मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निरोप

चलत मुसाफिर · · जे न देखे रवी...
काव्यरस
रस्त्यावरून या तू चालू नकोस आता निक्षून ती म्हणाली हातात हात होता (आला सुवास तोच ती बैसता समीप पण साठवू कसा तो मन क्षुब्ध, हात कंप) हळवे जुने तमाम तू आठवू नको ते कसलाच अर्थ नाही उरला न जीव तेथे नाही मी राहिले ती तूही आता निराळा वेड्या मनास लागे वेडा निरर्थ चाळा मैत्री असेल अपुली भेटू अधूमधून नजरेस मात्र ठेव अपुल्या जरा जपून नजरेत ना दिसू दे ती ओल पावसाची एकांत तो मनस्वी ती रात्र मीलनाची वळुनी न पाहताही तत्काळ ती निघाली मी आर्त, स्तब्ध, सुन्न दाटून रात्र आली --- झाला बराच वेळ आहे इथे बसून तो गंध ओळखीचा आहे इथे अजून (टीप: आम्हाला इतपतच काव्य येते)

वाचने 7129 वाचनखूण प्रतिक्रिया 17

कर्नलतपस्वी 02/07/2023 - 22:15
कदाचित असाही विचार करत असेल. काय कुणाचा भरवसा द्यावा. झाला बराच वेळ आहे इथे बसून विचार करी मनासी आणू कोयता कुठून संभाळ गं बाई...

In reply to by चलत मुसाफिर

राजेंद्र मेहेंदळे 03/07/2023 - 17:26
प्रेमभंगाचे दुखः दारुत बुडविणारे साठोत्तरी कालखंडातले देवदास कुठे अन, "तू हां कर या ना कर तू है मेरी किरन" वाले आजचे प्रेमवीर कुठे. गटारातील घाणीत किड्यांचा बुजबुजाट पेठांच्या गल्ल्यात प्रेमवीरांचा सुळसुळाट

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

साठ-सत्तरचा दशकातले दिवाणे "दिल का भवर करे पुकार" या स्थितीतून 'मेरे टूटे हुवे दिलसे" या अवस्थेत गेले की (दारू न पिणारे -) मजसारखे दीवाणे 'मुकेश के दर्दभरे नगमे' ऐकत रात्री अंधारात एकटे बसलेले असतात. घरच्यांना कळत नाही हे येडं अंधारात एकटं बसून काय करतं. .

चौथा कोनाडा 06/07/2023 - 17:08
व्वा .... खुप सुंदर .... ! एक नंबर ! ❤ ❤️ ❤️ ❤️

अत्रुप्त आत्मा 06/07/2023 - 20:18
झाला बराच वेळ आहे इथे बसून तो गंध ओळखीचा आहे इथे अजून
छान

चलत मुसाफिर 07/07/2023 - 07:22
आम्ही फक्त एक उत्साही कवी आहोत. प्रतिसादांतून प्रोत्साहन मिळताना पाहून आनंद झाला. मिपाकरांना धन्यवाद

राघव 10/07/2023 - 14:00
चांगली रचना! लिहित रहावे! पुलेशु. :-)
हातातुनी सुटोनी जातात हात तेव्हा वेढ्यात अंगठीच्या अडकून काय राही? मैत्रातले वसंत उमलून संपले की कुठलाच प्राणपक्षी बहरून गात नाही कवयित्रीचे पूर्ण नाव विसरलो. आडनाव भट की काहीतरी आहे. कवयित्री मुंबईत जर्मन दूतावासात की कल्चरल सेंटर मध्ये काम करतात हेही अंधुकसे आठवते. ग्रेसमय कविता आहेत पण खूप सुंदर वाटतात.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

चलत मुसाफिर 10/07/2023 - 18:49
ओळी आवडल्या. कवयित्री कोण मलाही कल्पना नाही. पण एकूणच माझे काव्य- साहित्य क्षेत्रातील ज्ञान जेमतेम आहे. लिहिताना मी वृत्त वगैरेवर काही लक्ष दिले नव्हते कारण तितकी क्षमताच नाही. मनात आले ते लिहिले. प्रतिसादाबद्दल सप्रेम धन्यवाद

सौन्दर्य 31/07/2023 - 18:39
@ चलत मुसाफीर - मी ही कविता आधी वाचली नव्हती पण तुम्ही माझ्या कवितेवर जी प्रतिक्रिया दिली त्यावरून ही कविता वाचावीशी वाटली. प्रियकराच्या मनातील भावना तुम्ही छानच मांडल्या आहेत. एकुणात कविता सुंदरच. असेच लिहीत रहा.