मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पहिले पाढे पंचावन्न!

चतुरंग · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
अन्वयचा बाळकडू वरचा लेख वाचला आणि परवाची गोष्ट आठवली ती लिहावी म्हटले. ------------------------------------------------------------------- हा आठवडा चिरंजिवांच्या ह्या शालेय वर्षाचा शेवटचा आठवडा. शनिवारपासून सुट्टी सुरु होईल आणि थेट सप्टेंबरात शाळा उघडेल तेव्हा मुलगा पहिलीतून दुसरीत जाईल. परवाची गोष्ट, मुलाला टेबल्स करुन द्यायचे मनात आले, टेबल्स म्हणजे पाढे. म्हटलं त्यालाच लिहायला लावूयात म्हणजे अनायसे लिहूनही होतील. क्रिएटीविटी चं भूत डोक्यात ना! मनाशी कल्पना घोळवत होतो काय करावे. एकदम त्याला सांगायला नको कारण नाही म्हणणार हे माहीत होते. मग वेगळाच पवित्रा घेतला मी : "एक कागद दे रे, मला टेबल्स करायची आहेत." तो : "कशाला टेबल्स?" (हल्लीची मुलं प्रश्न फार विचारतात बुवा - आम्ही मुकाट्याने कामं करायचो असं आठवतंय) मी : "मला टेबल्स लिहावीशी वाटताहेत, माझी विसरली आहेत त्यामुळे पाठ करायची आहेत." तो : थोडा विचार करुन, "ओके." फोल्डर काढून एक कागद दिलान. (त्यावेळी त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती..) मी मनात स्वतःवरच खूष म्हटले वा रे पठ्ठे बरोब्बर लागू पडली मात्रा! त्याचं एकीकडे लेगो की कायसं खेळणं सुरुच होतं. मी फारसं लक्ष नाही असं दाखवत होतो. त्यालाच पट्टी, पेन्सिल, रंगीत खडू वगैरे मागितले त्यानं इमाने इतबारे दिलेन. मला वाटलं चला फसत चाललाय गडी आता घोळात घेऊयात. कागद घेतला रेघा वगैरे मारल्या. नंतर एकामागे एक चार फोन आले मग ते काम तसंच राहिलं... ---------------------------------------------------------------------------------- काल संध्याकाळी बायको म्हणाली. "काय म्हणताहेत टेऽऽबल्स?" (प्रश्न सरळ कधी आला तर शप्पथ!) मी : "अरे हो. आज करायला हवीत. काल तशीच राहिली. आज गप्पा मारता मारता हळूच त्यालाही कामात ओढतो!" बायको (छद्मी हसत) : "हॅहॅहॅ..चिरंजीव काय सांगत होते माहिते का आज शाळेतून आल्यावर?" मी : "काय?" बायको : "म्हणाला, आई, बाबा काय करणारेत मला माहिती आहे. त्यांना कशाला हवीत टेबल्स ते तर कॅलक्यूलेटर वापरतात! स्वतः आधी टेबल्स काढायला सुरुवात करतील. मग थोडी टेबल्स काढून झाली की मला बोलावून घेतील आणि आपण दोघं करुयात म्हणून हळूच माझ्याकडून सगळं लिहून घेतील!!" मी स्तंभित झालो. टेबल्सचा बेत रहित झाला. परवापासूनचा रेघा मारलेला कागद मला अजूनही हॅहॅहॅ करुन चिडवतोय असं वाटतं! मनात म्हटलं चतुरंगा पोरानं तुला कधीच मात दिली आहेन, पहिले पाढे पंचावन्न!! चतुरंग

वाचने 7962 वाचनखूण प्रतिक्रिया 36

यशोधरा Tue, 06/23/2009 - 20:01
बेटा सवाई आहे! =)) काही वर्षांनी चतुरंगजींच्या विडंबनांचीही विडंबने नक्की वाचायला मिळणार! वाट पाहते! :)

In reply to by निखिल देशपांडे

दशानन Wed, 06/24/2009 - 10:33
खी खी खी खी खी खीखी खी खीखी खी खीखी खी खी =)) रंगासेठ.... बच्चे को बचा मत समज ना... तुम्हे कच्चा चबा जायेगा... डकार भी नही लेगा.... =)) लहान मुलांना मी जाम घाबरतो ;) थोडेसं नवीन !

In reply to by सहज

धनंजय Wed, 06/24/2009 - 00:18
पहिले प्यादे x e५(वजीर), शह आणि मात!

धमाल मुलगा Tue, 06/23/2009 - 20:17
हे सगळं वाचुन आता काही काळानं 'बाळा, मला शिकवू नकोस, मी तुझा बाप आहे' असं म्हणण्याचीही सोय उरणार नाही असं वाटायला लागलंय. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

In reply to by धमाल मुलगा

हे सगळं वाचुन आता काही काळानं 'बाळा, मला शिकवू नकोस, मी तुझा बाप आहे' असं म्हणण्याचीही सोय उरणार नाही असं वाटायला लागलंय.
मालक, काही काळानं काय? ऑलरेडी वाईट अवस्था आहे. आजचा डायलॉग सांगितलाच आहे तुला. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक Tue, 06/23/2009 - 21:32
त्यांचे डिंकाचे लाडू अजून तयार झालेले नाहीत. त्यामुळं ते काही काळानं असंच म्हणणार... ;)

क्रान्ति Tue, 06/23/2009 - 21:02
मुलं मिपा वाचत नाहीत, म्हणून सगळे हात धुवून मुलांच्या मागे लागलात की काय? तिकडे त्या आदीचा कात्रज वाचून होत नाही, तर इकडे पुन्हा चिरंजीवांच्या कागाळ्या! ;) [ह. घ्या हो!] बाकी, आजकालची लेकरं खरंच सवाई! आपल्यासारखी "मुकी बिचारी कुणी हाका" अशी नाहीत! लेख आवडला. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

प्राजु Tue, 06/23/2009 - 21:08
=)) =)) =)) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ऋषिकेश Tue, 06/23/2009 - 21:12
=)) =)) =)) __/\__ चतुरंगांची टेबलं क्रमशः म्हणायची ;) ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

In reply to by ऋषिकेश

क्रान्ति Tue, 06/23/2009 - 21:20
चतुरंगांची टेबलं क्रमशः म्हणायची इथेही क्रमशः!!!!!!!!!!! =)) =)) =)) क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

नीधप Tue, 06/23/2009 - 22:53
वा.. मीठमोहर्‍यांनी दृष्ट काढा या हिरोची! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

लिखाळ Wed, 06/24/2009 - 00:34
हा हा .. मजेदार :) भारी किस्सा ! --(लहानपणी अनेकांची विकेट घेतलेला) लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

विकास Wed, 06/24/2009 - 01:37
एकदम मस्त अनुभव आहे. "पहीले पाढे पंचावन्न" हे उत्तर स्वानुभवानेपण चपखल वाटते :-)

आपला अभिजित Wed, 06/24/2009 - 18:38
असेच अनुभव घेतोय सध्या! हा मुलांविषयीच्या प्रेमाचा महापूर ओसरला, की लिहू त्याविषयी सवडीने!! :S