पहिले पाढे पंचावन्न!
अन्वयचा बाळकडू वरचा लेख वाचला आणि परवाची गोष्ट आठवली ती लिहावी म्हटले.
-------------------------------------------------------------------
हा आठवडा चिरंजिवांच्या ह्या शालेय वर्षाचा शेवटचा आठवडा. शनिवारपासून सुट्टी सुरु होईल आणि थेट सप्टेंबरात शाळा उघडेल तेव्हा मुलगा पहिलीतून दुसरीत जाईल.
परवाची गोष्ट, मुलाला टेबल्स करुन द्यायचे मनात आले, टेबल्स म्हणजे पाढे. म्हटलं त्यालाच लिहायला लावूयात म्हणजे अनायसे लिहूनही होतील. क्रिएटीविटी चं भूत डोक्यात ना!
मनाशी कल्पना घोळवत होतो काय करावे. एकदम त्याला सांगायला नको कारण नाही म्हणणार हे माहीत होते.
मग वेगळाच पवित्रा घेतला
मी : "एक कागद दे रे, मला टेबल्स करायची आहेत."
तो : "कशाला टेबल्स?" (हल्लीची मुलं प्रश्न फार विचारतात बुवा - आम्ही मुकाट्याने कामं करायचो असं आठवतंय)
मी : "मला टेबल्स लिहावीशी वाटताहेत, माझी विसरली आहेत त्यामुळे पाठ करायची आहेत."
तो : थोडा विचार करुन, "ओके." फोल्डर काढून एक कागद दिलान. (त्यावेळी त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती..)
मी मनात स्वतःवरच खूष म्हटले वा रे पठ्ठे बरोब्बर लागू पडली मात्रा!
त्याचं एकीकडे लेगो की कायसं खेळणं सुरुच होतं. मी फारसं लक्ष नाही असं दाखवत होतो. त्यालाच पट्टी, पेन्सिल, रंगीत खडू वगैरे मागितले त्यानं इमाने इतबारे दिलेन.
मला वाटलं चला फसत चाललाय गडी आता घोळात घेऊयात. कागद घेतला रेघा वगैरे मारल्या. नंतर एकामागे एक चार फोन आले मग ते काम तसंच राहिलं...
----------------------------------------------------------------------------------
काल संध्याकाळी बायको म्हणाली.
"काय म्हणताहेत टेऽऽबल्स?" (प्रश्न सरळ कधी आला तर शप्पथ!)
मी : "अरे हो. आज करायला हवीत. काल तशीच राहिली. आज गप्पा मारता मारता हळूच त्यालाही कामात ओढतो!"
बायको (छद्मी हसत) : "हॅहॅहॅ..चिरंजीव काय सांगत होते माहिते का आज शाळेतून आल्यावर?"
मी : "काय?"
बायको : "म्हणाला, आई, बाबा काय करणारेत मला माहिती आहे. त्यांना कशाला हवीत टेबल्स ते तर कॅलक्यूलेटर वापरतात!
स्वतः आधी टेबल्स काढायला सुरुवात करतील. मग थोडी टेबल्स काढून झाली की मला बोलावून घेतील आणि आपण दोघं करुयात म्हणून हळूच माझ्याकडून सगळं लिहून घेतील!!"
मी स्तंभित झालो. टेबल्सचा बेत रहित झाला. परवापासूनचा रेघा मारलेला कागद मला अजूनही हॅहॅहॅ करुन चिडवतोय असं वाटतं!
मनात म्हटलं चतुरंगा पोरानं तुला कधीच मात दिली आहेन, पहिले पाढे पंचावन्न!!
चतुरंग
वाचने
7970
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
हॅ हॅ हॅ
--अवलिया
बेटा सवाई आहे! =))
काही वर्षांनी चतुरंगजींच्या विडंबनांचीही विडंबने नक्की वाचायला मिळणार! वाट पाहते! :)
चेकमेट झाले की रंगाशेठ ;)
º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
In reply to चेकमेट by परिकथेतील राजकुमार
चेकमेट झाले की रंगाशेठ
असेच म्हणतो...
बापसे बेटा सवाई....
==निखिल
In reply to चेकमेट by निखिल देशपांडे
खी खी खी खी खी खीखी खी खीखी खी खीखी खी खी
=))
रंगासेठ.... बच्चे को बचा मत समज ना... तुम्हे कच्चा चबा जायेगा... डकार भी नही लेगा.... =))
लहान मुलांना मी जाम घाबरतो ;)
थोडेसं नवीन !
