शिवसेनेचे (कॉपोरेट) समांतर सरकार
उद्धव ठाकरे शिवसेनेला कॉर्पोरेट लूक देऊ इच्छिताहेत. त्याच्याविषयीची सविस्तर माहिती इथे वाचा.
http://www.loksatta.com/lokprabha/20090821/sankraman.htm
उद्धवच्या या प्रयत्नांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. याआधी शिवसेना जे 'समांतर सरकार' चालवत होती, (म्हणजे लफडी निस्तरणे, कुणाचे वैयक्तिक प्रश्न सोडविणे वगैरे) तेच आताही करतेय. पण त्याला दिलेल्या कॉर्पोरेट लूकने त्याची चर्चा नक्कीच होऊ शकते. राज ठाकरे आंदोलनाव्यतिरिक्त आणि आगखाऊ भाषणांव्यतिरिक्त काही करेल असे वाटत होते (म्हणजे अजूनही आहे.) पण स्वारी विकासाच्या 'ब्ल्यू प्रिंट'वरच अडलेली आहे. तिथून पुढे जायला तयार नाही. त्या तुलनेत उद्धव शांतपणे न बोलता शिवसेनेचा विस्तार वाढविण्यासाठी लक्षवेधी आणि ठोस प्रयत्न करताहेत ही कौतुकाची बाब आहे. त्याचा राजकीय फायदा त्यांना मिळेल असे शक्यता निर्माण नक्कीच होऊ शकते. राजकडे करिष्मा असला तरी त्याचं कामही दिसायला हवे. उद्धवकडे करिष्मा नसला तरी कदाचित कामातून तो निर्माण होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतेय.
वाचने
11362
वाचनखूण
प्रतिक्रिया
40
१] उद्धवकडे करिष्मा नसला तरी कदाचित कामातून तो निर्माण होऊ शकतो
२] राज ठाकरे यांची स्वारी विकासाच्या 'ब्ल्यू प्रिंट'वरच अडलेली आहे.
येत्या वि.सभा निवदणुकीत शिव सेनेला नक्कीच फायदा होऊ शकतो.
सुखद धक्का देऊन गेली. धन्यवाद!
मथळा मात्र थोडा दिशाभूल करणारा वाटला.
In reply to माहिती आवडली by एकलव्य
असेच म्हणतो.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
चांगला उपक्रम दिसतोय.लोकांनी मांडलेले प्रश्न डेटाबेसमध्ये साठवण्याचा आणि ते सोडवण्याचा निश्चितच लोकांना/पक्षाला फायदा होइल.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
उमराणी सरकार
त्या तुलनेत उद्धव शांतपणे न बोलता शिवसेनेचा विस्तार वाढविण्यासाठी लक्षवेधी आणि ठोस प्रयत्न करताहेत ही कौतुकाची बाब आहे.बहुत जान है इस लीडर में. थंड डोक्याने घणाघाती प्रहार करणारा सर्व शर्यती जिंकणारच. दुर्देवाने बहुसंख्य मतदारांची मते अशा बाबी विचारात न घेता टाकली जातात. शिवसेनेला येत्या निवडणूकीसाठी हार्दीक शुभेच्छा.
न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे
उद्धव ठाकरे यांच्यावर कायम सर्वांनी ताशेरे ओढलेत. मवाळ मवाळ म्हणून हेटाळणी , शिवसेना कार्यकारी प्रमुख झाल्यापासून तर सर्वांनी त्यांचे पाय खेचायचे प्रयत्न केले. प्रथम राणे..मग राज.. असे एकापाठोपाठ एक धक्क्यातून त्यांनी शिवसेनेला सावरले. मागची विधानसभा त्यांनी घेतलीच असती पण काहींनी पक्षात राहून पक्षविरोधी कामे करून शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले. त्यांच्या प्रत्येक चांगल्या प्रयत्नांना विघ्नसंतुष्ट लोकांनी खिळ घालायचा प्रयत्न केला.
