त्यांनी हिंदीत का बोलावं?
In reply to महाराष्ट्रात काहीच समस्या by श्रीगुरुजी
महाराष्ट्रात काहीच समस्या नाही. येथे मराठी भाषिक सुद्धा हिंदीत बोलून आपली राष्ट्रीय पातळी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. हिंदी ही राष्ट्रभाषा (!) आहे हे मराठी भाषिकच उच्चरवाने सांगतात.ह्या विधानानुसार महाराष्ट्रात यासूचनेची गरजच नाहीये.
अमित शहांच्या सूचनेचे महाराष्ट्रात जोरदार स्वागत होईल.अनेक मराठी जण नोकरीनिमित्त चैन्नई आणि इतर दक्षिण भारतीय शहरांत वास्तव्य करुन आहेत. तिथे त्यांची स्थानिक पातळीवर जी कुचंबणा होते ती टळेल व त्याकरिताच दक्षिण भारतात अंमलबजावणी व्हावी म्हणून मराठी माणसे या सूचनेचे स्वागत करतील.
In reply to अमित शाह यांच्याकडून ही by वामन देशमुख
In reply to एक राष्ट्र - एक भाषा - एक संस्कृती ?? by तर्कवादी
In reply to एक राष्ट्र - एक भाषा - एक संस्कृती ?? by तर्कवादी
पण दक्षिणेकडील राज्यात हिंदीची ही डाळ शिजेल असे वाटत नाही. भाषाभिमान शिकावा तो दक्षिणेतील लोकांकडून ...हा एक नवीनच गैरसमज. मी शाळेत असताना त्या काळी सरसकट सर्व दक्षिण भारतीयांचा आपल्याकडे मद्रासी असा उल्लेख व्हायचा. तर तेव्हा मी एकदा वर्तमानपत्रात बातमी वाचली - पी टी उषा या खेळाडूने अश्विनी नचप्पा या आणि इतर दोन खेळाडूंबद्दल तक्रार केली होती की त्या तिघी कन्नडमध्ये बोलतात, उषाला कन्नड येत नाही म्हणून त्या मुद्दामच तसे करतात आणि कन्नड मध्ये त्या तिघी उषाची खिल्ली उडवितात, चेष्टा करतात, अपमान करतात अशी काहीशी ही तक्रार होती. तर सांगायचा उद्देश हा की त्या चार राज्यांमध्येही प्रत्येकाला स्वतःच्या राज्याच्या भाषेचा दुराभिमान आणि इतर राज्याच्या भाषेविषयी पराकोटीचा द्वेष आहे. कावेरी पाणी प्रश्न किंवा इतर सीमाविषयक प्रश्नांनादेखील भाषिक वादाची किनार आहे. काही असे दक्षिण भारतीय नागरिक आहेत की ज्यांना एकापेक्षा अधिक दक्षिणी भाषा येतात पण सर्वच तसे नाहीत मग संवाद साधताना अडचण येते, भांडणे होतात. इंग्रजी अस्खलित येण्याइतकेही हे विद्वान नसतात पण हिंदीला विरोध करावा म्हणून आपापसात मोडक्या तोडक्या इंग्रजीत संवाद साधतात आणि पुन्हा गैरसमज भांडणे होतातच. ८० च्या दशकांत हे जास्त होते. आताशा इंग्रजी ज्ञान वाढले असल्याने इतके गैरसमज होत नाहीत पण हिंदीला विरोध म्हणून चार राज्यां नी आपसातील संवादाची भाषा इंग्रजी ठेवली आहे. महाराष्ट्र किंवा इतर राज्यातला कोणी यांच्याकडे संवाद साधू लागला की इंग्रजी किंवा त्यांच्या स्थानिक दक्षिणी भाषेचा आग्रह धरतात. हिंदी येत असली तरी मुद्दामच बोलत नाहीत. समोरच्याची अडचण करणे हाच मुख्य उद्देश असतो. स्वतःचं भाषाप्रेम इतकंच खरं असेल तर इंग्रजीचा देखील आग्रह धरु नये.
In reply to पण दक्षिणेकडील राज्यात by चेतन सुभाष गुगळे
In reply to दक्षीण भारतीय आपल्या भाषेचा by अमरेंद्र बाहुबली
In reply to स्थानिक भाषेसोबत दुसरी भाषा by चेतन सुभाष गुगळे
In reply to ऊत्तरभारतीय म्हणजे देश नाही, by अमरेंद्र बाहुबली
In reply to ऊत्तरभारतीय म्हणजे देश नाही, by अमरेंद्र बाहुबली
In reply to दक्षिण भारतीयांच्या सोयीकरिता by चेतन सुभाष गुगळे
In reply to भारतीयांच्या सोयीकरिता by अमरेंद्र बाहुबली
In reply to दक्षिण भारतीयांच्या सोयीकरिता by चेतन सुभाष गुगळे
In reply to आमचा फक्त हिंदी लादण्यास by श्रीगुरुजी
In reply to स्थानिक भाषेसोबत दुसरी भाषा by चेतन सुभाष गुगळे
उत्तर भारतीयांना दक्षिणी भाषांचा द्वेष नाहीये. त्यांना या भाषा शिकणे अवघड जातेय कारण त्यात विरामचिह्नांचा वापरच केला जात नाही. शिवाय गरीब उत्तर भारतीयांना इंग्रजी शिकणे देखील सुलभ आणि परवडणारे नाही त्यामुळेच त्यांची अपेक्षा इतकीच आहे की स्थानिक भाषेबरोबरच त्यांना हिंदीचाही पर्याय द्यावाअमिताभ बच्चन वा ईतर अनेक गरीब उत्तर भारतीयांना मराठीपण शिकणे अवघड जाते का ? मराठीतर विरामचिह्ने आहेत ना ? आणि अनेक दाक्षिणात्य, गुजराथी आणि पंजाबी लोकसुद्धा मराठी शिकतात, त्यांच्या पुढच्या पिढ्या तर छान मराठीत बोलतात.. मग उत्तर भारतीयांनाच ते का जमू नये ? चला अमिताभला नाही जमलं गरीबीमुळे.. सोडून देऊ.. अभिषेक बच्चनचे तरी मराठीतील संभाषणाचे व्हिडिओ मिळतात का ? जसे पंजाबी अक्षय कुमारला , कन्नड असलेल्या गिरिष कर्नाडला , तमिळ शंकर महादेवनला चांगलं मराठी बोलता येतं मग हिंदी भाषिक उत्तर भारतीयांनाच का नाही येत ?
In reply to स्थानिक भाषेसोबत दुसरी भाषा by चेतन सुभाष गुगळे
- कृपया, तुम्ही ही सवलत किंवा प्राथमिकता उत्तर भारतीयांना का मिळावी ते सांगा?
- आणि इतरांनी त्याच पातळीला जायला अतिरीक्त प्रयत्न करुन आपला वेळ आणि श्रम का घालवावेत? यामुळे घटनेने (कलम १४) दिलेल्या समानतेच्या तत्वांचा भंग होत नाही का?
- जे अहिंदी भाषिकांना level playing field (मराठी प्रतिशब्द काय?) कसे मिळणार? उदा. केंद्रीय लोकसेवा आयोग level playing field सर्व उमेदवारांना मिळावी म्हणुन प्रयत्न करते.
- जर त्यांनी आपली भाषा सोडुन इतर भाषा शिकणे म्हणजे एकप्रकारे सांस्कृतिक नरसंहार नाही का?
- भारतीय इतिहासात 'तु मुसलमान बन, तु हे मिळेल' असली उदाहरणे बरीच आहेत, आता फक्त तु हिंदी भाषिक बन, तुला हे फायदे आहेत असे असेल तर मुसलमान राज्यकर्ते आणि आताचे राज्यकर्ते यात फरक काय?
In reply to श्री गुगळे आणि इतर हिंदी समर्थक यांना प्रश्न. by Trump
जेव्हा तुम्ही हिंदीचा आग्रह धरता तेव्हा उत्तर भारतीयांना (त्यात थोडेफार महाराष्टातील लोकही येतात) त्यांच्या मुळ भाषेच्या साधर्म्यामुळे एक फायदा मिळतो. त्यात पातळीला पोचायला दक्षिण भारतीयांना जास्त अभ्यास करावा लागतो, त्याला वेळ आणि श्रम लागतात.हा एकच काय तो कामाचा मुद्दा आतापर्यंत हिंदी विरोधक / इंग्रजी समर्थकांकडून आला आहे.
