डिस्क्लेमरः
ह्या लेखामागील हेतू हा गुंतवणूक कशी, कुठे आणि किती करावी हे ठरवण्याकरता नाही. त्यासाठी अनेक तज्ञ मंडळींनी मिपावर अगोदरच लिहून झालेले आहे. तेवढा माझा स्वतःचा अभ्यासही नाही. पण मला स्वतःला आलेले अनुभव आणि त्यातून मी काय शिकलो इतपतच लिहावेसे वाटले. आणिकही अनेक उत्तम विचार असतील हे मी नाकारत नाही.
---
आजच एक धागा बघीतला की आर्थिक नियोजन कसे करावे. कधी विचारचक्रात पडलो आणि भूतकाळात गेलो ते माझे मलाच समजले नाही.
एक वेळ अशी होती की अगदीच मोजके पैसे शिल्लक असत, ज्यात गुंतवणूक कशी करावी हेच सुचत नसे. त्यामुळे करिअरच्या सुरुवातीला अगदीच नगण्य गुंतवणूक झाली.
आणि ती वेळ न साधल्यानं आपण किती वेळ वाया घालवला हे आठवून आज फार फार खेद वाटतो. असो.
स्वानुभवातून काही बाबी मला जाणवल्यात त्या अशा:
- आपल्याकडे आर्थिक नियोजनाबद्दल निरक्षरता खूप आहे. आणि या विशिष्ट निरक्षरतेचं सर्वात् मुख्य कारण म्हणजे जगतांना आवश्यक असणाऱ्या सर्वसाधारण शिस्तीचा अभाव हे आहे. हेच पैसा कमी पडण्याचं एक प्रमुख कारण देखील आहे.
- आपल्याकडे बहुतांशी, गणित हा विषय अत्यंत कठीण/जणू काही शत्रूच असे लहानपणापासून कळत/नकळत मनावर बिंबवल्या जातं. "ते अर्थकारणातलं आपल्याला काही कळत नाही" हे भूषण नसून विदारक आहे हे समजायला हवं. हे असले विचार सर्वस्वी अकारण, अहितकारक आहेत आणि जाणीवपूर्वक टाळायला हवेत.
- नियोजनातला प्रमुख भाग हा उत्पन्नाच्या किती प्रमाणात आपण गुंतवणूक केली पाहिजे हा आहेच (सर्वसाधरण आवश्यक खर्च, पुढची गरज यावरून प्रमाण ठरतं), पण त्याहीपेक्षा त्यामागची नियमितता जास्त महत्त्वाची आहे. शिस्त लागते ती इथेच. They say, "commitment will help you to initiate a thing, consistency will help you to accomplish it."
- गुंतवणूक करण्याआधी बेसिक लॉजिक, शक्य तेवढा जास्तीत जास्त सखोल अभ्यास आणि आपल्या अभ्यासावरचा आपला स्वतःचा विश्वास हे फार महत्त्वाचं आहे.
- जर कोणतीही गुंतवणूक केवळ कोणा दुसऱ्याच्या अभ्यासावर अवलंबून केलेली असेल, तर त्या गुंतवणुकीला जुगार म्हणण्यास वाव आहे (त्यात फायदा/तोटा किती हा भाग गौण आहे). जर आपण अभ्यास करण्याचेही कष्ट उपसणार नसू, तर तो पैसा मिळण्यास आपण अपात्र आहोत हे समजून घ्यायला हवे.
- बचत आणि उत्पन्न या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. दोन्हींमधे संतुलन हवं तसंच दोन्ही वृद्धिंगत व्हायला हव्यात. उत्पन्नाचे वेगवेगळे स्त्रोत तयार करणं हाही गुंतवणुकीचा महत्त्वाचा भाग आहे.
- टॅक्सेस हा विषय नीट समजून घेऊन त्यानुसार गुंतवणूक, निर्गुंतवणूक आणि पुनर्गुंतवणूक करायला हवी. यातून बरीच बचत होऊ शकते.
- नशीब हा एक अपरिहार्य, अनाकलनीय आणि अत्यंत महत्त्वाचा "घटक" न मानता "साथिदार" आहे असे मानत जावे. त्याचा वाटा वेगळा काढून ठेवायलाच हवा.
