Skip to main content

जिवाचा मोहम्मद अली रस्ता...!

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 24/08/2009 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, तसे आम्ही उत्सवप्रेमी. सध्या गणेशोत्सवाचा आनंद साजरा करतो आहोत. गणेश हा आमचा माता, पिता, सखा, बंधू, सर्व काही..! आज भल्या पहाटे आमच्या लाडक्या लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं, छानशी पूजा केली, आणि मोदकांच्या प्रसादाचं जेवण यथेच्छ जेवलो... परंतु तसे आम्ही सर्वच धर्मांवर, त्यातील सणा-उत्सवांवर, खाण्यापिण्यावर मनापासून पिरेम करणारे एक हौशी रसिक! आज सायंकाळी काही कामानिमित्त मुंबैच्या मोहम्मद अली रस्त्यावर जाणं झालं आणि आम्ही त्या रस्त्यावर साजर्‍या होणार्‍या मुस्सुलमानांच्या रमझान सणात रमलो आणि तेथेच काही काळ रेगाळलो. सकाळी अगदी सात्विक ब्राह्मणी मोदकांचं जेवण जेवून गणेशोत्सव साजरा केला, संध्याकाळी मोहम्मद अली रस्त्यावर झकासपैकी मटणकबाब, हलीम आणि मुस्सुलमानी मिठाया हाणून जिवाचा मोहम्मद अली रस्ता आणि रमजानही साजरा केला.. ! :) त्याचीच ही काही प्रकाशचित्र! १) रात्रीच्या टायमाला गजबजलेला महम्मद अली रस्ता... २) खादाडी... ३) ही फिरनी, गुलाबजामून, आणि कालाजामून. चापले मस्तपैकी! :) ४) हे मालपुव्याचं पीठ. आणि हा आमचा रहीम प्रतापगढी. मालपुवा तळत आहे. हा तळलेला मालपुवा नंतर पाकात टाकतात. आज काय साला मालपुवा झाला होता म्हणून सांगू! तोंडात अक्षरश: विरघ़ळत होता! हाणला मन लावून! :) ५) हा आमचा रफिक भाई कन्नौरी अत्तरवाला. त्याची आमची पुरानी जानपछान. अगदी रौशनीच्या टायमापासून! हलका पाऊस पडला होता त्यामुळे रमजानची मुबारक बात द्यायला आलेल्या तात्याला तो केवड्याच्या अत्तराचा फाया बनवून भेट म्हणून देत आहे! :) ६) हा आमचा मुसाफिरभाई पानवाला. पुरानी जानपछानीतला! तात्या समोर दिसताचक्षणी, आमचे गुरुजींच्या - भाईकाकांच्या भाषेत सांगायचं तर झकासपैकी बनारसी १२० पान जमवून देऊन चुन्याची दांडी पुढ्यात धरणारा! इथे शब्द संपतात....! ७) पानाचा तोबरा भरतांना तात्या अभ्यंकर. जीवन त्यांना कळले हो! :) मिठाई झाली, अत्तर झालं, पानही झालं! आता पुढचं विचारू नका, ते विचारणं बरं नव्हे! ;) -- तात्या अभ्यंकर.

वाचने 9583
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

झक्कास !!!... लेख आणी चित्रे बघता बघता संपली.. अवांतरः तोंडात पान आणी बगलेत बटवा?? --टुकुल

हे सर्व खाद्य पदार्थ माउथ वॉटरिंग आहेत. नो डाऊट. पण या टायमाला भारतातल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे फोटो पहायचे आहेत. मीनल.

In reply to by मीनल

मलाही दगडूशेठ हलवाई, लाल बाग चा राजा,श्री सिद्धीविनायक.. अशा आणि इतर सार्वजनिक गणेशोत्सवाचे फोटो पहायचे आहेत. कोणी घेतले असतील तर इथे चि़कटवावेत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ओहोहोहोहो.... क्या बात है तात्या!! काय एकदम पाना खायो सैंया हमार... ;) पुढचं विचारत नाही बाबा, मंगलमुर्ती मोरया!!!! :)

वा! सुंदर वर्णन तात्या! या वेळेस मोहम्मद अली रस्त्यावर जाण्याचा विचार करतच होतो :) आता हे सर्व वाचल्या वर केव्हा जातो हीच घाई झाली आहे. =P~ (खादाड..) समंजस

संध्याकाळी मोहम्मद अली रस्त्यावर झकासपैकी मटणकबाब, हलीम आणि मुस्सुलमानी मिठाया हाणून जिवाचा मोहम्मद अली रस्ता आणि रमजानही साजरा केला.. फिरनी, मालपुवा, हलीम, मटन कबाब आणि ***** पान मजा करा लेको. जातोच आहे मी मस्कतला ईद मनवायला. मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

वा ! मस्त रे तात्या ! --अवलिया ============ काळाच्या पुढचा विचार मांडुन वर्तमानकाळात 'अपात्र' ठरण्यासाठी काय करु ? कुणाला सांगु ?

