मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

झ्ट्पट पि़झ्झा,,,,,

शार्दुल · · पाककृती
नमस्कार मिपाकर!!!!!!!!!!!!!!!!!!! बर्‍याच दिवसानी नवरोबाला पि़झ्झा बनवायची लहर आली,,,,,,, तेव्हा कालच्या विकांताचा मुहुर्त साधला आणि मस्त पि़झ्झा चापला,,,,,,, त्याची पा.क्रु. फोटोसहित ,,,,,, :> रेसिपी नवरोबाकडून मि.पा. स समर्पित. साहित्यः १. पि़झ्झा बेस (बाजारात तयार मिळतो) २. चिज ३. टोम्याटो केचप ४. एक ढोबळी मिरची , कांदा , टोमाटो ५. अमूल बटर ६. चिमूटभर गरम मसाला, मीठ १. एक ढोबळी मिरची , कांदा , टोमाटो एकदम बारीक चिरुन घ्या. pizza २. त्यामधे चिमूटभर गरम मसाला, मीठ आणि टोम्याटो केचप घालून एकजीव करून घ्या. pizza2 ३. पि़झ्झा बेसवर बटर लावून गरम तव्यावर ठेवा म्हणजे थोडा ख्रिस्पिनेस येइल,त्यावर टोम्याटो केचप लावून घ्या आणि शेवटी त्यावर वरील मिश्रणाचा थर लावून घ्या. pizza3 pizza4 ४. ओवन मधे १५ मि. बेक करून घ्या म्ह्न्जे भाज्या पिझ्झा खाताना कचकच लागत नहीत, ओवन नसल्यास गॅसवर पॅनमधे झाकण ठेवून भाजावा,,,,, म्हणजे बेसची दुसरी बाजुही खरपूस होते. त्यानंतर त्यावर चिझचा थर देऊन अणि १० मि. ओवन अथवा गॅसवर ठेवुन द्या. चिझ मेल्ट झाले की पि़झ्झा खाण्यास रेडी,,,,,, :) pizza5 pizza6 pizza7 pizza8 :)

वाचने 18694 वाचनखूण प्रतिक्रिया 34

सुरेख, कॉलेजात असताना आई फ्राय पॅन मधे पिझा करत असे. चिरुन न घेता ति भाज्यांच्या गोल चकत्या करत असे, आठवण झाली :( चुचु

शार्दुल Sat, 03/13/2010 - 14:56
आमच्या ह्यांनी बनवलाय,,,,,,, :) तो नेहमी भज्या चिरुन घेतो,,,, नेहा

दिपाली पाटिल Sat, 03/13/2010 - 14:58
छान आहे झटपट पिझ्झा...जेव्हढ्या झटपट बनत असेल तेव्हढ्याच झटपट संपतही असेल...माझी आईपण फ्रायपॅनमध्ये बनवायची असाच पिझ्झा... एखादवेळेस उगाचच घरात बनवलेली नावडती भाजीपण टाकत असे... दिपाली :)

In reply to by दिपाली पाटिल

बेसनलाडू Sat, 03/13/2010 - 15:59
बे एरियात लॉरेन्स एक्सप्रेस वे वरील टेस्टी पिझ्झा अ‍ॅन्ड सब्स या दुकानात खास घरी बनवता येण्यासारखे, देसी पद्ध्तीचे पिझ्झा मिळतात. यावरील टॉपिंग्ज मध्ये छोले, बटर चिकन, साग, पालक-पनीर यांचा समावेश होतो व त्यांची नावेही शोले, हीरो, खलनायक, वीर-जारा अशी सिनेमांची आहेत! (यात नुकतीच ३ इडियट्स ची भर पडली आहे) (चित्रपटप्रेमी)बेसनलाडू माझ्या काकांच्या घरी पावभाजीची भाजी टॉपिंग्स म्हणून वापरली जाते. किंवा अगदी एखादी कोशिंबीरसुद्धा! (घरगुती)बेसनलाडू

गणपा Sat, 03/13/2010 - 15:03
एकदम सोप्पी सुटसुटीत कृती. मस्तच. आता करुन पहायलाच हवा :)

विसोबा खेचर Sat, 03/13/2010 - 15:07
हम्म! पिझ्झा..! आपण साला चार हात दूर.. बाकी चालू द्या..फोटू मात्र छान आलेत! :) (पिझ्झा, बर्गर वगैरे मुळीच न आवडणारा) तात्या.

