IT WIFE आणि स्वयंपाक
लग्न झाल्यानंतर साधारणपणे १०-१५ दिवसांनी "स्वयंपाक" हा मुद्दा किती महत्वाचा होता हे तरुणांना कळून चुकते. लग्न ठरवताना सुंदरता, शिक्षण, आणि नोकरी हे तीनच मुद्दे विचारात घेतल्याने हा अनर्थ तरुणांवर ओढवतो. मुलीही "लग्नानंतर स्वयंपाकाच बघू..." असाच विचार करत असाव्यात किंबहुना करतात. खरंतर लग्न झालेल्या ह्या मुलींना बाई किंवा काकू म्हणायला हरकत नाही. पण "बाई" म्हटल्यावर ह्या मुलींना प्रचंड राग येतो. विशेषत: सॉफ्टवेअर मधल्या मुलीला. स्वयंपाक आणि घरकामाची जबाबदारी एकटीच्याच अंगावर येईल का काय असं बहुधा त्यांना वाटत असावं.ह्या फील्डमधल्या मुलींशी ज्यांच लग्न झालेले आहे त्यांच्याबद्दल मला मनापासून सहानुभूती व्यक्त करावीशी वाटते. स्वयंपाक आणि जॉब अशी दुहेरी भूमिका आपण उत्तमरीतीने पार पाडत आहोत असा ह्या बायकांचा गोड गैरसमज असतो. स्वयंपाकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्वप्रथम लग्न न झालेल्या तरुण वर्गाला माझा सल्ला आहे की लग्न ठरवताना, "स्वयंपाक येतो का?" हा प्रश्न आवर्जून विचारावा. " थोडा-थोडा स्वयंपाक येतो" असे उत्तर मिळाल्यास " थोडा म्हणजे किती??" हे विचारायला विसरू नका. प्रत्येकीची definition वेगळी असते. माझ्या पत्नीने "सगळं बनवता येतं..." असं म्हटलेलं मला आठवतं. "चांगलं" , "बर्यापैकी" हे शब्द ती जाणूनबुजून म्हणाली नसावी हे मला तिचे पाककौशल्य बघितल्यावर कळाले.
आठवड्याचे सातही दिवस स्वयंपाकाचा कंटाळा असणार्या ह्या बायका तुम्हाला सॉफ्टवेअर मध्येच सापडतील.सदानकदा आजचा स्वयंपाक करायचं कसं चुकवता येईल ह्याच खटाटोपात त्या असतात. " आज बाहेर खायला जायचे का?" हा प्रश्न नवर्याने विचारून होण्याआधी त्या "सही...... कित्ती छान......आलेच हं आवरून...." असे म्हणत क्षणार्धात दिसेनाश्या होतात. एकदा बाहेर जायचं ठरवल्यावर , हुशार आणि शहाण्या नवर्याने ते कधीही कॅन्सल करू नये. अन्यथा भांडण होण्याचे ९९% चान्सेस असतात.शेवटी बाहेरून हॉटेलमधले जेवण मागवावे लागते आणि मगच ह्या बायका शांत होतात हे सांगण्याची गरज नसावी. वीक एन्ड ला बाहेर पडण्याची वेळही ह्या बायका अचूक हेरतात.संध्याकाळीच बाहेर पडायचं म्हणजे नवरा "रात्री बाहेरच जेवू" असे म्हणतो हे त्यांना चांगलेच ठाऊक असते. चुकून कधी स्वयंपाक करण्याचा योग आलाच तर, "आपण" आज खिचडी बनवूया का? असे प्रेमाने बोलून नवर्यालाही स्वयंपाक घरात ओढून काम करायला लावण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. काही नवरेमंडळी ह्याला बळी पडतात. काहीजण "आपण" ह्या शब्दावरून "तू" ह्या शब्दावर नेण्याचा निष्फळ प्रयत्न करतात.
एकटीने स्वयंपाक करणे हा आपल्यावर अन्याय आहे अस ह्यांना नेहमी वाटतं. "दोघे खातो ना?? मग दोघे मिळून स्वयंपाक करू" असा professionalism त्या घरातही आणतात. ह्या बायका स्वयंपाक करताना नवरा बाहेर आरामात TV बघत असेल तर हे त्यांना अजिबात बघवत नाही. स्वयंपाक करताना ह्या आळशी माणसाला कुठलं काम देता येईल ह्याचा विचारच त्या करत असाव्यात. गरज नसलीतरी थोडं का होईना आपल्या नवर्याने काम केलच पाहिजे असा त्यांचा अट्टाहास असतो.अश्या बायकांचे नवरे साधारणत: ताट-वाट्या घेणे, कोथिंबीर निवडणे,डायनिंग टेबल पुसणे अशी कामे करतात. IT मधल्या बायकांना उत्तम व चविष्ट भाजी बनवता येते ही संकल्पना निव्वळ अशक्य आहे. बनवलेल्या भाजीचा पहिला प्रयोग त्या आपल्या नवर्यावरच करतात. एवढ्यावरच त्या थांबत नाहीत. वर तोंड करून "कशी झालीय भाजी?" हा प्रश्न विचारायला ते अजिबात विसरत नाहीत. "suggestions " म्हणजे त्यांना अपमानकारक वाटते. त्यांना suggestion देणे म्हणजे नवर्याने वादाला सुरुवात केल्यासारखी असते. भांडण नको म्हणून हे नवरे " भाजी मस्त झालीय..." म्हणत हळूच फ्रीजमधून थोडा सॉस, लोणचे घेताना दिसतात. त्यातूनही हिम्मत करून कुणी suggestion दिलेच तर त्यांची प्रतिक्रिया ठरलेली असते. "झालं? ठेवलास नावं??"....."थोडं कमी जास्त होणारच की रे"......."तू करायचं होतास मग"......"एवढं केलय त्याचं काही नाही..." असा उपकाराचा टोला लगवायलाही ते मागेपुढे बघत नाहीत.
