शाकाहार :- काही नवीन पैलु
In reply to शाकाहार-मांसाहार.... by प्रभाकर पेठकर
In reply to शाकाहार-मांसाहार.... by प्रभाकर पेठकर
In reply to छट्... by मन
In reply to मी by प्रभाकर पेठकर
In reply to मग ही घ्या उत्तरं by मन
In reply to तेच by प्रभाकर पेठकर
In reply to शाकाहार-मांसाहार.... by प्रभाकर पेठकर
In reply to टु बी ऑर नॉट टु बी. by गणपा
In reply to शाकाहार-मांसाहार.... by प्रभाकर पेठकर
In reply to मस्त लिहिलेत प्रभाकर काका . by वेताळ
In reply to मस्त लिहिलेत प्रभाकर काका . by वेताळ
अगदि त्याच प्रमाणे माणुस हा "ग्रेटर एप्स" ह्या प्रवर्गात मोडतो.(प्रवर्ग नामातील् चु.भु.द्या.घ्या. बायो लॉजी सोडुन काही युगे उलटली आहेत. ) त्यांतील प्राणी कोण? तर् ओरँग उटांग,चिंपांझी,गोरिला वगैरे. ह्यांचे मुख्य अन्न ते काय? तर् काही प्रमाणात् झाडपाला आणि उरवरीत फळे, काही प्रमाणात धान्य कण सुद्धा. ह्यानुसार, मानवाचा आहार् काय हवा?ह्याच नियमाने आपण मांसाहार सोडायचा तर मला शंका आहे की उद्या आमच्या अधोवस्त्रांबद्दल तर तुम्ही शंका घेणार नाही ना? ;) अहो साहेब ह्या निसर्गातील कित्येक गोष्टी मानवाने आपल्याला नैसर्गीक अनुकुल नसल्या तरी त्यावर काही प्रक्रिया अथवा संस्कार करून त्या आपल्याला योग्य अश्या स्वरूपात रुपांतरीत करून त्याचा उपभोग घेतला आहे - घेतो आहे. आता कुठला नियम बघायचा ते तुम्ही ठरवा, नैसर्गीक न्यायाने बघायचे तर जो बलवान आहे तोच टिकणार. मानुस त्यात वर आहे. तो त्याला अनुकुल असे नियम बनवेल. जसं जंगलात सिंह करतो. त्याला अनुकुल अशी त्याची जीवनशैली असते. त्याला हवं त्या ओढ्यावर तो पाणी पितो. हवं ते भक्ष्य तो मारतो. तो त्याच्या खाण्याच्या नैसर्गीक शैलीव्यतिरिक्त काही खात नाही कारण त्याची ती क्षमता नसावी. मानवी मुल्यांचा विचार केला तर मांस हे अतिशय समृध्द अन्न आहे. जे की जगातल्या सर्व भागात सहज उपलब्ध आहे. मांसाहाराला जे पर्यायी अन्न म्हणून सांगीतल्या जातं ते जगात सर्वत्र उपलब्ध नाहीये. नैसर्गीक अवस्थेत मानुस कच्च मांस खात होता. आपल्या शरीराला भाजलेलं मांस अनुकुल आहे हे लक्षात आल्यावर त्याने ते भाजणं सुरू केलं. त्याचा हेतू जगण्यासाठी खाणं हा होता आणि आता तो शिजवून खातो. त्यात वेगवेगळे मसाले आणि पध्दती मिसळून तो त्या अन्नांचं स्वादिष्ट रुचकर भोजनात रुपांतर करतो आणि आमच्या सारखे पामर त्याला पुर्णब्रम्हं म्हणून सेवन करतात. असो. एक साधा विचार करा जगात समुद्राच्या किनारी राहणार्या लोकांनी मासे खायचं बंद केलं तर आपण त्याला पर्यायी अन्न पुरवू शकू का? मला वाटतं की शाकाहार मानसाचा नैसर्गीक आहार असेलही मात्र आजच्या उन्नत अवस्थेत मानसाने जसं इतर कित्येक बाबींवर आपल्याला अनुकुल संस्कार केले व हवे असलेले अनुकुल वातावरण तयार करून तो राहतो आहे त्यानुसार आहारात हा साधा बदल खुप क्रांतीकारक आहे असं मला वाटत नाही. नीलकांत
In reply to माझं मत... by नीलकांत
In reply to वरील काही by ईश्वरी
In reply to मांसाहार आणि शाकाहार हे दोन्ही आहार by चतुरंग
In reply to दोन्हीही प्रिय.. by विसोबा खेचर
In reply to ये हुयी ना बात!! by पिवळा डांबिस