- पैसा कमवणं, गुंतवणं, साभाळणं, पुनर्गुंतणूक करणं या बरोबरच योग्य विनियोग करणं हाही गुंतवणूकीचाच भाग आहे. विनियोग आणि खर्च या दोन गोष्टींत मूलभूत फरक आहे हे समजून घ्यायला हवे. योग्य विनियोग होत नसेल तर ती गुंतवणूक नासली असे समजण्यास हरकत नाही.
- पैसा हा जवळ-जवळ नेहमीच पैशाकडे जातो आणि पैशाचं सोंग कधीही आणता येत नाही. आपली मदत आपणच करायची आहे हे स्वतःच्या मनावर पक्के बिंबवावे. कोणीही (अक्षरशः कोणीही) आपल्या मदतीला येणार नाहीये ह्याची आपण नीट जाणीव ठेवायला हवी. जर कोणाची मदत झालीच तर तो बोनस समजावा. पण आपण स्वतः पुरेसं स्थिरस्थावर झाल्यावर निदान दोन योग्य व्यक्तींना "पायावर" उभं राहण्यास जरूर मदत करावी (don't serve them fish... equip them with knowledge to fish) आणि परताव्याऐवजी त्यांना असंच आणिक दोन योग्य व्यक्तींना मदत करावयास सांगावे.
बाकी गुंतवणूक वेगवेगळ्या बास्केट्स मधे करावी, विम्यातून अपेक्षा केवळ सुरक्षेची ठेवावी वगैरे बाबी सर्वच जण जाणतात.
गुंतवणूकीसाठी नेहमी काहीतरी भव्यदिव्यच स्ट्रॅटेजी असली पाहिजे असे काही नाही.
They say, "simplicity is the most complicated thing to achieve.." and it's true.
सध्या इतपतच. आणिक काही सुचले तर जरूर लिहेन. कुणास स्वतःच्या अनुभवातून काही आणिक सांगावेसे वाटले तर जरूर लिहावे.
इत्यलम्
वाचने
20432
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान लेख.
या बाबतीतला माझा अनुभव
कॉमी आणि चित्रगुप्त सर,
In reply to या बाबतीतला माझा अनुभव by चित्रगुप्त
पिढी पिढीतला फरक आहे.
@कर्नल तपस्वी: नेमके सांगितलेत.
माझ्या वडिलांच्या बाबतीत असं
In reply to @कर्नल तपस्वी: नेमके सांगितलेत. by चित्रगुप्त
लहानपणी वर्तनाचे संस्कार
+१
In reply to लहानपणी वर्तनाचे संस्कार by कंजूस
आडात असेल तर...
In reply to +१ by राघव
कर्नल, सहमत.
In reply to आडात असेल तर... by कर्नलतपस्वी
उत्पन्न - गुंतवणुक -
आर्थिक नियोजन .. म्हणजे
अॅनालॉजी आवडली!
In reply to आर्थिक नियोजन .. म्हणजे by अमर विश्वास
उत्तम धागा!!
वाह! खूप सुंदर अन् चांगली
In reply to उत्तम धागा!! by राजेंद्र मेहेंदळे
आवडलं आहे.
In reply to उत्तम धागा!! by राजेंद्र मेहेंदळे
वाखूसा
१) The sad truth is that we
ही वृत्ती सर्व ठिकाणी (देशांत
In reply to १) The sad truth is that we by सुबोध खरे
एकंदर आपल्याकडे (मराठी
In reply to १) The sad truth is that we by सुबोध खरे
+१
In reply to एकंदर आपल्याकडे (मराठी by सुबोध खरे
माझ्या माहितीतील एक रेल्वे
हायला गंमतच
थोडा वेगळा विचार मांडतो ...
In reply to हायला गंमतच by कर्नलतपस्वी
कोरडवाहू शेतीतून गुलाबाचं उत्पन्न
बरोबर. उत्पन्नाचे वेगवेगळे
In reply to कोरडवाहू शेतीतून गुलाबाचं उत्पन्न by कर्नलतपस्वी
@कर्नल तपस्वी: सहमत. एक वेगळा उद्योग.
In reply to कोरडवाहू शेतीतून गुलाबाचं उत्पन्न by कर्नलतपस्वी
वाह!
In reply to @कर्नल तपस्वी: सहमत. एक वेगळा उद्योग. by चित्रगुप्त
आपला पोरगा फावल्या वेळात टीव्ही बघत लोळण्यापेक्षा ..
