मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शाकाहार :- काही नवीन पैलु

मन · · काथ्याकूट
मित्रहो, जीवाची हत्या करणे वाइट,म्हणुन मांसाहार वाइट आणी म्हणुनच तो अयोग्य.शाकाहार तेव्हढा चांगला. ह्यातील माझं काहीही म्हणणं नाही. मी मानवी शरीर,प्रकृती ह्यासाठी स्वाभावीक अन्न कुठलं आहे, ते शोधतोय. मुळात, बहुतांश सर्व सस्तन प्राणी आणी पक्षी ह्यांचे प्रामुख्याने शाकाहारी आणि मांसाहारी असे वर्गीकरण करता येते. जे प्रामुख्याने वनस्पती खातात, ते शाकाहारी. जे प्रामुख्याने इतर वनस्पतींशिवाय इतर सजीव(प्राणी,पक्षी )भक्ष्य म्हणुन खातात(स्वजातीतील् सुद्धा) ते मांसाहारी. माझे काही तर्क, निरिक्षण आणि वाचनातील् काही भागानुसार मानवी शरीरा बद्दल हे विचारः- १.एकाच प्रवर्गातील किंवा परीवारातील(स्पेसीज् किंवा फ्यामिली) प्राण्यांचा आहार समान/मिळताजुळता/साम्य असलेला असतो. जसे घोडा आणि झेब्रा हे एकाच प्रवर्गातील प्राणी. त्यांच्या शरीरात विलक्षण साम्य आहे.म्हणुन त्यांच्या आहारातही साम्य आहे. दोघेही हिरवळ चरतात,त्यावर् जगु शकतात. आता डोळ्यासमोर चित्र आणा की मांजर् उंदीर् पकडते आहे. दुसरे चित्रः- चित्ता किंवा वाघ ससा पकडत आहेत. काही साम्य दिसलं? दुसर्‍या चित्रात उंदीर(भक्ष्य) मोठा झाला आणि बनला ससा तसेच भक्षक ही मोठा झाला आणि मनी मावशी चा बनला वाघोबा. बरोबर? कारण हे दिसत की वाघ/चित्ता आणि मनी माउ हे एकाच म्हणजे मार्जार प्रवर्गातील असल्याने त्यांच्या आहारात हे साम्य आहे. अगदि त्याच प्रमाणे माणुस हा "ग्रेटर एप्स" ह्या प्रवर्गात मोडतो.(प्रवर्ग नामातील् चु.भु.द्या.घ्या. बायो लॉजी सोडुन काही युगे उलटली आहेत. ) त्यांतील प्राणी कोण? तर् ओरँग उटांग,चिंपांझी,गोरिला वगैरे. ह्यांचे मुख्य अन्न ते काय? तर् काही प्रमाणात् झाडपाला आणि उरवरीत फळे, काही प्रमाणात धान्य कण सुद्धा. ह्यानुसार, मानवाचा आहार् काय हवा? २.मांसाहारी प्राण्यांची शरीर रचना वैशिष्ट्य म्हणजे अति तीक्ष्ण दात जबड्याच्या समोरील भागात् असतात.(थोडेफार् ड्रॅक्युलासारखेच,भयावह) उदाहरणः- कुत्रा,वाघ,लांडगा. येथे, अन्न तोडणे हे मुख्य उद्दिष्ट् आहे, चर्वण नव्हे. याउलट,शाकाहारी प्राण्यांकडे सहसा अशा दातांचा अभाव असतो. त्यांचे दात असतात प्रामुख्याने "चर्वण" करण्यासाठी.जात्याच्या दोन दगडात जसे धान्य रगडले जाते, त्याच प्रकारे अन्न हे ह्या प्राण्यांच्या रुंद पृष्ठभाग असणार्‍या दातात "रगडले" जाते. नेमके असेच दात मानवाला आहेत,ते म्हणजे त्याच्या दाढा. (जबड्याच्या आकारमानानुसार्, सर्वाधिक भुभागावर् हे दात पसरलेले आहेत.) ह्यानुसार, मानवाचा आहार् काय हवा? ३.शाकाहारी प्राणी "चावुन" खातो. मांसाहारी प्राणी चावतो कमी,"गिळतो" जास्त. ("अन्न रगडण्याची " पुरेशी व्यवस्था नसल्याने)ह्या चावुन खाण्यादरम्यान, धाकाहारी प्राण्याच्या आहारात पुरेशी "लाळ" मिसळली जाते.मांसाहारी प्राण्यात ही प्रक्रिया तेव्हढ्या प्रमाणात होत नाही.(जवल् जवळ् नगण्य.) माणसाच्या लाळेचे अन्नात मिसळण्याशी गुणोत्तर काढले,तर् ते शाकाहारी प्राण्यांच्या अगदी निकट जाते. ४.ऍपेंडिक्स् हे नाव बर्‍याच लोकांनी(जवळपास् आपण सर्वांनीच) ऐकले असावे. काय असते हे ऍपेंडिक्स? तो आहे मानवी शरीरातील एक हल्ली वापर होत नसलेला भाग. तो हिरव्या वनस्पती खाणार्‍या प्राण्यात कार्यरत् असतो. त्याचे कार्य हेच की:- हरित वनस्पतीतील सेल्युलोज चे पचन करुन त्यातुनही उर्जा मिळवणे. मानवी शरीरात हा भाग् कार्यरत् नसल्याने हरित भाग उर्जेसाठी वापरता येत् नाही आणि मग विष्ठेतुन बाहेर् टाकला जातो. पण ह्या अवयवाची उपस्थिती हेच सुचित करते की मानवी शरीर तुर्तास शाकाहारास जवळचे आहे. शाकाहारच ते प्रमुख्याने नीट पचवु शकते. ५.सहज प्रवृत्ती:- एका (पाश्चात्त्य)विश्लेषकाचे निरिक्षण आहे ते असे........ तुम्ही एका नुकत्याच थोड्याशा मोठ्या झालेल्या वाघाच्या भुकेल्या बछड्यासमोर किंवा मांजरीच्या पिल्लासमोर एक सफरचंद ठेवा आणि ठेवा एक छोटेसे जिवंत कोंबडीचे पिल्लु. नैसर्गिक बुद्धिनुसार्, बछडे त्या पिलाला (भक्ष्य म्हणुन) मारुन खाइल, व सफरचंदाशी खेळत बसेल्. आता तसेच सफरचंद आणि जिवंत कोंबडीचे पिल्लु एका निरागस , भुकेल्या ,(माणसाच्या)बालकाच्या समोर ठेवा. बालक ते सफरचंद खाउन टाकेल आणि त्या पिलाशी खेळण्यात मग्न होइल. बछडे सफरचंद् खायचा विचारही करणार् नाही. बालक त्या पिलाला मारुन मग खाण्याचा विचारही करणार नाही. ह्याचे कारण?नैसर्गिक वृत्ती,नैसर्गिक जाणीव किंवा उपजत् ज्ञान म्हणा हवं तर. मग ह्या सगळ्या गोष्टी बर्‍याचशा हेच सुचवतात की शारिरिक दृष्ट्या मानवाला प्रामुख्याने शाकाहार हाच सुटेबल् ठरतो. तूम्हाला काय वाटतं? वरील निरिक्षण,तर्क् आणि निष्कर्ष योग्य दिशेने जाताहेत, की त्यात कुठे काही विसंगती,तर्क् दोष आहे?

वाचन 55280 प्रतिक्रिया 93