In reply to दोन्हीही प्रिय.. by विसोबा खेचर
In reply to हां तर by मन
In reply to हां तर by मन
In reply to चरक संहितेत... by नीलकांत
In reply to खास शाकाहारी लोकांसाठी एक सल्ला by चित्रगुप्त
In reply to खास शाकाहारी लोकांसाठी एक सल्ला by चित्रगुप्त
In reply to हे फसवं आर्ग्युमेंट आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
उलट अधिकाधिक लोकांनी मांसाहार सोडल्यास कदाचित जंगलं वाढायला अधिक जागा उपलब्ध होईल.पुन्हा दुसरी लॉजिकल चूक. जंगलातील प्राणी मारून खाण्याचे दिवस संपलेत कधीच. आजच्या घडीला शाकाहार फोफावला, तर शेतीसाठी जास्तच जंगले तोडावी लागतील.. शेती कमी करायची असेल, तर मांसाहारी व्हा. जगाच्या भल्यासाठी आता समुद्राची शेती करायची वेळ आली आहे. मांस नको तर मासे-आहारी तरी व्हाच असे माझे म्हणने आहे. जय प्लँक्टन्स : द बिगेस्ट प्लांट मास ऑन अर्थ!
In reply to लॉजिकमधील चूक : by आनंदी गोपाळ
उर्जा, एन्झाईम्स, व टाईमचा हिशोब कुठे?या सगळ्या गोष्टी पुन्हा वनस्पतीजन्य आहारातून मानवाचं शरीर बनवणार. शरीर ज्या गोष्टी नाकारतं त्या पुन्हा काहीबाही करून जाळल्यास (उदा: बायोगॅस, खतं इ.) पुन्हा परिणाम एकच होणार. पृथ्वीच्या जीवावरच आपण आपलं आयुष्य जगणार. प्राणिजन्य आहारातून समप्रमाणात ऊर्जा मिळवण्यासाठी बर्याच अधिक प्रमाणात पाणी, जमीन, वेळ खर्च होतात असा दावा आहे. (यात कुठेही संपूर्ण पोषण याबद्दल चर्चा नाही.) सर्व लोक शाकाहारी झाल्यास सर्वांना पुरेसं अन्न मिळणार नाही असा जो दावा (का कोण जाणे!) केला जातो तो बिनबुडाचा आहे असा दावा आहे. या गणितात सहजच दिसणार्या अडचणीही मीच सांगते. पोषण मूल्य हा फार कटकटीचा भाग आहे. त्याशिवाय शेतीचं अर्थशास्त्र. कपास, नीळ, कॉफी, अफू वगैरे पदार्थ अन्न म्हणून खाल्ले जात नाहीत, त्यांचीही शेती होते. नगदी पिकं काढण्याकडे शेतकर्यांचा ओढा असतो. पिकाला पुरेसा भाव मिळाला नाही म्हणून पीक जाळलं जातं. इ. त्याशिवाय शेतीखालचा जमिनीचा भाग कमी झाल्यास, तिथे झाडं लावल्यासही पर्यावरणावर प्रचंड मोठा फरक दिसणार नाही. पर्यावरण म्हणजे हरित वायू परिणामामुळे होणारा परिणाम यासंदर्भात बघितल्यास, हवा 'शुद्ध' करण्याचं काम समुद्री जीव झाडांपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात करतात. आत्ता आहे त्यापेक्षा १०% झाडं अधिक झाल्यास फार फरक पडेलच असं नाही. (या गणिताचे स्रोत शोधण्यासाठी टैम्प्लीस.) त्याशिवाय मी सुरूवातीला केलेल्या विधानातल्या अधिक त्रुटी दाखवल्यास आवडेल. दुसर्या बाजूने मांसाहारातूनच मिळणारे काही आवश्यक पोषण (ब जीवनसत्त्वाचे काही प्रकार?) शाकाहारी लोकांना मिळत नाही किंवा पुरेसं मिळत नाही अशीही अडचण आहेच. शाकाहार्यांच्या आहारात दूध आणि अंडीही मोजलेली नाहीत. व्यक्तिशः माझा कोणाच्याही कोणत्याही प्रकारच्या आहाराला विरोध नाही. मी स्वतः शक्यतोवर शाकाहारी असले तरी माझ्याही अनेक चवी-ढवी आहेत. सगळ्याच भाज्या, फळं मला अगदी मनापासून आवडतात असं नाही. उलट आवडतं ते काहीही मिळालं नाही/मिळत नाही तेव्हा उपलब्ध असेल ते (बीफ्/पोर्क) आणि शैक्षणिक भूक म्हणून ससा, मोर, बेकन, सॉसेजेस, कोंबडी, हरीण, बकरा खाल्ले आहेत.
