मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जनरल मोटर्सची दिवाळखोरी आणि ऑटो उद्योगाचे भविष्य ..

छोटा डॉन · · काथ्याकूट
गेले काही दिवस आपण डेट्रॉईट बीग-३ संकटात, यु ए डब्ल्यु शी बोलणी फिसकटली, ट्रेझरी डिपार्टमेंटकडुन अजुन नवा बेल्-आउट पॅकजचा प्रस्ताव , क्रायस्लरची दिवाळखोरी, रिक वॅगनरची हकालपट्टी, जनरल मोटर्सला ३१ मे ची अखेरची मुदत, मॅग्ना आणि फियाट ओपेलच्या रेसमध्ये वगैरे बातम्या वाचत अगर ऐकत असाल ... आज त्याची परमोच्चवधी झाली आहे .... "आज जगातल्या नंबर १ च्या जनरल मोटर्सने दिवाळे घोषीत केले आहे". त्यांनी आज फेडरल कोर्टात "चॅप्टर-११, बँकरप्सी प्रोटेक्शन" साठी अर्ज केला आहे .... २-३ वर्षापुर्वीच यशाच्या शिखरावर असलेल्या वाहननिर्मीतीउद्योगाच्या इतिहासातला हा एक सर्वात वाईट क्षण, ऑटो उद्योग म्हणाजे जनरल मोटर्स असे समिकरण असलेली एक महाबलाढ्य आणि अवाढव्य कंपनी आज दिवाळखोरीत जाऊन बसली आहे. कुठल्या कुठे दिवस बदलले ? अर्थात दिवाळखोरी म्हणजे सर्व बिझीनेस बंद असे नाही पण बरेच बदल होतील हे नक्की ... एक नक्की आहे ही "जी एम" ही पुर्वीची "जी एम" राहणार नाही, आता टोयोटा आणि होंडासारख्या त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना रान मोकळे सापडेल. ह्या अनुषंगाने काही महत्वाच्या नोंदी :
  1. आज सकाळी जनरल मोटर्सने आपला २४ पानी दिवाळखोरी अर्ज कोर्टात दाखल केला. त्यात त्यांनी ८२.२९ बिलीयन डोलर्सची संपत्ती (ऍसेट्स) जमाखात्यावर दाखवले तर १७२.८१ बिलीयन डॉलर्सची देणी दाखवली आहेत.
  2. त्यांनी आत्तापर्यंत सुमारे ११ बिलीयन डॉलर्स कर्ज म्हणुन वापरले आहेत ....
  3. नव्या घोषणेनुसार अमेरिकन सरकार अजुन ३० बिलीयन डॉलर्स गुंतवणुक करुन कंपनीचे ६०% समभाग स्वतःच्या ताब्यात ठेवेल आणि कॅनेडियन सरकार ९.५ बिलीयन डॉलर्सची गुंतवणुक करुन १२.५% समभाग स्वतःच्या ताब्यात ठेवतील. उरलेल्या भागांवर शेअरहोल्डर्सचा ताबा असेल. म्हणजे थोडक्यात इथुन पुढे जनरल मोटर्स ही अमेरिकन सरकारची कंपनी असेल.
  4. जनरल मोटर्स आपल्या ९ मॅन्युफॅक्चरिंग कारखान्यांना कायमचे टाळे ठोकेल व ३ इतर कारखाने काही काहीसाठी "विनाकाम" ठेऊन नंतर हे विकुन टाकेल.
  5. ह्याचा परिणाम सुमारे १८०००-२१००० डायरेक्ट जी एम नोकरदारांचे व सुमारे ५०००० इतर लहान सपोर्ट इंडस्ट्रीतल्या नोकरदारांचे जॉब जाण्यात होईल.
  6. जी एम च्या अमिरिकेतल्या ८ ब्रँडपैकी ४ ब्रँडला एक तर विकले जातील अथवा सरकारकडुन लिक्विडेट ( मराठी शब्द ? ) केले जातील. ह्यात बहुचर्चित हॅमर, साब, पोन्टेक, सॅटर्न ब्रँडचा समावेश आहे.
  7. साधारणता ६० ते ९० दिवसात भविष्यात जनरल मोटर्स नक्की कशी असेल ह्याचे चित्र स्पष्ट होईल असा अंदाज आहे ...
हे थोडक्यात विवरण झाले. थोडा अजुन वेळ मिळाला की "सविस्तर लेखाजोखा" लिहण्याचा प्रयत्न करेन. योगायोगाने मी ह्याच क्षेत्रातला असल्याने मी शक्य तितकी खात्रीशिर व सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करेन ... तोपर्यंत :
  • मिपाकरांचे ह्या चाललेल्या घडामोडीबद्दल काय मत आहे ?
  • अमेरिकन ओटो उद्योगाचा हा अंत की नवी पहाट ?
  • ह्याचा दुरगामी परिणाम काय असु शकतो ?
  • इतर जगावर नक्की काय परिणाम होईल ?
  • बुडत्या अर्थव्यवस्थेला हा प्रसंग "काडीचे ओझे" ठरणार नाही ना ?
आदी मुद्द्यांवर सविस्तर विवेचन वाचायला आवडेल. अवलियासाहेबांचा विस्तारित प्रतिसाद मला इथे अपेक्षित आहे, मी वाट पहातो आहे ... बाकी अजुन सविस्तर सवड मिळाली की लगेच, ही फक्त चर्चेची सुरवात आहे ....

वाचन 12862 प्रतिक्रिया 0