मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धोका

क्रान्ति · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
हास्य वरचे, आत दु:खाशी सलोखा बेगडी आयुष्य देते रोज धोका बंद केली मी सुखाची सर्व दारे, एकही नाही घराला या झरोका हारणे हा वारसा की धर्म माझा? सोडला हातातला प्रत्येक मोका! सोबती काळोखगर्भाचा उबारा, आणि चुकलेल्या क्षणाचा मंद ठोका ध्यास आता थांबण्याचा, संपण्याचा अंत व्हावा वेगळा, नवखा, अनोखा

वाचने 3058 वाचनखूण प्रतिक्रिया 13

अमृतांजन 07/02/2010 - 17:33
प्रत्येक ओळ सुंदर! विशेष्त मला आवडलेल्या ह्या ओळी- हास्य वरचे, आत दु:खाशी सलोखा बेगडी आयुष्य देते रोज धोका हारणे हा वारसा की धर्म माझा? सोडला हातातला प्रत्येक मोका! जियो.

राघव 07/02/2010 - 22:20
प्रत्येक कडवे सुंदर! अवांतर: तुम्ही कवितांचे पुस्तक कधी काढताय याची वाट बघतोय! राघव

प्रमोद देव 07/02/2010 - 22:36
ध्यास आता थांबण्याचा, संपण्याचा अंत व्हावा वेगळा, नवखा, अनोखा शेवटच्या द्विपदीतील अंत्ययमक 'अनोखा' ? त्यामुळे आधीचे सगळे कष्ट पाण्यात गेले. ही द्विपदी सोडून बाकी सगळ्या द्विपदी ऊत्तम जमल्या आहेत. तेव्हा क्रांति,शेवटच्या द्विपदीत योग्य तो बदल कर.बाकी चाल तयार आहे.... ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

शुचि 08/02/2010 - 00:57
आवडली ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

प्राजु 08/02/2010 - 07:07
सोबती काळोखगर्भाचा उबारा, आणि चुकलेल्या क्षणाचा मंद ठोका ध्यास आता थांबण्याचा, संपण्याचा अंत व्हावा वेगळा, नवखा, अनोखा या ओळी खूप सुंदर आहेत. फार फार सुंदर! - प्राजक्ता http://www.praaju.com/

मेघवेडा 08/02/2010 - 21:00
आवडली.. फार सुंदर.. -- मेघवेडा. आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O

In reply to by मेघवेडा

टारझन 08/02/2010 - 22:20
छाणंच हो कविता :) - गेमवेडा खरडवही आणि खरडफळा अनुमती मिळाली ना ? आता सही बदला :)

बिपिन कार्यकर्ते 08/02/2010 - 22:01
कविता आवडली. थोडी वेगळ्या धाटणीची वाटली. राघवप्रमाणेच आम्हीही वाट बघू आता. :) बिपिन कार्यकर्ते

सुधीर काळे 08/02/2010 - 22:10
क्रांती, कविता छान जमली आहे. ------------------------ सुधीर काळे बाद मुद्दत उन्हें देखकर यूँ लगा, जैसे बेकार दिलको करार आ गया!

अश्विनीका 08/02/2010 - 22:38
सुंदर कविता. ध्यास आता थांबण्याचा, संपण्याचा अंत व्हावा वेगळा, नवखा, अनोखा ह्या ओळी तर खासच. - अश्विनी