उत्तर भारतीयांना (त्यात थोडेफार महाराष्टातील लोकही येतात) त्यांच्या मुळ भाषेच्या साधर्म्यामुळे एक फायदा मिळतो.यात माझ्या माहितीप्रमाणे भोजपुरी मैथिली सारख्या भाषांसोबतच पंजाबी, हरियाणवी, राजस्थानी, गुजराती आणि काही प्रमाणात मराठी देखील धरावी लागेल. म्हणजे किमान दहा वेगवेगळ्या भाषिक मंडळींना हिंदी शिकायला कमी श्रम पडतील असा अंदाज आहे. आता तुम्ही अशी दुसरी कोणतीही भारतातील भाषा सूचवा जी शिकायला इतर दहा भाषिकांना (ज्यात दक्षिण भारतातील चार भाषा आल्या) कमी श्रम पडतील. आपण त्या भारतीय भाषेचा विचार करु.
आता इंग्रजीचा मुद्दा, इंग्रजी ही परदेशी भाषा असल्याने भारतात कोणालाच येत नाही. प्रत्येकाने ती स्वतः शिकणे आवश्यक आहे. त्यामुळे जो शिकण्याचे स्वतः प्रयत्न करेल.म्हणजे भारतीय असलेल्या हिंदी भाषेला द्वितीया भाषा म्हणून प्राधान्य दिले तर भारतातले विशिष्ट दहा भाषिक पुढे जातील या कारणास्तव परकीय भाषेला हा दर्जा द्यायचा? त्यापेक्षा ज्यांना एकापेक्षा अधिक भारतीय भाषा बोलता / लिहिता / वाचता येतात त्यांना अनुवादक किंवा इतर अशा स्वरुपाच्या नोकर्यांमध्ये फायदा द्यावा. हिंदी भाषिकांना दुसरी कोणतीच भाषा चांगली येत नाही या त्यांच्या कमतरतेमुळे भारतीय भाषातील अनुवादकासारख्या नोकर्यांमध्ये त्यांना स्थान नसणे हा एक नैसर्गिक तोटा त्यांना होईलच (नैसर्गिक फायदा तुम्ही मांडला आहेच. तोटा मी मांडला. कॉम्पेन्सेट झाले.)
In reply to त्यांचा एक फायदा असेल तर एक तोटा देखील आहेच की by चेतन सुभाष गुगळे
हा एकच काय तो कामाचा मुद्दा आतापर्यंत हिंदी विरोधक / इंग्रजी समर्थकांकडून आला आहे.धन्यवाद. कृपया इतर प्रश्नांचीही उत्तरे द्यावीत. ----
म्हणजे भारतीय असलेल्या हिंदी भाषेला द्वितीया भाषा म्हणून प्राधान्य दिले तर भारतातले विशिष्ट दहा भाषिक पुढे जातील या कारणास्तव परकीय भाषेला हा दर्जा द्यायचा?इतर उत्तरे आली की मी याचे उत्तर देईन.
In reply to कृपया इतर प्रश्नांचीही उत्तरे द्यावीत. by Trump
In reply to श्री गुगळे आणि इतर हिंदी समर्थक यांना प्रश्न. by Trump
In reply to तुमचे पाच प्रश्न हे एकाच एकाच by चेतन सुभाष गुगळे
In reply to चेतन by sunil kachure
आणि सरकारी सर्व व्यवहार हिंदी मधून झाला असता तर अर्ध्या भारताला हे आपला देश आहे असे वाटलेच नसते.ईग्रजीतून झाल्याने जास्त आत्मीयता वाटते? किती टक्के जनतेला? उत्स्फूर्त संवाद साधायचा म्हंटला तर या देशातील ९९ टक्के जनतेला इंग्रजीतून हे जमणार नाही. हिंदी निदान ५० टक्के जनतेला तरी नक्की जमेल.
तुम्ही मूळ मराठी नाही आहात.हा विषय च नाही.http://www.misalpav.com/comment/1138270#comment-1138270 http://www.misalpav.com/comment/1138277#comment-1138277 http://www.misalpav.com/comment/1138298#comment-1138298 http://www.misalpav.com/comment/1138304#comment-1138304 http://www.misalpav.com/comment/1138374#comment-1138374 ह्या सर्व प्रतिसादांमध्ये माझ्या मारवाडी असण्याबद्दलचा राग दिसून येत आहे स्पष्टपणे.
In reply to तुमचे पाच प्रश्न हे एकाच एकाच by चेतन सुभाष गुगळे
In reply to आपल्या मराठी भाषेच्या by श्रीगुरुजी
परंतु महाराष्ट्रात दोन असमान भाषिकांनी इंग्लिश ऐवजी हिंदीत संवाद साधावा हे मला मान्य नाही.परंतु भारतात दोन असमान भाषिकांनी हिंदी या भारतीय भाषे ऐवजी इंग्रजी या परकीय भाषेत संवाद साधावा भारताच्या भारतीयत्वाला शोभणारे नाही.
In reply to परंतु महाराष्ट्रात दोन असमान by चेतन सुभाष गुगळे
परंतु भारतात दोन असमान भाषिकांनी हिंदी या भारतीय भाषे ऐवजी इंग्रजी या परकीय भाषेत संवाद साधावा भारताच्या भारतीयत्वाला शोभणारे नाही.
हे कोणी ठरविले? जर हिंदी भारतीय भाषा असेल तर मराठी सुद्धा भारतीय भाषा आहे. मग मराठीत का संवाद साधू नये? मला हिंदी येत नाही. त्यामुळे महाराष्ट्राबाहेरील अमराठी राज्यात मी फक्त इंग्लिश मध्येच संवाद साधू शकतो.
अवांतर - भारतातील अधिकृत १५ भाषांमध्ये इंग्लिश व गोरखा या भाषांचा सुद्धा समावेश आहे. नागालँड या राज्याची अधिकृत राजभाषा इंग्लिश आहे. त्यामुळे ही भाषा सुद्धा आता घटनात्मकदृष्ट्या भारतीय भाषा आहे.
In reply to परंतु महाराष्ट्रात दोन असमान by चेतन सुभाष गुगळे
परंतु भारतात दोन असमान भाषिकांनी हिंदी या भारतीय भाषे ऐवजी इंग्रजी या परकीय भाषेत संवाद साधावा भारताच्या भारतीयत्वाला शोभणारे नाही.
आत्ता तुम्ही लिहिताय त्या मराठीत ,ज्याची बाजू लावूनधरताय त्या हिंदीत आणि तुमची मातृभाषा असलेल्या मारवाडीत अक्षरश: हजारो शब्द हे अरबी , फार्सी मूळ असलेले आहेत. ते शब्द परकीय आक्रमकांच्यामुळे भारतीय भाषांमधे शिरलेत. ते शब्द वापरणं हे भारतीयत्वाला शोभणारं आहे का? नसेल तर अरबी , फार्सीमुक्त मराठीत बोलणार का आजपासून?In reply to चेतन गुगळे by उपयोजक
In reply to आपल्या मराठी भाषेच्या by श्रीगुरुजी
आपल्या मराठी भाषेच्या कौशल्याविषयी व हेतूंविषयी माझ्या मनात अजिबात शंका नाही.धन्यवाद.
पुण्यातील अनेक जैन-मारवाडी माझे परिचित आहेत व ते सर्वजण येथे पूर्ण समरस झाले असून उत्तम मराठी बोलतात.हे का घडू शकले? कारण त्यांनी मराठी माध्यमातून १० वी पर्यंतचे शिक्षण घेतले. अर्थात याचा परिणाम म्हणून त्यांचे मराठी उत्तम झाले तरी इंग्रजी बोलणे तितकेसे अस्खलित नाही. त्यामुळे त्यांना एखाद्या अमराठी व्यक्तिसोबत इंग्रजीत संवाद साधण्यापेक्षा हिंदी सुलभ जाईल. इथे तुम्ही इंग्रजीचा आग्रह धराल तर मग ह्याच लोकांना इंग्रजी माध्यमातून १० वी पर्यंतचे शिक्षण घ्यावे लागेल परिणामस्वरुप ते इतर भाषिकांसोबत इंग्रजीतून सहज संवाद साधतील पण त्यांचे मराठी भाषा ज्ञान शून्य राहील. हिंदी ऐवजी इंग्रजीचा आग्रह दूरगामी (लॉग टर्म) विचार करता मराठीला संपविणारा ठरेल.
