना कहना...
In reply to कभी अलविदा ना केहना by मेघना भुस्कुटे
मुळात
In reply to कभी अलविदा ना केहना by मेघना भुस्कुटे
अगदि बरोबर
In reply to हम दिल दे चुके सनम... by मनिष
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे...
काही खरच डोक्यात जाणार्या सिनेमांच्या कथा...
चुकीची दुरूस्ती...
In reply to काही खरच डोक्यात जाणार्या सिनेमांच्या कथा... by मनिष
काही खरच डोक्यात जाणार्या सिनेमांच्या कथा -- बेनाम बादशाह
हिडीस बादशहा
In reply to काही खरच डोक्यात जाणार्या सिनेमांच्या कथा -- बेनाम बादशाह by मनिष
अजून एक सिनेमा ...........लक्ष्य..
अस्साच एक
अगदी अगदी
In reply to अस्साच एक by ऋचा
खि खि खि
In reply to अगदी अगदी by मेघना भुस्कुटे
दिल क्या करे
>>> लक्ष्य
'लक्ष्य'
अगदी
In reply to 'लक्ष्य' by मेघना भुस्कुटे
_मग एकदम
In reply to 'लक्ष्य' by मेघना भुस्कुटे
आता थोडं
अहं
In reply to आता थोडं by भडकमकर मास्तर
आता हे
In reply to अहं by मेघना भुस्कुटे
कदाचित
In reply to आता हे by भडकमकर मास्तर
दुसरा धागा
असहमत...
तुझ्या
In reply to असहमत... by छोट्या
हा हा!!!
In reply to तुझ्या by भडकमकर मास्तर
सहमत
In reply to हा हा!!! by छोट्या
हा हा हा
In reply to सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
हम दिल चुके????
स्वप्न आणि वास्तव
एखाद्या
In reply to स्वप्न आणि वास्तव by मध्यमवर्गीय
हाहाहा! फारच भारी! लेख आणि
धमाल लेख आहे
झ्याक...
मास्तर
दुरुस्ती...
In reply to मास्तर by चिंतामणी
ब्याक इन फॉर्म
In reply to दुरुस्ती... by भडकमकर मास्तर
:-D
मास्तर फुल्ल फोर्म मध्ये.....
मिपावर कधीकाळी संयतपणे