In reply to by शार्दुल

टारझन Sat, 03/13/2010 - 17:02
सताठ पिझ्झा अजुन वाढव हो .. शार्दुल -- . ;) खाईन खाईन .. आणि बाकी पार्सल नेईन :) -(पिझ्झा बर्गर फुल्टु चापुन खाणारा) टार्‍या.

मदनबाण Sat, 03/13/2010 - 19:50
पिझ्झा एकदम भारी झालेला दिसतो... :) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com

प्रभो Sat, 03/13/2010 - 20:46
मस्त --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी

रेवती Sat, 03/13/2010 - 21:06
हा आपला देसी पिझ्झा आहे. मस्त लागतो! अमेरिकन (कि इटालियन?) पिझ्झ्याची चव अजिबात नसते. फार्फार आवडतो मला असा पिझ्झा! आणि तुझ्या पतिराजांना सांग ,"फोटू मस्त आलेत" म्हणून. आता मलाही पिझ्झा करावासा वाट्टोय पण आमच्या इथे पूर्ण बेक्ड बेस मिळतो, त्याची तशी चव येत नाही गं! आणि भारतीय दुकानान मिळतो कि नाही माहीत नाही......बर्‍याच जणी तयार नान वापरतात म्हणे! रेवती

गणपा Tue, 03/16/2010 - 16:25
विकांती करुन पाहीला. फक्कड जमला होता. सामिशप्रेमी असल्याने थोडे फेरफार केले होते. एक सचित्र झलक..

मराठे Tue, 03/16/2010 - 20:17
माझ्या आईने बनवलेल्या पिझ्झाची आठवण आली. तिने कधी पिझ्झा खाल्ला नव्हता फक्त चित्र बघितलेलं. तिला त्यात काय टाकतात तेही माहीत नव्हतं पण आमच्या आग्रहासाठी तिने बनवला होता. जे.के.बेकरी मधून "पिझ्झा पाव" आणला, त्यावर टॉमॅटो कॅचप पसरला, नंतर आदल्यादिवशी केलेली पावभाजी पसरली, वरून पुन्हा कांदा, कोथिंबिर वगैरे पसरलं. चिझ घरात नव्हतं (नसायचंच) मग तिने चक्क शिजवलेला बटाटा किसून टाकला. पण त्या पिझ्झाची चव इथल्या इटालियन रेस्टराँपेक्षा जास्त चांगली होती हे जाणवतं.

पिवळा डांबिस Wed, 03/17/2010 - 04:41
६. चिमूटभर गरम मसाला :) पावभाजीची भाजी टॉपिंग्स म्हणून वापरली जाते. किंवा अगदी एखादी कोशिंबीरसुद्धा! =)) ......बर्‍याच जणी तयार नान वापरतात म्हणे! =)) =)) आदल्यादिवशी केलेली पावभाजी पसरली, वरून पुन्हा कांदा, कोथिंबिर वगैरे पसरलं. =)) =)) =)) चिझ घरात नव्हतं ... मग तिने चक्क शिजवलेला बटाटा किसून टाकला. =)) =)) =)) =)) पण त्या पिझ्झाची चव इथल्या इटालियन रेस्टराँपेक्षा जास्त चांगली होती हे जाणवतं. :''( अरे बस, पुरे की! हसून हसून डोळ्यात पाणी आलं आता!!!! =)) :''(

In reply to by पिवळा डांबिस

Nile Wed, 03/17/2010 - 04:55
+१ =)) =)) सगळं ठीक आहे हो मंडळी पण फक्त त्याला पिझ्झा म्हणु नका! ;)

In reply to by पिवळा डांबिस

नेत्रेश Fri, 03/26/2010 - 04:53
भारतात पिझ्झाहट मध्ये सुद्धा असाच पिझ्झा मिळतो का?(बहुतेक नसावा). बहुतेक भारतीयांना ईटालीयन / अमेरिकन चीझच्या चवीची सवय नसल्यामुळे परदेशी मिळणार पिझ्झा आवडत नसावा. चीझ नसलेला पिझ्झा :) :) :) क्लासिक ...