In reply to आपल्या मराठी भाषेच्या by चेतन सुभाष गुगळे
हिंदी ऐवजी इंग्रजीचा आग्रह दूरगामी (लॉग टर्म) विचार करता मराठीला संपविणारा ठरेल.सहमत.
In reply to तुमचे पाच प्रश्न हे एकाच एकाच by चेतन सुभाष गुगळे
यापेक्षा वेगळं उत्तर माझ्यापाशी नाहीये. निदान सध्यातरी ...धन्यवाद हे मान्य केल्याबद्दल. जरी सगळे प्रश्न एकच वाटत असले तरी ते वेगवेगळे आहेत. तुम्ही आधी दिलेले उत्तर हे मुळ प्रश्नांना बगल देऊन दिले आहे. त्यामुळे ते मी स्वीकारणार नाही. पण जर तुम्हाला मुळ मुद्द्याला उत्तर देता येत नाहीत तर बाकीच्या प्रतिवादांना अर्थ राहत नाही. --
मी टंकन श्रम घेत मराठी भाषेत इतकं लेखन करुनदेखील केवळ मी मराठी वंशाचा नाही म्हणून मला मराठी भाषेबद्दल आत्मीयता नाही असा निष्कर्ष काढला गेला व माझ्या हेतूंबाबतच शंका घेतली गेली असल्याने (हे आपल्याबद्दल नाही) इथे आता काही मांडत नाही.तुम्हाला झालेले दु:ख मला समजु शकते. जर तुम्ही स्वतःला मराठी समजत असाल तर तुम्ही नक्कीच मराठी आहात. जे तुम्हाला मराठी समजत नाही त्यांना तुम्ही 'मराठी (भाषिक) म्हणजे काय? ' असा प्रतिशश्न विचारायला हवा. --
स्वतंत्र रीत्या आपणांस ते जाणून घ्यायचे असल्यास मला दूरध्वनीवर संपर्क करु शकता.सध्या तरी त्याची आवश्यकता वाटत नाही. बघुन नंतर. धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by Trump
'मराठी (भाषिक) म्हणजे काय?
मातृभाषा मराठी असणे , घरच्या सदस्यांसोबत मराठीतून बोलले जाणे म्हणजे मराठीभाषिक असणे.In reply to Trump by उपयोजक
मातृभाषा मराठी असणे , घरच्या सदस्यांसोबत मराठीतून बोलले जाणे म्हणजे मराठीभाषिक असणे.घरात कोणती भाषा बोलली जाते - खास करुन आई वडीला व भावंडांशी ते एखाद्या व्यक्तीच्या हातात नसते. मातृभाषा याचा शब्दशः अर्थ म्हणजे आईशी वा घरात बोलली जाणारी भाषा असा घेतला जावू नये. तर प्रथम भाषा असा अर्थ घ्यायला हवा.... ज्या भाषेत तुम्ही नेहमीच विचार करता, ज्या भाषेत सहजपणे आणि उत्स्फुर्तपणे आपल्या भावना व्यक्त करता ती भाषा तुमची भाषा आहे.. जरी ती घरच्या सदस्यांसोबत बोलली जात नसेल तरीही.. मला ट्रम्प यांनी केलेली व्याख्या अधिक पटली
जर तुम्ही स्वतःला मराठी समजत असाल तर तुम्ही नक्कीच मराठी आहातघरात मराठी बोलत नसूनही अनेकजण मनाने मराठी असू शकतात.. त्यांच्या मराठी असण्यावर शंका घेतली जावू नये. जो अभिमानाने स्वतःला "मी मराठी" म्हणवतो (म्हणजे सच्चेपणाने , मनापासून - समोरची पार्टी बघून नाही) तो मराठीच. त्याउलट घरात मराठी बोलली जात असूनही बाहेर सगळीकडे हिंदी वा इंग्लिश बोलण्यातच धन्यता वा कूलनेस मानणार्यांना मी तरी मराठी समजणार नाही (अर्थात त्यांनाही स्वतःला मराठी म्हणवण्यात फारसा रस नसतोच ही गोष्ट वेगळी)
In reply to असहमत by तर्कवादी
In reply to असहमत by तर्कवादी
In reply to असहमत by तर्कवादी
In reply to घरात मराठी बोलत नाही तरी पण by अमरेंद्र बाहुबली
घरात मराठी बोलत नाही तरी पण मराठी म्हणे.ह्या मानसिकतेमुळे तुम्ही घरात मराठी बोलले जात नाही इतक्या कारणाकरिता मराठीबद्दल मनापासून आत्मियता असणार्यांना दूर लोटताय. तसेही घरात (आधीच्या पिढीशी) मराठी बोलली जात असूनही पुढच्या पिढीशी (म्हणजे मुलांशी) आवर्जुन इंग्लिश बोलणारे किंवा घराबाहेर आवर्जुन हिंदीच बोलणारे (खास करुन मुंबई/ नागपूर यासारख्या ठिकाणी) तथाकथित मराठी असूनही मराठीपासून मनाने दूर गेलेले आहेतच. तेव्हा घरात मराठी न बोलणारे पण मराठीबद्दल आत्मियता असणार्यांबद्दल काय दृष्टीकोन ठेवावा हे तुमचे तुम्ही ठरवा. ह्याबाबत मी अधिक चर्चा करुन इच्छित नाही. धन्यवाद.
In reply to घरात मराठी बोलत नाही तरी पण by तर्कवादी
In reply to मला मॅंडरीन बद्दल आत्मयता आहे by अमरेंद्र बाहुबली
मला मॅंडरीन बद्दल आत्मयता आहे. मग मी आजपासून चिनी का?माझ्या आधीच्या प्रतिसादात त्याचं उत्तर होतं .. पण तुमच्या हटवादीपणाला सलाम .. यापुढे या विषयावर मला वाद करायचा नाही... तुमची मनोवृत्ती तुम्हाला लखलाभ... "ज्या भाषेत तुम्ही नेहमीच विचार करता, ज्या भाषेत सहजपणे आणि उत्स्फुर्तपणे आपल्या भावना व्यक्त करता ती भाषा तुमची भाषा आहे."
In reply to मला मॅंडरीन बद्दल आत्मयता आहे by तर्कवादी
In reply to काहीबाही प्रतिसाद लिहीयचा नी by अमरेंद्र बाहुबली
काहीबाही प्रतिसाद लिहीयचा नी मग तर्क लावला तर मला वाद घालायचा नाही म्हणून पळ काढायचा. आय डी काय तर म्हणे तर्कवादी. नाव सोनूबाई…..मि. बाहूबली... शब्द जपून वापरा.. मला पण व्यक्तिगत चिखलफेक करता येईल.. .. नाव बाहुबली घेतल्याने तुम्ही सर्व शक्तीमान होत नाहीत.. आणि तर्क कशाशी खातात हे तुम्हाला कळत का ? म्हणे "मी तर्क लावला" ... तर्काने प्रतिसाद देण्याची तुमची कुवत नाही ..तेव्हा उगाच नाद करायचा नाही ...
In reply to काहीबाही प्रतिसाद लिहीयचा नी by तर्कवादी
In reply to काहीबाही प्रतिसाद लिहीयचा नी by तर्कवादी
In reply to साहेब ईतका तर्क लावता येतो तर by अमरेंद्र बाहुबली
In reply to नाय मराठी तर नाय. by कॉमी
In reply to घरात मराठी बोलत नाही तरी पण by अमरेंद्र बाहुबली
घरात मराठी बोलत नाही तरी पण मराठी म्हणे.असे असु शकते आणि माझा एक गमतीशीर अनुभव आहे. मी काम करत असलेल्या बेंगलोर स्थित कंपनीत काही फ्रेशर्स जॉईन झाले होते. त्यात मराठी मुलामुलींचाही एक ग्रुप होता. मी ही मराठी असल्याने कँटीन मध्ये ओळखपाळख झाली .एकदा त्यांच्या सोबत बसलो असताना एका दणकट तरुणाकडे बोट दाखवुन एक मुलगी म्हणाली कि सर हा पंजाबी आहे आणि मराठी मध्येच बोलतो. बोल रे मराठी असे म्हणाली आणि सगळे हसु लागले. त्या तरुणालाही कदाचित सवय असावी व ह्यावरुन अनेक विनोद ही झाले असावेत म्हणुन तो ही हसु लागला. मला म्हणाला कि मी कल्याणमध्ये लहानाचा मोठा झालोय आणि चांगले मराठी बोलतो. मी त्याला म्हणालो भारतातल्या दोन अगदी शक्तीशाली गर्जना तू अभिमानाने म्हणु शकतोस "हर हर महादेव" आणि "जो बोले सो निहाल सत श्री अकाल" ह्यावर तो फारच खुश झाला आणि म्हणाला अशी प्रतिक्रिया आता पर्यंत कोणी दिली नव्हती. तेव्हा कोणी घरी जरी मराठी बोलत नसले तरी तो अस्सल महाराष्ट्रीयन असु शकतो.
