
आन्द्रे वायदा (http://en.wikipedia.org/wiki/Andrzej_Wajda) नामक पोलिश दिग्दर्शकाचा हा २००७ सालातला सिनेमा. ( या सिनेमाला २००८चं फ़ॊरीन फ़िल्मसाठीचं ऒस्कर नॊमिनेशन होतं)
कातीन हत्याकांड हा दुसर्या महायुद्धातला ( त्या मानानं कमी प्रसिद्ध पण ) प्रचंड अस्वस्थ करणारा इतिहास...
कातीन हा रशियाच्या पश्चिमेकडचा
स्मॊलेन्स्कजवळचा भाग...

जर्मनीने पोलंडवर ( सप्टेम्बर १९३९ )पश्चिमेकडून हल्ला करून युद्धाला सुरुवात केली त्याच सुमारास रशियानेही पूर्वेकडून पोलंडमध्ये सैनिक घुसवले...( पोलंड या रशियन सैनिकांशी लढला नाही.तसे आदेशच सैनिकांना होते). रशियन रेड आर्मीने हजारो पोलिश सैनिक आणि लष्करी अधिकारी बंदी बनवले, त्यांना स्पेशल कॅम्पात बंदी बनवून ठेवलं गेलं.... शिवाय उच्चशिक्षित, प्राध्यापक, शास्त्रज्ञ असे नागरिकही पकडले आणि
एप्रिल १९४० च्या सुमारास या ( लष्करी आणि नागरी मिळून) सुमारे २२००० माणसांची स्टॅलिनच्या सहीने आलेल्या आदेशाने "कातीन"च्या जंगलामध्ये गोळ्या झाडून हत्या केली गेली...हजारो लोकांच्या कबरी खणून त्यांना गाडले गेले.... ( स्टॅलिन्चा या हत्याकांडामागे काय हेतू होता याबद्दल विविध मते आहेत. त्याच सुमारास जर्मनीशी त्यांची असलेली दोस्ती संपुष्टात येत होती..संपूर्ण पोलंड युद्धानंतर हुशार, राष्ट्रवादी नागरिकांसह पुन्हा उभा राहू नये, आणि लष्करी ताकद नष्ट व्हावी या हेतूने अत्यंत योजनापूर्वक हे हत्याकांड घडवले गेले हे मात्र खरे) ....
नंतर रशियाने पोलंडमधून माघार घेतली आणि संपूर्ण पोलंड जर्मनीने व्यापला. आणि १९४३ सालामध्ये जर्मनीला या प्रचंड कबरी सापडल्या..... ( गोबेल्सने रशियाची बदनामी करायची ही संधी सोडली नाही.त्याच्या पद्धतीने त्याने आंतरराष्ट्रीय तटस्थ निरीक्षक वगैरे बोलावून त्या कबरी उकरून काढून शवविच्छेदन करून रशियाची हरामखोरी जगापुढे आणली.
जसे काही जर्मन धुतल्या तांदळासारखेच होते.. पण ते असो)...
त्यानंतर १९४५ च्या मध्यात रशियाने पुन्हा पोलंडवर कब्जा केला. युद्ध संपले. जेते म्हणून रशियनांनी अर्थातच पुन्हा इतिहास बदलून टाकला आणि हे हत्याकांड जर्मनांचेच काम आहे असा कांगावा केला. पुन्हा विच्छेदन, कबरी उकरणे, शास्त्रीय पुरावे वगैरेंनी दिशाभूल करणे वगैरे साग्रसांगीत पार पडले. आता युद्धातून उभा राहणारा पोलंड मनात एक अत्यंत भळभळती जखम घेऊन जगत होता....
प्रत्येकाच्या मनात कातीन हत्याकांडाविषयी आक्रोश होता, सारं सार्यांना माहिती होतं पण कम्युनिस्ट सरकारमध्ये बोलायची सोय नव्हती....