राजेश घासकडवी Wed, 03/17/2010 - 05:32
हा पिझ्झा फारच सुंदर दिसतो आहे. आत्तापर्यंत तयार मिळणाऱ्या पिझ्झा बेसचा माझा अनुभव चांगला नाही. जर घरी ओव्हन असेल तर मी आधी दिलेली पावाची कृती वापरून पावाची कणीक तयार करावी. (वाटते तितकी कठीण नाही - सर्व घटक एकत्र करून फूड प्रोसेसरमध्ये मळून घ्यायचे व फुगवत ठेवायचे) ती पहिल्यांदा पंचडाऊन करून झाल्यावर लाटून मग भाज्या वगैरे कापायला घ्याव्या - त्यावर टॉपिंग घालेपर्यंत फुगण्याइतका वेळ जातोच... मग ओव्हनमध्ये सुंदर भाजून घ्यावा. ताज्या बेसने पिझ्झाला जी चव येते ती वेगळीच. अशा लाटलेल्या पिझ्झाच्या पोळ्या फ्रीज करून ठेवता येतात. त्या महिनाभर सहज टिकतात. तयार बेसपेक्षा स्वस्तही पडतील, व पाहिजे तेव्हा पिझ्झा करता येतो. बाकी मी खाल्लेल्या पिझ्झ्यांमध्ये शिकागो स्टाईल पिझ्झाइतका सुंदर पिझ्झा जगात दुसरा कुठचाही नाही (इटलीतलाही नाही..) राजेश

In reply to by राजेश घासकडवी

स्वाती दिनेश Wed, 03/17/2010 - 13:18
बाकी मी खाल्लेल्या पिझ्झ्यांमध्ये शिकागो स्टाईल पिझ्झाइतका सुंदर पिझ्झा जगात दुसरा कुठचाही नाही (इटलीतलाही नाही..) यातील इटलीतलाही नाही शी असहमत.. रोमच्या फोंटानाच्या तिथल्या रेस्टॉरंटमधला पिझ्झा लाजबाब, फिरेंझच्या लहानशा हाटेलातला अप्रतिम चवीचा पिझ्झा आणि आमच्या फ्राफुतल्या रोमेनो ह्या इटालियन पिझ्झेरियातला पिझ्झा.. ज्याला तोड नाही! स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

राजेश घासकडवी Wed, 03/17/2010 - 13:32
अमेरिकेतला पिझ्झा व इटलीतला हे दोन वेगळे प्राणी असतात. खूप दूरचे नातेवाईक. सिंह आणि मांजरासारखे. काही मांजरं छान असतात, पण... असो. शिकागो स्टाईल पिझ्झ्याबरोबर मी मोठ्याचा अजून थोडा मोठा झालो, त्यामुळे पार्शल आहे. कधीतरी रेसिपी टाकेन... राजेश

In reply to by राजेश घासकडवी

स्वाती दिनेश Wed, 03/17/2010 - 13:42
अमेरिकेतला पिझ्झा व इटलीतला हे दोन वेगळे प्राणी असतात. खूप दूरचे नातेवाईक. अमेरिकन वे ऑफ पिझ्झा आणि इटालियन पिझ्झा हे खूप वेगळे अस॑तात. आणि भारतीय व्हर्जनही वाचले वरती ,ते तर .. स्वाती ता.क: रेसिपीची वाट पाहत आहे...

In reply to by स्वाती दिनेश

रेवती गुरुवार, 03/18/2010 - 21:28
रोमच्या फोंटानाच्या तिथल्या रेस्टॉरंटमधला पिझ्झा लाजबाब नको, नको, स्वातीताई, त्रास होतो असं वाचून्......त्यापेक्षा पाकृ टाक ना!:) रेवती