In reply to घरात मराठी बोलत नाही तरी पण by कानडाऊ योगेशु
तेव्हा कोणी घरी जरी मराठी बोलत नसले तरी तो अस्सल महाराष्ट्रीयन असु शकतो.अगदी बरोबर.. फार छान किस्सा.. आणि असे अनेक किस्से असू शकतात. फार काय अनेक मुस्लिम लोक घरात भले हिंदी बोलतात पण त्यांचं मराठी बोलणंही खूप छान असतं. मला आठवतंय माझा एक जुना सहकारी होता शोएब नावाचा. सोलापूरचा होता पण त्याचे मराठी उच्चार अगदी पुणेरी वळणाचे होते. .."मला मराठी येतं" असं त्याला वेगळं सांगावंही लागत नसे तो नेहमी मराठीच बोलायचा.. आता अशा माणसाला केवळ त्याच्या घरात हिंदी बोलली जाते म्हणून अमराठी म्हणायचे का ?
In reply to छान किस्सा by तर्कवादी
फार काय अनेक मुस्लिम लोक घरात भले हिंदी बोलतातआपली राज्य /प्रदेश आणि भाषा अशी चर्चा सुरु आहे ना ? मग हे धर्माचं कुठून आलं मध्येच ?
In reply to फार काय अनेक मुस्लिम लोक घरात by चौथा कोनाडा
मग हे धर्माचं कुठून आलं मध्येच ?धर्माचं आलं नाही. फक्त घरात हिंदी बोलतात हे नमूद केलंय.. आणि घरात हिंदी बोलण्याचं कारण कदाचित (कदाचितच हं.. मी काही खात्रीशीर दावा करत नाही) त्यांचं मुस्लिम धर्मीय असणं हे असू शकेल. तरी धर्माच्या उल्लेखाकडे दुर्लक्ष केला तरी चालेल,.. हवं तर ते वाक्य असं वाचा " फार काय अनेक
In reply to त्यांचा एक फायदा असेल तर एक तोटा देखील आहेच की by चेतन सुभाष गुगळे
In reply to पण दक्षिणेकडील राज्यात by चेतन सुभाष गुगळे
हिंदी येत असली तरी मुद्दामच बोलत नाहीत. समोरच्याची अडचण करणे हाच मुख्य उद्देश असतो.
त्यांच्याशी उत्तरभारतीय हिंदीत का बोलतात? मोडक्यातोडक्या इंग्रजीत का असेना ते मदतीला तयार असतात. मग समोरच्याची अडचण करणे हा उद्देश कसा काय बुवा?
किती मराठी लोकांना शेजारच्या कर्नाटकाची कन्नड किंवा तेलंगणाची तेलुगू येते?In reply to बँक ऑफ महाराष्ट्र मधे तर by विजुभाऊ
In reply to दक्षिणेतल्या सर्वसामान्य by कानडाऊ योगेशु
मुस्लिम समुदायाची दुकाने होती तिथे हिंदीमध्ये बोलणे चालुन गेले. हाच अनुभव एका सौदेंडियन मित्रानेही सांगितला हैद्राबादमध्ये असल्यामूळे उर्दूमिश्रीत हिंदी बोलु शकत होता त्यामुळे दुसर्या दाक्षिणात्य प्रदेशात गेल्यावर बाय डिफॉल्ट मुस्लीम दुकानदार किंवा स्टाफ असलेल्या दुकानातच जायचा.
हिंदी ला प्रमोट करण्यामागे हाही एक उद्देश असावा म्हणजे कर्नाटकातल्या एका खेडेगावातला मनुष्य तामिळनाडु अथवा केरळामधल्या एका शहरात गेला वा ह्याच्या उलट झाले तर जी गैरसोय होईल ती हिंदीमुळे काही प्रमाणात कमी होऊ शकेल.हा एक फार महत्त्वाचा मुद्दा इथे मांडला गेला आहे. हिंदी विरोध करुन कोणाचं नुकसान होईल हे येथे लक्षात येते.
In reply to ह्या प्रतिसाद दुर्लक्षणे महागात पडू शकते by चेतन सुभाष गुगळे
In reply to हिंदी ल विरोध करून कोणाचे नुकसान होईल by sunil kachure
आकडेवारी बघितली तर हिंदी भाषिक लोक खूप मोठ्या संख्येने (प्रचंड हा शब्द अगदी योग्य आहे)बिगर हिंदी भाषा असलेल्या राज्यात स्थलांतरित झालेली आहेत.ह्या पहिल्या मुद्द्याबाबत अनेकांना फार मोठे गैरसमज आहेत. त्यांना तिकडे खायला मिळत नाहीत म्हणून इथे येतात हा त्यातला एक. वस्तुस्थिती सर्वच ठिकाणी अशी नाही. सरकारी योजना रोहयो / मनरेगा वगैरेमुळे त्यांना पोटाला पुरेल इतके त्यांच्या राज्यांत देखील बर्यापैकी मिळते. आपल्या लोकांना त्यांची जास्त गरज आहे. मी धुळ्यात असताना आणि उर्वरित महाराष्ट्रात देखील बरेच ठिकाणी पाहिले आहे. बारा तास स्वस्तात राबू शकणारे मनुष्यबळ म्हणून आपल्या इथले उद्योजक ठेकेदारामार्फत त्यांना त्यांच्या गावी जाऊन चांगले अमिष दाखवून इथे मजूरीकरिता आणतात. २०१४ चा रेट सांगतो रुपये दीडशे फक्त + जेवण + निवासाची सोय यावर रोज बारा तास राबणारे मजूर सर्रास ठेकेदारामार्फत बिहार झारखंड छत्तीसगड उत्तरप्रदेश येथून मागविला जाई. अनेकदा तर इथे सहा महिने काम केल्यावर ते कंटाळत घरी जायची मागणी करीत तरी ठेकेदार त्यांना कधी प्रेमाने तर कधी सक्ती धाकदपटशाचा उपयोग करुन येथेच अडकवून ठेवत. पगार महिन्याच्या महिन्याला पूर्ण न देता बराचसा स्वतःकडे सिक्यूरिटी डिपॉझिटच्या नावाखाली दाबून ठेवणे ही अजून एक धूर्त खेळी असे. तरीही मग फारच असह्य झाले तर ठेकेदाराची नजर चुकवून बाकी पगारावर पाणी सोडत ही मुले मिळेल त्या वाहनाने पळून स्वतःच्या गावी जायचा प्रयत्न करीत पण जर तेव्हा ठेकेदाराच्या तावडीत सापडले तर असह्या मार खावून पुन्हा येथेच काम करावे लागे. हे सर्व स्वतःच्या डोळ्यांनी जवळून पाहिले आहे. या अमराठी तरुणांना तुम्ही मराठी / इंग्रजीची सक्ती करणार काय? त्याचवेळी स्थानिक मराठी मजूर तीनशे ते साडेतीनशे रुपये रोजाने (बारा तास) मिळे + त्यांच्या वाहतूकीकरिता सिक्स सिटरची सोय करावी लागे. स्थानिक जत्रा, देवीचा सण असे काही निमित्त काढून सुट्या घेण्याची प्रवृत्ती यामूळे कामाचे फार नुकसान होई. अशा परिस्थितीत मराठी उद्योजकाला देखील एक तर बाहेरचा मजूरच ठेवणे (त्याकरिता मनसेला खंडणी देऊन देखील) परवडते किंवा मग मराठी मजूर ठेवला तर स्वतःच्या उत्पादनाची किंमत वाढवणे भाग पडते ज्याचा परिणाम खप कमी होण्यात होतो.
