मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्रीसंत, सॉरी श्रीसंत तात्याबा महाराजांची नंदनला पत्रे..!

विसोबा खेचर · · जनातलं, मनातलं
हा छोटेखानी लेख तुझे आहे तुजपाशी मधल्या काकाजी देवासकरांना सादर समर्पित! :) पत्र क्रमांक - १ बेटा नंदन, अनेक आशीर्वाद!
तात्या, मला भारतीय स्त्री-सौंदर्याबाबत काही मौलिक गोष्टी सांगा!
सांगतो हां! नंद्या, बाबारे -या जगात भारतीय स्त्री-सौंदर्य हेच खरे. मुंबै-दिल्ली-बंगळुरातले बिनबाह्यांचे आधुनिक आणि फ्यॅशनेबल स्त्री-सौंदर्य, पेशवाई ब्राह्मणी-कायस्थी -घाटी मराठी स्त्री-सौंदर्य, कधी अत्यंत देखण्या तर गुडीगुडी गोडगोड गुजराथी खमण-ठेपला अने ढोकलावाल्या भाभ्यांचे स्त्री-सौंदर्य, तर कधी लस्सीसारखे घट्ट-आव्हानात्मक-उफाड्याचे-मक्कई रोटीसारखे गरमागरम पंजाबी स्त्री-सौंदर्य! नखर्‍यानटव्याचे-लाडीक रुसव्याफुगव्याचे -होळीच्या रंगात नटलेले मथुरा-बनारसचे स्त्री-सौंदर्य, तर कधी नाजूक-नितळ कांतीचे परंतु त्याचसोबत बिर्यानीची खुशबू असलेले लखनवी-काश्मिरी मुसुलमानी पडदनशीन स्त्री-सौंदर्य, कधी रोशोगुल्ल्याइतकेच नाजूक-पटकन विरघळणारे मुनमुनसेनी स्त्री-सौंदर्य, तर कधी अजमेरी कलाकंदासारखे खमंग आणि बिकानेरी शेवेसारखे चविष्ट-आगे दुकाण अणे पिछ्छे मकाण असलेल्या मारवाड्याला हळूच आतल्या मकाणात बोलावून लाडीकपणे " अजि सुणोजी!" म्हणणारे राजस्थानी स्त्री-सौंदर्य!
आणि सरतेशेवटी सुंदर मोकळा केशसम्भार, आखीवरेखीव भुवया, सुंदर नाकेलं नाक, बोलके डोळे असलेलं,आणि जीवघेण्या बांध्याचं दाक्षिणात्य स्त्री-सौंदर्य!
असं हे विविधतेने नटलेलं भारतीय स्त्री-सौंदर्यच या जगात आम्हाला सर्वाधिक प्रिय आहे! नाय, तश्या तुमच्या अमेरीकन नी कोरीयन, नी रश्शियन, नी विंगलंड, नी जापनीज बायड्या असतीलही छान, परंतु बेटा नंदन, स्त्री-सौदर्य, रुचकर खाणंपिणं, आणि संगीत गाणं-बजावणं, या तीन बाबतीत भारताइतकी महासत्ता कोणाकडेच नाही रे! असो.. बाळ नंदन, आता भारतीय स्त्री-सौंदर्याचे महाराष्ट्र-राजस्थान-मल्लूकेरळ इत्यादी विभागवार वर्णन करणारी स्वतंत्र पत्रे तुला सवडीने पाठवीनच! चला, या निमित्ताने तुझा हा हट्ट मला पुरा करता येतोय याचे समाधान आहे हो! :) तुझा, तात्या.

वाचने 14282 वाचनखूण प्रतिक्रिया 27

अवलिया Sat, 11/21/2009 - 12:22
सुरवात तर चांगली झाली आहे. पुढील पत्रांमधुन भारतीय स्री सौंदर्यावर रोशनी पडो आणि नंद्या मार्गाला लागो !! --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

प्रभो Sat, 11/21/2009 - 12:29
स्त्रीसंत तात्याबा महाराज अमर रहे... असच लिहून सगळ्यांवर रोशनी टाका..... --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

In reply to by विसोबा खेचर

प्रभो Sat, 11/21/2009 - 12:43
बरं मग... तात्या जिये हजारो साल..साल के दिन हो पचास हजार.... :) --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

In reply to by विसोबा खेचर

अवलिया Sat, 11/21/2009 - 13:01
>>>अरे मी आहे अजून.....! हा निष्कर्ष कसा काढलात ? --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

In reply to by अवलिया

प्रभो Sat, 11/21/2009 - 13:15
>>हा निष्कर्ष कसा काढलात ? ह्म्म... तात्याबा स्वर्गवासी झाल्याचे कमीत कमी १० फोटो पाहिल्याचे मला आठवतंय.. --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