नुकतचं लग्न झालेल्या मुली कंपनीत बसून google वर रेसिपी शोधताना दिसतात. "आपल्याला काहीही बनवता येत नाही" हे नवर्याला इतक्या लवकर कळू नये हा त्यामागचा उद्देश असावा. रेसिपी मिळाली नाही तर आईला,आत्याला,मामीला फोन करून तासभर ह्या बायका रेसिपी विचारण्यात काढतात. "योग्य वयात स्वयंपाक शिकली असतीस तर हि वेळ आली नसती" हे मात्र नवर्याने दिसत असूनही म्हणू नये. ह्या बायकांचा "जेवण बनवण्याचा" मूड अशाने केंव्हाही जाऊ शकतो. चौरस आहार सोडून दररोज नवनवीन छोटे छोटे पदार्थ बनविण्यावर ह्यांचा भर असतो. हे भयंकर आणि अयशस्वी प्रयोग करण्यामागचा उद्देश प्रेमापोटी असतो की " उद्यापासून स्वयंपाकाला बाई लावू" हे नवर्याने स्वत:हून म्हणण्यासाठी? हे त्या बायकांनाच माहित...!
ह्या बायका मंडईतल्या गर्दीमध्येही सहज ओळखून येतात. ब्रँडेड जीन्स आणि टी-शर्ट , एका हातात महागडा मोबाईल व दुसर्या हातात पर्स हि त्यांची ओळख. मल्टीप्लेक्स , शॉपिंग मॉल मध्ये बिनधास्त पैसे वाया घालवणार्या ह्या बायका मंडईमध्ये १-२ रुपयासाठी घासाघीस करताना पहावयास मिळतात. "too costly ......ohh.....too much ......" असे उद्गार ऐकल्यास ती शक्यतो सॉफ्टवेअर मधलीच समजावी. इथे bargaining हा त्यांच्यादृष्टीने मूळ मुद्दा नसून " IT मधली असले म्हणून काय झाले? मलाही भाज्यांमधले कळते म्हटलं...." हे जगाला पटवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मजेची गोष्ट म्हणजे अश्या बायकांना मंडईतले विक्रेतेही ४-५ रुपये आधीच वाढवून सांगतात. एज्युकेटेड बायकांना हे अजूनही कळालेले नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल. मित्र हो, हा लेख लिहण्याचा उद्देश हाच की, तुम्ही सॉफ्टवेअरमधल्या मुलीशी लग्न करत असाल तर पुन्हा विचार करा. बोटांवर मोजण्याइतक्या बायकांना स्वयंपाक येत असेलही, पण होणारी बायको त्यांपैकीच आहे का नाही ते तुम्हालाच ठरवावे लागेल. तुम्हाला स्वत:ला चांगला स्वयंपाक येत असल्यास उत्तमच. पण ह्याचा फायदा IT मधल्या मुली घेणार नाहीत ना हे तपासून पहा. लग्न झालेल्या मित्रांनो , काळ बदलला आहे. मी स्वयंपाक करायला शिकलो. तुम्ही केंव्हा शिकणार?? अजून वेळ गेलेली नाही. चला , उठा....आतातरी स्वयंपाक करायला शिका.
वाचने
36686
वाचनखूण
प्रतिक्रिया
158
हो उठाच!
In reply to हो उठाच! by प्रियाली
+१
नोकरी, पैसा, सौंदर्य, छंद,
In reply to नोकरी, पैसा, सौंदर्य, छंद, by माया
>> सद्य वैवाहीक स्थितीवरुन
In reply to >> सद्य वैवाहीक स्थितीवरुन by मेघवेडा
मेव्या, तुला रे कशाला नसत्या
In reply to मेव्या, तुला रे कशाला नसत्या by विंजिनेर
अरेच्चा! तुम्हा लोकांच्या
ज्याच त्याच स्वातंत्र्य
In reply to ज्याच त्याच स्वातंत्र्य by प्रकाश घाटपांडे
दोघानाही स्वयंपाक यायलाच हवा....!!
मज्जा आली. काय टीआरपी आहे.