In reply to आकडेवारी बघितली तर हिंदी by चेतन सुभाष गुगळे
In reply to विषयांतर करत आहात by sunil kachure
अगदी काल परवा पर्यंत बिहार सारख्या राज्यात पगार सोडा फक्त मोजकेच अन्न देवून लोकांकडून काम करून घेतली जात होती. बंदुकीच्या जोरावर.हे वीस वर्षांपूर्वी पर्यंत खरं होतं. नंतर परिस्थिती बदलली आहे.
विषयाला कलाटणी देवून स्वस्त मजूर,आपली गरज . हे विषयाशी संबंधित नसलेले मुद्ध्ये पुढे करू नका. त्या मुळे आपल्या फायद्या साठी त्यांना इथे आणले ह्या वाक्याला काही अर्थ नाही.विषयाशी संबंध नाही कसा? आपण स्वतः आणलेल्या मजूरांना कशी काय भाषिक सक्ती करणार? स्वस्त मजूर धंद्याकरिता फायद्याचे ठरतात म्हणून उद्योजक त्यांना ठेवतात ही वस्तुस्थिती आहे. सर्व एम आय डी सी भागात जाऊन खात्री करु घ्या. त्यांना ठेवू नये याकरिताच मनसेनी आंदोलने केलीत आणि नंतर एखादे स्क्रॅप उचलण्याचे कंत्राट किंवा मोठ्या रकमेच्या खंडणीवर सेटलमेंट केली. मी शिवसेना सोडली तेव्हा फक्त माणसे सोबत आली, शिवसेनेचे फंड्स मला मिळाले नाहीत. पक्ष वाढविण्याकरिता पैसा लागतो असे समर्थन देखील या तोडपाण्याबद्दल राज ठाकरेंनी केले होते. २००८-०९ मध्ये मी स्वतः हे रांजणगाव - कारेगाव या एमआयडीसीत आणि जवळच्या शिरूर - सुपे येथील उद्योग धंद्यांमध्ये पाहिलं आहे. ही खंडणी गोळा करण्याकरिता जी विशिष्ट माणसे मोठ्या प्रमाणात नेमली होती आता ती भोंगा प्रकरणापासून मनसेला सोडून जात आहेत.
In reply to अगदी काल परवा पर्यंत बिहार by चेतन सुभाष गुगळे
In reply to मजुरांचे वर्गीकरण महत्वाचे आहे by Trump
मराठी मजुर मिळायला अवघड जाते, मिळाले तरी परवडत नाही. कमी मजूरी देऊन मजूराला पिळून काढायचे नी बक्कळ नफा कमवायचा,वरून मजूर मिळत नाही म्हणून बोंबलायचे. असली कामे मराठी माणूस करत नाही कारण त्यालाईतरत्र कमी श्रमात चांगला मोबदला मिळतो. ह्या ऊलट कुत्र-डूकरांसारखी मानवी पैदास करून त्याना खाऊ घालणे जमत नाही म्हणून महाराष्ट्रात मजूरी करायला नी हिंदी लादायला पाठवायचे. आता ह्यात चुक कोणाची मराठी माणसाचीच का?In reply to मराठी मजुर मिळायला अवघड जाते, by अमरेंद्र बाहुबली
In reply to तुमचा उद्वेग समजला. by Trump
In reply to मराठी मजुर मिळायला अवघड जाते, by अमरेंद्र बाहुबली
ह्या ऊलट कुत्र-डूकरांसारखी मानवी पैदास करून त्याना खाऊ घालणे जमत नाही म्हणून महाराष्ट्रात मजूरी करायला नी हिंदी लादायला पाठवायचे. आता ह्यात चुक कोणाची मराठी माणसाचीच का?स्वखुशीने आलेले सोडाच. पण मराठी उद्योजक देखील जेव्हा त्यांना पैसे वाचविण्याकरिता इथे प्रयत्नपूर्वक बोलावून घेतात तेव्हा ती चूक कोणाची असते. चितळेंच्या म्हशी धुणारे बिहारी मजूर आहेत. आता काय यांना सक्ती केली होती का बिहारी मजूर नेमायची? यांनी मराठी माणसे का नेमली नाहीत?
In reply to त्यांना मजुरीवर ठेवणारे चूक की बरोबर हे ठरवा by चेतन सुभाष गुगळे
In reply to कारण त्याना बिहारात काम मिळत by अमरेंद्र बाहुबली
In reply to मराठी मजूर कमी पैशात काम करत by कानडाऊ योगेशु
In reply to दोन प्रश्न . . . by सुक्या
In reply to सुक्या by उपयोजक
इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे. ती ज्ञानभाषा आहे. ती शालेय अभ्यासक्रमांतून काढून टाकल्यास नुकसान आपलेच होईल.हा विचार कोणाच्या ध्यानीमनी सुद्धा नसावा. अमित शहांचे सुद्धा असे मत शंभर टक्के नसणार. ज्ञानभाषा म्हणजे काय असते ? हिंदी ज्ञानभाषा का नाही ? भाषेचा उपयोग संवाद साधणे हा असतो. तो हिंदीचा सुद्धा आहे. हिंदी भाषिक लोकांनी मुंबईत येऊन राहणे म्हणजे आक्रमण समजायचे का- मग दाक्षिणात्य शहरांमध्ये- उदा चेन्नई बेंगलोर हैदराबाद- इथे मराठी लोकं नोकऱ्या करतात, ते ही आक्रमण म्हणायचे का ? (कारण दाक्षिणात्य भाषा तिथल्या मराठी लोकांनी शिकून घ्याव्यात असे कधीही कुठून ऐकायला वाचायला मिळत नाही.)
In reply to ? by कॉमी
In reply to कॉमी by उपयोजक
In reply to कॉमी by उपयोजक
In reply to कॉमी by उपयोजक
In reply to बहुतांशी सहमत by तर्कवादी
असली प्रचंड भेसळ असलेली हिंदी फक्त कामचलाऊ भाषा वाटते..याचा अर्थ तिची अर्थात संपर्क भाषा म्हणजेच युनिव्हर्सल भाषा होण्याकडे वाटचाल चालू आहे ! म्हणजेच इंग्रजी प्रमाणे. (सध्या काही प्रमाणात आहेच)
मराठीत जसे सावरकरांनी भाषाशुद्धीकरणाचा भाग म्हणून अनेक सुलभ , कर्णमधूर असे नवीन मराठी शब्द या भाषेला दिलेत तसे काही प्रयत्न हिंदीत फारसे झाले असावेत असे दिसत नाहीसध्याच्या वेगवान आयटी काळात भाषाशुद्धीकरणाची संकल्पना कालबाह्य झाली की काय असे वाटते.
खरं तर हिंदी भाषिकांनी हिंदीची उपेक्षा केली... आणि अशी भेसळीची भाषा दुसर्यांवर लादू पाहत आहेत.. हिंदी देशपातळीवर संपर्क भाषा व्हावी या साठी गेल्या काही दशकांपासून प्रयत्न सुरु आहेत, सध्याचे केंद्र शासन "वन अमुक, वन तमुक" च्या अंतर्गत "एक देश, एक भाषा" लागू करू पहात आहे !असं काही झालं नाही, इतर भाषिकांनी हिंदी आपलीशी करताना त्यांच्या भाषेतील शब्द देखिल मिसळले.उदा. मराठीमुळे "वाट लगाना" हा वाक्प्रचार रुढ झाला !
In reply to असली प्रचंड भेसळ असलेली हिंदी by चौथा कोनाडा
In reply to असली प्रचंड भेसळ असलेली हिंदी by चौथा कोनाडा
याचा अर्थ तिची अर्थात संपर्क भाषा म्हणजेच युनिव्हर्सल भाषा होण्याकडे वाटचाल चालू आहे ! म्हणजेच इंग्रजी प्रमाणे.
पूर्वी फक्त दक्षिणेत व काही प्रमाणात बंगालमध्ये हिंदीला विरोध होता. आता महाराष्ट्रात सुद्धा हिंदीविरोध वाढत आहे. अनेक पूर्वोत्तर राज्यांनी अमित शहांच्या हिंदी वापरण्याच्या प्रस्तावाला विरोध केला आहे. अनेक मराठी वाहिन्यांवर बऱ्याच उत्पादनांच्या जाहिराती आता मराठीत भाषांतर करून दाखवितात ज्या पूर्वी बहुतांशी हिंदीत असायच्या. Google, Facebook, WhatsApp अशी समाजमाध्यमे व Tata Sky, Amazon सारख्या कंपन्यांनी मराठी भाषेचा पर्याय दिला आहे.
