Skip to main content

अनंताचा खेळ..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 21/12/2009 या दिवशी प्रकाशित केले.
गेला रूसुनिया | कातर सांजेला | तेजाचा तो गोळा | लालबुंद || कललेली सांज | चढणारी रात | सोडुनिया साथ | रवी गेला || कुशित तमाच्या | नक्षत्रे सहस्र | नांदती एकत्र | चांदवर्खी || शशीबिंब नभी | लोभस देखणे | धरेचे लाजणे | पाहून ते || चंदेरी ही रात | सावळा शृंगार | क्षितिजाच्या पार | रवी पाही || वितळला राग | सोडी अहंकारा | मागतो किनारा | नभाकडे || भिजली पहाट | त्याच्या आसवांत | झाली वाटाघाट | चंद्रासवे || चांद परतूनी | रवीबिंब आले | क्षितिज रंगले | केशरात || रोजचाच घोळ | नाही ताळमेळ | अनंताचा खेळ | चालू राही || - प्राजु
लेखनविषय:

वाचने 5981
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

छान छंदोबद्ध रचना! (आमची दुसरी दाद इथे आहेच! ;) ) चतुरंग

सुंदर... :) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia

प्राजुजी नेहमी प्रमाणेच छान झालीय कविता. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

आवडली कविता. -अनामिक

प्राजु, नेहमी प्रमाणेच सुरेख कविता आवडली. :) आजकाल शांत झाला आहात तुम्ही का बरे ? ***** राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

चांगली कविता! डोळ्यासमोर संध्याकाळ आली. बाकी आम्ही छंदाच्या फंदात पडत नाही म्हणून काय झालं? कविता आवडली. रेवती

ज ब र द स्त अभंग रचना. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

खरोखर फार सुंदर जमलिये कविता. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

प्राजु, कविता आवडली. अदिती

कविता सूंदर झालीये!

आवडली कविता. -दिलीप बिरुटे

आदिती, स्नेहाराणी, प्रा. डॉ. मनापासून आभार. - प्राजक्ता http://www.praaju.com/

फार फार सुरेख... :X

मस्त वर्णन आहे चंदेरी ही रात | सावळा शृंगार | क्षितिजाच्या पार | रवी पाही || वितळला राग | सोडी अहंकारा | मागतो किनारा | नभाकडे || भिजली पहाट | त्याच्या आसवांत | झाली वाटाघाट | चंद्रासवे || ईथे कविता वादातीत उंची गाठते.. दवबिंदुंना आसवाचे रुप देण्याची कल्पना उच्चच !!! आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

सौरभ, हर्षद आनंदी आपले मनापासून आभार. - प्राजक्ता http://www.praaju.com/

चांद परतूनी | रवीबिंब आले | क्षितिज रंगले | केशरात || शब्द लावण्य मोह घालते

माननीय प्राजुजी छान छंदोबद्ध रचना! आवडली ! :) --अवलिया