पुणेरी विक्षिप्तपणा!
पुणेरी विक्षिप्तपणा
_______________________________________________________
सदर लेख केवळ आपल्या मनोरंजनासाठी, माझा कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही.
_______________________________________________________
ही घटना 'मे २००७' मधली, या काळात मी 'चाणक्य मंडल परिवारचा एक अभ्यासक्रम' पूर्ण करण्यासाठी म्हणून पुण्यात सुमारे एक महिना वास्तव्याला होतो. सदाशिव पेठेतील एका विद्यार्थी गृहात मी आणि माझा मित्र राहत असताना आलेला हा एक गंमतीशीर अनुभव.
***
(वार: रविवार, वेळ: सुमारे १४:२०)
दुपारी काहीश्या उशिरानेच जाग आली आणि घड्याळात बघून दचकलो, अरे १४:२०? ओह माय गोड इट्स टू लेट... घाई घाईत आन्हिक उरकली आणि आता संध्याकाळ होई पर्यंत काहीतरी टीपी करू म्हणून जवळच्या सायबर ची वाट धरू म्हणून विचार केला. पण भूक लागली होतीच ना..तितक्यात आमच्या शेजारील रुम मधला विद्यार्थी म्हणाला आपला मालक आहे ना श्री. XXXX (या श्री. XXXX चे एक छोटेसे अल्पोपहारगृहपण आहे)तो एकदम उत्कृष्ट आम्लेट बनवतो.. यु मस्ट गिव इट अ ट्राय.. मी म्हटलं ठीकाय जाऊ त्यांच्याकडेच.
***
(वेळ: 15:00)
त्यांच्या रूम वर पहिल्या माळ्यावर गेलो. तेव्हा तर मालक झोपलेले असून ते १६:३० वाजता उठतील असे समजलं.
***
(वेळ: १६:3०)
मी पुन्हा त्यांच्या रूम वर पहिल्या माळ्यावर गेलो. तर मालक अजूनही झोपलेले असून ते आता आपल्या पुनः निर्धारित वेळेस म्हणजे १७:०० वाजता उठतील अस समजलं.
***
(वेळ १७:००)
मालक झोपेतून जागे आणि अस्मादिकांना खास पुण्याचं वैशिट्य असलेल्या शैलीत "काय पाहिजे?" म्हणून विचारते...
आता पुढचा संवाद पहा:
(इं: इंटरनेटप्रेमी, मा: मालक)
इं: काका मला एक दोन आम्लेट हवी आहेत..
मा: ओ नीट काय ते सांगा एक का दोन?
इं: दोन, दोन..
मा: बर कशाबरोबर खाणार पोळी का ब्रेड?
इं: ब्रेड.
मा: ठीक आहे, अर्ध्या तासाने या.
इं: ठीक, पण काका मला जरा बाहेर जायचं आहे, लवकर नाही का मिळणार?
('मा' एक तुच्छता पूर्ण कटाक्ष टाकतात.)
इं: ठीक आहे मग मी १७:३० वाजता येतो.
मा: हम्म..
***
(वेळ: १८:00)
भुकेने पोटात कावळे ओरडू लागले आणि आम्ही चला आता आम्लेट घेऊन येऊ आणि मस्त पैकी ब्रेड बरोबर हाणू अस विचार करून मालकांकडे रवाना.
(वेळ: १८:१०)
मा: हे घ्या आम्लेट तयार..
इं: छान , किती झाले पैसे?
मा: २५ रु.
इं: हे घ्या..
[मा', 'इं' कडुन पैसे घेतात, (आणि वाचकांना अतिशयोक्ती वाटेल, पण ते रु.१० च्या नोटांच्या खरेपणाची चाचणी देखील घेतात!) असो.]
मा: ब्रेड कुठायत?
'इं' अवाक, मालकानेच ब्रेड आणार असे आश्वासन दिल्याने, अस्मादिकांनी ब्रेड आणलेच नव्हते!
मा : अरे काय तुम्ही मुंबईकर? ब्रेड कुठायत..? मी तुम्हाला विचारलेल ना कशाबरोबर खाणार म्हणून?
इं: मा, हो आणि मी तुम्हाला सांगितलेलं की ब्रेड बरोबर खाणार.
मा: अरे मग आणायचे नाही का ब्रेड? तुम्ही मुंबईकर असेच बावळट!
इं पुन्हा एकदा अवाक, खरतर तुम्हाला एखादी गोष्ट कशाबरोबर खाणार अस एखादा खाद्य सेवा पुरवठादार विचारतो, तेव्हा तोच ती वस्तू मुख्य वस्तू सोबत पुरवणार असाच त्याचा साधा सरळ अर्थ होतो. इथे मात्र 'मा' मात्र सरळ माझ्यावरच घसरले..
आणि शेवटी मलाच पायपीट करत जाऊन, ब्रेड आणून ते आम्लेट खावं लागलं!
(एक्स पुणेकर)
वाचने
16014
वाचनखूण
प्रतिक्रिया
66
अंडे
In reply to अंडे by शेखर काळे
नाही...
