रुळ
लेखनविषय:
हातात हात
घेवुन आम्ही चालायचो
ती एका रुळावर पाय ठेवायची अन्
मी दुस-या रुळावर पाय ठेवायचो
तोल संभाळत
चालत असतांना बोलत असतांना
असंच आयुष्यातही संभाळायचे
एकमेकांना हलकेच बजावुन सांगायचो
करिअरच्या रुळावरुन
कधीतरी तिची गाडी निघुन गेली
मी मात्र मारत आहे त्याच रुळांवरुन
शटलसारख्या चकरा... टर्मिनस टु टर्मिनस.
वाचने
6903
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
कविता आवड्ली
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/In reply to वा नाना by jaypal
अरे तुला कसले कसले फोटू सापडतात रे!!
तू स्वतःच एक फोटूसर्च इंजिन आहेस रे बाबा.. _/\_
नाना, कविता उत्तम!
पण, हळव्या कविता तुम्हाला शोभत नाहीत! ;)
राघव
In reply to या जयपालची तर.. by राघव
जयपाल रावांना __/\__
नानांची कविताही सुरेख !
स्मिता
आमचा खास प्रतिसाद! ;)
चतुरंग
In reply to हे घ्या नाना, by चतुरंग
पेश्शल प्रतिसाद
अदिती
इंजिनचा डायव्हर जर बरोबर नसेल तर असच होणार. हा काय रुळाचा दोष नाही.
वेताळ
मोजक्या शब्दांत काऴजाला भीडणारया भावना.......
उम्मी...
नाना छान मुक्तकाव्य.
चित्रपालाचं चित्र ही तंतोतंत जुळणार.
जबराच काव्य रे नाना..!


मस्त हो नाना!
मग सध्या तुम्ही कोणत्या दोन ठेसनांमध्ये चकरा मारता?;)
रेवती
विडंबनांची धूळ उडाल्याने नानाची मूळ कविता 'रूळ' विसरली जाऊ नये म्हणून हा प्रतिसाद! ;)
बाकी कविता एकदम नाना पेश्शल! :)
In reply to विडंबनांच by मेघवेडा
>>विडंबनांची धूळ उडाल्याने नानाची मूळ कविता 'रूळ' विसरली जाऊ नये म्हणून हा प्रतिसाद!
+१, असेच म्हणतो.
नान्याची कविता छानच आहे, प्रश्नच नाही !
------
छोटा डॉन
जियो णाणा , अंमळ भावनाप्रधाण आयटम साँग आहे. :)
- (भाऊक) टारझन
छान!
बिपिन कार्यकर्ते
वा, मस्त!!. अखेरच्या ओळी वाचून, काही झाले तरी माणूस शेवटी परिस्थितीला 'रुळतो' म्हणायचं.
In reply to टर्मिनस इलनेस by नंदन
हे आलेच कोटीभास्कर. ;)
बिपिन कार्यकर्ते
In reply to हे आलेच by बिपिन कार्यकर्ते
नव्हे कोटीकेसरी!
एवढ्या विडंबनांत "मूळ" मागे पडू नये म्हणून पुन्हा एक कंपूबाज प्रतिसाद.
अदिती
In reply to टर्मिनस इलनेस by नंदन
माणूस शेवटी परिस्थितीला 'रुळतो' म्हणायचं.
एकदम बरोबर!
हाहाहा!
रेवती
In reply to टर्मिनस इलनेस by नंदन
हा हा हा!
-Nile
नान्या, हा आमचा प्रतिसाद..
फारच 'दर्द' आहे....
छान कविता...
अवलियासेठ,
सुंदर कविता..
(हळवा)केशवसुमार
१८ (१६+२ प्रतिसादातील) विडंबनाची प्रेरणा देणारी ऐतिहासीक काव्या बद्दल अभिनंदन
()केशवसुमार
सर्व वाचकांचे, प्रतिसादकांचे आणि विडंबकांचे आभार :)
--अवलिया
वा नाना