उद्धवच्या या प्रयत्नांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. उद्धवकडे करिष्मा नाही हे पटत नाही. नाहीतर आत्तापर्यंत शिवसेनेला संपायला वेळ लागला नसता. फक्त हेच नाही पण शेतकर्यांचे प्रश्न, वीज अशा बर्याच बाबतीत त्यांनी सरकारला धारेवर धरले आहे.
शिवसेनेला येत्या निवडणूकीसाठी हार्दीक शुभेच्छा.
खादाडमाऊ
(यावेळी आम्हाला नवीन सरकार पाहिजे )
उपक्रम नक्किच स्तुत्य आहे! त्याचे यशापयश ठरवायला जरी वेळ लागला तरी!


उध्दवजींचा उपक्रम खरच स्तुत्य आहे.
काळाबरोबर बदलाव लागतच..
सेना कॉर्पोरेट होतेय.. इतरंचा जळफळाट होणारच...
दगड मारला तरी जळफळाट .. सामाजीक कार्य केल तरी जळफळाट .
भगवी झूल पांघरुन क्युबन सिगार आणि फ्रेंच वाइन पित हिंदुत्वावर बोलणार्यांचा...
खुलेआम करायलासुध्दा गटस लागतात राव.... तेथे पाहीजे जातीचे.. येर्या गबाळ्याचे ते काम नोहे...
In reply to भगवी झूल by वि_जय
गर्व से कहो, हम शिवसैनिक है !!!!
(हल्ली हिंदीत चालतं की मराठीची सक्ती आहे ?)
-- मिसळभोक्ता
छान अवांतर अवांतर खेळणं चालु आहे की :)
मजाय बुवा!
चालुद्या!!!
-(च्१अ१ ग्रस्त अत्यावस्थ) ध मा ल.
पण त्यांच्या एखाद्या नगरसेवकाचीच तक्रार करायची असेल तर दखल घेतली जाईल का?
माझे रु.७५०००/- बुडवले आहेत.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
In reply to पण by श्रीयुत संतोष जोशी
टाका ना बिन्धास्त..
वाघ म्हटलं तरी खातो, वाघोबा म्हंटल तरी खातो.
In reply to पण by श्रीयुत संतोष जोशी
राजमान्य राजश्री जोशीसाहेब
तुम्ही सांगा अगोदर त्याला रुपये ७५,०००/-दिलेच का?
तुम्ही गर्भश्रीमंत आहात? जेणेकरुन तुमच्याकडे त्याने भीक मागीतली व उदार अंत:करणाने आपण त्याला दिलीत का?
In reply to राजमान्य by वि_जय
त्याच्या मुलाच्या लग्नाचे काम केले होते त्याच्या बिलाचे पैसे बुडवले त्याने.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
In reply to त्याच्या मुलाच्या by श्रीयुत संतोष जोशी
मग तर तुम्ही तक्रार कराच. आणि २रे तक्रार केल्यानंतर त्यांचा काय प्रतिसाद येतो हे ही सांगा.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
In reply to पण by श्रीयुत संतोष जोशी
माझे रु.७५०००/- बुडवले आहेत
छ्या छ्या छ्या काय हे? स्वराज्यासाठी कित्येकांनी आपले प्राण बाजीला लावले आणि तुम्ही फुटकळ मोहोरांची खंत करीत आहात? त्या मोहोरा सत्कारणी (कोण रे तो, सत्कार बार म्हणतोय?) लागल्या असतील, अशी मला खात्री आहे! ;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
माझ्यासारख्या शिवसेनेच्या "जूना अने जाणीता" भगताला आनंद झाला. बाळासाहेब आहेत तोवर उद्धवसाहेबांचा खरा 'कस' कळणार नाहीं, पण पित्याच्या मार्गदर्शनात ते छान तयार होत आहेत.
देव करो आणि राजला सद्बुद्धी सुचून तो स्वगृही परत येवो हीच श्रींचे चरणी प्रार्थना.
सुधीर काळे
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
काळेसाहेब,
तुमच्या सारख्याच भावना केवळ शिवसैनिकंच्याच नव्हे तर तमाम मराठी जनतेच्या आहेत.
उद्धवसाहेबांचा खरा 'कस' कळणार नाहीं, पण पित्याच्या मार्गदर्शनात ते छान तयार होत आहेत.
