मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रुळ

अवलिया · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
हातात हात घेवुन आम्ही चालायचो ती एका रुळावर पाय ठेवायची अन् मी दुस-या रुळावर पाय ठेवायचो तोल संभाळत चालत असतांना बोलत असतांना असंच आयुष्यातही संभाळायचे एकमेकांना हलकेच बजावुन सांगायचो करिअरच्या रुळावरुन कधीतरी तिची गाडी निघुन गेली मी मात्र मारत आहे त्याच रुळांवरुन शटलसारख्या चकरा... टर्मिनस टु टर्मिनस.

वाचन 6899 वाचनखूण प्रतिक्रिया 23

jaypal गुरुवार, 06/24/2010 - 20:17
कविता आवड्ली gffh *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

In reply to by jaypal

राघव Fri, 06/25/2010 - 00:45
अरे तुला कसले कसले फोटू सापडतात रे!! तू स्वतःच एक फोटूसर्च इंजिन आहेस रे बाबा.. _/\_ नाना, कविता उत्तम! पण, हळव्या कविता तुम्हाला शोभत नाहीत! ;) राघव

वेताळ गुरुवार, 06/24/2010 - 20:26
इंजिनचा डायव्हर जर बरोबर नसेल तर असच होणार. हा काय रुळाचा दोष नाही. वेताळ

उम्मि गुरुवार, 06/24/2010 - 20:28
मोजक्या शब्दांत काऴजाला भीडणारया भावना....... उम्मी...

गणपा गुरुवार, 06/24/2010 - 20:32
नाना छान मुक्तकाव्य. चित्रपालाचं चित्र ही तंतोतंत जुळणार.

रेवती गुरुवार, 06/24/2010 - 20:35
मस्त हो नाना! मग सध्या तुम्ही कोणत्या दोन ठेसनांमध्ये चकरा मारता?;) रेवती

मेघवेडा गुरुवार, 06/24/2010 - 21:09
विडंबनांची धूळ उडाल्याने नानाची मूळ कविता 'रूळ' विसरली जाऊ नये म्हणून हा प्रतिसाद! ;) बाकी कविता एकदम नाना पेश्शल! :)

In reply to by मेघवेडा

छोटा डॉन Fri, 06/25/2010 - 11:11
>>विडंबनांची धूळ उडाल्याने नानाची मूळ कविता 'रूळ' विसरली जाऊ नये म्हणून हा प्रतिसाद! +१, असेच म्हणतो. नान्याची कविता छानच आहे, प्रश्नच नाही ! ------ छोटा डॉन

केशवसुमार Fri, 06/25/2010 - 15:36
अवलियासेठ, सुंदर कविता.. (हळवा)केशवसुमार १८ (१६+२ प्रतिसादातील) विडंबनाची प्रेरणा देणारी ऐतिहासीक काव्या बद्दल अभिनंदन ()केशवसुमार

अवलिया Fri, 06/25/2010 - 17:25
सर्व वाचकांचे, प्रतिसादकांचे आणि विडंबकांचे आभार :) --अवलिया