आर्थिक नियोजनामागील विचार!
आणि ती वेळ न साधल्यानं आपण किती वेळ वाया घालवला हे आठवून आज फार फार खेद वाटतो.अशा प्रकारचा 'फार फार खेद' करणे याला काहीही अर्थ नाही. संपत्ती वाढवण्याच्या दृष्टीने जरी तो वेळ 'वाया घालवला' असे वाटत असले तरी त्या काळात अनेक सुंदर गोष्टी जीवनात घडल्या असतील, त्यांच्या स्मृतीत रमणे उत्तम. नशिबात असेल तेच, तेवढेच आणि तेंव्हाच मिळते, हे मला स्वतःच्या अनुभवातून उमगले आहे.
अर्थकारणातलं आपल्याला काही कळत नाही" हे भूषण नसून विदारक आहे हे समजायला हवं. हे असले विचार सर्वस्वी अकारण, अहितकारक आहेत-- जे आपल्याला कळत/आवडत नाही, त्या वाटेला लागण्याऐवजी आपण आपल्या आवडत्या गोष्टींचा पाठपुरावा करत राहिलो तर आपले जीवन सफळ, परिपूर्ण, समाधानकारक, सार्थक होते असा माझा अनुभव आहे. आपण आपल्या आवडीचे कार्य निष्ठेने करत आहोत, हे समाधान फार मोठे असते. पैसा नशिबाने येत-जात असतो. ज्यांना अर्थकारणातले काही कळत नाही, त्यांनी अजिबात वाईट वाटून घेऊ नये. तो आपला मार्ग नव्हे हे समजून घ्यावे. त्यात विदारक, अहितकारक असे काही नाही. -- अर्थात हे माझे अनुभवातून आलेले शहाणपण आहे. इतरांचे अनुभव वेगळे असू शकतात.
In reply to या बाबतीतला माझा अनुभव by चित्रगुप्त
जन्मभर विविध छंदांचा पाठपुरावा लहानपणापासून आजतागायत अव्याहतपणे करता आला.अगदीच अव्याहतपणे नाही, पण हे मी देखील करत आलोय आणि त्यातला आनंद नेहमीच उल्हसित करून जातो हे अगदीच खरे आहे! :-)
अशा प्रकारचा 'फार फार खेद' करणे याला काहीही अर्थ नाही. संपत्ती वाढवण्याच्या दृष्टीने जरी तो वेळ 'वाया घालवला' असे वाटत असले तरी त्या काळात अनेक सुंदर गोष्टी जीवनात घडल्या असतील, त्यांच्या स्मृतीत रमणे उत्तम. नशिबात असेल तेच, तेवढेच आणि तेंव्हाच मिळते, हे मला स्वतःच्या अनुभवातून उमगले आहे.नंतर खेद करण्यात अर्थ नाही हे जरी खरे असले तरी, पैशाचे सोंग आणता येत नाही. त्यावेळेस योग्य गुंतवणूक केलेली असती तर घरी देखील हातभार लावता आला असता, वडिलांवर असलेला भार जरा हलका करता आला असता, इतकेच म्हणायचे होते.
ज्यांना अर्थकारणातले काही कळत नाही, त्यांनी अजिबात वाईट वाटून घेऊ नये. तो आपला मार्ग नव्हे हे समजून घ्यावे. त्यात विदारक, अहितकारक असे काही नाही.:-) माझे विधान सरसकट नाही, तसे सूचीत झाले असल्यास क्षमस्व. विदारक आणि अहितकारक हे त्यांच्यासाठी आहे की जे योग्य प्रयत्न करण्याआधीच ठरवून बसतात की "आपल्याला काही समजत नाही." एखाद्या गोष्टीचा बागुलबुवा करून घेणे हे अहितकारकच आहे. हे मी स्वतः केलेले आहे. पण जेव्हा समजून घ्यायला घेऊन बसलो तर लक्षात आले की, हे फार काही रॉकेट सायन्स नाही. काही बेसिक गोष्टी समजून घ्यायच्या, डोके लावायचे आणि प्रयत्न करून पहायचे इतकेच केले.. त्यातूनही बरेच काही करता आले. अजूनही स्टॅटिस्टिक्सच्या वाट्याला जाऊन सगळे समजून घेणे झालेले नाही.. पण मनावर घेतले तर तेही काही अशक्य वगैरे नाही. एखाद्या गोष्टीची गरज नसणे वेगळे आणि एखाद्या बागुलबुव्यापोटी त्या गोष्टीच्या वाटेलाच न जाणे वेगळे, इतकेच. पुनःश्च धन्यवाद!