In reply to मज्जा आली. काय टीआरपी आहे. by अप्पा जोगळेकर
>> एक अविवाहित << योग्य वयात
In reply to >> एक अविवाहित << योग्य वयात by ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो ताई मी पंचवीस वर्षे वयाचा
In reply to अहो ताई मी पंचवीस वर्षे वयाचा by अप्पा जोगळेकर
तरी तुला सांगत होते, "अप्पा" टोपण नाव बदल..नाही ऐकलस
मस्तं लेख रे.. आवडेश. स्वैपाक
In reply to मस्तं लेख रे.. आवडेश. स्वैपाक by llपुण्याचे पेशवेll
पुण्याचे पेशवे
In reply to मस्तं लेख रे.. आवडेश. स्वैपाक by llपुण्याचे पेशवेll
"स्वयंपाक न येणे" ह्याला शक्यतो कुठलेही valid reason नसावे...
In reply to "स्वयंपाक न येणे" ह्याला शक्यतो कुठलेही valid reason नसावे... by सुजय कुलकर्णी
पुप्या.. विचार कर तु काय
In reply to पुप्या.. विचार कर तु काय by अर्धवट
हा हा हा, पुप्या
In reply to पुप्या.. विचार कर तु काय by अर्धवट
अर्धवटराव , लेख वाचल्याबद्दल
In reply to "स्वयंपाक न येणे" ह्याला शक्यतो कुठलेही valid reason नसावे... by सुजय कुलकर्णी
"स्वयंपाक न येणे" ह्याला
In reply to मस्तं लेख रे.. आवडेश. स्वैपाक by llपुण्याचे पेशवेll
जबरा रे पुपे.. ४ थ्या
लेख आवडला.........!
??????????????????????????????????????
आपलं तर काय टेंशन
In reply to आपलं तर काय टेंशन by प्रभो
हाहाहा
In reply to आपलं तर काय टेंशन by प्रभो
आपलं तर काय टेंशन
तुमचा हा लेख तुम्ही गंमत
वा!!!
In reply to वा!!! by मधुशाला
अगायाया.... =))
In reply to वा!!! by मधुशाला
सहमत
In reply to वा!!! by मधुशाला
अर्र, या काही सभासदांचीच
In reply to अर्र, या काही सभासदांचीच by ३_१४ विक्षिप्त अदिती
इथेही तेच उपायः इनो नाय तर
लेख आवडला
लेखकाशी सहमत..
In reply to लेखकाशी सहमत.. by योगी९००
(विषय दिलेला नाही)
उगाच....
In reply to उगाच.... by सविता
दुर्लक्षच केले असते पण हे
In reply to दुर्लक्षच केले असते पण हे by शिल्पा ब
नक्की त्रास कशाचा
In reply to नक्की त्रास कशाचा by पद्माक्षी
लेखकाने लेख विनोदी आहे असा
In reply to नक्की त्रास कशाचा by पद्माक्षी
<<तुम्हाला नक्की त्रास कशाचा
आयला गायछाप संपलि...
संपादित
तुम्ही पण युयुत्सुंच्या
लेख विनोदी आहे असे समजून
In reply to लेख विनोदी आहे असे समजून by पक्या
सुधारणा लेखनशैलीत का विचारात?
स्वयपाक करताना..
In reply to स्वयपाक करताना.. by चन्द्रशेखर सातव
१+
चालू द्या...
लेख प्रसिद्ध झाल्याबद्दल
In reply to लेख प्रसिद्ध झाल्याबद्दल by मृत्युन्जय
अगदी अगदी... पुरुषमुक्ती
In reply to अगदी अगदी... पुरुषमुक्ती by शिल्पा ब
४९८अ सारखे ४९८आ पण टाकुन
In reply to अगदी अगदी... पुरुषमुक्ती by शिल्पा ब
तुमच्यासारख्या अजिबात
In reply to लेख प्रसिद्ध झाल्याबद्दल by मृत्युन्जय
मृत्यूंजय... लेख नीट वाचला
In reply to मृत्यूंजय... लेख नीट वाचला by मस्त कलंदर
=)) मेला बिचारा मृत्युंजय!
In reply to =)) मेला बिचारा मृत्युंजय! by ३_१४ विक्षिप्त अदिती
नक्की कोण मारणार ते सांगा
In reply to मृत्यूंजय... लेख नीट वाचला by मस्त कलंदर
वाचला हो नीट. म्हणुनच म्हणतो
In reply to लेख प्रसिद्ध झाल्याबद्दल by मृत्युन्जय
तुम्हाला जे अथक प्रयत्नांनी
In reply to तुम्हाला जे अथक प्रयत्नांनी by सुजय कुलकर्णी
बूंदसे गयी...
In reply to बूंदसे गयी... by प्रियाली
खतरनाक
In reply to तुम्हाला जे अथक प्रयत्नांनी by सुजय कुलकर्णी
हा ! हा ! हा !
सगळेच तेंडूलकर
मी या लेखकाची पंखा झालेय...
वा वा
In reply to वा वा by अमोल मेंढे
आणी हो आमच्याकडे आठवड्यातुन ३
उम्म्म
In reply to उम्म्म by इरसाल
बरोबर
एक चांगला विनोदी लेख
बायकोबी पायजे सुंदरबी
मजा येतेय..