एकंदरीत हिंदी, इंग्लिश प्रमाणे, संपर्कभाषा होण्याची शक्यता दिसत नाही. अजून काही दशकांनी स्थानिक भाषा व इंग्लिश या दोनच संपर्कभाषा असतील.In reply to असली प्रचंड भेसळ असलेली हिंदी by चौथा कोनाडा
सध्याच्या वेगवान आयटी काळात भाषाशुद्धीकरणाची संकल्पना कालबाह्य झाली की काय असे वाटते.मराठीत डेटा साठी 'विदा' हा प्रतिशब्द अलिकडच्या काळातच शोधला गेला असावा बहुधा.
In reply to बहुतांशी सहमत by तर्कवादी
खरं तर हिंदी भाषिकांनी हिंदीची उपेक्षा केली आणि अशी भेसळीची भाषा दुसर्यांवर लादू पाहत आहेत..मराठीत काही वर्षांपूर्वी काहे दिया परदेस नावाची मालिका प्रसारित व्हायची. मुंबईतली एक मराठी मुलगी हिंदीभाषिक मुलाच्या प्रेमात पडते. आधी तो तिच्याशी / तिच्या कुटुंबियांशी संवाद साधतो तेव्हढेच संवाद हिंदीत होते आणि बाकी मराठी. मग पुढे त्या दोघांचं लग्न आणि नंतर ती मुलगी सासरी वाराणसीला जाते आणि त्यानंतर अख्खी मालिकाच हिंदी बनून गेली होती. मराठी वाहिनीवर हिंदी नावाची आणि जवळपास सर्वच संवाद हिंदीत असलेली आणि वाराणसी शहरात घडणार्या घटना दाखविणारी मालिका काही मराठी भाषा प्रेमी (व आग्रही देखील) मोठ्या कौतुकाने पाहत असत. त्याच्याही अनेक वर्षे पूर्वी विक्रम गोखले यांनी मराठीत मुंबई दूरदर्शन वर डरनेका नही असे शीर्षक असलेली आणि अतिशय गचाळ बंबैय्या हिंदीत संवाद असलेली मराठी मालिका केली होती. या अशा कलाकृतीच्या निर्मात्यांनी केलेल्या चूकांचा दोष भाषेकडे कसा काय जातो?
In reply to दोन प्रश्न . . . by सुक्या
In reply to सहमत by चेतन सुभाष गुगळे
In reply to +१ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to धन्यवाद. by चेतन सुभाष गुगळे
In reply to धन्यवाद. by चेतन सुभाष गुगळे
In reply to सहमत by चेतन सुभाष गुगळे
In reply to चेतन by उपयोजक
In reply to चेतन by उपयोजक
In reply to दोन प्रश्न . . . by सुक्या
हिंदी चालत नसेल तर परदेशी असलेली इंग्रजी का चालते किंवा का चालावी?
व
परदेशी असलेली इंग्रजी चालते तर हिंदी का चालु नये?
या दोन्ही प्रश्नांचं उत्तर कधीच मिळणार नाही.
कारण ... हा उत्तर वि, दक्षिण असा वर्चस्वाचा मुद्दा आहे. In reply to पण मी म्हणतो तुम्ही सगळे आताच by सुरसंगम
In reply to आहेत .. असे खुप लोक आहेत. जी by सुक्या
In reply to सुक्या by उपयोजक
In reply to स्वभाषाभिमान by सर टोबी
In reply to सर टोबी by उपयोजक
In reply to भाषा हा सांस्कृतिक ठेवा आहे by सर टोबी
In reply to आहेत .. असे खुप लोक आहेत. जी by सुक्या
खरं सांगु का .. ज्या लोकांना काही प्रोब्लेम नसतो ते सुखाने राहतात ..+१
In reply to पण मी म्हणतो तुम्ही सगळे आताच by सुरसंगम
In reply to पण मी म्हणतो तुम्ही सगळे आताच by सुरसंगम
In reply to १०० मार्कचे संस्कृत ? by रानरेडा
In reply to इंग्लिश ज्ञानभाषा असल्याने by श्रीगुरुजी
In reply to चेन्नई मध्ये मारवाडी ( सुवर्ण by सुबोध खरे
In reply to तुम्हाला हिंदी भाषेचाा एवढा द्वेष का आहे by ॲबसेंट माइंडेड…
In reply to शाळेपासून सरकारी by श्रीगुरुजी
In reply to मग तुम्ही तुमच्या मुला by ॲबसेंट माइंडेड…
In reply to माझा अनुभव by सौन्दर्य
अजून एक अनुभव - २०१५ला भारतात आलॊ होतो त्यावेळी एका नातेवाईकाचा सेल फोन टेम्पररी वापरात होतो. नक्की कोणती फोन कंपनी होती ते आठवत नाही. तर एकदा त्याच्यात काहीतरी बिघाड झाला व त्यांच्या कस्टमर केअरला फोन करावा लागला. त्यात मराठीत बोलण्यासाठी एक नंबर दाबण्याचे ऑप्शन दिले होते. तो नंबर दाबल्यावर देखील समोरून हिंदीत संभाषण सुरु झाले. मी म्हंटले मला मराठीतच बोलायचे आहे त्यावर ती व्यक्ती म्हणाली तो पर्याय उपलब्ध नाही. "जर पर्याय उपलब्ध नव्हता तर तसे फसवे पर्याय का दिलेत ?" असं विचारल्यावर ती व्यक्ती म्हणाली "ऐसा गर्व्हरमेंट का कायदा है, इसलीये वो ऑप्शन दिया है". म्हणजे ऑप्शन द्यायचे पण मराठीत बोलणारी व्यक्तीच नाही ठेवायची असा एकूण कारभार दिसला. त्या क्षणी मला जास्त गरज होती म्हणून जास्त वाद न घालता गुपचूप हिंदीत काम चालवून घेतले.कधी कधी हिंदी मनुष्यही मराठीचा पर्याय स्विकारल्यानंतर उपलब्ध नसतो. मग तसेच वाट बघत बसावे लागते, शेवटी इंग्रजी किंवा हिंदी पर्याय घ्यावा लागतो.
In reply to मराठी by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to कुठल्याही प्रदेशातील भारतीय by पुंबा
In reply to कुठल्याही प्रदेशातील भारतीय by पुंबा
In reply to पुंबा by उपयोजक
In reply to भाषिक अस्मिता हि आपली पोळी by सुबोध खरे
याउलट जया भादुरी सारख्या नतद्रष्ट बायका येथे बक्कळ पैसे कमावून सुद्धा मला मराठी येत नाही हे भूषण म्हणून सांगतात तेंव्हा त्यांना रस्त्यावर बडवावेसे वाटते.जया बच्चन यांनी बक्कळ पैसे कमावले आहेते हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय करुन, मराठी चित्रपटांत (एक अपवाद आहे त्यांच्या मेकअपमनने जेव्हा एक मराठी चित्रपट निर्माण केला होता तेव्हा त्यात जया व अमिताभ बच्चन यांनी अतिथी कलाकार म्हणून भूमिका केली होती) नव्हे. हिंदी चित्रपटांत अभिनय ही त्यांची आवड आणि कमाईचे साधन आहे. या संबंधित एफटीआयआय ही संस्था ज्यात त्यांनी शिक्षण घेतले ती पुण्यात आहे आणि पुढे त्यांचे कार्यक्षेत्र अर्थात चित्र निर्मिती संस्था व बहुसंख्य स्टुडिओज् हे मुंबईत आहेत, म्हणजे आपल्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण आणि व्यवसाय करण्यास त्यांना महाराष्ट्रात यावे लागले. अर्थात एनएसडी ही एक संस्था दिल्लीत देखील आहे पण तिथल्या अभिनय शिक्षणाचा बाज वेगळा आहे त्यामुळे ज्याला एफटीआयआय च्या पद्धतीचे अभिनय प्रशिक्षण हवे असेल त्याला एनएसडी हा पर्याय समर्पक असेलच असे नाही. असो. समजा एफटीआयआय सारखी संस्था आणि विविध चित्रनिर्मिती संस्था / स्टुडिओज् यांची उभारणी जर उत्तर भारतातच केली तर उत्तर भारतीय मंडळींना येथे येण्याची गरज भासणार नाही व महाराष्ट्राच्या लोकसंख्येत अतिरिक्त भर पडून जो सोयीसुविधांवर ताण येत आहे तोदेखील येणार नाही. अर्थात अशा वेळी बॉलीवूड महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही छापाची विधाने मराठी नेतेमंडळींकडून केली जातात त्या दुटप्पी वर्तनाचीही नोंद घ्यावीच लागेल. म्हणजे यूपीत स्टूडिओ बनवायला विरोध आणि इथल्या स्टुडिओत येऊन काम केले तर आमच्या जीवावर कमविता असे डबल स्टँडर्ड विधान करणे तार्किकतेच्या कसोटीवर टिकणारे नाही.
