मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

झ्ट्पट पि़झ्झा,,,,,

शार्दुल · · पाककृती
नमस्कार मिपाकर!!!!!!!!!!!!!!!!!!! बर्‍याच दिवसानी नवरोबाला पि़झ्झा बनवायची लहर आली,,,,,,, तेव्हा कालच्या विकांताचा मुहुर्त साधला आणि मस्त पि़झ्झा चापला,,,,,,, त्याची पा.क्रु. फोटोसहित ,,,,,, :> रेसिपी नवरोबाकडून मि.पा. स समर्पित. साहित्यः १. पि़झ्झा बेस (बाजारात तयार मिळतो) २. चिज ३. टोम्याटो केचप ४. एक ढोबळी मिरची , कांदा , टोमाटो ५. अमूल बटर ६. चिमूटभर गरम मसाला, मीठ १. एक ढोबळी मिरची , कांदा , टोमाटो एकदम बारीक चिरुन घ्या. Image removed. २. त्यामधे चिमूटभर गरम मसाला, मीठ आणि टोम्याटो केचप घालून एकजीव करून घ्या. Image removed. ३. पि़झ्झा बेसवर बटर लावून गरम तव्यावर ठेवा म्हणजे थोडा ख्रिस्पिनेस येइल,त्यावर टोम्याटो केचप लावून घ्या आणि शेवटी त्यावर वरील मिश्रणाचा थर लावून घ्या. Image removed. Image removed. Image removed. ४. ओवन मधे १५ मि. बेक करून घ्या म्ह्न्जे भाज्या पिझ्झा खाताना कचकच लागत नहीत, ओवन नसल्यास गॅसवर पॅनमधे झाकण ठेवून भाजावा,,,,, म्हणजे बेसची दुसरी बाजुही खरपूस होते. त्यानंतर त्यावर चिझचा थर देऊन अणि १० मि. ओवन अथवा गॅसवर ठेवुन द्या. चिझ मेल्ट झाले की पि़झ्झा खाण्यास रेडी,,,,,, :) Image removed. Image removed. Image removed. Image removed. :)

वाचन 18693 प्रतिक्रिया 0