निरोप
लेखनविषय:
काव्यरस
रस्त्यावरून या तू
चालू नकोस आता
निक्षून ती म्हणाली
हातात हात होता
(आला सुवास तोच
ती बैसता समीप
पण साठवू कसा तो
मन क्षुब्ध, हात कंप)
हळवे जुने तमाम
तू आठवू नको ते
कसलाच अर्थ नाही
उरला न जीव तेथे
नाही मी राहिले ती
तूही आता निराळा
वेड्या मनास लागे
वेडा निरर्थ चाळा
मैत्री असेल अपुली
भेटू अधूमधून
नजरेस मात्र ठेव
अपुल्या जरा जपून
नजरेत ना दिसू दे
ती ओल पावसाची
एकांत तो मनस्वी
ती रात्र मीलनाची
वळुनी न पाहताही
तत्काळ ती निघाली
मी आर्त, स्तब्ध, सुन्न
दाटून रात्र आली
---
झाला बराच वेळ
आहे इथे बसून
तो गंध ओळखीचा
आहे इथे अजून
(टीप: आम्हाला इतपतच काव्य येते)
वाचने
7129
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
कदाचित असाही विचार करत असेल. काय कुणाचा भरवसा द्यावा.
झाला बराच वेळ
आहे इथे बसून
विचार करी मनासी
आणू कोयता कुठून
संभाळ गं बाई...
In reply to ल ई डें ज र हाये भौ... by कर्नलतपस्वी
कटू सत्य
In reply to हो by चलत मुसाफिर
प्रेमभंगाचे दुखः दारुत बुडविणारे साठोत्तरी कालखंडातले देवदास कुठे अन, "तू हां कर या ना कर तू है मेरी किरन" वाले आजचे प्रेमवीर कुठे.
गटारातील घाणीत
किड्यांचा बुजबुजाट
पेठांच्या गल्ल्यात
प्रेमवीरांचा सुळसुळाट
In reply to बाब्बो!! अंगावर काटा आला. by राजेंद्र मेहेंदळे
दुर्दैव
In reply to बाब्बो!! अंगावर काटा आला. by राजेंद्र मेहेंदळे
साठ-सत्तरचा दशकातले दिवाणे "दिल का भवर करे पुकार" या स्थितीतून 'मेरे टूटे हुवे दिलसे" या अवस्थेत गेले की (दारू न पिणारे -) मजसारखे दीवाणे 'मुकेश के दर्दभरे नगमे' ऐकत रात्री अंधारात एकटे बसलेले असतात. घरच्यांना कळत नाही हे येडं अंधारात एकटं बसून काय करतं.


व्वा .... खुप सुंदर .... ! एक नंबर !
❤
❤️
❤️
❤️
झाला बराच वेळ आहे इथे बसून तो गंध ओळखीचा आहे इथे अजूनछान
आम्ही फक्त एक उत्साही कवी आहोत. प्रतिसादांतून प्रोत्साहन मिळताना पाहून आनंद झाला. मिपाकरांना धन्यवाद
चांगली रचना! लिहित रहावे! पुलेशु. :-)
हातातुनी सुटोनी
जातात हात तेव्हा
वेढ्यात अंगठीच्या
अडकून काय राही?
मैत्रातले वसंत
उमलून संपले की
कुठलाच प्राणपक्षी
बहरून गात नाही
कवयित्रीचे पूर्ण नाव विसरलो. आडनाव भट की काहीतरी आहे. कवयित्री मुंबईत जर्मन दूतावासात की कल्चरल सेंटर मध्ये काम करतात हेही अंधुकसे आठवते. ग्रेसमय कविता आहेत पण खूप सुंदर वाटतात.
In reply to या कवितेवरून आणि वृत्तावरून एका कवितेची आठवण झाली. by हणमंतअण्णा शंक…
ओळी आवडल्या. कवयित्री कोण मलाही कल्पना नाही. पण एकूणच माझे काव्य- साहित्य क्षेत्रातील ज्ञान जेमतेम आहे.
लिहिताना मी वृत्त वगैरेवर काही लक्ष दिले नव्हते कारण तितकी क्षमताच नाही. मनात आले ते लिहिले.
प्रतिसादाबद्दल सप्रेम धन्यवाद
छान.. छानच
In reply to छान.. छानच by सागरसाथी
प्रोत्साहन दिल्याबद्दल.
@ चलत मुसाफीर -
मी ही कविता आधी वाचली नव्हती पण तुम्ही माझ्या कवितेवर जी प्रतिक्रिया दिली त्यावरून ही कविता वाचावीशी वाटली. प्रियकराच्या मनातील भावना तुम्ही छानच मांडल्या आहेत. एकुणात कविता सुंदरच. असेच लिहीत रहा.
In reply to छानच कविता by सौन्दर्य
कविता वाचून प्रतिसाद दिल्याबद्दल
In reply to छानच कविता by सौन्दर्य
कविता वाचून प्रतिसाद दिल्याबद्दल
ल ई डें ज र हाये भौ...