मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अनंताचा खेळ..

प्राजु · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
गेला रूसुनिया | कातर सांजेला | तेजाचा तो गोळा | लालबुंद || कललेली सांज | चढणारी रात | सोडुनिया साथ | रवी गेला || कुशित तमाच्या | नक्षत्रे सहस्र | नांदती एकत्र | चांदवर्खी || शशीबिंब नभी | लोभस देखणे | धरेचे लाजणे | पाहून ते || चंदेरी ही रात | सावळा शृंगार | क्षितिजाच्या पार | रवी पाही || वितळला राग | सोडी अहंकारा | मागतो किनारा | नभाकडे || भिजली पहाट | त्याच्या आसवांत | झाली वाटाघाट | चंद्रासवे || चांद परतूनी | रवीबिंब आले | क्षितिज रंगले | केशरात || रोजचाच घोळ | नाही ताळमेळ | अनंताचा खेळ | चालू राही || - प्राजु

वाचने 5981 वाचनखूण प्रतिक्रिया 20

मदनबाण 21/12/2009 - 21:52
सुंदर... :) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia

jaypal 21/12/2009 - 22:19
प्राजुजी नेहमी प्रमाणेच छान झालीय कविता. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

दशानन 21/12/2009 - 23:23
प्राजु, नेहमी प्रमाणेच सुरेख कविता आवडली. :) आजकाल शांत झाला आहात तुम्ही का बरे ? ***** राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

रेवती 22/12/2009 - 00:03
चांगली कविता! डोळ्यासमोर संध्याकाळ आली. बाकी आम्ही छंदाच्या फंदात पडत नाही म्हणून काय झालं? कविता आवडली. रेवती

पाषाणभेद 22/12/2009 - 07:21
ज ब र द स्त अभंग रचना. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

llपुण्याचे पेशवेll 22/12/2009 - 09:52
खरोखर फार सुंदर जमलिये कविता. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

प्राजु 22/12/2009 - 09:55
सर्वांचे आभार. :) - प्राजक्ता http://www.praaju.com/

३_१४ विक्षिप्त अदिती 22/12/2009 - 10:04
प्राजु, कविता आवडली. अदिती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 24/12/2009 - 22:20
आवडली कविता. -दिलीप बिरुटे

प्राजु 24/12/2009 - 22:45
आदिती, स्नेहाराणी, प्रा. डॉ. मनापासून आभार. - प्राजक्ता http://www.praaju.com/

सौरभ.बोंगाळे 24/12/2009 - 22:51
फार फार सुरेख... :X

हर्षद आनंदी 25/12/2009 - 07:30
मस्त वर्णन आहे चंदेरी ही रात | सावळा शृंगार | क्षितिजाच्या पार | रवी पाही || वितळला राग | सोडी अहंकारा | मागतो किनारा | नभाकडे || भिजली पहाट | त्याच्या आसवांत | झाली वाटाघाट | चंद्रासवे || ईथे कविता वादातीत उंची गाठते.. दवबिंदुंना आसवाचे रुप देण्याची कल्पना उच्चच !!! आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

प्राजु 25/12/2009 - 20:28
सौरभ, हर्षद आनंदी आपले मनापासून आभार. - प्राजक्ता http://www.praaju.com/

अविनाशकुलकर्णी 26/12/2009 - 10:04
चांद परतूनी | रवीबिंब आले | क्षितिज रंगले | केशरात || शब्द लावण्य मोह घालते

अवलिया 28/12/2009 - 09:29
माननीय प्राजुजी छान छंदोबद्ध रचना! आवडली ! :) --अवलिया