In reply to या वस्तुस्थिती मागे अनेक पैलूंचा विचार व्हावा by चेतन सुभाष गुगळे
मुंबईत असताना मी मराठी बोलणार नाही केवळ हिंदीतच बोलेनअसा पवित्रा त्यांनी घेतला आणि कोलकात्यात गेल्यावर या महानगरात
हिंदीत कामकाज चालणार नाही प्रत्येक कोलकातावासियाला बंगाली आलेच पाहिजेअशी उलट भूमिका घेतली तर मात्र याबाबत जया बच्चन यांचा निषेधच करावा लागेल.
In reply to भाषिक अस्मिता हि आपली पोळी by सुबोध खरे
जया भादुरी सारख्या नतद्रष्ट बायका येथे बक्कळ पैसे कमावून सुद्धा मला मराठी येत नाही !मुंबईत कित्येक वर्षे राहणार्या, बक्कळ पैसे कमावणार्या किंवा जेमतेम पोट भरणार्या बर्याच लोकांना मराठी येत नाही. "हम हिंदीमें ही बात करेंगे" चा संदर्भ वेगळा होता (मला आठवते त्याप्रमाणे) त्यांनी इंग्लीश मध्ये बोलण्याला विरोध करत "हम युपीकें हैं, हम हिंदीमें ही बात करेंगे" असे विधान सहज केले होते होते तेव्हा त्याला कसलाही भाषिक, प्रादेशिक, राजकीय विखार नव्हता. "हम हिंदीमें ही बात करेंगे" हे वाक्य पकडून तिच्या विरुद्ध राळ उठवण्यात आली !
In reply to जया भादुरी सारख्या नतद्रष्ट by चौथा कोनाडा
In reply to ते विधान मराठी विरोधातच होते. by चेतन सुभाष गुगळे
In reply to हे पण मोडतोड केलेले वृत्त by चौथा कोनाडा
In reply to तोच संदर्भ आहे. फार जुना by चेतन सुभाष गुगळे
In reply to चेतन सुभाष गुगळेजी, व्हिडीओ by चौथा कोनाडा
In reply to जया भादुरी सारख्या नतद्रष्ट by चौथा कोनाडा
In reply to भाषिक अस्मिता हि आपली पोळी by सुबोध खरे
याउलट जया भादुरी सारख्या नतद्रष्ट बायका येथे बक्कळ पैसे कमावून सुद्धा मला मराठी येत नाही हे भूषण म्हणून सांगतात तेंव्हा त्यांना रस्त्यावर बडवावेसे वाटते.कायदा सुव्यवस्था सुशासन न्यायदान प्रक्रिया हे केवळ पुस्तकी शब्द नाहीत, त्यांचा व्यवहारात देखील उपयोग करता येतो. तितका संयम नसल्यास निषेध करण्याचे अनेक सभ्य व सुसंस्कृत मार्ग आहेत. कोणत्याही परिस्थितीत पाऊणशे वयाच्या एका महिलेला शारिरीक इजा करण्याची इच्छा होणे व ती समाजमाध्यमावर जाहीर व्यक्त करणे ही निरोगी पुरुषाची मानसिकता नाही.
In reply to कुठल्याही प्रदेशातील भारतीय by पुंबा
In reply to रहमान by उपयोजक
In reply to तामिळ by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to हिंदीला by सर टोबी
In reply to हिन्दी राष्ट्रभाषा by सुखीमाणूस
हिंदी राष्ट्रभाषा म्हणून घटनेने निवडली आहे.
अगाध ज्ञान. रचाकने अज्ञानात सुख असतं म्हणून तुम्ही तुमचं नाव सुखीमाणूस ठेवलंय का?In reply to हिन्दी राष्ट्रभाषा by सुखीमाणूस
In reply to पूर्ण चुकीची माहिती आहे. भारत by श्रीगुरुजी
In reply to पूर्ण चुकीची माहिती आहे. भारत by श्रीगुरुजी
In reply to हिंदी आणि ( राष्ट्रभाषा आणि राजभाषा ) by हणमंतअण्णा शंक…
अमितभाई हिंदीच्या राष्ट्रभाषा होण्याचा मार्ग कायदेशीर विनासायास करू शकतात यावर मी विश्वास ठेवतो.
अमितभाईने बिमारू राज्ये नी तियाला गुजरात जोडून वेगळं राष्ट्र मागून घ्यावे नी त्याला हिंदी राष्ट्रभाषा करावी. ईतर राज्यांच्या माथी बळजबरीने हिंदी मारू नये. देशातील एकमेव हुशार राज्य असेल तर तामीळनाडू त्यानी हिंदीला सरळ लाथाडले. तरी त्याना काही फरक पडला नाही ऊत्तरोत्तर तामीळनाडू विकासच करत आहे.In reply to हिंदी आणि ( राष्ट्रभाषा आणि राजभाषा ) by हणमंतअण्णा शंक…
ज्या पद्धतीने कायदा, संविधान आणि त्यातल्या दुरुस्त्या, त्यांना भविष्यात न्यायालयात दिली जातील ती आव्हाने यांचा आधीच सखोल अभ्यास करून अमितभाईंनी (अर्थात टीमने) कलम ३७० रद्द केले, ते पाहता अमितभाई हिंदीच्या राष्ट्रभाषा होण्याचा मार्ग कायदेशीर विनासायास करू शकतात यावर मी विश्वास ठेवतो.
कलम ३७० रद्द करणे आणि हिंदी राष्ट्रभाषा करणे यात महद्अंतर आहे. ३७० वे कलम रद्द करण्यास बहुसंख्य भारतीयांचा पाठिंबा होता. परंतु त्यांच्या दृष्टीने ती प्राथमिकता नव्हती. त्यामुळे ते कलम लादणारा व रद्द न करणारा पक्ष वारंवार सत्तेत येऊ शकला. परंतु त्याचमुळे भाजपने हे कलम रद्द केल्यानंतर अत्यंत क्षीण विरोध झाला.
हिंदी ही राष्ट्रभाषा करण्याचा निर्णय झाला तर अनेक राज्यातून विरोध होईल. त्याचा भाजपला निवडणुकीत तोटा होईल. भाजप कर्नाटक पाठोपाठ तेलंगणात बस्तान बसविण्याच्या प्रयत्नात आहे. तेथे भाजपला फटका बसू शकतो. महाराष्ट्र, बंगाल व ईशान्येकडील राज्यातही विरोध होईल. मुळात हिंदी भाषिक राज्यात भाजप बराचसा संतृप्त झाला असल्याने निवडणुकीत तेथे अधिक फायदा होणार नाही. सर्वोच्च न्यायालयात सुद्धा हा निर्णय टिकणार नाही. त्यामुळे अमित शहा हे धाडस करणार नाहीत. केले तर पस्तावतील.In reply to हिंदी आणि ( राष्ट्रभाषा आणि राजभाषा ) by हणमंतअण्णा शंक…
ते पाहता अमितभाई हिंदीच्या राष्ट्रभाषा होण्याचा मार्ग कायदेशीर विनासायास करू शकतात यावर मी विश्वास ठेवतो.करु देत ना राष्ट्रभाषा.. केंद्र सरकारच्या कामकाजाची अधिकृत भाषा हिंदी असेल तर मान्यही करु.. पण म्हणून अन्य भाषा संपवायच्या का ? अन्य भाषा बोलायच्या नाहीतच का ? हिंदी राष्ट्रभाषा आहे की नाही हा कायदेशीर वाद काही काळ बाजूला ठेवू .. त्याचा कायदेशीर कीस पाडून काय आहे ते कायदेपंडित सांगतीलच.. आणि हिंदी राष्ट्रभाषा आहे म्हणून प्रत्येकाने जबरदस्तीने हिंदीच बोलली पाहिजे याला काय अर्थ ? स्थानिक भाषा बोलायच्या /शिकायच्या नाहीत ? उद्या हे अमित शहा स्थानिक भाषेतून शिक्षण मग, स्थानिक भाषेतील संस्थळांचा देशातील वापर (यात मिसळपावपण आले हं) , स्थानिक भाषेतीलप्रसार माध्यमे, वृत्तपत्रे आणि सरतेशेवटी स्थानिक भाषेतून बोलायलाही बंदी घालतील.. स्थानिक भाषेतून बोलणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरवतील.. मग हिंदी राष्ट्रभाषा आहे म्हणत हे सगळं पण चालवून घ्यायचं का ? स्थानिक भाषांचं अस्तित्वच नको आहे का हिंदी भाषकांना ?
