मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'काका' वदून गेल्या, आता बघेन म्हणतो

चतुरंग · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आंतरजालावर दिवाळी फराळ चालू असताना ही खमंग भाजणी हाती लागली लगोलग थालीपीठ लावून टाकले! ;) 'काका' वदून गेल्या, आता बघेन म्हणतो आडून गॉगलाच्या थोडा लवेन म्हणतो मुद्दा वयाबियाचा मी काढणार नाही जी जी दिसेल ती ती आता टिपेन म्हणतो क्रेडीट आज सारे संपून गोचि होई आहेत कनवटीला ते वापरेन म्हणतो दिसता सुबक जराशी वळते लगेच मुंडी आता नवीन मापे गोळा करेन म्हणतो डोळेच वाट चुकती, ना दोष पावलांचा बारात चांदणीच्या थोडा बसेन म्हणतो ती आमिषे मुलींची असती कमाल खोटी "मामा" बनून भाचे मी खेळवेन म्हणतो!! अपुल्याच इज्जतीचा "रंग्या" लिलाव आहे घरचा अहेर कसला मिळतो बघेन म्हणतो! चतुरंग

वाचने 11662 वाचनखूण प्रतिक्रिया 48

शेखर 20/10/2009 - 06:31
अप्रतिम.... राहिलेले फटाके एकदमच फोडले .... >> घरचा अहेर कसला मिळतो बघेन म्हणतो! तो मिळाल्यावर नक्की सांगा / दाखवा .... :) (काकु माहेरी भारतात गेल्या वाटतं) शेखर...

In reply to by शेखर

टारझन 20/10/2009 - 16:43
आगायायाया !! बेक्कार सुटेश चुतुरंग ... =)) =)) =)) =)) विडंबण लै भारी .. पण खालची एक प्रतिक्रिया त्याहून भारी =))

In reply to by टारझन

प्रभो 20/10/2009 - 16:55
मस्त --प्रभो

In reply to by प्रभो

दशानन 20/10/2009 - 18:23
सुसाट सुटले आहेत.... ;) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

In reply to by शेखर

रेवती 20/10/2009 - 18:50
असली विडंबनं टाकत जाऊ नका असं सत्रांदा सांगितलं होतं!:( (काकु माहेरी भारतात गेल्या वाटतं) आहे, इथेच आहे! हे विडंबन वाचल्यावर आता कुठेही जाण्याची शक्यता नाही. रेवती

In reply to by रेवती

दशानन 20/10/2009 - 18:54
>>>असली विडंबनं टाकत जाऊ नका असं सत्रांदा सांगितलं होतं! =)) =)) =)) घरचा आहेर मिळणे म्हणजे हेच का :? *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

In reply to by रेवती

चित्रा 21/10/2009 - 04:37
हे विडंबन वाचल्यावर आता कुठेही जाण्याची शक्यता नाही. :) विडंबन छान!

In reply to by चित्रा

सहज 21/10/2009 - 07:28
>हे विडंबन वाचल्यावर आता कुठेही जाण्याची शक्यता नाही. अहो तोच तर रंगारावांचा खरा हेतु होता. हो किनई रंगाकाका? :-) मिशन अक्मप्लिश्ड

अमृतांजन 20/10/2009 - 07:41
क्रेडीट आज सारे संपून गोचि होई आहेत कनवटीला ते वापरेन म्हणतो दिसता सुबक जराशी वळते लगेच मुंडी आता नवीन मापे गोळा करेन म्हणतो व्वा! मझा आला!!!

बेसनलाडू 20/10/2009 - 08:57
ज ह ब ह र्‍या हा (लोटपोट)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सुबक ठेंगणी 20/10/2009 - 10:50
आतापर्यंत वाचलेल्या इडंबनांमधले अत्युच्च !!! =))

In reply to by सुबक ठेंगणी

स्वाती२ 20/10/2009 - 18:29
+२

In reply to by श्रावण मोडक

अवलिया 20/10/2009 - 10:47
जबरा ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

llपुण्याचे पेशवेll 20/10/2009 - 11:15
जबर्‍या. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सहज 20/10/2009 - 12:36
जबर्‍या.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनिल हटेला 20/10/2009 - 16:59
ज ह ब र्‍या!! :-) बैलोबा चायनीजकर !!! Drink Beer, Save Water !! ;-)

In reply to by अनिल हटेला

टुकुल 21/10/2009 - 08:33
___/\___ --टुकुल

In reply to by टुकुल

लवंगी 22/10/2009 - 04:06
___/\___

ब्रिटिश टिंग्या 20/10/2009 - 10:48
हॅ हॅ हॅ >>"मामा" बनून भाचे मी खेळवेन म्हणतो!! =))

सुधीर काळे 20/10/2009 - 10:57
चतुरंग-जी, हा पाचवा रंग आजच पाहिला. अगदी मनोहर आहे! सुंदर कविता. विडंबन वाटतच नाहीं. 'वृत्ता'तही एकदम फिट्ट! माझ्याकडून खास पुष्पगुच्छ आपल्याला. "मामा" बनून भाचे मी खेळवेन म्हणतो!!>> takes the cake! (हे मराठीत कसं म्हणायचं? विकल्प जरूर सुचवा!) सुधीर ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