वा वा तात्या, मस्तच ! न्हाय, न्हाय फुडचं नाय इचारनार बाप्पा ! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

वा. तात्या मजा केलात यार तुम्ही. आम्ही गणरायाच्या पहिल्या दिवशीच भीमराव पांचाळेंच्या मैफलीचा आनंद लुटत होतो. समोर भीमराव नि पुढ्यात दाद देणारे आम्ही. तिथेही मजा आला राव. (भोचक) तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?

अमा, तात्याअलीखाँ साहब, मजा आ गया पढकेही. फोटू भी एक से एक. بِپِن كارِیاكرتے

पुण्याच्या मोमीनपुराची आठवण झाली... आज रात्री जाणारच.. सू हा स...

In reply to by sneharani

मालपुवा khayacha aahe. bolavnar ka?
कोण स्नेहाराणी ना? हो........, बोलवीन की! अगदी खुशीनं! :) कधी जायचं बोल! स्वगत : ही स्नेहाराणी कुणी स्त्री सभासद नक्कीच नसावी! :? (ह घ्या) आपला, तात्याराजा! ;)

तात्या, खाद्यपदार्थांचे फोटो भारी ! मिठाई झाली, अत्तर झालं, पानही झालं! आता पुढचं विचारू नका, ते विचारणं बरं नव्हे! ठाण्यात लावणी-बिवणीची खास कार्यक्रम असतील, तेव्हा एकाद्या दोन लावण्या ऐकायला तर नसतील गेले तात्या...? -दिलीप बिरुटे (तात्यांचा पंखा )

फोटू लै भारी. एकंदर माहौल चारमिनारजवळच्या बोळांची याद दिलवून गेला. आता पुढच्या खेपेला बडे मियाँनंतर मालपुवा, फिरनी खायला इथे वाट वाकडी करायला हवी.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी


तात्याखाननी मज्जा केलेली आहे आणी इतके गोड पदार्थ एका रात्रीत हाणून मला जाम जळवलेलं आहे! (मला नगरला शबाना शेखच्या घरी खाल्लेल्या शीरखुरम्याची आद आली.) (शेख)चतुरंग

काय तात्या maja karatay ho aamachi.tumchi mulagi na me?

In reply to by sneharani

tumchi mulagi na me? ऑ?? मी तुला कधी खाजगीत किंवा जाहीरपणे मुलगी वगैरे मानल्याचं मला आठवत नाही! जाऊ द्या! हा विषय मी इथेच सम्पवतो..! :) पुढील संवादाकरता व्य नि किंवा खरडीचा वापर करावा... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

tumchi mulagi na me?
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) असो , बाकी खरडवहीत जाऊन हसेन म्हणतो आयला तात्याला आम्ही गणपती समजत होतो .. तात्या तर हणूमाण ! डार्विन च्या सिद्धांता नुसार हनुमानाचेही असेच काहीसे पुरावे रामायणात पहायला मिळतात ! असो .. बाकी पुरावे खरडवहीत पाहिन म्हणतो आपला हल्ली खुप खुप प्रतिसाद उडालेला टारझन (पळा आता ... .तात्याचे फटके खायच्या आत) प्रतिसाद पॉवर्ड बाय मोणॅको, इतका हलका .. की लगेच उडतो !

तुझा गणगोत अशक्य आहे !!! फोटोंसाठी धन्स म्हणजे लाख लाख धन्स !

मजा आया मोहम्मद अली रस्ता कू देखके. तुने शिख-कबाब,उसके साथ पुदीना पत्ता उधरकी चाय , बिर्यानी नही दिखाया कायको रे ! आप सबका टपोरी भाई विकि

फोटो एकदम आकर्षक (tempting)आहेत. भरपेट खाऊन तोंडामधे तोबरे ज्यांनी भरले हो, खाणे त्यांना कळले हो! :-) "जिवाचा मोहम्मद अली रस्ता..." हा "जसवंतच्या मोहम्मद अली जीना" पेक्षा नक्कीच छान आहे ;)

वा वा वा चविष्ट फोटो :) ऋषिकेश ------------------ सकाळचे १० वाजून ३६ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "खईके पान बनारस वालाऽऽ...."