१९९० मध्ये मात्र गोर्बाचेव सरकारने या हत्याकांडाची जबाबदारी त्या काळातल्या NKVD या रशियन गुप्त पोलीसांची होती असे थोडे थोडे मान्य केले...( पण त्या संदर्भातले नि:संदिग्ध कागदपत्रांचे पुरावे दिले नाहीत.. हे एक वांशिक हत्याकांड होते हे अजिबात मान्य केले नाही ). मग खूप पोलिश नागरिकांचीआंदोलने, आंतरराष्ट्रीय दबाव वगैरे वगैरे झाले , पुन्हा संशोधन, पुरावे गोळा करणे झाले आणि काही वर्षांनी पुतिन सरकारने सर्व पुरावे द्यायचे मान्य केले... रशिया पोलंड संबंधांवर दूरगामी परिणाम करणार्या या घटनेची जबाबदारी अखेर रशियन सरकारने मान्य केली. त्यासंदर्भातले सर्व पुरावेही द्यायचे मान्य केले.
आन्द्रे वाज्दा नामक पोलिश दिग्दर्शकाचा कातीन हा २००७ सालातला सिनेमा. ( या सिनेमाला फॉरीन फ़िल्मसाठीचं ऑस्कर नॊमिनेशन होतं).. हा सिनेमा २०१० मध्ये अधिकृतरित्या रशियन दूरचित्रवाणीवरती दाखवला गेला.
पण यात अजूनही काही घडायचे बाकी होते. १९४० साली घडलेल्या या हत्याकांडाची सत्तरावी स्मृती जागवण्यासाठी होणार्या समारंभासाठी निघालेले पोलिश अध्यक्ष कॅझिन्स्की आणि त्यांच्याबरोबर लष्करी अधिकारी, उपपंतप्रधान, सरकारी अधिकारी आणि कातीन हत्याकांडात बळी पडलेल्यांचे नातेवाईक असे ९६ लोक होते ते सारे कातीनपासून १९ किलोमीटर अंतरावर स्मॊलेन्स्क शहराजवळ झालेल्या विमान अपघातात एप्रिल २०१० मध्ये ठार झाले. कातीन हे कायमच पोलंडसाठी भयंकर दुर्दैवी आठवणी घेऊन येणार होते.
अधिक माहितीसाठी हे आणि हे पहा.
https://www.cia.gov/library/center-for-the-study-of-intelligence/csi-publications/csi-studies/studies/winter99-00/art6.html
http://en.wikipedia.org/wiki/2010_Polish_Air_Force_Tu-154_crash
http://en.wikipedia.org/wiki/Katyn_massacre
तर अशा या घटनेवरचा कातीन नावाचा सिनेमा मी दोन दिवसांपूर्वी पाहिला.सिनेमा उत्तम आहे. वॉरफ़िल्ममध्ये असतात तशी युद्धाची दृष्ये यात नाहीत .परंतु घरी राहिलेल्या कुटुंबाच्या दृष्टीने या सार्याकडे कसे पाहिले जाते त्याचे छान चित्रण आहे.... चित्रपटाची सुरुवात होते तेव्हा एक पोलिश लष्करी अधिकारी रशियन रेड आर्मीचा युद्धबंदी होतो, आणि त्याच्या प्राध्यापक वडिलांनाही अख्ख्या स्टाफ़सकट क्रॅकोव युनिवर्सिटीमधून उचलून नेऊन बंदी बनवले जाते. त्याची बायको, मुलगी आणि आई त्या दोघांच्या नंतर येणार्या मृत्यूच्या बातम्या सहन करतात...१९४३ मध्ये कातीन हत्याकांड उघडकीस येते आणि बळी पडलेल्यांची लिस्ट तयार होते. जर्मन लोक बळी पडलेल्या जनरलच्या पत्नीचा रशियाविरुद्धच्या प्रचारासाठी वापर करायचा प्रयत्न करतात.युद्ध संपते आणि उलटा
रशियन प्रोपोगंडा सुरू होतो की याला जबाबदार जर्मनच आहेत. युद्धोत्तर पोलंडपुढचे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत.. झालं गेलं विसरून जाऊन पुन्हा नवीन सरकारशी तडजोडी करत करत राष्ट्रनिर्मितीसाठी झटायचं की मेलेल्यांच्या स्मृतीसाठी नव्या सरकारशी भांडायचं? युद्धानंतरच्या पोलिश नागरिकांची ही
द्विधा मनस्थिती यात सुंदर दाखवली आहे...