१४:२० पासून १८:१० पर्यंत भुक
(सदर प्रतिक्रिया केवळ आपल्या
In reply to (सदर प्रतिक्रिया केवळ आपल्या by विश्वनाथ मेहेंदळे
इतके करूनही त्याला असा अनुभव
In reply to इतके करूनही त्याला असा अनुभव by राजेश घासकडवी
चालू द्या..
In reply to इतके करूनही त्याला असा अनुभव by राजेश घासकडवी
रुखरुख
In reply to इतके करूनही त्याला असा अनुभव by राजेश घासकडवी
तुम्ही मुंबईकर असेच
अनुभव वाचून डोळे पाणावले..
खुप छान काल्पनिक संवाद लिहिला
In reply to खुप छान काल्पनिक संवाद लिहिला by Dhananjay Borgaonkar
@Dhananjay Borgaonkar अजिबात
In reply to @Dhananjay Borgaonkar अजिबात by इंटरनेटस्नेही
अबब..सत्यकथा वाचुन शहारा आला.
इंशेठ
In reply to इंशेठ by केशवसुमार
+१
पुणेरी
जाउद्याहो आता असल्या भाकडकथेत
चालू द्या..
अनेक गोष्टी गृहीत धरल्यामुळे गडबड !!
In reply to अनेक गोष्टी गृहीत धरल्यामुळे गडबड !! by असुर
+१००००००००००
In reply to +१०००००००००० by सविता
+१
In reply to +१ by मी-सौरभ
मस्तच!!!!
ते सगळ जाउ देत
या शिर्षकात
In reply to या शिर्षकात by विकास
>>>या शिर्षकात redundancy
पॉपकॉर्न घेउन बसलो होतो.
In reply to पॉपकॉर्न घेउन बसलो होतो. by चिंतामणी
काळजी करु नका काही काही सामने
In reply to काळजी करु नका काही काही सामने by मृत्युन्जय
इंतजार और सही और सही
मजा वाटली. हे केवळ पुण्यातच
In reply to मजा वाटली. हे केवळ पुण्यातच by अप्पा जोगळेकर
मजा वाटली. हे केवळ पुण्यातच
सोपं आहे
विक्षिप्त
In reply to विक्षिप्त by प्रकाश घाटपांडे
संपादकांसाठी: महोदय, लिंक अन
In reply to संपादकांसाठी: महोदय, लिंक अन by पाषाणभेद
नोंद घेतली
झक्कास प्रतिक्रिया... लगे
मला तरी एक ऑम्लेट खाण्यासाठी
In reply to मला तरी एक ऑम्लेट खाण्यासाठी by मृत्युन्जय
+१
५ चांदण्या चमकवणार्या हॉटेल
In reply to ५ चांदण्या चमकवणार्या हॉटेल by दत्ता काळे
जबरा
पुणेकर
लेख मजेशीर आहे.
लाज वाटायला पाहिजे...
स्वतःच्या लेखनाला भारंभार
In reply to स्वतःच्या लेखनाला भारंभार by परिकथेतील राजकुमार
>>स्वतःच्या लेखनाला भारंभार
In reply to >>स्वतःच्या लेखनाला भारंभार by विश्वनाथ मेहेंदळे
विश्वनाथ मेहेंदळे
In reply to >>स्वतःच्या लेखनाला भारंभार by विश्वनाथ मेहेंदळे
विश्वनाथ मेहेंदळे - अजून एक राहीलंच की!!
In reply to >>स्वतःच्या लेखनाला भारंभार by विश्वनाथ मेहेंदळे
खूप छान लिहिता. कशाला असे
In reply to स्वतःच्या लेखनाला भारंभार by परिकथेतील राजकुमार
सहमत
In reply to सहमत by Pain
चोप्य पस्ते
In reply to चोप्य पस्ते by राजेश घासकडवी
सॉरी. कॉपी पेस्ट म्हणायचे
In reply to सॉरी. कॉपी पेस्ट म्हणायचे by Pain
गैरसमज
In reply to गैरसमज by ३_१४ विक्षिप्त अदिती
मला वाटलं होतं की
In reply to मला वाटलं होतं की by राजेश घासकडवी
खल्लास!!!!
In reply to स्वतःच्या लेखनाला भारंभार by परिकथेतील राजकुमार
अस्सल
माझा प्रतिसाद (आभार आणि खुलासा)
धागा संपला म्हणायच का?
In reply to धागा संपला म्हणायच का? by मी-सौरभ
(विषय दिलेला नाही)
प्रत्युत्तरे
शहाणे
मस्तच्
अरे हे तर काहिच नाय, एकदा
In reply to अरे हे तर काहिच नाय, एकदा by मधुकर
त्याला तुम्ही ग्राहक म्हणून
In reply to त्याला तुम्ही ग्राहक म्हणून by मृत्युन्जय
एक बौध्दीक.. वरील प्रतिसादात
In reply to एक बौध्दीक.. वरील प्रतिसादात by कानडाऊ योगेशु
सगळे पुणेकर "कंस"च असता हो.
In reply to सगळे पुणेकर "कंस"च असता हो. by मृत्युन्जय
पेटलायस तू! चितळ्यांच्या
In reply to पेटलायस तू! चितळ्यांच्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
हॅहॅहॅहॅहॅहॅ ... हे आपले
मी चितळ्यांच्या नियमांचे पालन