खर सांगायच तर माश्याच्या पिल्लाला पोहायला शिकवायला लागत नाही.. उद्धवजींबाबतही तसेच असावे.. तयार आहेतच.. अधिक प्रगल्भ होताना दिसत आहेत..
सुदैवाने राज यांची साथ मिळाली तर आणखी काय हवे मराठी मनाला?
मराठी माणसाचे हे केवळ स्वप्नच राहिल? काय वाटते?
अमितराव,
मराठी माणसाला संबोधीत असलेली खेकड्याची व्रुत्ती सोडा राव.
अहो मराठी माणसाने टाटा सुमो घेतली आणी हॉटेलात भागिदारी केली तर तुमच्या आमच्या पोटात का दुखते ?
अहो उपरे मुंबईत येऊन गब्बर झाले... घेऊद्या हो मराठ्याला.
अमितराव का फुका करता डराव डराव?
हिंदु हिंदु,मराठी मराठी करायचे आणि मागने हे असे धंदे. त्यापेक्षा ते खादीवाले परवडले. लोकाना ब्रम्हज्ञान तरी शिकवत नाहीत.
अहो ते 'खा'दी वाले लोकांना ब्रम्हज्ञान शिकवणार तरी कधी?
ते तेल्'घी खाऊन खाऊन दिवस काढतायत ना?
बर यांच अर्धे आयुष्य जाते अल्पसंख्यांकांची हाजी हाजी करण्यात उरलेल बाईंच्या दरबारात लवून मुजरा करण्यात..
मागे आपल्या एका मिपाकराने छान म्हटले होते...
दिल्लीचेही तळवे चाटतो महाराष्ट्र माझा
आमच्या तिर्थरुपांनी ,
संसारावर तुळशीपत्र ठेउन उभी हयात एक कपर्दिकही न कमावता नि:स्वार्थी भावनेने सेनेच्या कार्यासाठी खर्ची घातली ......किंबहुना स्वतःच्या उत्पन्नामधिल काही वाटा कायम गोरगरिबांसाठी खर्ची घातला पण आंम्हास किंवा आमच्या कुटुंबियांस कधी त्याची खंत वाटली नाही .........आणि कधी वाटणारही नाही
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
In reply to संसारावर तुळशीपत्र by अनामिका
अनामिका,
तुझ्या वडिलांचा त्याग महान आहे यात शंका नाहीं. "टोपण नावा"च्या पद्धतीमुळे त्यांचे नाव तू सांगितलेस तरच कळेल. नाहीं तर तेही "अनामिक"च रहातील.
जर प्रशस्त वाटले तर त्यांचे नाव वगैरे माहिती मला kbkale42@gmail.com वर कळविलीस तर मला बरे वाटेल. त्यांना माझा प्रणामही कळव.
सुधीर काळे
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
अनामिकाजी,
खर आहे. तुमच्या तीर्थरूपांसारख्या लाखो शिवसैनिकांनी संसारावर तुळ्शीपत्र ठेवूनच शिवसेना वाढवली, आणी हे बाळासाहेबांनी नेहमीच जाहीरपणे सांगीतली आहे.१९६६ ते १९९५ या कालावधीत शिवसैनिकांनी पदरमोड केली. १९९५ मध्ये सत्ता आल्यावर नेत्यांचा कायापालट झाला, स्वाभिमानी शिवसैनिक मात्र तसाच राहीला. असो
स्वतःच्या उत्पन्नामधिल काही वाटा कायम गोरगरिबांसाठी खर्ची घातला पण आंम्हास किंवा आमच्या कुटुंबियांस कधी त्याची खंत वाटली नाही .........आणि कधी वाटणारही नाही
आपले हे वाक्य म्हणजे लाखो निष्ठावंत शिवसैनिकांच्या कुटूंबीयांचे मनोगत आहे. आणि म्हणुनच 'शिवसेना' हा केवळ राजकीय पक्ष न रहाता मराठी मनाचा मंत्र झाला.