In reply to लॉजिकमधील चूक : by आनंदी गोपाळ
जंगलातील प्राणी मारून खाण्याचे दिवस संपलेत कधीच. आजच्या घडीला शाकाहार फोफावला, तर शेतीसाठी जास्तच जंगले तोडावी लागतील.. शेती कमी करायची असेल, तर मांसाहारी व्हा.जंगलातले प्राणी पुरे पडण्याएवढी लोकसंख्या कमी होती तेव्हा ही अडचण नव्हतीच. आता (गेली अनेक शतकं) मांसाहारासाठीही पद्धतशीर शेती होते. १. या (प्राणी-)शेतीसाठी मोकळी जागा लागते. २. या प्राण्यांना खाऊ घालण्यासाठी आधी मुळात गवत, संत्र्याच्या साली, इ.इ. अनेक गोष्टी लागतात. कोंबड्यांना अ आणि ड जीवनसत्त्व टोचली जातात किंवा कोंबड्यांना टिपण्यासाठी बाहेर सोडलं जातं, पुन्हा अधिक जागेची आवश्यकता आहे. इतर सर्वच प्राण्यांच्या बाबतीत काही ना काही घटक येतातच. या प्राण्यांना पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी पाणी लागतं. या प्राण्यांच्या अन्नासाठी पाण्याची आवश्यकता असते. हे प्राणी जंगलात जाऊन खाऊन परत कत्तलखान्यात जात नाहीत. ३. मांसाहार मार्केटात येतो तो ही बराच प्रोसेस होऊन येतो. (भारतातलं मांसाचं मार्केट खूपच कमी आहे.) या प्रोसेसिंगसाठी जागा आणि चिक्कार प्रमाणात ऊर्जा+पाणी वापरले जातात. त्याची जागा धान्य, भाज्या, फळांनी घेतल्यास पाणी, जागा आणि ऊर्जा नक्कीच कमी वापरले जातील. थोडक्यात सूर्याकडून येणारी ऊर्जा आणि पृथ्वीकडून येणारं पाणी आणि इन/ऑरगॅनिक वस्तूमान झाडांवाटे माणसाच्या शरीरात येण्याऐवजी झाडांकडून प्राण्यांकडे आणि प्राण्यांकडून माणसाकडे तर ती क्रिया अधिक इन-एफिशियंट होणार. (यात पुन्हा आकडे देता येतील, पण थर्मोडायनामिक्सचा दुसरा नियम, वाढती एंट्रॉपी, परपेच्युअल मशीन किंवा १००% एफिशियन्सी असणारं मशीन बनवणं अशक्य असणं वगैरे पहाता यात आकडे देण्याची फार आवश्यकता नसावी.) अन्न साखळीत कोणताही प्राणी जेवढा वर चढणार तेवढं मूळ स्रोताकडून ऊर्जा मिळवणं इन-एफिशियंट (मराठी) होणार. मूळ स्रोत - सूर्य आणि पृथ्वी. सर्वांना मिळणारी ऊर्जा शेवटी तिथूनच येते. अन्न साखळीत वरच्या स्तरावर असणारे प्राणी, खालच्या स्तरावर असणार्या प्राण्यांपेक्षा खूपच कमी असतात त्याचं हेच कारण. मांसाहारी मनुष्य अन्न साखळीत वरच्या स्तरावर जातो. यांची संख्या बेसुमार वाढल्यास शेती करावी लागणार अन्यथा हे लोक मांसाहारी बनून टिकून राहू शकत नाहीत. माणूस खातो त्या माशांची बेसुमार मासेमारी केल्यासही समुद्री इकोसिस्टमवर त्याचे दुष्परिणाम होतात. तिथली अन्न-साखळी तुटते. पर्यावरणाचा मुद्दा कळीचा बनतो पाण्याच्या कमी/मर्यादित उपलब्धतेमुळे. तिसरं महायुद्ध पाण्यासाठीही होऊ शकतं असा एक दावा केला जातो. एखाद्या देशाकडून अन्न आयात करणं म्हणजे पाणीही आयात करणं. या संदर्भात मांसाहार खूपच कमी एफिशियंट आहे याचा विचार केला जातो. लाल मांसाच्या अतिसेवनामुळे होणारे रोग, मांसाहारी (कार्निव्होरस म्हणावे इतपत) लोकांना होणारे निरनिराळे कर्करोग यांचा विचार केलेला नाही.
