भाषिक संपत्ती
लेखनप्रकार
भाषिक संपत्ती - लहानपणापासुन आवडता असलेल्या विषयावर लिहायला घ्यावे असा विचार केला त्यावेळेस याहुन जास्त समर्पक शीर्षक नाही सुचले.
सध्या शिव्या (किंवा मराठीत ज्याला आपण स्लँग म्हणतो) मर्दानगीचे प्रतिक आहेत असे मौलिक ज्ञान मला नुकतेच मिळाले आहे. त्यामुळे या संपत्तीचे मोलही प्रचंड वाढले आहे.
असे म्हणतात की कुठल्याही भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर प्रथम त्या भाषेतल्या शिव्या शिकुन घ्याव्यात. आमच्यासाठी ही प्रक्रिया फार लवकर सुरु झाली. मायबोलीतल्या काही "मर्दानी" शब्दांवर आम्ही खुप लवकर प्रभुत्व मिळवले. कोल्हापुरात असताना (माझा लेख सुपरहिट्ट होणार. मी कोल्हापुरचा आहे हे सुरुवातीलाच डिक्लेअर करुन टाकले आहे) एकदा पिताश्रींच्या एका सुहृदाने "काय रे कोल्हापुरी झालास की नाही" असा सज्जड प्रश्न विचारला होता. मी पुर्ण भंजाळुन हो असे उत्तर देउन टाकले. त्यावर "मग तु *डेच्या म्हणतो की नाही मित्रांना" असे हसत हसत विचारले. यावर पिताश्रींनीही हसुन प्रतिसाद दिला. त्यामुळे कोल्हापुरी होण्यासाठी मित्रांना *डेच्या म्हणणे निरातिशय आहे हे मला खुप बालवयात कळुन चुकले. दुसर्याच दिवशी मी खुपच प्रेमाने मित्रावर या गोड शब्दाच उपयोग केला. दुर्दैवाने मित्राची आई वर्गशिक्षिका होती आणि तिने आपला असा प्रेमळ उल्लेख ऐकला. त्यानंतर जे काही झाले ते सांगवत नाही (बाई बहुधा पुणेकर असाव्यात. माझ्या भाषास्वातंत्राचे त्यांना जरादेखील कौतुक नव्हते).
या पहिल्याच मर्दानगीच्या प्रयत्नात वर्गभगिनींसमोर गाल लाल झाले होते त्यामुळे भाषेचे धडे थोडे सबुरीनेच घेतले. पण शाळा बदलली. गाव बदलले. त्यामुळे नविन गाव. नविन विटी नविन दांडु (परा इथे अश्लील अश्लील म्हणण्यासारखे काही नाही आहे. हा एक साधा वाक्प्रचार आहे). नवीन गावातली भाषिक वैशिष्ट्ये पण झटकन आत्मसात करुन घेतली. इथे *सडीच्या हा एक नवीन शब्द शिकलो. आता शब्दाचा अर्थ कळण्याचे वय नव्हते ते. त्यामुळे कोल्हापुरात जे झाले तेच नवीन गावातही झाले. आमच्या दामले बाईंना माझे भाषासामृध्य बघुन दम लागला. आधीच बदनाम त्यात आम्ही खुप भरभर बोलायचो. (जिकडेतिकडे नसती घाई. मरणाची घाई. वाघ मागे लागल्यासारखी). एकदा दामले बाई रजेवर असताना दुसर्या बाईंनी शिकवले. रानडे बाईंनी. दुसर्या दिवशी नेमका आदल्या दिवशीचा वृत्तांत सांगण्यासाठी दामले बाईंनी "शिंचे" मलाच उठवले. मी सुरवातीलाच पचकलो "रांडे बाईंनी ना........". त्यादिवशी मी का मार खाल्ला हे मला बर्याच वर्षांनी कळाले.
