मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वैकुंठ

बाबुराव · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
प्रिय तुकाराम, काल तु सपनात आला अन् म्हणला, चल वैकुंठाला. मी हापकुनच गेलो हातापायाला दरदरुन घाम फुटला. च्यामारी तुक्या, तुला काय सवसारात इंट्रेस नव्हता. तु बरा आन तुव्हा इट्टल बरा. माहं तसं नव्ह रं दादा, पोरासोरायचं शिक्षान, म्हातारा-म्हतरी, त्यायच्या हौशी-मौजी, अजुन लय गोष्टी राह्यला आन तु म्हणतो चल वैकुंठाला. आपल्याच्यानं काय होनार नाय. तुव्ह मी काय ऐकणार नाय. टाळ चिपळ्याच्या आवाजात आरामात झोपलो. पर, माह्याच तसबीरीजोळ माहं गणगोत काहून रडून राह्यलं हे मातर कळत नव्हतं ?

वाचने 3799 वाचनखूण प्रतिक्रिया 19

In reply to by पाषाणभेद

बाबुराव 18/04/2010 - 13:20
आरं हा गड्या. माणूस मरुन गेलाय आन त्याला लय इचार सुचुन राह्यला असा लय भयकथेत येऊन गेलंय. :( बाबुराव :)

टारझन 18/04/2010 - 12:31
राम नाम .... - प्रो.प्रा. टारझन मालक, हॉटेल वैकुंठ लॉजींग बोर्डींग , वेताळटेकडी खुर्द

In reply to by टारझन

३_१४ विक्षिप्त अदिती 19/04/2010 - 18:09
ते प्रो.प्रा. मी चुकून प्रा.डॉ. असं वाचलं. बाकी कविता समजली नाही. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 19/04/2010 - 18:36
प्रत्येक धाग्यावर अवांतर चर्चा, गप्पा होऊ नयेत हे मान्य, पण ही शिस्त प्रत्येकानेच लावून घ्यायला हवी. ओळखा पाहू हे वाक्य कोणी कोणास आणि का म्हटले असावे ....! :) - प्रा.डॉ.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टारझन 19/04/2010 - 20:51
बरोबरंच आहे ... वरिल उपप्रतिसात पहिल्यांदाच दिल्या गेला आहे असे वाटते. तेंव्हा वरील करड्या शाईतल्या वाक्याची पुर्तता होते आहे. - टारंजय

In reply to by टारझन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 19/04/2010 - 21:04
>>>वरिल उपप्रतिसात पहिल्यांदाच दिल्या गेला आहे असे वाटते. टार्‍याला बरेच संदर्भ माहिती नसतात आणि गडबडीत काही तरी लिहून जातो. आणि मला विनाकारण टारुला उत्तरे देत बसावे लागते. जरा, अभ्यास करत जा...! :) आणि उपप्रति'सात' यातले 'सात' काय आहे ? उपप्रति'आठ' का नाही...!>:) >:) >:) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धमाल मुलगा 19/04/2010 - 21:09
बाबुराव तशे मोठ्या मनाचे हायेत. नक्की क्षमा करतील त्ये. :) >>उपप्रति'आठ' का नाही... =)) =))

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टारझन 19/04/2010 - 21:26
=)) =)) =)) =)) कसलं लिहीलंय ... "उपप्रतिसात" व्वा !! =)) बाकी हल्ली रिकामटेकडा वेळ कमी असल्याने अभ्यास कमी आहे हे मान्य केलेच पाहिजे ... बाकी मला आजिबात माहिती नाहीये बरकां .. की तुम्ही रिकर्सिव प्रतिसाद दिला होतात ते :) - (नापास) अभ्याश प्रतिसातवी

In reply to by टारझन

llपुण्याचे पेशवेll 20/04/2010 - 07:34
असो, मोठे व्हा! सांगा बरे असे कोण कोणास म्हणाले.. पुण्याचे पेशवे

शुचि 18/04/2010 - 16:57
बाबुराव मस्त लिहीलय हो : ) दिवसाची सुरुवात छान झाली. झकास. =D> ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ सरेंडर इज द टेंडरेस्ट इंपल्स ऑफ द हार्ट, अ‍ॅक्टींग आउट ऑफ लव्ह टू गिव्ह व्हॉटेव्हर द बिलव्हड वॉन्ट्स.

मीनल 18/04/2010 - 17:11
लेखन आवडलं. मला वास्तव वाटलं. भाषा ही आवडली. मीनल. http://myurmee.blogspot.com/

sur_nair 19/04/2010 - 05:56
sixth sense चित्रपट आठवला. बाकी इथून पाय निघणे जरा अवघडच असते आपल्या सारख्या सामान्य माणसांना

धमाल मुलगा 19/04/2010 - 20:56
टाळ चिपळ्याच्या आवाजात आरामात झोपलो. पर, माह्याच तसबीरीजोळ माहं गणगोत काहून रडून राह्यलं हे मातर कळत नव्हतं ?
अगाबाब्बो! शेवटच्या कडव्यानं शीनच पालटवला की. ब्येस ब्येस. आक्षी खरं लिवलंया बाबूराव तुमी.

राजेश घासकडवी 19/04/2010 - 22:58
मला या कवितेची सुरवातीची कडवी आवडली. त्यात तुकोबासारख्याला जे जमतं ते सर्वसामान्यांना का जमत नाही याविषयी साधीभोळी पण समर्पक टिप्पणी वाटत होती. किंबहुना तुकोबाचा विठ्ठल त्याला घराबाहेर सापडला तसा खूप लोकांना आपला विठ्ठल घरात, संसारात, नात्यागोत्यांच्या पाशात सापडतो. यात छान आयरनी होती. शेवटच्या कडव्यात कलाटणी आहे, पण माझी तरी अंमळ निराशा झाली. राजेश

llपुण्याचे पेशवेll 20/04/2010 - 07:36
कविता बरी वाटली. पुण्याचे पेशवे