मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उपवासाचे खमंग थालीपीठ...

डावखुरा · · पाककृती
उपवासाचे खमंग थालीपीठ... पुर्वतयारी : राजगिरा,भगर,साबुदाणा समप्रमाणात घेउन भाजुन घ्या.. त्यात धणे,जिरे घालुन दळुन घ्या.. कृती : भाजणीचे पीठ, तिखट, मीठ, दाण्याचे कुट, दही/लिंबु, कोथिंबिर मिसळुन गोळा बनवुन घ्या.. गरम झालेल्या तव्यावर थापुन खरपुस भाजेपर्यंत वाट पहा... तयार थालीपीठ...सोबत खोबर्‍याची चटणी किंवा दही... खाद्यलालसा..

वाचने 7142 वाचनखूण प्रतिक्रिया 13

विलासराव 21/11/2010 - 17:42
येउद्या , तसाही तीन दिवस उपवास होताच.

डावखुरा 21/11/2010 - 18:20
विलासराव करुन पहा...अगदी कट्लेट सारखे लागते चवीला.... (अवांतर : जर उपवास नसेल तर टोमॅटो सॉस सोबत खायला कही हरकत नाही डिट्टो कट्लेट... )

पर्नल नेने मराठे 22/11/2010 - 13:08
अग लालसा , रंग पिवळा का दिस्तोय्...हळद घातलिस कि काय्...वाजलेच ३-१३ मग उपासाचे ;)

डावखुरा 22/11/2010 - 14:03
रंग पिवळा हळ्दीमुळे नाही तर बॅकग्राउंड मुळे दिसत असेल कदाचित..आणि छायाचित्र घेताना पण जरा लाईट कमी होता....आणि पनेमतै मी लालसा(कारण लहान आहे..{मेल}) आहे फक्त..अगं नाहीये..

छोटा डॉन 22/11/2010 - 14:14
फोटो जबरदस्त जीवघेणा आहे. एकदम खल्लास !!! मात्र तुम्ही पाकृ फारच शॉर्ट लिहली आहे. सविस्तर पाककृतीसाठी कृपया "उपवासाची साबुदाण्याची बॅचलर थालिपीठे ... उर्फ डॉन्याचा सल्ला हा लेख वाचवा. - ( पाकृचे थालिपीठवाला ) छोटा डॉन