दोन गावातल्या दोन तर्हा झाल्यामुळे मी खुप सावधपणे बोलायला शिकलो हे मात्र नक्क्की. तिसरे गाव होते साक्षात मध्यप्रदेशातले. इंदौर. इथे बोलण्याचा वेगळाच लहेजा. सगळे कसे अदबशीर. सगळ्यांचा आप आप करुन उल्लेख व्हायचा. लहान मुलांना शिकवले जायचे की सगळ्यांना "जी" लावुन संबोधावे. याचा कधीकधी अतिरेकही व्हायचा. आम्ही एका वाड्यात रहायचो. वाडामालकांचा नातू असेल ४-५ वर्षांचा. त्याच्या आईने त्याला पढवुन ठेवले होते की सगळ्यांना "जी लावायचे". तो मलाही भैय्याजी म्हणायचा (अजुनही त्या आठवणींनी भिती वाटते. चुकुन कोणाल इतिहास कळाला आणि मी भैय्या आहे असा गैरसमज करुन घेतला किंवा तश्या अफवा पसरवल्या तर काय घ्या? जौनपुरला जाउन शिव्या शिकायला लागायच्या.) तर या बबलूने (नाव आठवत नाही मला त्याचे. आपण बबलू म्हणूयात) एकदा सक्काळी सक्काळी आरोळी ठोकली "मम्मीजी टट्टीजी आइजी". यानंतर संपुर्ण वाडा हास्यकल्लोळात बुडाला होता एक आठवडाभर. असो. तर तो मुद्दा नाही. आपण शिव्यांवर आहोत. या शहरात आपण काहीच शिकु शकणार नाही हे मला लवकरच उमगले. एवढे प्रेमळ, अदबशीर लोका काय शिव्या देणार ना? म्हणजे असे बघा की रस्त्यात भांडण चालले आहे. एक दुसर्याला म्हणतो आहे "*डेच्याजी" आणि दुसरा पहिल्याला म्हणतो आहे "*सडीच्याजी" तर कसे वाटेल ना? मटणात बासुंदी ओतल्यासारखे वाटेल की नाही? पण मी साफ चुकीचा होतो.?सपशेल गलत. (मराठी बोलताना अधुन मधुन हिंदी बोलणे गरजेचे असते. उगाच शुद्ध भाषा बोलायला लागलो तर त्यामुळे ब्राह्मणांबद्दल संपुर्ण भारतात गैरसमज होतात म्हणे. आणि त्यामुळे ब्राह्मण मराठा वाद पण वाढीस लागतो असे ऐकुन आहे). तर या इंदौरमध्येही मी एक खुप गोड शिवी शिकलो (इंदौर ना हे . इथले सगळेच कसे गोड, पद्धतशीर, अदबशीर). ही गोड शिवी होती "*त्या". या शिवीचा काय सांगु तुम्हाला अखिल भारतात प्रसार इंदौरी लोकांनीचे केला बहुधा. याही शिवीचा अर्थ मला कळाला नाही. त्यामुळे एका मित्राला खोपच्यात घेउन आधी अर्थ विचारुन बघितला. तर बेणं पुण्याचं निघालं. असले शब्द वापरत नाही आम्ही म्हणालं. पण एकुणात न वापरण्याजोगा शब्द आहे हे मला कळाले. त्यामुळे शिकलो पण आचरणात नाही आणले.
आता इतकी गावं फिरुन जेव्हा मी ठाण्याला गेलो तेव्हा बाकीचे भाषासौंदर्यात किस झाड की पत्ती असेच मला वाटत होते. परत मी तोंडघशी आपटलो. साफ चुक. सपशेल गलत. माझे वर्गबंधु याबाबतीत माझ्या २ पावले पुढे होती. ६वीत असताना, माईंड इट ११ वर्ष वयाची मुले दिवसाची सुरुवात एकमेकांच्या आयाबहिणींची प्रेमळ विचारपूस करुन करायची. आई बहिणीवरच्या यच्चयावत शिव्यांची देणगी इथलीच. पहिलीनंतर भ ची बाराखडी देखील घोकली इथेच. नंतरची ४ वर्षे माझ्या आयुष्यातली सगळ्यात शिवराळ वर्षे होती. साधारण या वयात मुलांनी नाव, गाव, फळ फुल, आडनाव खेळणे अपेक्षीत असते. आम्ही शिव्यांच्या भेंड्या खेळायचो. "अच्चीत गच्ची......" अश्या काही शिव्या असतात हे इथेच कळाले. मजल इथपर्यंत वाढली की आयला आणि च्यायला किंवा च्यामारी या शिव्या आहेत हेच डोक्यात घुसेना. आमच्या वर्गशिक्षिका अश्या काही जबरदस्त हेल काढुन च्यायला म्हणायच्या की शिवी आहे हा इंडिकेटर मेंदुत लागणे बंदच झाले. पुण्यात नंतर एका मित्राने शिव्या देतो असा आरोप केला तेव्हा मी पुरता भांबावुन गेलो की मी नक्की काय शिवी दिली? (हा मित्र आता सहजतेने "भें८८" म्हणतो ही गोष्ट वेगळी). नंतर कळाले की मी च्यायला म्हणलो होतो.
कालौघात मराठी, हिंदी, इंग्रजी अश्या बर्याच भाषेतल्या झोपाळ्यांवर हिंदोळे घेतले. फकारांती शब्द शिकलो. आपण ज्या सहजतेने बोलतो त्याहुन जास्त सहजतेने मुलींना बोलताना बघितले. आणि त्या शब्दातली मजा पण हळुहळु निघुन गेली. वय वाढले तसे हे शब्द, या शिव्या आपली संस्कृती नाही हे कळुन चुकले. कदाचित तोपर्यंत पुण्याला स्थलायन केले होते त्यामुळेही असेल. पण बोलीभाषेतुन शिव्या हद्दपार झाल्या. आयला च्यायला राहिल्या. पण बाकीच्या गेल्या. खरे सांगु का? शिव्या मायभाषेची जवळीक साधुन देतात, त्या मर्दानगीचे लक्षण आहे, ते मित्रत्वाचे प्रतीक आहे वगैरे वगैरे झूट आहे हे कळुन चुकले. आजही शिव्या माहिती आहेत. गाडी चालवताना चुकुन समोरचा रिक्षावाला मध्ये घुसला की अल्लदपणे त्याच्या आइची विचारपूस होउ शकते. पण हा सुसंस्कृतपणा नाही. हा सभ्यपणा नाही. मित्रांशी सलगी दाखवत त्याला घातलेल्या ४ शिव्या आणि भर रस्त्यात मांडलेला भाषेचा हा बाजार यात फरक आहे. आपला मुद्दा सहजपणे, सुसंस्कृतपणे, शिव्या न वापरता समोरच्याला पटवुन देण्यात खरे कसब आहे. सगळे मुद्दे संपल्यावर गुद्दे सुरु करण्यापुर्वी वापरायची भाषा म्हणजे शिव्या.
