जिवाचा मोहम्मद अली रस्ता...!
राम राम मंडळी,
तसे आम्ही उत्सवप्रेमी. सध्या गणेशोत्सवाचा आनंद साजरा करतो आहोत. गणेश हा आमचा माता, पिता, सखा, बंधू, सर्व काही..! आज भल्या पहाटे आमच्या लाडक्या लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं, छानशी पूजा केली, आणि मोदकांच्या प्रसादाचं जेवण यथेच्छ जेवलो...
परंतु तसे आम्ही सर्वच धर्मांवर, त्यातील सणा-उत्सवांवर, खाण्यापिण्यावर मनापासून पिरेम करणारे एक हौशी रसिक!
आज सायंकाळी काही कामानिमित्त मुंबैच्या मोहम्मद अली रस्त्यावर जाणं झालं आणि आम्ही त्या रस्त्यावर साजर्या होणार्या मुस्सुलमानांच्या रमझान सणात रमलो आणि तेथेच काही काळ रेगाळलो. सकाळी अगदी सात्विक ब्राह्मणी मोदकांचं जेवण जेवून गणेशोत्सव साजरा केला, संध्याकाळी मोहम्मद अली रस्त्यावर झकासपैकी मटणकबाब, हलीम आणि मुस्सुलमानी मिठाया हाणून जिवाचा मोहम्मद अली रस्ता आणि रमजानही साजरा केला.. ! :)
त्याचीच ही काही प्रकाशचित्र!
१) रात्रीच्या टायमाला गजबजलेला महम्मद अली रस्ता...
२) खादाडी...
३) ही फिरनी, गुलाबजामून, आणि कालाजामून. चापले मस्तपैकी! :)
४) हे मालपुव्याचं पीठ.
आणि हा आमचा रहीम प्रतापगढी. मालपुवा तळत आहे. हा तळलेला मालपुवा नंतर पाकात टाकतात. आज काय साला मालपुवा झाला होता म्हणून सांगू! तोंडात अक्षरश: विरघ़ळत होता! हाणला मन लावून! :)
५) हा आमचा रफिक भाई कन्नौरी अत्तरवाला. त्याची आमची पुरानी जानपछान. अगदी रौशनीच्या टायमापासून! हलका पाऊस पडला होता त्यामुळे रमजानची मुबारक बात द्यायला आलेल्या तात्याला तो केवड्याच्या अत्तराचा फाया बनवून भेट म्हणून देत आहे! :)
६) हा आमचा मुसाफिरभाई पानवाला. पुरानी जानपछानीतला! तात्या समोर दिसताचक्षणी, आमचे गुरुजींच्या - भाईकाकांच्या भाषेत सांगायचं तर झकासपैकी बनारसी १२० पान जमवून देऊन चुन्याची दांडी पुढ्यात धरणारा!
इथे शब्द संपतात....!
७) पानाचा तोबरा भरतांना तात्या अभ्यंकर. जीवन त्यांना कळले हो! :)
मिठाई झाली, अत्तर झालं, पानही झालं! आता पुढचं विचारू नका, ते विचारणं बरं नव्हे! ;)
-- तात्या अभ्यंकर.

वाचने
9579
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
ओ तात्या !!
माउथ वॉटरिंग
In reply to माउथ वॉटरिंग by मीनल
+१
ओहोहोहोहो..
वा! सुंदर वर्णन!!
खल्लास....
वा ! मस्त रे
वा वा
मैफलीचा आनंद
वा!!!
जियो...
मालपुवा
In reply to मालपुवा by sneharani
मालपुवा
तात्या,
बेष्ट!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अरे वा छान!
asa
In reply to asa by sneharani
tumchi mulagi na me? ऑ??
In reply to tumchi mulagi na me? ऑ?? by विसोबा खेचर
tumchi mulagi na me?
वाह उस्ताद!
खल्लास रे तात्या
तात्याखान......
छान फोटो
वा वा वा