शेवट हत्याकांड कसे घडले ते तपशीलवार दाखवले जाते.. बघवत नाही...स्वत: आंद्रे वायदाचे वडील या दुर्घटनेतले बळी होते. त्याने अत्यंत संवेदनशीलतेने हा सिनेमा तयार केला आहे.
चित्रपटाबद्दल मुद्दामच अधिक लिहित नाही. या चित्रपटामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाविषयी अस्वस्थ करणारी अतिशय वाईट माहिती वाचायला मिळाली, ती शेअर करावीशी वाटली म्हणून बर्याच दिवसांनी काही लिहिले....
हा एक चुकवू नये असा सिनेमा आहे हे नक्की. जरूर पहा.
महत्त्वाची घटना आहे. मला
खच्चीकरण
या वेगळ्या चित्रपटाची ओळख
पहिल्या तसेच दुसर्या
In reply to पहिल्या तसेच दुसर्या by पाषाणभेद
अवांतर: उजवीकडून दुसरा सैनिक
मास्तर इज बॅक
धन्यवाद मास्तर..
बाप रे!
ऑल टाईम फेव्हरीट टाइमपास
पुन्हा १९४५ मध्ये...
In reply to पुन्हा १९४५ मध्ये... by भडकमकर मास्तर
+१
भयानक...
संवेदना
In reply to संवेदना by इन्द्र्राज पवार
वैर्याची एक रात्र वाचवत
In reply to वैर्याची एक रात्र वाचवत by मृत्युन्जय
मृत्युन्जय
धन्यवाद मास्तर!
भयानक ! वाचुनच अंगावर काटा
In reply to भयानक ! वाचुनच अंगावर काटा by परिकथेतील राजकुमार
असेच म्हणतो.
In reply to भयानक ! वाचुनच अंगावर काटा by परिकथेतील राजकुमार
पण बघणार कधी?
अतिशय प्रभावी सिनेमा आहे हा.
In reply to अतिशय प्रभावी सिनेमा आहे हा. by पुष्करिणी
सुंदर आणि माहितीपुर्ण
In reply to अतिशय प्रभावी सिनेमा आहे हा. by पुष्करिणी
उत्तम माहिती.. धन्यवाद
In reply to उत्तम माहिती.. धन्यवाद by भडकमकर मास्तर
दुसरं महायुद्ध जिंकल्यावर
In reply to दुसरं महायुद्ध जिंकल्यावर by पुष्करिणी
खूप छान
In reply to खूप छान by भडकमकर मास्तर
चर्चिल एक गर्विष्ठ, माजोरडा
In reply to चर्चिल एक गर्विष्ठ, माजोरडा by मृत्युन्जय
चर्चिल आणि अत्रे
In reply to चर्चिल आणि अत्रे by इन्द्र्राज पवार
एकांगी
In reply to एकांगी by ३_१४ विक्षिप्त अदिती
संपूर्ण सहमत!
In reply to चर्चिल आणि अत्रे by इन्द्र्राज पवार
देशभक्तीसाठी चर्चिल मोठा
In reply to देशभक्तीसाठी चर्चिल मोठा by मृत्युन्जय
हे सगळं 'कातिन'संदर्भात फार अवांतर आहे.