आजपासुन ५० वर्षांनी शिव्या अस्तित्वात असतीलच. प्रचलितही असतील. १०० वर्षांपुर्वी कदाचित नालायक, हरामखोर या शिव्या होत्या. अजुन ५० वर्षांनी कदाचित शिव्यांचे स्वरूप बदलले असेल. पण आपण संस्कृती संस्कृती जी म्हणतो ती आपल्याला पुलं, शिरवाडकर, कुसुमाग्रज यांचे साहित्य वाचुन आठवेल की या शिव्या ऐकुन? काय म्हणता?
वाचने
19133
वाचनखूण
प्रतिक्रिया
50
मस्त खुसखुशीत !!!
In reply to मस्त खुसखुशीत !!! by मितान
हेच म्हणतो
लेख मस्त !!
हा हा भाषासौंदर्य आवडुन गेले
In reply to हा हा भाषासौंदर्य आवडुन गेले by परिकथेतील राजकुमार
आयला बिकांनी आधीच भला मोठ्ठा
(बा*** ! )मस्त खुसखुशीत लेख
पु. लं. चे 'रावसाहेब' ...
In reply to पु. लं. चे 'रावसाहेब' ... by sagarparadkar
+१
व. पुं. चा 'भांडणारा जोशी' ...
In reply to व. पुं. चा 'भांडणारा जोशी' ... by sagarparadkar
काही हरकत नाही. आजही भावे
In reply to काही हरकत नाही. आजही भावे by मृत्युन्जय
वा वा!! आमच्या शाळेची किर्ती ऐकून कान धन्य झाले..
हॅ हॅ हॅ छान
सै रे !!
ऐला!
_/\_
सही जवाब.... भारी लिवलंय
आठवणी दाटतात
खुसखुशीत लेख
In reply to खुसखुशीत लेख by प्रदीप
क्क्काऽऽय्य???
In reply to खुसखुशीत लेख by प्रदीप
'I woke up at sparrow-fart'
च्यामायला! येकदम ध्वज फडकाव
In reply to च्यामायला! येकदम ध्वज फडकाव by नगरीनिरंजन
अहो ते त्यावरूनच लिहीले होते.
आमि नांगरत आसतांना .. बेलाला
या वाक्यात सगळं आलं...
_/\_ _/\_ _/\_ बाकी का माहीती
झक्कास रे
In reply to झक्कास रे by ३_१४ विक्षिप्त अदिती
अगं मी तर शिव्या देताना माझे
In reply to अगं मी तर शिव्या देताना माझे by मृत्युन्जय
अगदी अगदी!
दिवाळी जवळ आलेली असताना
मस्त लेख!
In reply to मस्त लेख! by पिवळा डांबिस
अलाऊड आहे पण लाऊडली नका देऊ.
अभिनंदन
In reply to अभिनंदन by रन्गराव
जे शिंपडायचे होते ते शिंपडुन
In reply to जे शिंपडायचे होते ते शिंपडुन by मृत्युन्जय
बरोबर आहे
In reply to अभिनंदन by रन्गराव
जमल तर कि बोर्डवर आणि
मस्त लेख! एकदम
नेमक्या शब्दांत मांडलेत
मस्त खुसखुशीत लेख...पण
In reply to मस्त खुसखुशीत लेख...पण by शिल्पा ब
पहिल्यांदा ऐकले तेव्हा कदाचित
पंजाबी..."हलकट..."
In reply to पंजाबी..."हलकट..." by इन्द्र्राज पवार
>>पंजाबी शिव्यांची फार गंमत
In reply to >>पंजाबी शिव्यांची फार गंमत by विश्वनाथ मेहेंदळे
अगदी असेच
In reply to पंजाबी..."हलकट..." by इन्द्र्राज पवार
नाय हो अवांतर नाही व्हायचं.
छान लिहील आहे.
मस्तं लेख रे मित्रा. बाकी
In reply to मस्तं लेख रे मित्रा. बाकी by llपुण्याचे पेशवेll
अगदी अगदी!
कोल्हापूर आणि शिव्यावरुन एक
उत्तम.
वा वा
माझ्या एका मामाला त्याच्या