(गं बाई करू मी रांधप कुणीकडे)
काव्यरस
आमच्या गुरुमाऊली यशोदामैय्याच्या झुरळे, पाली आम्हां सोयरी.. वरून प्रेरणा घेऊन व पी. सावळाराम यांची माफी मागून.
किरकिर उंदिर करे सारखा
ओट्यावरही झुरळ चढे
पालीच पाली चहूकडे
गं बाई करू मी रांधप कुणीकडे?
घरभर फिरले मारण्या पाली
गोणी, पिंपं, ओट्याखाली
चमकून बघता वरती दिसली
दचकून माझा ऊर उडे
गं बाई करू मी रांधप कुणीकडे?
काप काढली असती तळुनि
(पण) कढई भरली मधमाशांनी
खुणाविते मज फळीवरूनि
घसरत झुरळच दुग्धि पडे
गं बाई करू मी रांधप कुणीकडे?
मूळ काव्य - रिमझिम पाऊस पडे सारखा
वाचने
5250
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
सही विडंबन मेव्या.......शोल्लेट एक्दम....
मेव्या रे मेव्या !!!!
लै बेक्कार !!
पहिलं कडवं तर अप्रतिम पाडलंयस !
अ फ ला तू न !!
In reply to आईग्ग्ग्ग ! by मितान
लै भारी...एक नंबर :)
पहिलं कडवं तर अप्रतिम पाडलंयस !अगदी....बेष्ट
In reply to आईग्ग्ग्ग ! by मितान
>>>पहिलं कडवं तर अप्रतिम पाडलंयस !
-दिलीप बिरुटे
मस्त रे मस्त! हसले जाम! :D
आयला, मेव्या तू पण शिकलास माझ्या संगतीत राहून विडंबनाच्या जिलब्या पाडायला!! गुरूदक्षिणा (सौजन्य द्रोणाचार्य/एकलव्य) कधी देणार?
In reply to आयला, मेव्या तू पण शिकलास by ३_१४ विक्षिप्त अदिती
'सेरेना विल्यम्स-लिझेल ह्युबर' यांचं सध्याचं 'टॉप रँकिंग' धोक्यात दिसतंय! ;)
In reply to 'सेरेना विल्यम्स-लिझेल by मेघवेडा
मी फुलं बडवते!
In reply to चूक! by ३_१४ विक्षिप्त अदिती
हा हा हा.. फुलं बडवली काय नि चेंडू बडवले काय.. ध्येय एकच! ;)
In reply to हा हा हा.. फुलं बडवली काय नि by मेघवेडा
यू गॉट इट मेव्या! :D
In reply to हा हा हा.. फुलं बडवली काय नि by मेघवेडा
नाय ना! चेंडू बडवायची सोय नाही आहे ना ... :-(
मग फुलं (आणि कीबोर्ड) बडवण्यावरच समाधान मानून घेते मी! असो. माझ्या सर्कारी वेदनांवर मी वेगळं विडंबन पाडेन! सोप्पं तर असतं प्राचीला गच्ची जोडणं, बरोबर की नाही?
सहीच रे मेव्या.. आवडले विडंबन...
बाकी विडंबन करणं अगदीच येरागबाळाचे काम नोहे.. नाही का??
पाल!
हा हा हा!
ही ही ही!
हे हे हे!
(तुझं नाव बदलून आता पी. मेघवेडा नायतर "पाल" वेडा करावं काय? )
In reply to ईईईईईईईईईईईईईईईई!!!! by पैसा
त्याला बंगाली बनवून त्याचं नावच 'मेघवेडा पाल' केलं तर?
In reply to त्याला बंगाली बनवून त्याचं by ३_१४ विक्षिप्त अदिती
भीषण भालो!
मस्त रे मेव्या.
हा हा हा
वा रे मस्त विडंबन!;)
अनेक वर्षात स्वयंपाकघर स्वच्छ केले नाही काय अशी शंका आली.;)
या निमित्ताने तुझ्यातील तरल भावनांचे दर्शन झाले.
हॅहॅहॅ!!
चान चान! ;)
वी.चतुरंग
आज काल नवविडंबकांचा विडंबनाला चान चान म्हणायची पद्धत आहे म्हणुन हा प्रतिसाद.
बाकी मेव्या हे विडंबन जमलयं महराजा...
विडंबन आवडले.
(वाचक)बेसनलाडू
मस्त!
ब्येक्कार! पहिलं कडवं तर एकदम छप्परफोड!
अवांतर - अचानक 'कवनात राहिले झुरळ, मध्माशा पाली' असं का झालंय बॉ मिपावर? ;)
कोण म्हणते मराठी भाषा धोक्यात आहे?
अगदी सायबाच्या देशात बागडलेले दोन मराठी बहाद्दर, कुठून कुठून भुले बिसरे गीत काढून विडंबन करत आहेत.
विडंबन आवडलं.
विडंबन आवडले !
मस्त..!
(घर चिलटा-झुरळांपासून स्वच्छ ठेवणारा पाल हा प्राणी अतिशय आवडणारा) तात्या.
सही विडंबन