In reply to हे सगळं 'कातिन'संदर्भात फार अवांतर आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
ब्रिटनची संपूर्ण भरभराट
In reply to देशभक्तीसाठी चर्चिल मोठा by मृत्युन्जय
दोन उदाहरणे....!!
In reply to दोन उदाहरणे....!! by इन्द्र्राज पवार
'कातिन'शी याचा काय संबंध?
In reply to 'कातिन'शी याचा काय संबंध? by ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदीच अवांतर : बोअर युद्धांत
In reply to दोन उदाहरणे....!! by इन्द्र्राज पवार
इंद्रा, तुमचा एक भारतीय
In reply to इंद्रा, तुमचा एक भारतीय by पुष्करिणी
कोहिनूर वगैरे बर्याचशा
In reply to कोहिनूर वगैरे बर्याचशा by मृत्युन्जय
२९ मार्च १८४९ ला पंजाब पडलं ,
In reply to कोहिनूर वगैरे बर्याचशा by मृत्युन्जय
जरतर आणि इतिहास
In reply to जरतर आणि इतिहास by इन्द्र्राज पवार
तुमच्या दोन्ही मुद्द्यांना
In reply to कोहिनूर वगैरे बर्याचशा by मृत्युन्जय
मृत्युन्जय
In reply to इंद्रा, तुमचा एक भारतीय by पुष्करिणी
पुष्करिणी
In reply to पुष्करिणी by Pain
दुसर्या महायुध्दाच्या काळात
In reply to दुसर्या महायुध्दाच्या काळात by पुष्करिणी
डंकर्क
In reply to दुसर्या महायुध्दाच्या काळात by पुष्करिणी
पुष्करिणी
In reply to दुसर्या महायुध्दाच्या काळात by पुष्करिणी
आपणच सरसेनापती होऊया
In reply to आपणच सरसेनापती होऊया by धनंजय
देशनेतृत्व आणि युद्धनेतृत्व...!
In reply to देशनेतृत्व आणि युद्धनेतृत्व...! by इन्द्र्राज पवार
ज्यावेळी चर्चिल आणि भारत हा
In reply to देशनेतृत्व आणि युद्धनेतृत्व...! by इन्द्र्राज पवार
दुवा चुकला - आता ठीक करून
In reply to दुवा चुकला - आता ठीक करून by धनंजय
तो दुवा...!!
In reply to आपणच सरसेनापती होऊया by धनंजय
मलाही दिलेला दुवा दिसत
In reply to मलाही दिलेला दुवा दिसत by पुष्करिणी
नेताजींची नाव अजुनही
In reply to नेताजींची नाव अजुनही by मृत्युन्जय
आता यात चर्चिल यांचा हात
In reply to आता यात चर्चिल यांचा हात by ३_१४ विक्षिप्त अदिती
छे छे. चर्चिल सारखा सहृदय
In reply to चर्चिल आणि अत्रे by इन्द्र्राज पवार
इन्द्र्राज पवार
In reply to अतिशय प्रभावी सिनेमा आहे हा. by पुष्करिणी
सुरेख प्रतिसाद
In reply to अतिशय प्रभावी सिनेमा आहे हा. by पुष्करिणी
प्रकाटाआ.
पोलंड आणि आंद्रे वायदा
मास्तरांचा लेख बर्याच
मास्तरांनी खुप दिवसाने
चित्रपट पाहिला पाहिजे
निशब्द ..
निशब्द ..
निशब्द ..
चित्रपट बघवेल की नाही हे
सुपर्ब!!
सुंदर ओळख.
युद्धस्यः....
सिनेमा बघायचा म्हणजे मानसीक तयारी करूनच बसावे लागेल.
अप्रसिद्ध हत्याकांड
प्रभावी
वाचनिय लेख आणि चर्चा. चित्रपट
मास्तरांचे नेहमी प्रमाणे
In reply to मास्तरांचे नेहमी प्रमाणे by कवटी
हेच म्हणतो
सुन्न करणारा चित्रपट
थर्ड आय एशियन फिल्म