In reply to @कर्नल तपस्वी: नेमके सांगितलेत. by चित्रगुप्त
In reply to लहानपणी वर्तनाचे संस्कार by कंजूस
In reply to +१ by राघव
In reply to आडात असेल तर... by कर्नलतपस्वी
In reply to आर्थिक नियोजन .. म्हणजे by अमर विश्वास
In reply to उत्तम धागा!! by राजेंद्र मेहेंदळे
..वगैरे आपल्यासाठी नाही.हे खूप आवडले. आपल्याला काय करायचे किंवा काय झेपेल ते आपण ठरवायला पाहिजे. जिकडे स्वतः लक्ष घालता येईल तितपतच करावे, हे अगदी योग्य आहे!
In reply to उत्तम धागा!! by राजेंद्र मेहेंदळे
In reply to १) The sad truth is that we by सुबोध खरे
In reply to १) The sad truth is that we by सुबोध खरे
In reply to एकंदर आपल्याकडे (मराठी by सुबोध खरे
In reply to हायला गंमतच by कर्नलतपस्वी
In reply to कोरडवाहू शेतीतून गुलाबाचं उत्पन्न by कर्नलतपस्वी
In reply to कोरडवाहू शेतीतून गुलाबाचं उत्पन्न by कर्नलतपस्वी
मराठी घराघरात अर्थीक नियोजन या विषयावर संस्कार होताना दिसतात. फक्त म्युच्युअल फंड, शेअर मार्केट म्हणजेच अर्थीक नियोजन असा अर्थ मुळीच नसावा एवढेच माझे म्हणणे.आमुचेही हेचि म्हणणे. माझ्या अमेरिकेतल्या मुलाने काही काळ एक उद्योग करून बघितला होता (सध्या त्याला 'पिकलबॉल' खेळण्याची गोडी लागल्याने तो बंद केला आहे): अॅमेझॉन वरून (किंवा अन्य मोठमोठ्या स्टोअर्स वगैरे मधून) घेतलेल्या ज्या वस्तू परत केल्या जातात, त्या साठवण्याची भलीमोठी गोदामे असतात. अधून मधून त्या सामानाचा लिलाव केला जातो. अल्प किंमतीत ट्रकभर सामान मिळते ते आणायचे. घरी त्यातली प्रत्येक वस्तू वेगवेगळी करून अॅमेझॉन वर तिची जी किंमत असेल त्याच्या ५०-६० टक्के किंमतीत रोख पैसे घेऊन विकायची (फेसबुक मार्फत) यात बराच नफा मिळतो. मुख्य मेहनत म्हणजे भाड्याची ट्रक घेऊन सामान घरी आणून ते स्वतः उतरवणे आणि गराजमधे व्यवस्थित लावून ठेवणे. नंतर हळू हळू विकले जाते. त्यातल्या काही वस्तू घरी वापरण्यासारख्याही असतात. यातून एक वेगळ्याच प्रकारचे व्यवहारचातुर्यही विकसित होते. गंमत म्हणजे जे काही थोडेसे भारतीय वस्तू घ्यायला येतात त्यापैकी