ये र बालां
लेखनविषय:
काव्यरस
आता तुज्यासाटी बग घोडा घोडा झालू
गवत खात खात बग तूज्याकड आलू
ऊडी मारुन राजा माज्या पाटीवर बस
कती येल नूसतच ऊबं राहु आसं
माकरावानी बग आता खाजवीतो कूस
फुटू देना आता तूज्या गालावर हस
काला काला कावला न पीवली पीवली फुलं
तुज्यासाटी नाचतान मोराची पावलं
आय तूजी वाट बगी डोलं सूकवून
तूच कूट गेला बग आमाला टाकून
ये रं बाला कल आली कालजामदूनं
बग तरी माज्याकड आभालातूनं
बग तरी माज्याकड आभालातूनं
वाचने
11504
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
:(
कविता आवडली. शेवटच्या दोन ओळी हलवून गेल्या. उगाच वाचली कविता असं वाटलं, म्हणूनच ग्रेट कविता.
बिपिन कार्यकर्ते
In reply to !!! by बिपिन कार्यकर्ते
> उगाच वाचली कविता असं वाटलं, म्हणूनच ग्रेट कविता.
असेच म्हणते.
In reply to असेच by चित्रा
असेच म्हणतो.
In reply to असेच म्हणतो by धनंजय
हेच म्हणतो.
राजा.. कल आली रं कालजामदूनं
बापरे!!!
का हो अशी जीवघेणी कविता!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
In reply to बापरे!!! का by प्राजु
माज्या मीत्रासाटीच लीवलय तै. लय जुनी आटवन
काय लिहु कळत नाही आहे.. छान पण म्हणता येत नाही .. पण मन हालवुन टाकल
--टुकुल
8|
गेलेल्या बाळासाठी आहे त्यामुळे जास्त त्रास देऊन गेली कविता.
(आत्ता पावसानं लावलेली ओढही शेतकर्यांना अशीच पिळवटून टाकत असेल असं वाटून गेलं..)
(रिता)चतुरंग
In reply to ह्म्म्..वेदनादायी कविता! by चतुरंग
अगदी मनातलं बोललात चतुरंगराव ! :-(
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
मन हेलावले.
रस्त्याने चालतांना नेहमी उजव्या बाजूने चालावे, त्यामुळे समोरच्या (वाहना)शी होणारी धडक टळू शकते.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
:|
निशब्द !
वेदनादायी कविता. रितेपणाला अधोरेखीत करणारी :(
ऋषिकेश
------------------
सकाळचे ९ वाजून १६ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "एक झोकाऽ एक झोका.. चुके काळजाचा ठोका...."
----!
(नि:शब्द!) तात्या.
नेहेमीप्रमाणे काहीतरी खुशखुशीत, विनोदी वाचायला मिळणार ह्या अपेक्षेने धागा उघडला....
एकदम कलाटणी देणारा शेवट.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
साईड ऑफ बाल्या
बाल्याची ह्या दुसरी बाजु
--- :(
:(
केलं कवितेनं.
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
नि:शब्द!
-अनामिक
सुन्न केलत. काल वाचल्यावर बराच वेळ नुसती बसून होते.
उत्तम कविता. शेवट अगदी हेलावुन टाकणारा
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
काय बोलू?
अदिती
मनाला त्रासदायक वाटत असूनसुद्धा दुपारपासुन दहावेळा वाचली...
:|
सू हा स...
:(
:(
:(
मदनबाण.....
Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html
ग्रेट कविता.
आपलाच,
मनोबा
___ :(
गणपा का??????
>>>>
तूच कूट गेला बग आमाला टाकून
ये रं बाला कल आली कालजामदूनं
बग तरी माज्याकड आभालातूनं
भयानक त्रास झाला..
:-(
मन डोके बधीर करुन गेली हि कविता ....
पण हल्ली ब्रिटीश मिपावर येत का नाही ?
!!!