प्रिय तुकाराम,
काल तु सपनात आला
अन् म्हणला, चल वैकुंठाला.
मी हापकुनच गेलो
हातापायाला दरदरुन घाम फुटला.
च्यामारी तुक्या,
तुला काय सवसारात इंट्रेस नव्हता.
तु बरा आन तुव्हा इट्टल बरा.
माहं तसं नव्ह रं दादा,
पोरासोरायचं शिक्षान, म्हातारा-म्हतरी,
त्यायच्या हौशी-मौजी,
अजुन लय गोष्टी राह्यला
आन तु म्हणतो चल वैकुंठाला.
आपल्याच्यानं काय होनार नाय.
तुव्ह मी काय ऐकणार नाय.
टाळ चिपळ्याच्या आवाजात
आरामात झोपलो.
पर, माह्याच तसबीरीजोळ
माहं गणगोत काहून रडून राह्यलं
हे मातर कळत नव्हतं ?
वाचने
3799
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
लय भारी
आरं हा
In reply to लय भारी by पाषाणभेद
राम नाम .... -
ते
In reply to राम नाम .... - by टारझन
कुठं वाचलं आठवत नाही
In reply to ते by ३_१४ विक्षिप्त अदिती
बरोबरंच
In reply to कुठं वाचलं आठवत नाही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाबुराव अवांतराबद्दल क्षमा करा राव....!
In reply to बरोबरंच by टारझन
क्षमा करतील हो!
In reply to बाबुराव अवांतराबद्दल क्षमा करा राव....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कसलं
In reply to बाबुराव अवांतराबद्दल क्षमा करा राव....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असो, मोठे
In reply to कसलं by टारझन
बाबुराव...
बाबुराव
आवडलं
sixth sense
छान लिहलय
टाळ
आवा चालली पंढरपुरा
थोडं वेगळं
कविता बरी