काहीजण आणखी घासाघीस करतात किंवा सामान घरी घेऊन गेल्यावर त्यात अमुक खोट आहे, सबब सामान परत घेऊन जा आणि पैसे परत करा, नाहीतर वाईट रिव्हू देऊ अशी धमकी देतात. अशा अनुभवांमुळे भारतीय व्यक्तीने फोनवर पृच्छा केली तर वस्तू विकली गेली असे सांगायला सुरुवात केली होती. त्यामानाने अमेरिकन लोक खूप समजदार असल्याचे दिसून येते. वस्तूत काही कमतरता असेल तर स्वतः ठीक करून घेतात. मी घरी असल्याने बरेचदा मीच त्या वस्तू काढून द्यायचो, तेंव्हा इथेच आधी उघडून, तपासून खात्री करून घ्या असे संगायचो. सामान गोदामातून आणताना त्यात काय काय आहे ते सगळे कळत नाही. मोठमोठे सोफे, पलंग, ट्रेड मिल, गाद्या अश्या सामानापासून किरकोळ वस्तूंपर्यंत काहीही असू शकते. परंतु नुकसान मात्र होत नाही. (आपला पोरगा फावल्या वेळात टीव्ही बघत लोळण्यापेक्षा काहीतरी धडपड, उद्योग करतो किंवा खेळात प्राविण्य मिळवतो आहे, हे आमचे समाधान)
In reply to @कर्नल तपस्वी: सहमत. एक वेगळा उद्योग. by चित्रगुप्त
अॅमेझॉन वरून (किंवा अन्य मोठमोठ्या स्टोअर्स वगैरे मधून) घेतलेल्या ज्या वस्तू परत केल्या जातात, त्या साठवण्याची भलीमोठी गोदामे असतात. अधून मधून त्या सामानाचा लिलाव केला जातो. अल्प किंमतीत ट्रकभर सामान मिळते ते आणायचे. घरी त्यातली प्रत्येक वस्तू वेगवेगळी करून अॅमेझॉन वर तिची जी किंमत असेल त्याच्या ५०-६० टक्के किंमतीत रोख पैसे घेऊन विकायची (फेसबुक मार्फत) यात बराच नफा मिळतो.भारी कल्पना आहे! आवडली! :-)
यामानाने अमेरिकन लोक खूप समजदार असल्याचे दिसून येते.होय, हे बऱ्याच लोकांकडून ऐकलंय. आपल्याकडे मुख्यतः फुकट ते पौष्टिक अशी मानसिकता दिसते! त्यातूनच ओरबाडून घेण्याची वृत्ती आलेली आहे. असो.
In reply to @कर्नल तपस्वी: सहमत. एक वेगळा उद्योग. by चित्रगुप्त
आपल्याकडे मुख्यतः फुकट ते पौष्टिक अशी मानसिकता दिसते!-- त्याबरोबरच अर्ध्या किंमतीत सामान मिळत असूनही एकादा स्क्रू निखळलेला असणे एवढ्या क्षुल्लक कारणावरून "आम्ही पैसे देतो आहे" अशी मुजोरी दाखवत 'ती परत घेऊन जा आणि पैसे परत करा नाहीतर खराब रिव्हू देऊ' हे आणखी वरून.