नंदन Sat, 11/21/2009 - 12:41
नखर्‍यानटव्याचे-लाडीक रुसव्याफुगव्याचे -होळीच्या रंगात नटलेले मथुरा-बनारसचे स्त्री-सौंदर्य, तर कधी नाजूक-नितळ कांतीचे परंतु त्याचसोबत बिर्यानीची खुशबू असलेले लखनवी-काश्मिरी मुसुलमानी पडदनशीन स्त्री-सौंदर्य, कधी रोशोगुल्ल्याइतकेच नाजूक-पटकन विरघळणारे मुनमुनसेनी स्त्री-सौंदर्य, तर कधी अजमेरी कलाकंदासारखे खमंग आणि बिकानेरी शेवेसारखे चविष्ट-आगे दुकाण अणे पिछ्छे मकाण असलेल्या मारवाड्याला हळूच आतल्या मकाणात बोलावून लाडीकपणे " अजि सुणोजी!" म्हणणारे राजस्थानी स्त्री-सौंदर्य!
क्या बात है! सौंदर्याबाबत 'मनसे' नव्हे तर दिलसे काम घ्यावे, हे खरं. बाकी अंमळ खाद्य-पेययात्रेचा पुढचा भाग वाचतो आहे की काय असा भास झाला ;)
स्त्री-सौदर्य, रुचकर खाणंपिणं, आणि संगीत गाणं-बजावणं, या तीन बाबतीत भारताइतकी महासत्ता कोणाकडेच नाही रे!
--- आवड आपली आपली. अरे पण शिंडी राहिली की :) बाकी मी न केलेल्या हट्टामुळे का होईना, तात्याने नवीन लेखमाला लिहायला लेखणी उचलली हे काय कमी आहे? पुढच्या भागांची वाट पाहतो :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by मधु मलुष्टे ज्…

प्रभो Sat, 11/21/2009 - 12:54
पहिला आणी तिसरा फोटो ज्ज्याम आवडला... --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

समंजस Sat, 11/21/2009 - 13:16
संगीत उपासक, साहित्य उपासक अशी तात्यांची रुपे बघतच आलो आहोत. आता या लेखमालेच्या निमीत्ताने सौंदर्य उपासक असलेल्या तात्यांच्या ह्या रुपाची सुद्धा चांगलीच ओळख होणार तर :D

In reply to by नंदन

अवलिया Sat, 11/21/2009 - 16:59
हा हा हा म्हणजे ऑनलाईन दुनियादारीच्या कोर्स मधला हा पहिला चाप्टर म्हणता येईल. --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

In reply to by नंदन

अवलिया Sat, 11/21/2009 - 17:14
घ्या ! म्हणजे तुम्हाला सध्या बक्कळ टैम दिसतोय.. जुनं पुराणं उकरुन काढताय! पुर्वेकडे चक्कर मारुन तिथलं कल्चर पाहुन नवयौवन संजीवनी प्राप्त करुन आलेल्या आपल्या अजुन यौवनात मी सिद्ध करणा-या संतश्रेष्ठ हभप (हळुच भलतीकडे पहाणारे) गुरुबद्दलच्या आमच्याच जुन्या प्रतिक्रिया दाखवुन तुम्ही गुरुबद्दल अनादराची भावना प्रकट केली आहे त्याचे पापक्षालन करणे गरजेचे आहे. --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

टारझन Sat, 11/21/2009 - 16:38
कोदांनी जरूर वाचावा असा धागा !! ते बिचारे पौगंडावस्थेत असुन पार डोक्याचे किस पाडणारे लेख लिहीतंय :) ... एक कोदा आहे .. पौगंडावस्थेत असुन तसा वागत नाही , आणि एक राजे आहे ... जो पार वय निघुन गेलं तरी अजुन पौगंडावस्थेतुन निघत नाहीये ;) - (सौंदर्यसाबण) ट्रक्स

In reply to by टारझन

प्रभो Sat, 11/21/2009 - 22:07
ठ्यॉ.... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

श्रावण मोडक Sun, 11/22/2009 - 00:30
मला वाटलं स्रीसंत आणि स्त्रीसंत (चंद्रशेखर - तोच हो तोच, ज्याच्या एका हातातून दोन वेगळ्या प्रकारचे चेंडू पडायचे असं सारे फलंदाज म्हणायचे) हे एकच असावं. शेवटी हे सगळं शुद्धलेखन. हे काही आपल्याला कळत नाही. ;)

धनंजय Sun, 11/22/2009 - 19:13
अगदी दिलसे-जिगरसे लिहिलेली मालिका वाचण्यास उत्सूक आहे :-)

चतुरंग Sun, 11/22/2009 - 19:47
तो नंदन तिकडे त्या अमेरिकेत सुदूर पश्चिमेस आणि त्यातही अतीव दक्षिण टोकास जाऊन बसलाय, रखरखीत वाळवंटी प्रदेश सगळा! ;) सौंदर्यानुभूती बद्दल आपल्याशिवाय इतक्या अधिकारवाणीने कोण बरे लिहू शकेल? तेव्हा ही मालिका सुरू राहूदे आम्हीही वाचूच चवीचवीने! :D (खुद के साथ बातां : रंगा, ह्या मालिकेच्या निमित्ताने उचललेली लेखणी आता कशाकशावर बरं 'रोशनी' टाकेल? :?) (रोशन)चतुरंग

अमृतांजन Sun, 11/22/2009 - 19:49
भारतीय स्त्रीचे सौंदर्य उत्त्रोत्तर खूलत जाते ह्याविषयी शंकाच नाही. आता हेच पहा ना- आजच लग्न झालेली शिल्पा लहानपणी म्हणे अशी दिसत होती- तिचे बाकीचे लहानपणीचे फोटो येथे बघावयास मिळतील.

In reply to by अमृतांजन

निमीत्त मात्र Mon, 11/23/2009 - 04:58
जिसको भगवान नही देता उसको डॉक्टर देता है! -राखी सावंत

मदनबाण Sun, 11/22/2009 - 21:25
श्रीसंत तात्याबा महाराजांचे पुढील पत्र व्यवहार वाचण्यास उत्सुक... तेव्हढंच आमच्याही ज्ञानात भर पडेल !!! ;) (सदा वर फिदा)... ;) मदनबाण.....

संदीप चित्रे Mon, 11/23/2009 - 07:23
एका सुरेख आणि नाजूक विषयाबद्दल लेखमाला लिहायला घेतल्याबद्दल अभिनंदन ! पुढील लेखनाची उत्सुकतेने वाट बघतोय.