अनंताचा खेळ..
लेखनविषय:
गेला रूसुनिया | कातर सांजेला |
तेजाचा तो गोळा | लालबुंद ||
कललेली सांज | चढणारी रात |
सोडुनिया साथ | रवी गेला ||
कुशित तमाच्या | नक्षत्रे सहस्र |
नांदती एकत्र | चांदवर्खी ||
शशीबिंब नभी | लोभस देखणे |
धरेचे लाजणे | पाहून ते ||
चंदेरी ही रात | सावळा शृंगार |
क्षितिजाच्या पार | रवी पाही ||
वितळला राग | सोडी अहंकारा |
मागतो किनारा | नभाकडे ||
भिजली पहाट | त्याच्या आसवांत |
झाली वाटाघाट | चंद्रासवे ||
चांद परतूनी | रवीबिंब आले |
क्षितिज रंगले | केशरात ||
रोजचाच घोळ | नाही ताळमेळ |
अनंताचा खेळ | चालू राही ||
- प्राजु
वाचने
5981
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
छान छंदोबद्ध रचना!
(आमची दुसरी दाद इथे आहेच! ;) )
चतुरंग
सुंदर... :)
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
प्राजुजी नेहमी प्रमाणेच छान झालीय कविता.

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/


***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/आवडली कविता.
-अनामिक
प्राजु,
नेहमी प्रमाणेच सुरेख कविता आवडली.
:)
आजकाल शांत झाला आहात तुम्ही का बरे ?
*****
राज जैन, सध्या नर्हे, पुणे येथे मुक्काम
चांगली कविता!
डोळ्यासमोर संध्याकाळ आली.
बाकी आम्ही छंदाच्या फंदात पडत नाही म्हणून काय झालं?
कविता आवडली.
रेवती
दिवस-रात्रीचा खेळ चांगला आहे.
ज ब र द स्त अभंग रचना.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करीखूपच छान.
क्रान्ति
अग्निसखा
खरोखर फार सुंदर जमलिये कविता.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
सर्वांचे आभार. :)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
प्राजु, कविता आवडली.
अदिती
कविता सूंदर झालीये!
आवडली कविता.
-दिलीप बिरुटे
आदिती, स्नेहाराणी, प्रा. डॉ. मनापासून आभार.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
फार फार सुरेख... :X
मस्त वर्णन आहे
चंदेरी ही रात | सावळा शृंगार |
क्षितिजाच्या पार | रवी पाही ||
वितळला राग | सोडी अहंकारा |
मागतो किनारा | नभाकडे ||
भिजली पहाट | त्याच्या आसवांत |
झाली वाटाघाट | चंद्रासवे ||
ईथे कविता वादातीत उंची गाठते.. दवबिंदुंना आसवाचे रुप देण्याची कल्पना उच्चच !!!
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
सौरभ, हर्षद आनंदी आपले मनापासून आभार.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
चांद परतूनी | रवीबिंब आले |
क्षितिज रंगले | केशरात ||
शब्द लावण्य मोह घालते
माननीय प्राजुजी
छान छंदोबद्ध रचना!
आवडली ! :)
--अवलिया
वा प्राजु