मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिवसेनेचे (कॉपोरेट) समांतर सरकार

भोचक · · काथ्याकूट
उद्धव ठाकरे शिवसेनेला कॉर्पोरेट लूक देऊ इच्छिताहेत. त्याच्याविषयीची सविस्तर माहिती इथे वाचा. http://www.loksatta.com/lokprabha/20090821/sankraman.htm उद्धवच्या या प्रयत्नांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. याआधी शिवसेना जे 'समांतर सरकार' चालवत होती, (म्हणजे लफडी निस्तरणे, कुणाचे वैयक्तिक प्रश्न सोडविणे वगैरे) तेच आताही करतेय. पण त्याला दिलेल्या कॉर्पोरेट लूकने त्याची चर्चा नक्कीच होऊ शकते. राज ठाकरे आंदोलनाव्यतिरिक्त आणि आगखाऊ भाषणांव्यतिरिक्त काही करेल असे वाटत होते (म्हणजे अजूनही आहे.) पण स्वारी विकासाच्या 'ब्ल्यू प्रिंट'वरच अडलेली आहे. तिथून पुढे जायला तयार नाही. त्या तुलनेत उद्धव शांतपणे न बोलता शिवसेनेचा विस्तार वाढविण्यासाठी लक्षवेधी आणि ठोस प्रयत्न करताहेत ही कौतुकाची बाब आहे. त्याचा राजकीय फायदा त्यांना मिळेल असे शक्यता निर्माण नक्कीच होऊ शकते. राजकडे करिष्मा असला तरी त्याचं कामही दिसायला हवे. उद्धवकडे करिष्मा नसला तरी कदाचित कामातून तो निर्माण होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतेय.

वाचन 11359 प्रतिक्रिया 40