In reply to तुमचं संपादन थोडं उशीरा by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to 'लाल मांस' अन 'यांचा विचार केलेला नाही.' by आनंदी गोपाळ
In reply to 'लाल मांस' अन 'यांचा विचार केलेला नाही.' by आनंदी गोपाळ
In reply to माझा मुद्दा तो नाहीच. जगातले by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to कोणे एके काळी by आनंदी गोपाळ
In reply to मनुष्य गाय खातो तेव्हाही by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to सध्या नोटाईम सो टाईमप्लीज. by आनंदी गोपाळ
In reply to :-) by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to नको... by मन१
In reply to माणसाने शाकाहारी असावे की by गोंधळी
In reply to नक्कीच चांगला... by प्रभाकर पेठकर
In reply to मांसाहारी पदार्थात प्रथिने by गोंधळी
In reply to डॉक्टरांचे मत. by प्रभाकर पेठकर
In reply to निरिक्षणे बाद by सुनील
निरिक्षण २ - मनुष्य कच्चे मांस खात नाही. सबब, त्याला तीक्ष्ण दातांची वा सुळ्यांची आवश्यकता नाही. हा मुद्दादेखिल बाद.अनेक भाज्या, धान्येही आधुनिक मनुष्य कच्च्या खात नाही, बर्याच प्रक्रिया करून खातो. कच्ची पीठं खाल्ल्यास अनेकांना पोटदुखी इत्याही होतात. (निदान कणीक भिजवल्यावर आई अशी तंबी देतेच देते.)
ज्याला जे हवे, ते त्याने खावे. नसती कारणमिमांसा देत बसू नयेसहमत आहे.
In reply to मानव शाकाहारिच by रमेश आठवले
In reply to रमेश! by आनंदी गोपाळ
In reply to रमेश! by आनंदी गोपाळ
In reply to आनंदीबाई by रमेश आठवले
In reply to आनंदीबाई by रमेश आठवले
प्राण्यांच्या उत्क्रांती प्रक्रियेचा वर वर अभ्यास केला तर असे लक्ष्यात येते कि प्रत्येक प्राणीमात्रात त्याच्या उदरभरणासाठी लागणारे अन्न मिळवण्यासाठी स्वयम्भूत साधने असतात.उत्क्रांती प्रक्रिया ही स्वत:च ती साधने बनविते. ती 'असत' नाहीत.
मांसाहारी प्राण्यान्जवळ नखे, सुळे अशी शिकारीची साधने असतात. मनुष्यामध्ये अशी साधने नाहीत ह्यांचे कारण मानव हा शाकाहारी घडविला गेला आहे. त्याने नंतर बुद्धीचा वापर करून काठी, बाण,सापळा व इतर बाह्य साधनांचा वापर करून शिकार करावयास सुरुवात केली आणि ह्यामुळे तो मांसाहारी होऊ शकला, बाकी नैसर्गिक पणे तो शाकाहारीच घडला आहे.बुद्धी नावाचे शस्त्र उत्क्रांतीतून मिळाल्यावर इतर सगळी शस्त्रे क्षुल्लक व कुचकामी ठरली, सबब त्यागली गेली. अक्कल वापरून अन्न मिळविणे जास्त सोपे होते. उगा धारदार सुळे अन बळकट बाहू कशाला हवेत? आम्ही प्राणी पाळू लागलो अन शेती करताना झाडेही पाळू लागलो. उत्क्रांतीचा 'वरवर' नाही नुसता ८वी यत्तेइतका अभ्यास केला असतात, किंबहुना वर्गात शिक्षक बोलले ते थोडे जागेपणी ऐकले असतेत, तरी इतके समजले असते. उगा प्रतिसाद टंकताना 'अमुक शास्त्राचा 'वरवर' अभ्यास केला असता असे दिसून येते' स्टाईल वाक्ये टंकून स्वतःच्या अज्ञानाला वजन देण्याचा प्रयत्न केलात तर माझ्या सारखे लोक मी टंकले तसे खडूस प्रतिसाद लिहीणारच. ती मिपाची प्रकृती आहे.