मदनबाण 20/10/2009 - 11:23
सॉलिट्ट्ट्ट... :D ही खमंग भाजणी हाती लागली लगोलग थालीपीठ लावून टाकले! खी.खी.खी.... भाजणी आणि त्याचे थालीपीठ दोन्ही मस्तच... :) दिसता सुबक जराशी वळते लगेच मुंडी आता नवीन मापे गोळा करेन म्हणतो व्वा... ;) डोळेच वाट चुकती, ना दोष पावलांचा बारात चांदणीच्या थोडा बसेन म्हणतो लयं भारी !!! (कडबोळी प्रेमी) ;) मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |

विनायक प्रभू 20/10/2009 - 11:51
विडंबन. मम्मा, मामाच्या गावाला जाउया.

प्रमोद देव 20/10/2009 - 11:51
क्या बात है,रंगाशेठ!

सुनील 20/10/2009 - 12:36
खमंग विडंबन! सुनील काका Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

केशवसुमार 20/10/2009 - 18:19
रंगाशेठ, थालिपीठ एकदम खमंग झाले आहे.. बाकी घरचा आहेर अत्तापर्यंत मिळाला असेलच.. केसुकाका B)

संदीप चित्रे 20/10/2009 - 19:14
>> मुद्दा वयाबियाचा मी काढणार नाही जी जी दिसेल ती ती आता टिपेन म्हणतो तुला 'घरचा आहेर' जोरदार मिळाला असेल ह्याबद्दल वादच नाही :)

मिसळभोक्ता 20/10/2009 - 22:00
१०/१० !! लगे रहो ! (रंगा के साथ बातां: हे भाचे खेळवण्याचे आमचे टेक्निक कुठून कळले रे तुला ?) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

चतुरंग 20/10/2009 - 22:30
"काकांचा" कधीना कधी "मामा" झालेलाच असतो ना? त्यामुळे आपण सारे एकाच नावेचे प्रवासी! ;) (काका-मामा)चतुरंग

पार्टनर 20/10/2009 - 22:26
मस्तच ..! परत परत वाचली !! - पार्टनर

चतुरंग 20/10/2009 - 22:27
आणि बाहेरचा अहेर देणार्‍या सर्व वाचकांचे आभार! ;) (घरचा अहेर मिळाल्यावर बराचवेळ सुन्न होतो त्यामुळे आभाराचा प्रतिसाद हा फिकट रंगात आणि खूप वेळाने देतोय! :SS ) (फिकुटलेला)चतुरंग

In reply to by चतुरंग

Nile 21/10/2009 - 04:41
हा हा हा! सुरेख विडंबन काका! ;)
(घरचा अहेर मिळाल्यावर बराचवेळ सुन्न होतो त्यामुळे आभाराचा प्रतिसाद हा फिकट रंगात आणि खूप वेळाने देतोय!
पुढल्या वेळेला थालपीठात थोडी घरची भाजणी पण घालावी लागणारे असे दिसते. ;) काकुंना सप्रेम नमस्कार कळवा! :)

In reply to by चतुरंग

छप्पर उडून गेले, गंमत बघेन म्हणते झडून पंख गेले, उडतो कसा पहाते! मुद्दा वयाबियाचा मी काढणार नाही मीही दिसेल 'तो तो' आता पुन्हा पहाते क्रेडीट तुझे सगळे डेबिट आज होई माझेच एकटीचे मी जोखुनी पहाते ही नजर तुझी गळते कचर्‍याची जणू कुंडी आता करून गोळा मी पेटवीन म्हणते डोळ्यांस दोष दे तू, तारे पुढे चमकती, पदरात तोंड झाकून थोडी हसेन म्हणते ती आमिषे तुझी मेल्या तद्दन सर्व खोटी "मामा" करून तुजला मी खेळवेन म्हणते!! माहेरी कसली जाते, तुज सोडूनी एकट्याला माहेर इथे आणते, बघ मजा मग तू म्हणते अपुल्याच इज्जतीचा करतो लिलाव कसला घरचा अहेर सोडा, तू उपवास काढ म्हणते!

In reply to by Nile

बिपिन कार्यकर्ते 21/10/2009 - 08:02
रंगाशेठनी केलेले विडंबन आणि बहुगुणीशेठने केलेले विडंबन^२ ... दोन्ही मस्त !!! मजा आली वाचायला. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सहज 21/10/2009 - 08:16
बहुगुणीशेठने केलेले विडंबन जबरदस्त!!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

ऋषिकेश 21/10/2009 - 10:24
सवाल जवाब लै भारी -ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

मदनबाण 21/10/2009 - 12:34
बहुगुणीशेठने केलेले विडंबन जबरदस्त !!! असेच म्हणतो... अवांतर :--- शेठ बर्‍याच दिवसांनी दिसले. :) मदनबाण..... रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.

In reply to by मदनबाण

श्रावण मोडक 21/10/2009 - 12:39
+३

In reply to by बहुगुणी

चतुरंग 21/10/2009 - 15:55
छान आहे. आवडला! :) (अहेर थोडा वृत्तात वगैरे व्यवस्थित पॅक करुन दिला असता तर आणखीन आनंद झाला असता! ;) ) चतुरंग