In reply to स्थावर मालमत्ता by निनाद
In reply to स्थावर मालमत्ता हा मुद्दा एकदम बरोबर आहे ... by अमर विश्वास
In reply to अनेकांनी आर्थिक नियोजनाचे by अहिरावण
कितीही म्हटलं तरी आपलं कुणी आपल्यासोबत आहे ही भावनाच खूप जणांना दिलासा देणारी असते. दोन उदा: १. एक म्हातारी, जन्मभर जॉब केला. तोवर तोंडाच्या पट्ट्यानं सगळ्या जवळच्यांना दुखवून ठेवलं. ज्या मुलानं तिची जबाबदारी घेतली तो नेमका लवकर गेला. बाकीच्या दोघांनी हात वर केले. अक्षरशः १ महिनासुद्धा कुणी ठेवून घ्यायला तयार नाही अशी परिस्थिती. त्यातच ती गेली. २. एक म्हातारी, विधुराशी लग्न केलं. जन्मभर जॉब केला. उभी हयात लोकं जोडण्यात गेलीत. प्रचंड भोग भोगलेत पण मनातले आणि तोंडातले मार्दव कधी कमी झाले नाही. आज एक सावत्र मुलगी आणि एक सख्खी मुलगी आहे असे लोकांना सांगीतले तरी खोटं वाटेल इतकं प्रेम आहे. दोन्ही मुली स्वतःहून आपल्याकडे घेऊन जाण्यासाठी भांडतात. नातवंडांना आजीला बघीतलं की गगन ठेंगणं होतं. आनंद ओसंडून वाहणारं घर आहे. पुन्हा म्हणतो, समजूतदारपणा नसलेल्या व्यक्तीचा सहवास, मग ती व्यक्ती कोणत्याही पिढीतील असो, त्रासदायकच असतो.जीभेवर गुळाची ढेप, मनांत आशावादी आनंद, सगळ्यांवर मनापासून प्रेम करण्याची वृत्ती, स्वतःच्या शरीराच्या मर्यादांची जाणीव ठेवूनही शक्यतो स्वतःची कामं स्वतः करण्याची हातोटी, कुणी मागीतलाच तर आपुलकीनं पण निर्लिप्तपणे सल्ला देण्याचं कसब आणि या सर्व गुणांच्या जोडीला निग्रही व्यक्तिमत्व असूनही असलेला गोड विनय...! अहो इतके गुण आहेत ना या वर उल्लेखलेल्या म्हातारीत की जगावं कसं याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणता येईल. म्हटलं तर सगळ्यांत आहे म्हटलं तर पूर्ण अलिप्त! मी स्वतः या आजींना मागच्या १० वर्षांपासून बघतोय.. आजतागायत एकदासुद्धा कधी वैताग, नैराश्य, चिडचिड असं झालेलं बघीतलं नाही मी त्यांचं.. अगदी त्यांची स्वतःची तब्येत खराब असतांना देखील! त्यांच्याकडे बघून असं वाटतं की वृद्धाश्रम माणसाच्या मनातच असतो कुठेतरी. आपल्यावर कोण प्रेम करतं यापेक्षा, आपण सगळ्यांचं अजून किती प्रेमानं केलं पाहिजे या दृष्टीकोनातून आयुष्य घडवणं सोपं नाही.. तेही लाचारीतून नव्हे, तर मनापासून! आपला स्वभाव बदलणं आपल्याच हातात असतं.. पण स्वतःकडे त्यासाठी डोळसपणे बघायला हवं.