In reply to बाकी भाषा बोलायच्या नाहीत का ? by तर्कवादी
In reply to मुळात जेथे अनेक भाषा बोलल्या by श्रीगुरुजी
In reply to बाकी भाषा बोलायच्या नाहीत का ? by तर्कवादी
केंद्र सरकारच्या कामकाजाची अधिकृत भाषा हिंदी असेल तर मान्यही करु.. पण म्हणून अन्य भाषा संपवायच्या का ? अन्य भाषा बोलायच्या नाहीतच का ?
स्थानिक भाषेतून शिक्षण मग, स्थानिक भाषेतील संस्थळांचा देशातील वापर (यात मिसळपावपण आले हं) , स्थानिक भाषेतीलप्रसार माध्यमे, वृत्तपत्रे आणि सरतेशेवटी स्थानिक भाषेतून बोलायलाही बंदी घालतील.. स्थानिक भाषेतून बोलणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरवतील.. मग हिंदी राष्ट्रभाषा आहे म्हणत हे सगळं पण चालवून घ्यायचं का ? स्थानिक भाषांचं अस्तित्वच नको आहे का हिंदी भाषकांना ?स्थानिक विरुद्ध हिंदी असा रंग देऊ नये. हिंदी विरुद्ध इंग्रजी असे ते आहे. दोन भिन्नभाषिक लोकांनी परस्पर संवाद साधण्याकरिता इंग्रजी ऐवजी हिंदीला प्राधान्य द्यावे असे हे आवाहन आहे. यात सक्ती नाही. स्थानिक भाषेची गळचेपी तर अजिबात नाही. दोन मराठी भाषिकांनी मराठीत बोलू नये किंवा दोन तमिळ भाषिकांनी तमिळमध्ये बोलू नये असे सांगत नाहीयेत अमित. फक्त जेव्हा एक मराठी भाषिक एका तमिळ भाषिका सोबत संवाद साधतोय तेव्हा इंग्रजी ऐवजी हिंदीला प्राधान्य द्यावे असे हे साधे आवाहन आहे. आपली स्थानिक भाषा + एक अजून एक भाषा (ज्यांना आपली स्थानिक भाषा येत नाही त्यांच्यासोबत दैनंदिन व्यवहारात संवाद साधण्याकरिता) अशा दोन भाषा येणे गरजेचे असेल तर ही दुसरी भाषा शिकायला सोपी अशी कोणती आहे? अर्थातच हिंदी. इंग्रजी तरी प्रयत्नपुर्वक शिकावी लागती तरी परिणामकारकरीत्या बोलता येत नाही ती नाहीच. जे हिंदी चित्रपट / दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम (मनोरंजन + वृत्त) पाहतात त्यांना हिंदी शिकावी लागतच नाही. आपोआपच येते. मला शाळेत फक्त ५ वी ते ७ वी हे तीनच वर्षे हिंदी हा एक १०० गुणांचा विषय होता. तरीही मी सहजपणे इतरांसोबत हिंदीत संवाद साधू शकतो. ५ वी १० वी इंग्रजी हा १०० गुणांचा विषय आणि पुढे महाविद्यालयात सर्वच विषय इंग्रजी भाषेतून शिकलो तरी इतरांसोबत इंग्रजीत संवाद साधताना एक अवघडलेपण वाटते. एकेक शब्द मनात अनुवाद करुन मग मनातल्या मनात काळ बरोबर आहे की नाही हे ठरवत वाक्य जुळवत बोलावे लागते आणि तरीही चूका होतात. हिंदीत बोलताना कितीही चूका केल्यात तरीही अपराधीपण वाटत नाही. इंग्रजी बोलताना एक जरी चूक झाली तरी आपल्याला फाशीची शिक्षा होईल इतके प्रचंड अपराधीपण वाटते. एक तर इंग्रजीतले ते हॅव बीन / हॅड बीन असे परफेक्ट टेन्स धरून एकूण बारा काळ, मग आता आपण प्रेसेन्ट परफेक्ट मध्ये बोलायचे की सिंपल पास्ट मध्ये की पास्ट परफेक्ट मध्ये की पास्ट कंट्यूनिअस की पास्ट परफेक्ट कंट्यूनिअस हा घोळ काही केल्या संपत नाही. पॅसिव्ह व्हॉईस / इंडायरेक्ट स्पीचमध्ये तर अजूनच दडपण येते. उच्चारांबाबत तर नवीनच गोंधळ दिसतो आहे. पूर्वी आम्ही कॉस्च्यूम, शेड्यूल, कोच असे शब्द उच्चारायचो आता तेच म्हणे कॉस्ट्यूम, स्केड्यूल, काऊच असे उच्चारले जातात. इतकंच उच्चारांकरिता वापरले जाणारे इंग्रजी शब्द प्रोनाउंन्सिएशन आणि अॅक्सेंट यांच्या उच्चारातही अनेक ठिकाणी तफावत आढळते. दक्षिण भारतीय लोकांचं एक बरं आहे ते चूकीचं इंग्रजीही सर्रास बोलतात आणि ते देखील प्रचंड आत्मविश्वासाने. त्यांचे इंग्रजी शब्दांचे उच्चार हा तर स्वतंत्र ग्रंथाचा विषय होईल. हां इंग्रजी ही लेखनाकरिता बरीच सुलभ भाषा आहे असे खात्रीने म्हणता येईल. विशेषतः आता लॅपटॉप वर टायपिंग करायचं असतं तेव्हा तर स्पेल चेक ग्रामर चेक आणि डिक्शनरी सोबत असताना तर अगदीच विल्यम शेक्स्पीअर इतकं नाही तरी शशी थरूर यांच्या तोडीचं इंग्रजी देखील अनेक भारतीय लोक लिहू शकतात. समोरच्याला आपला मुद्दा समजेल आणि तो आपल्याला उचित प्रतिसाद पाठवेल व तोही पुन्हा आपल्याला समजेल इतपत कार्यालयीन इंग्रजी वाचन लेखन बहुतेक सर्व डेस्क जॉब असणार्या नोकरदार मंडळींना येत असावं असा अंदाज आहे. नोकरीकरिता अर्ज, वस्तू खरेदी करिता चौकशी - प्रत्युत्तरात माहितीपत्रक दरपत्रक कोटेशन, त्यानंतर पुढे कस्टमर कंप्लेंट - रिझोल्यूशन याकरिता करावं लागणारं रिटन कम्यूनिकेशन इंग्रजीत फारच सुलभ आणि विनासायास होतं. हेच हिंदीत करायचं म्हंटलं तर प्रचंड कटकटीचं होईल. आणि तोंडी करायचं ठरलं तर नेमकं उलट म्हणजे इंग्रजीत अवघड आणि हिंदीत तूलनेने सुलभ. स्थानिक भाषिक अर्थातच सर्वोत्तम पण अनेकदा मी वस्तू महाराष्ट्रात वापरतोय आणि कंपनीचं हेड ऑफिस बेंगलोरमध्ये आहे अशा वेळी मला कन्नड येत नाही आणि विक्रेत्याला मराठी येत नाही तर इंग्रजीपेक्षा बोलायला मला हिंदी सोपी पण जर तो इंग्रजी किंवा कन्नडमध्येच बोला असं अडून राहिला तर मग मी तोंडी ऐवजी लेखीचा आग्रह धरेल. कारण इंग्रजी बोलताना चूका होऊ शकतात आणि मग पुढे त्याचा परिणाम अपेक्षित सोल्यूशन मिळण्यात होऊ शकतो. लेखीमध्ये इंग्रजीत चूक होण्याची शक्यता तूलनेने कमी आहे.
महाराष्ट्रात काहीच समस्या