गेले काही दिवस आपण डेट्रॉईट बीग-३ संकटात, यु ए डब्ल्यु शी बोलणी फिसकटली, ट्रेझरी डिपार्टमेंटकडुन अजुन नवा बेल्-आउट पॅकजचा प्रस्ताव , क्रायस्लरची दिवाळखोरी, रिक वॅगनरची हकालपट्टी, जनरल मोटर्सला ३१ मे ची अखेरची मुदत, मॅग्ना आणि फियाट ओपेलच्या रेसमध्ये वगैरे बातम्या वाचत अगर ऐकत असाल ...
आज त्याची परमोच्चवधी झाली आहे ....
"आज जगातल्या नंबर १ च्या जनरल मोटर्सने दिवाळे घोषीत केले आहे".
त्यांनी आज फेडरल कोर्टात "चॅप्टर-११, बँकरप्सी प्रोटेक्शन" साठी अर्ज केला आहे ....
२-३ वर्षापुर्वीच यशाच्या शिखरावर असलेल्या वाहननिर्मीतीउद्योगाच्या इतिहासातला हा एक सर्वात वाईट क्षण, ऑटो उद्योग म्हणाजे जनरल मोटर्स असे समिकरण असलेली एक महाबलाढ्य आणि अवाढव्य कंपनी आज दिवाळखोरीत जाऊन बसली आहे.
कुठल्या कुठे दिवस बदलले ?
अर्थात दिवाळखोरी म्हणजे सर्व बिझीनेस बंद असे नाही पण बरेच बदल होतील हे नक्की ...
एक नक्की आहे ही "जी एम" ही पुर्वीची "जी एम" राहणार नाही, आता टोयोटा आणि होंडासारख्या त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना रान मोकळे सापडेल.
ह्या अनुषंगाने काही महत्वाच्या नोंदी :
- आज सकाळी जनरल मोटर्सने आपला २४ पानी दिवाळखोरी अर्ज कोर्टात दाखल केला. त्यात त्यांनी ८२.२९ बिलीयन डोलर्सची संपत्ती (ऍसेट्स) जमाखात्यावर दाखवले तर १७२.८१ बिलीयन डॉलर्सची देणी दाखवली आहेत.
- त्यांनी आत्तापर्यंत सुमारे ११ बिलीयन डॉलर्स कर्ज म्हणुन वापरले आहेत ....
- नव्या घोषणेनुसार अमेरिकन सरकार अजुन ३० बिलीयन डॉलर्स गुंतवणुक करुन कंपनीचे ६०% समभाग स्वतःच्या ताब्यात ठेवेल आणि कॅनेडियन सरकार ९.५ बिलीयन डॉलर्सची गुंतवणुक करुन १२.५% समभाग स्वतःच्या ताब्यात ठेवतील. उरलेल्या भागांवर शेअरहोल्डर्सचा ताबा असेल. म्हणजे थोडक्यात इथुन पुढे जनरल मोटर्स ही अमेरिकन सरकारची कंपनी असेल.
- जनरल मोटर्स आपल्या ९ मॅन्युफॅक्चरिंग कारखान्यांना कायमचे टाळे ठोकेल व ३ इतर कारखाने काही काहीसाठी "विनाकाम" ठेऊन नंतर हे विकुन टाकेल.
- ह्याचा परिणाम सुमारे १८०००-२१००० डायरेक्ट जी एम नोकरदारांचे व सुमारे ५०००० इतर लहान सपोर्ट इंडस्ट्रीतल्या नोकरदारांचे जॉब जाण्यात होईल.
- जी एम च्या अमिरिकेतल्या ८ ब्रँडपैकी ४ ब्रँडला एक तर विकले जातील अथवा सरकारकडुन लिक्विडेट ( मराठी शब्द ? ) केले जातील. ह्यात बहुचर्चित हॅमर, साब, पोन्टेक, सॅटर्न ब्रँडचा समावेश आहे.
- साधारणता ६० ते ९० दिवसात भविष्यात जनरल मोटर्स नक्की कशी असेल ह्याचे चित्र स्पष्ट होईल असा अंदाज आहे ...
- मिपाकरांचे ह्या चाललेल्या घडामोडीबद्दल काय मत आहे ?
- अमेरिकन ओटो उद्योगाचा हा अंत की नवी पहाट ?
- ह्याचा दुरगामी परिणाम काय असु शकतो ?
- इतर जगावर नक्की काय परिणाम होईल ?
- बुडत्या अर्थव्यवस्थेला हा प्रसंग "काडीचे ओझे" ठरणार नाही ना ?
वाचने
12863
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
टाटाला
चांगला विषय...
दिवाळखोर व्हायची काही कारणे
अमेरीका व
तीन जनरल्स
In reply to अमेरीका व by अविनाशकुलकर्णी
काल
जी एम्
बरोबर ...
In reply to जी एम् by महेश हतोळकर
On a Clear Day You Can See General Motors हे पुस्तक
थोडे विस्तारित ...
In reply to On a Clear Day You Can See General Motors हे पुस्तक by रामदास
+१ अत्यंत चपखल वर्णन!
In reply to On a Clear Day You Can See General Motors हे पुस्तक by रामदास
.... "टोयोटा
बरोबर ...
In reply to .... "टोयोटा by अनामिक
ही बघा प्रिअस
In reply to बरोबर ... by छोटा डॉन
इलेक्ट्रिक कार = प्रदूषणमुक्त का बरे?
हुप्प्याश
In reply to इलेक्ट्रिक कार = प्रदूषणमुक्त का बरे? by हुप्प्या
काहीतरी गल्लत होते आहे
In reply to इलेक्ट्रिक कार = प्रदूषणमुक्त का बरे? by हुप्प्या
असं होय!
In reply to काहीतरी गल्लत होते आहे by अनामिक
पुन्हा
In reply to काहीतरी गल्लत होते आहे by अनामिक
इफिशियंसी ....
In reply to पुन्हा by ३_१४ विक्षिप्त अदिती
आता समजलं;
In reply to इफिशियंसी .... by छोटा डॉन
>> प्रदूषण
In reply to आता समजलं; by ३_१४ विक्षिप्त अदिती
याचे उत्तर
In reply to पुन्हा by ३_१४ विक्षिप्त अदिती
धन्यवाद माहितीसाठी ...
In reply to याचे उत्तर by नितिन थत्ते
बरोबर आहे ...
In reply to काहीतरी गल्लत होते आहे by अनामिक
+१
डॉनराव
असेच म्हणतो
In reply to डॉनराव by अभिज्ञ
हे पहा
उत्तम लेख आणि प्रतिसाद
छान
परंतु
In reply to छान by मराठमोळा
सहमत आहे ...
In reply to परंतु by अनामिक
रंगाशेट, चि
डन!
In reply to रंगाशेट, चि by नितिन थत्ते
मंदीच्या पार्श्वभूमीवर हा लेख
तुला
In reply to मंदीच्या पार्श्वभूमीवर हा लेख by नाना चेंगट
कुंद्या चुकतोस चुकतोस्.अभ्यास
In reply to तुला by कुंदन
झक्कास !
In reply to कुंद्या चुकतोस चुकतोस्.अभ्यास by विजुभाऊ
परा काका यावर खरेतर नान्याने
In reply to झक्कास ! by परिकथेतील राजकुमार
बर्याच दिवसांनी अत्यंत हि &
In reply to झक्कास ! by परिकथेतील राजकुमार
मंदी : या शब्दाबद्दल खुलासा
मुक्त अर्थ व्यवस्था व हे असे ...
दिव्यांचा झगमगाट, सेलेब्रेशन्स...