In reply to नात्यांच्या नियोजनाचा विचारही by राघव
In reply to नात्यांच्या नियोजनाचा विचारही by राघव
In reply to आर्थिक समृद्धीच्या जोरावर by अमर विश्वास
In reply to सहमत आहे. परंतु अशांच्या by अहिरावण
In reply to वादग्रस्त मुद्दा आहे by राजेंद्र मेहेंदळे
त्याचबरोबर नवी पिढी नात्यांचे नियोजन पण छान करते, नात्यांची ओझी वागवत नाहीत. कित्येक तर नवरा बायको नाते सुद्धा फटकन तोडून टाकते. आर्थिक समृद्धी असल्याने नात्यांची गरजच वाटत नाही.फक्त कीव अशी वाटते की असे लोक (वर तुम्ही दिलेली चार उदाहरणे + विविध शेकडो उदाहरणे) यांचे खोल थिजलेले डोळे आणि हताश भाव पाहीले की कीव वाटते की एवढी सगळी समॄद्धी असूनही म्हातारपणी फक्त मरणाची वाट पहात असतात. वादग्रस्त मुद्दा आहे हे मान्य. कदाचित मला नेमके काय खटकत आहे आणि सांगावेसे वाटत आहे त्यासाठी योग्य वाक्यरचना करता येत नाही असे दिसते. दोष माझ्या भाषाअज्ञानाचा असावा असे वाटते
In reply to सहमत आहे. वृद्धाश्रम ही ठीकच by अहिरावण
यांचे खोल थिजलेले डोळे आणि हताश भाव पाहीले की कीव वाटते की एवढी सगळी समॄद्धी असूनही म्हातारपणी फक्त मरणाची वाट पहात असतात.गेल्या वर्षी पुण्यातील एका महागड्या वृद्धाश्रमात (दरमहा ४५,००० + औषधे वगैरे) माझा मोठा भाऊ (वय ९०) आणि दुसर्या तशाच एकात माझे गुरुतुल्य चित्रकार मित्र (वय ९०) यांना भेटायला जाऊन आलो. मुळात दोघेही अत्यंत आनंदी, उद्योगी पण आता 'थिजलेले डोळे आणि हाताश भाव'... त्यांच्याहूनही वाईट अवस्थेतले भकास, निराश, निव्वळ मरणाची वाट बघत असलेले अनेक लोक तिथे बघून प्रचंड धक्का बसला होता. काही जणांचे तिथे हॅप्पी बड्डे वगैरे मनवले जात होते, नातेवाईक आलेले होते पण खुद्द त्या वृद्धांच्या चेहर्यावरून त्यातले वैयर्थ स्पष्ट दिसून येत होते. माझे चित्रकार मित्र त्यापूर्वी एकटे इंदुरात रहात होते, शेजारी पाजारी मदत करायचे, डबा पोचवायचे. पण पुण्यात रहणार्या मुलाने बोलावून घेतले आणि काही महिन्यांनी वृद्धाश्रमात ठेवले. त्यांना कुठून मुलाकडे आलो असे वाटत होते. (आता दोघेही निवर्तले आणि सुटका झाली) -- वादग्रस्त मुद्दा आहे खरा, आणि कुणाच्या नशीबात कसा शेवट लिहीलेला आहे, ते अगम्य असते. नको ते दीर्घायुष्य. सगळे काही ठीक असतानाच उचल रे देवा, असे वाटत असूनही नव्वद-शंभर वर्षे जगलेले आमच्या कुटुंबात आहेत.
In reply to नात्यांचे नियोजन.... by कर्नलतपस्वी
In reply to मी काय म्हणतो, by वामन देशमुख
कुणास स्वतःच्या अनुभवातून काही आणिक सांगावेसे वाटले तर जरूर लिहावे.