आता सोमे-गोमे मराठी मराठी करतायत.. त्यांना काय माहीत, अरे केवळ शिवसेनाप्रमु़खांमुळे आणि अनामिकाजींच्या तीर्थरुपांसारख्या लाखो शिवसैनिकांमुळेच आज तुम्हाला लोक ओळखतायत्..आणि नेते म्हणून मिरवताय...
नाहीतर तुम्हाला विचारणार होत कोण? कुत्र??
In reply to अनामिकाजी, by वि_जय
सू हा स...
शिवसेनाप्रमु़खांमुळे >>>
पुत्रामुळे नाही बर का !! हे ध्यानात घ्या !!! बाकी कॉपोरेट चेहरा देऊन ग्रामीण भागात वाढलेली शिवसेना कधीच उतरणीला आली आहे..त्यात भरास भर म्हणुन ही नाटकं....
In reply to सू हा by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
ग्रामीण भागात वाढलेली शिवसेना कधीच उतरणीला आली आहे..
काहीतरी गैरसमज होतो आहे सुहासराव..
अहो, मुंबई, ठाण्यात घरभेद्यांमूळे सेनेला २००९ च्या लोकसभेत फटका बसला.. पण सेना लोकसभेत गेली ती ग्रामीण भागातुनच ना?
म्हणतात ना घर का भेदी....
नेत्यांचा कायापालट झालासत्ता आल्यावर
ह्याला शिवसेना अपवाद नाही. १९४७ पूर्वी काँग्रेसमध्येही असे हजारो लोक होते. सत्तेच्या स्पर्शानंतर त्यात बदल झाला. जनसंघाचेही (भाजपा) तेच झाले. अपवाद असलाच तर तो समाजवाद्यांचा आणि कदाचित साम्यवाद्यांचा (विकीसाहेब, वाचताहात ना?).
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
मराठी माणसाला नेहमीच दुहीचा शाप आहे.
बाळासाहेब आपल्यासाठी न अवघडता (without embarrassment) उभे आहेत त्यांना साथ द्या. चार पैसे खाल्ले तर खाऊ देत, आपलेच आहेत. पण त्यांना काम करायला लावा. आता तर नेटवर तक्रार करायची सोय त्यांनीच करून दिली आहे. तर लिहून-लिहून या दोघा पिता-पुत्रांना व एका पुतण्याला ताळयावर आणू या!
अवघड असेल, पण अशक्य नाहीं.
माझा शिवसेनेवरचा लेख "महानगरी वार्ताहार" या शिवसेनेच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला याचा अर्थ कुठे तरी ठिणगी, स्फुल्लिंग अजुन जिवंत आहे! मारा त्यावर फुंकर आणि करा त्याला प्रज्वलित.
सुधीर काळे
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
In reply to बाळासाहेब आपल्यासाठी न अवघडता उभे आहेत..... by सुधीर काळे
या दोघा पिता-पुत्रांना व एका पुतण्याला ताळयावर आणू या!
काळेसाहेब, लहान तोंडी मोठा घास घेतोय,
पित्याला नव्हे तर पुत्राला आणी पुतण्याला
पिता ताळ्यावर होता म्हणूनच मराठी माणूस आहे अन्यथा तो कधीच रसातळाला गेला असता...
In reply to या दोघा by वि_जय
तुमच्या "पिता ताळ्यावर होता म्हणूनच मराठी माणूस आहे अन्यथा तो कधीच रसातळाला गेला असता..." या विधानाशी मी पूर्णपणे सहमत आहे.
पण अख्ख्या मराठी समाजाला एकी राखण्याबद्दल उपदेश करणारे स्वतःवर वेळ आली तेंव्हा कमी पडले यात शंका नाहीं. आणि हे आपले दुर्दैव!
आता तरुण पिढीने मोठ्यांनी केलेल्या चुका करू नयेत व शहाणे व्हावे असे मला वाटते.
सुधीर काळे
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
In reply to स्वतःवर वेळ आली तेंव्हा कमी पडले by सुधीर काळे
पण अख्ख्या मराठी समाजाला एकी राखण्याबद्दल उपदेश करणारे स्वतःवर वेळ आली तेंव्हा कमी पडले यात शंका नाहीं. आणि हे आपले दुर्दैव!