In reply to @कर्नल तपस्वी: सहमत. एक वेगळा उद्योग. by चित्रगुप्त
"आम्ही पैसे देतो आहे" ही मुजोरी.
स्थावर मालमत्ता
स्थावर मालमत्ता हा मुद्दा एकदम बरोबर आहे ...
In reply to स्थावर मालमत्ता by निनाद
सहमत.
In reply to स्थावर मालमत्ता हा मुद्दा एकदम बरोबर आहे ... by अमर विश्वास
अनेकांनी आर्थिक नियोजनाचे
नात्यांच्या नियोजनाचा विचारही
In reply to अनेकांनी आर्थिक नियोजनाचे by अहिरावण
>>>नात्यांच्या नियोजनाचा
In reply to नात्यांच्या नियोजनाचा विचारही by राघव
काही प्रसिद्ध लोकांची चरित्रे
In reply to नात्यांच्या नियोजनाचा विचारही by राघव
आर्थिक समृद्धीच्या जोरावर
सहमत आहे. परंतु अशांच्या
In reply to आर्थिक समृद्धीच्या जोरावर by अमर विश्वास
वादग्रस्त मुद्दा आहे
In reply to सहमत आहे. परंतु अशांच्या by अहिरावण
सहमत आहे. वृद्धाश्रम ही ठीकच
In reply to वादग्रस्त मुद्दा आहे by राजेंद्र मेहेंदळे
@अहिरावणः अक्षरशः खरे आहे.
In reply to सहमत आहे. वृद्धाश्रम ही ठीकच by अहिरावण
नात्यांचे नियोजन....
>>प्रारब्ध
In reply to नात्यांचे नियोजन.... by कर्नलतपस्वी
मी काय म्हणतो,
गाडीला चाक असले की हवी तिथे
In reply to मी काय म्हणतो, by वामन देशमुख
आर्थिक नियोजनापासून ते पार
कशाला हा नकारात्मक सूर लागतोय
कर्ज
- नविन नोकरी लागली आहे? - लगेच स्थावर गुंतवणूक करा. एका क्षणाचा ही व्यय करू नका.
- नविन प्रकल्प कुठे येत आहेत याचा सदैव मागोवा घ्या.
- शक्यतो नविन प्रकल्प येण्या आधी जमिनी घेता आल्यास उत्तम.
- इतक्या दूर काय कामाची जमिन वगैरे विचार करू नका. दूर जमिनी असली तरी भाव वाढत राहतो.
- जमिनीचा नक्की भाव काय आहे हे सदैव तपासत रहा.
- जेथे जमिन घ्यायची आहे तेथे जमिन विकायची आहे असे सांगून भाव तपासा - खरा भाव समोर येईल.
- जमिन घेतांना वकिल आणि कागदपत्रे सर्व तपासून घेणे आवश्यक आहे.
- दुकान घेणे उत्तम असते - शक्य तो मोक्यावरचे दुकान घ्या.
- दुकान जेव्हढ्या मोठ्या रस्त्यावर घेता येइल तेथे घ्या.
- दुकान जेव्हढे मोठे घेता येइल तेवढे मोठे घ्या.
- चांगले सीए आणि वकील यांची मदत सदैव घ्या, त्यांना हाताशी ठेवा
- जमिनी शोधणारे एजंटसच्या कायम संपर्कात रहा.
असे तुम्ही कदाचित केले ही असेल. आणि आज कर्जात बुडाल्याचा त्रास होत असेल. पण स्थावर नावावर असेल तर येत्या काळात त्यातून बाहेर पडाल याची खात्री बाळगा.चांगला सल्ला. धन्यवाद निनाद!
In reply to कर्ज by निनाद
धन्यवाद निनाद सर.
In reply to कर्ज by निनाद
अजून एक फार दुर्लक्षित
In reply to कर्ज by निनाद
तुमचा अकाउंटंट
In reply to अजून एक फार दुर्लक्षित by निनाद
ट्रस्ट हा इच्छापत्र (will)
ट्रस्ट हा इच्छापत्र (will) ला
In reply to ट्रस्ट हा इच्छापत्र (will) by अमर विश्वास
तुमच्याच दोन कॉमेंट्स एकत्र
गलतीसे मिष्टेक
In reply to तुमच्याच दोन कॉमेंट्स एकत्र by अमर विश्वास