माझ्या मित्राचे वडील व्यावसायिक होते. त्यांनी त्या काळात मला सल्ला दिला होता - 'तुला आयुष्यात पुढे जायचे असेल तर घेता येईल तेव्हढे कर्ज घे आणि जमिनीत गुंतव - तू त्या शिवाय आयुष्यात प्रगति करणार नाहीस' अर्थात तरुण वय आणि गुंतवणुकीचा दृष्टिकोनच नसल्याने हा सल्ला मी ऐकला नव्हता. पण माझ्या एका मित्राने मात्र तो ऐकला होता. आणि त्याने त्या काळात प्रचंड धडपड करून वडिलांशी डिल करत-करत त्यांना अगदी मोक्यावरचे एक दुकान घ्यायला लावले होते. वडिल नोकरी करणारे अणि मध्यमवर्गिय. त्याकाळात हे फार मोठे कर्ज होते! कर्ज असल्याने त्याने सुरुवाती पासून नोकरी आणि शर्ट्स विकण्याचा जोड व्यवसाय केला. या मित्राने केलेली ही अगदी तरुण वयातली गुंतवणूक या सार्या कुटुंबाला पुढे खूप हात देऊन गेली. त्यांची आर्थिक ओढाताण होत होती पण त्या काळात अवाढव्य वाटणारे लाखांचे कर्ज पुढे जेमेतम सात ते नऊ वर्षात अगदीच आवाक्यातले दिसू लागले होते. दुकानाची किंमत दहा वर्षात दुपटीच्या पुढे गेली. त्यावर बँक मॅनेजर अजून कर्ज घ्या म्हणू लागला. मोक्यावर असल्याने दुकान सदैव भाड्याने जायचे. एका काळात अचानक नोकरी गेल्यावर सहा महिने या भाड्याची मदत झाली होती. या अनुभवाने पुढे जाऊन त्याने अजून दोन दुकाने घेतली. पुढे अनेक जमिनी घेतल्या आणि घेतच राहिला. कर्जे कशी घ्यायची यासाठी अनेक सीए त्याला मदत करतात. अनेक वकिलांची सल्ला-मसलत चाललेली असते. आणि आता त्याचा तो प्रमुख व्यवसाय बनला आहे. कर्ज घेतांना उपयोगी येते म्हणून टाईमपास म्हणून नोकरी करतो. आजही जमिनी घेतोच आहे आणि किमान दहा कोटींचे कर्ज तो कायम 'राखून' असतो! अर्थात उशिराने शहाणपण आल्यावर आम्हीही पुढे त्याच मार्गाने गेलो - पण शेवटी गेलेला काळ भरून काढणे शक्य नसते. त्यामुळे त्याच्या येव्हढे प्रचंड मोठे नेटवर्क सर्कल आणि त्या मार्फत मिळणारी मोक्यांच्या जमिनींची माहिती योग्य वेळी हातात येणे शक्य होत नाही. आता हा मित्र अनेक जमिनींचा मालक झाला असल्याने राजकिय व्यक्तिमत्वे त्याच्याशी जवळीक साधत राहतात. त्याला आपल्या प्रकल्पात ओढायचा प्रयत्न करतात - आणि माझा मित्र अजून श्रीमंत होत राहतो! सांगण्याचा उद्देश-
- नविन नोकरी लागली आहे? - लगेच स्थावर गुंतवणूक करा. एका क्षणाचा ही व्यय करू नका.
- नविन प्रकल्प कुठे येत आहेत याचा सदैव मागोवा घ्या.
- शक्यतो नविन प्रकल्प येण्या आधी जमिनी घेता आल्यास उत्तम.
- इतक्या दूर काय कामाची जमिन वगैरे विचार करू नका. दूर जमिनी असली तरी भाव वाढत राहतो.
- जमिनीचा नक्की भाव काय आहे हे सदैव तपासत रहा.
- जेथे जमिन घ्यायची आहे तेथे जमिन विकायची आहे असे सांगून भाव तपासा - खरा भाव समोर येईल.
- जमिन घेतांना वकिल आणि कागदपत्रे सर्व तपासून घेणे आवश्यक आहे.
- दुकान घेणे उत्तम असते - शक्य तो मोक्यावरचे दुकान घ्या.
- दुकान जेव्हढ्या मोठ्या रस्त्यावर घेता येइल तेथे घ्या.
- दुकान जेव्हढे मोठे घेता येइल तेवढे मोठे घ्या.
- चांगले सीए आणि वकील यांची मदत सदैव घ्या, त्यांना हाताशी ठेवा
- जमिनी शोधणारे एजंटसच्या कायम संपर्कात रहा.
In reply to कर्ज by निनाद
In reply to कर्ज by निनाद
In reply to कर्ज by निनाद
In reply to अजून एक फार दुर्लक्षित by निनाद
In reply to ट्रस्ट हा इच्छापत्र (will) by अमर विश्वास
In reply to तुमच्याच दोन कॉमेंट्स एकत्र by अमर विश्वास
छान लेख.