मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'काका' वदून गेल्या, आता बघेन म्हणतो

चतुरंग · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आंतरजालावर दिवाळी फराळ चालू असताना ही खमंग भाजणी हाती लागली लगोलग थालीपीठ लावून टाकले! ;) 'काका' वदून गेल्या, आता बघेन म्हणतो आडून गॉगलाच्या थोडा लवेन म्हणतो मुद्दा वयाबियाचा मी काढणार नाही जी जी दिसेल ती ती आता टिपेन म्हणतो क्रेडीट आज सारे संपून गोचि होई आहेत कनवटीला ते वापरेन म्हणतो दिसता सुबक जराशी वळते लगेच मुंडी आता नवीन मापे गोळा करेन म्हणतो डोळेच वाट चुकती, ना दोष पावलांचा बारात चांदणीच्या थोडा बसेन म्हणतो ती आमिषे मुलींची असती कमाल खोटी "मामा" बनून भाचे मी खेळवेन म्हणतो!! अपुल्याच इज्जतीचा "रंग्या" लिलाव आहे घरचा अहेर कसला मिळतो बघेन म्हणतो! चतुरंग

वाचन 11659 प्रतिक्रिया 0