अन्वयचा बाळकडू वरचा लेख वाचला आणि परवाची गोष्ट आठवली ती लिहावी म्हटले.
-------------------------------------------------------------------
हा आठवडा चिरंजिवांच्या ह्या शालेय वर्षाचा शेवटचा आठवडा. शनिवारपासून सुट्टी सुरु होईल आणि थेट सप्टेंबरात शाळा उघडेल तेव्हा मुलगा पहिलीतून दुसरीत जाईल.
परवाची गोष्ट, मुलाला टेबल्स करुन द्यायचे मनात आले, टेबल्स म्हणजे पाढे. म्हटलं त्यालाच लिहायला लावूयात म्हणजे अनायसे लिहूनही होतील. क्रिएटीविटी चं भूत डोक्यात ना!
मनाशी कल्पना घोळवत होतो काय करावे. एकदम त्याला सांगायला नको कारण नाही म्हणणार हे माहीत होते.
मग वेगळाच पवित्रा घेतला
मी : "एक कागद दे रे, मला टेबल्स करायची आहेत."
तो : "कशाला टेबल्स?" (हल्लीची मुलं प्रश्न फार विचारतात बुवा - आम्ही मुकाट्याने कामं करायचो असं आठवतंय)
मी : "मला टेबल्स लिहावीशी वाटताहेत, माझी विसरली आहेत त्यामुळे पाठ करायची आहेत."
तो : थोडा विचार करुन, "ओके." फोल्डर काढून एक कागद दिलान. (त्यावेळी त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती..)
मी मनात स्वतःवरच खूष म्हटले वा रे पठ्ठे बरोब्बर लागू पडली मात्रा!
त्याचं एकीकडे लेगो की कायसं खेळणं सुरुच होतं. मी फारसं लक्ष नाही असं दाखवत होतो. त्यालाच पट्टी, पेन्सिल, रंगीत खडू वगैरे मागितले त्यानं इमाने इतबारे दिलेन.
मला वाटलं चला फसत चाललाय गडी आता घोळात घेऊयात. कागद घेतला रेघा वगैरे मारल्या. नंतर एकामागे एक चार फोन आले मग ते काम तसंच राहिलं...
----------------------------------------------------------------------------------
काल संध्याकाळी बायको म्हणाली.
"काय म्हणताहेत टेऽऽबल्स?" (प्रश्न सरळ कधी आला तर शप्पथ!)
मी : "अरे हो. आज करायला हवीत. काल तशीच राहिली. आज गप्पा मारता मारता हळूच त्यालाही कामात ओढतो!"
बायको (छद्मी हसत) : "हॅहॅहॅ..चिरंजीव काय सांगत होते माहिते का आज शाळेतून आल्यावर?"
मी : "काय?"
बायको : "म्हणाला, आई, बाबा काय करणारेत मला माहिती आहे. त्यांना कशाला हवीत टेबल्स ते तर कॅलक्यूलेटर वापरतात!
स्वतः आधी टेबल्स काढायला सुरुवात करतील. मग थोडी टेबल्स काढून झाली की मला बोलावून घेतील आणि आपण दोघं करुयात म्हणून हळूच माझ्याकडून सगळं लिहून घेतील!!"
मी स्तंभित झालो. टेबल्सचा बेत रहित झाला. परवापासूनचा रेघा मारलेला कागद मला अजूनही हॅहॅहॅ करुन चिडवतोय असं वाटतं!
मनात म्हटलं चतुरंगा पोरानं तुला कधीच मात दिली आहेन, पहिले पाढे पंचावन्न!!
चतुरंग
वाचने
7970
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
हॅ हॅ हॅ
बेटा सवाई आहे!
चेकमेट
चेकमेट
In reply to चेकमेट by परिकथेतील राजकुमार
खी खी खी खी
In reply to चेकमेट by निखिल देशपांडे
हॅहॅहॅ
:-)
In reply to हॅहॅहॅ by श्रावण मोडक
+१
In reply to :-) by सहज
अगदी..
In reply to :-) by सहज
+२
In reply to :-) by सहज
हे शाब्बास रे चिरंजीव !
अगदी हेच
In reply to हे शाब्बास रे चिरंजीव ! by संदीप चित्रे
बोंबला!
+१
In reply to बोंबला! by धमाल मुलगा
बॉस!!!
In reply to बोंबला! by धमाल मुलगा
अहो...
In reply to बॉस!!! by बिपिन कार्यकर्ते
हाहाहा!!!
In reply to अहो... by श्रावण मोडक
ख्या ख्या
काय हे?
-
हा हा हा
सही!
In reply to हा हा हा by ऋषिकेश
हॅहॅहॅ!!!
ह्या
आलरेडी शरणागती पत्करली आहे!
In reply to ह्या by विनायक प्रभू
रंगा शेठ
हा, हा,
हा हा.. भारी
एकदम चतुर
+१
In reply to एकदम चतुर by स्वाती२
वा..
हा हा ..
चतुरंगांन
+१
In reply to चतुरंगांन by अनामिक
मस्त!
आम्हीही