थोडेसं नवीन !बुद्धी आणि बुद्धीचे बळ यांचे महत्त्व असे समजणार होते तर तुम्हाला! :)
In reply to हॅहॅहॅ by श्रावण मोडक
हा हा हा!
चेकमेट झाले मालक.
ह्याला म्हणतात बाप से बेटा सवाई !
तुझी पावलं ओळखायची कला बहुतेक आईच्या पोटातूनच शिकून आलाय ;)
In reply to हे शाब्बास रे चिरंजीव ! by संदीप चित्रे
अगदी हेच म्हणतो...!
-अनामिक
हे सगळं वाचुन आता काही काळानं 'बाळा, मला शिकवू नकोस, मी तुझा बाप आहे' असं म्हणण्याचीही सोय उरणार नाही असं वाटायला लागलंय.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
In reply to बोंबला! by धमाल मुलगा
असेच म्हणतो.
In reply to बोंबला! by धमाल मुलगा
हे सगळं वाचुन आता काही काळानं 'बाळा, मला शिकवू नकोस, मी तुझा बाप आहे' असं म्हणण्याचीही सोय उरणार नाही असं वाटायला लागलंय.मालक, काही काळानं काय? ऑलरेडी वाईट अवस्था आहे. आजचा डायलॉग सांगितलाच आहे तुला. बिपिन कार्यकर्ते
In reply to बॉस!!! by बिपिन कार्यकर्ते
त्यांचे डिंकाचे लाडू अजून तयार झालेले नाहीत. त्यामुळं ते काही काळानं असंच म्हणणार... ;)
ख्या ख्या ख्या !!! अफाट =)) =)) =))
मुलं मिपा वाचत नाहीत, म्हणून सगळे हात धुवून मुलांच्या मागे लागलात की काय? तिकडे त्या आदीचा कात्रज वाचून होत नाही, तर इकडे पुन्हा चिरंजीवांच्या कागाळ्या! ;) [ह. घ्या हो!] बाकी, आजकालची लेकरं खरंच सवाई! आपल्यासारखी "मुकी बिचारी कुणी हाका" अशी नाहीत!
लेख आवडला.
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
=)) =)) =))
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
=)) =)) =)) __/\__
चतुरंगांची टेबलं क्रमशः म्हणायची ;)
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
In reply to हा हा हा by ऋषिकेश
चतुरंगांची टेबलं क्रमशः म्हणायची
इथेही क्रमशः!!!!!!!!!!! =)) =)) =))
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
पोऽऽऽप्पट!!!!
बिपिन कार्यकर्ते
मुलाकडे टॅक्ट वापरुन उपयोग नाही.
सरळ शरण जा.
In reply to ह्या by विनायक प्रभू
हल्ली बरोबरीचा मित्र असल्यासारखेच वागतो! #:S
(बरोबरीचा प्रस्ताव मांडणारा) >:D चतुरंग
तुम्ही विटी क्रिएट करायला गेलात,
चिरंजीवानी टाळक्यात दांडू मारला की हो.
हा, हा, हा!!!!!
घरोघरी मातीच्याच चुली!!
:)
हा हा..
भारी किस्सा!
लेक फार भन्नाट दिसतोय :)
--शाल्मली.
एकदम चतुर आहे तुमचा लेक. अशा चेकमेटचा आनंद आगळाच.
वा.. मीठमोहर्यांनी दृष्ट काढा या हिरोची!
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
हा हा .. मजेदार :)
भारी किस्सा !
--(लहानपणी अनेकांची विकेट घेतलेला) लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
चतुरंगांना आपण अगदी चतुर असल्याचा रंग दाखवलाय सुपुत्राने!
-अनामिक
In reply to चतुरंगांन by अनामिक
सही आहे किस्सा ! शिष्यादिच्छेत्पराजयात ! ;-)
एकदम मस्त अनुभव आहे. "पहीले पाढे पंचावन्न" हे उत्तर स्वानुभवानेपण चपखल वाटते :-)
असेच अनुभव घेतोय सध्या!
हा मुलांविषयीच्या प्रेमाचा महापूर ओसरला, की लिहू त्याविषयी सवडीने!!
:S
हॅ हॅ हॅ