In reply to आनंदीबाई by रमेश आठवले
In reply to आथवले साहेब by वेताळ
In reply to मानव शाकाहारीच by रमेश आठवले
In reply to मानव फक्त शाकाहारीच नाहीच मुळी by बॅटमॅन
In reply to प्रत्युत्तर by रमेश आठवले
In reply to मानव फक्त शाकाहारीच नाहीच मुळी by बॅटमॅन
In reply to मानव शाकाहारीच by रमेश आठवले
In reply to समर्थन-खंडन.... by प्रभाकर पेठकर
योग्य प्रमाणात घेतलेला मांसाहार, शाकाहार आणि मिश्राहार कितपत आरोग्यदायी ठरतो ह्याचे काही सर्वमान्य पुरावे उपलब्ध असतील तर चर्चेला दिशा मिळेल. नाहीतर तिन्ही आहार पद्धतींचे समर्थन आणि खंडन करणारे अनेक जणं असतात त्यामुळे जगाच्या अंतापर्यंत ही चर्चा चालू शकेल.एग्जॅक्टलि!!! थोडेसे गुगलून पाहिले असता एक पेपर सापडला. यात त्यांनी व्हेजवाले आणि हेल्थ कॉन्शस नोनव्हेजवाले यांची तुलना करून निष्कर्ष काढले ते त्यांच्याच शब्दांत देतो. शीर्षकः Vegetarian diets, chronic diseases and longevity. सारांशः प्युअर व्हेजवाल्यांच्या मते व्हेज खाण्यामुळे आयुर्मान वाढते, विविध रोगांची रिस्क कमी होते, इ.इ. पण युरोपमधील सर्वांत जास्त हेल्दी लोक उदा. स्कँडेनेव्हियन्स..ते तर लै मांस खातात. व्हेज खाण्यामुळे लट्ठपणा कमी होतो, तसेच हृदयरोगाची रिस्क कमी होते, पण विविध प्रकारच्या कॅन्सर बद्दलची रिस्क आजिबात कमी होत नाही. शिवाय नॉनव्हेज खाण्यामुळे हिंसक स्वभाव बनतो असे जे अडाणचोट विधान आहे त्याला दुजोरा देणारी कसलीही माहिती आजपर्यंत पुढे आलेली नाही. आणि अलीकडच्या खादाड समाजात व्हेज म्हणजे एक प्रकारचे आहारनियमनच असल्यामुळे त्याचा काही अंशी फायदा होतो. व्हेजमध्ये फळे वैग्रे खा ल्ल्यामुळे फायदा होतो, निव्वळ मांस न खाल्ल्यामुळे नाही. पान क्र. २ वर पहावे, आईसलँड मधील आहाराच्या सवयी खुंदल खुंदल के नॉनव्हेज वाल्या असूनदेखील त्यांचे आयुर्मान जास्त आहे. हेल्थ कॉन्शस नॉनव्हेजवाले आणि व्हेजवाले यांची तुलना केल्यास बर्याच प्रचलित समजुतींना तडा जाऊ शकतो हे या ४ पानी पेपरावरुनदेखील सिद्ध होते.
In reply to अनेक शाकाहारी पदार्थ आणि सगळे by अप्पा जोगळेकर
In reply to अनेक शाकाहारी पदार्थ आणि सगळे by अप्पा जोगळेकर
In reply to कला आणि शाकाहार by चित्रगुप्त

In reply to कला आणि शाकाहार by चित्रगुप्त
In reply to शाकाहारी आणि by बॅटमॅन
In reply to बॅटमॅनचा स्पायडरमॅन झाला by अत्रुप्त आत्मा
In reply to बॅटमॅनचा स्पायडरमॅन झाला by अत्रुप्त आत्मा
In reply to च्यायला ! तुम्ही आधी प्रतिसाद by मराठे

In reply to ... by गवि
In reply to ... by गवि
In reply to ... by गवि
या धाग्यावराचा सर्वोच्च प्रतिसाद.असेच म्हणतो. त्यातही परमेश्वराच्या प्रथम अवतारास अग्रस्थानाचा मान देणे हे तर अगदी समर्पक! :)
In reply to ... by गवि
In reply to गुडघेदुखी आणि आहार by चित्रगुप्त
In reply to केमीकल लोचे... by अर्धवटराव
सपशेल पटलं!