काळेसाहेब, आपला रोख कुठे आहे हे ध्यानात येत नाही. स्पष्टीकरण केले तर बरे होईल.
धन्यवाद!!
In reply to पण अख्ख्या by नम्रता राणे
काळेसाहेबांना राज-उद्धव एकी विषयी म्हणायचे आहे. बाळासाहेबांना त्यात अपयश आले.
खादाडमाऊ
In reply to त्यात काय...? by योगी९००
अगदी बरोबर. मराठी लोकांत दुही होऊ नये असं सांगण्यात बाळासाहेबांनी आयुष्य खर्चलं, पण दोन सख्ख्या चुलतभावांमधलं भांडण सोडवायची वेळ आली तेंव्हां ते कमी पडले. त्यांच्याबद्दल माझ्या मनात त्यांनी जे पूर्वी केलं त्याबद्दल आदर होता तसाच आहे, पण वाईट इतकेच वाटते कीं तेही शेवटी एक माणूसच निघाले व "पाण्यापेक्षा रक्तच दाट" हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले.
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
बाहेरच लोक यायचे कुठे थांबले हो? ते तर येतच आहेत.
याला जबाबदार कोंण? काँग्रेसच ना?
४० वर्षापुर्वी शिवसेनाप्रमुखांनी लोंढे थांबवा अशी मागणी केली होती तेव्हा यांनीच जातीयवादी, प्रांतीयवादी अशी शेरेबाजी केली.
एकगठ्ठा मतांसाठी लाचारी केली.. अल्पसंख्याकांच्या दाढ्या कुरवाळल्या... आणि आता विलासरावांपासून अशोक चव्हाणांपर्यंत बोंबलतायत लोंढे थांबवा ...लोंढे थांबवा.
काळेसाहेब्/वि_जय यांच्याशी सहमत.
अनामिकाताईची प्रतिक्रीया मात्र ह्रदयाला भावली.. तुमच्या तीर्थरूपांना आमचा मनापासून जय-महाराष्ट्र !!!!
In reply to <बाहेरच by नम्रता राणे
सावाशी साव व बदमाशांबरोबर बदमाशी अशीच रणनीती राजकारणात असली पाहिजे व ती रणनीती बाळासाहेबांनी बरोबर राबविली. "लातोंके भूत बातोंसे नहीं मानते" हे अगदी खरं आहे आणि बाळासाहेबांनी जरूर पडली तिथे लाथा मारायला कमी केले नाहीं.
राजला जाऊ दिले ही चूक मात्र जिव्हारी लागली यात शंका नाहीं.
सुधीर काळे
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
एक सॉफ्टवेअर केलं म्हणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वगुणांवर शिक्कामोर्तब? अवघड आहे.
"Great Power Comes With Great Responsibilities"
मुळ मुद्दा बाजुला राहिला असे वाट्ते.
महानगर पालिकेत सेनेची सत्ता असताना, थेट तिथुन प्रश्न सोडवाय्च्या येवजी कोलसेटर चालु करुन काय होनार?
अमित साहेब तुमची चुकिची समजुत आहे की आज मराठी माणसाची जी गुंड-राडा करणारा म्हणून इमेज आहे ती शिवसेने मुळे.....
नेहरुनी शिवाजी महाराजांना काय म्हटलं होतं ते लक्शात आहे ना.....
'मुंबई तुमची भांडी घासा आमची' हे वाक्य आहे.. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या दरम्यान..शिवसेनेचा जन्म झाल्यानंतर हि घोषणा द्यायला कोणाची माय व्याली नाही हे लक्षात ठेवा अमितराव..
ज्यांनी सेनेच्या मदतीची जाणीव मरेपर्यंत जाणिव ठेवली असे कै. दादा कोंडके यांनी त्यांच्या शैलीत हि घोषणा देण्यर्या भडभुंजाना असे उत्तर दिले होते:- (मिपावरील सर्व महीला सभासदांची क्षमा मागून)
बायका तुमची पोर आमची
In reply to 'मुंबई by वि_जय
हांग आश्शी ईजयराव ! येकदम झक्कास !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
शिवसेना आता
'दमलेल्या बाबाची कहाणी' झालीये
सहमत