मस्त जुळतं आमचं!
तीच ते नाजूक हसने…
ब्रेकफास्टवेळी टेबलावर हसून चांदणे सांडणे,
सगळं काही नजरेत साठवले मी!
तिची ती उंची,
गोरापान रंग, बोलण्याचा ढंग—
अप्सराच जणू!
फिदा झालो मी तिच्यावर…
तिचे ते मोकळे केस,
स्टायलिश राहणे,
इंग्लिश बोलणे—
अहाहा!
मला दाढी ठेव सुचवणे,
हेअरस्टाईल बदलायला लावणे,
“फॉर्मलपेक्षा कॅज्युअलवर छान दिसशील” सांगणे…
कसला संकेत?
सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण
आणि संध्याकाळची कॉफी—
आम्हाला एकमेकांची सवयच झालीय!
टीम्स मिटिंग असो की
एखादा इवेंट,
आमचे लाडिक विनोद सुरूच असतात.
मागे मला मिळालेले गिफ्टही
मी तिला देऊन आनंदी केले.
ऑफिस कलीग हा फक्त
आमच्यातला अडसर आहे,
खरं तर आम्ही दोघं एकच आहोत!
काय झालं माझं लग्न झालंय म्हणून?
पूर्वी नाही का लोक दोन बायका करायचे?
मी आज ठरवलंच—
हिला विचारणारच!
मनात शंभर विचार चालू होते.
तिचा रिप्लाय?
ती काय म्हणेल?
पण नाही, मला तिच्या नजरेतला तो “हो” स्पष्ट दिसतो!
हिंमत करून मी तिला मॅसेज टाकलाय.
आता दोन तासांनी व्हॉट्सअप उघडणार!
आहाहा, काय आनंद!
तोपर्यंत ही माझी तासाभराची
टीम्स मिटींगही आटपेल!
झाली एकदाची मिटिंग!
हुश्श!
अरे… पण हे एचआर हेड
माझ्या टेबलाकडे का येताहेत?
त्यांच्या हातातला हा बंद लिफाफा?
आणि… सोबत सिक्युरिटी गार्ड?
वाचने
7134
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुठे vacancy असेल तर कळवा! :(
अचूक धरलात नेम
हाहा खरंय! जेम होईल अशी
In reply to अचूक धरलात नेम by रामचंद्र
तुम्ही तरंगत जाता म्हणूनच
सध्या तुमचा मूड जुनी मराठी
धन्यवाद! हो सध्या मुड खूप
In reply to सध्या तुमचा मूड जुनी मराठी by कंजूस
तसं नाही,तो मराठी गाणे आणि
In reply to सध्या तुमचा मूड जुनी मराठी by कंजूस
*समजत
In reply to तसं नाही,तो मराठी गाणे आणि by Bhakti
भाऊ जरा जपून,लई मोठा खड्डा
In reply to तसं नाही,तो मराठी गाणे आणि by Bhakti
भाऊ जरा जपून,लई मोठा खड्डा हाये हा ;)ताई, त्या खड्ड्यात पडायचाच मोह होतोय! :)आवरा मग!
In reply to भाऊ जरा जपून,लई मोठा खड्डा by अमरेंद्र बाहुबली
त्या खड्ड्यात पडायचाच मोह
In reply to भाऊ जरा जपून,लई मोठा खड्डा by अमरेंद्र बाहुबली
एच आर हेड , खुद्द स्वतः चालून
अरे वा! असे असेल तर खुपच छान
In reply to एच आर हेड , खुद्द स्वतः चालून by आंद्रे वडापाव
अरे वा!!
धन्यवाद! खरोखर अशीच परिस्थिती
In reply to अरे वा!! by राजेंद्र मेहेंदळे
कविता चांगली जमली आहे.
:)
In reply to कविता चांगली जमली आहे. by Bhakti
अबा आणी कवीता डेडली काॅम्बिनेशन......
पाकीट कुठल्या रंगाचं आहे?
In reply to अबा आणी कवीता डेडली काॅम्बिनेशन...... by कर्नलतपस्वी
पाकीट कुठल्या रंगाचं आहे?पांढऱ्या!कवीता आणी शेवटचा ट्विस्ट लई भारी.धन्यवाद कर्नलसाहेब!अबा, खड्ड्यात उडी मारण्यात आगोदर जरा गौर फरमाए....
छान कविताकर्नल साहेब! :)
In reply to अबा, खड्ड्यात उडी मारण्यात आगोदर जरा गौर फरमाए.... by कर्नलतपस्वी
@कर्नलतपस्वी
मगर लगने वाले "दाम" और होनेवाले "अंजाम" सोच के "जी" घबराता है ,जीअबा याच्या पुढे गेलेत.... ते हसीखुशी नोकरी कुर्बान करायला तयार आहेत....;))अशा रंगीनमिजाज कविराजांना
साहित्य आणि वास्तव वेगळं असतं
In reply to अशा रंगीनमिजाज कविराजांना by रामचंद्र
वा
खिक्क! मस्त माई!
In reply to वा by माईसाहेब कुरसूंदीकर
'मी तिला विचारलं, तिनं लाजून
अशी कशी ती धुंद
नाही मी बोलत आबा ....
वास्तव आहे!
In reply to नाही मी बोलत आबा .... by चित्रगुप्त
अरेरेरेरे !
:)
In reply to अरेरेरेरे ! by सस्नेह
जरा ग. वा. बेहेऱ्यांचं
In reply to :) by अमरेंद्र बाहुबली
आणतो!
In reply to जरा ग. वा. बेहेऱ्यांचं by रामचंद्र
शेवटची कलाटणी मस्तच. मजा आली.
धन्यवाद प्रचेतस सर! :)
In reply to शेवटची कलाटणी मस्तच. मजा आली. by प्रचेतस
.....
पाणी पुरीचा ठेला
In reply to ..... by विवेकपटाईत
पाणी पुरीचा ठेला संध्याकाळी लावतो स्पर्श अप्सरांचा रोज अनुभवतो.खिक्क! ह ह पु वा! :)हा हा हा ....
पाणी पुरीचा ठेला संध्याकाळी लावतो स्पर्श अप्सरांचा रोज अनुभवतो.हाहाहा....भारी.....