एका गारुड्याची गोष्ट ५: सापांची ओळख- नाग.
खालचे फोटो बघा , म्हणजे समजेल की तो 'चष्मा' हा नागाच्या शिकाऱ्यांला घाबरवण्यासाठी असतो. म्हणजे आपण जसे अभियांत्रिकीच्या परीक्षेत १ पानाच्या जागी ५ पानी उत्तर लिहून परीक्षकाला गोंधळात टाकतो, तसला हा प्रकार ;). प्रत्येक नागाच्या फण्यावर वेगळी नक्षी (फेशन-फण्याची नक्षी )असते पण सगळ्यांचा उद्देश तोच असतो.ती फेशन मात्र फारच मोहक असते,नागपंचमीमुळे का होईना ती आपल्या सर्वांनी पाहिलेली असते.शास्त्रीयदृष्ट्या पण त्याचे महत्व म्हणजे त्यावरून नागाचा विझुअल जेनेटिक्स समजू शकते.
नंतर चा हा फोटो बघा,आपण छत्री मिटतो तसा नाग फणा मिटतो आणि तो तसाच सरपटतो. त्यामुळे खूप वेळा कॉलवर नाग ओळखणे अवघड जाते, लोकं त्यामध्येच फसून अपघात करून घेतात. एखाद्याला कोपच्यात घेतल्या वर तो जसा आधी बॉडी फुगवत आये-माई काढतो तसा नाग फणा काढून फुत्कार टाकतो, त्यामधून त्याला फक्त समोरच्याला सांगायचे असते- "आपण लई डेंजर ए, पुढे आला तर बघ"...जर समोरच्याने वाट दिली तर तो लगेच कल्टी मारतो(दुनियादारी मधल्या साईनाथ सारखी ;)). शेवटचा पर्याय म्हणून चावतो, नागाला पण त्याच्या विषाची पूर्ण किंमत माहिती असते त्यामुळे जेंव्हा चावतो तेंव्हा तो मोजून-मापून चावतो.(दुसऱ्याचे डोके विनाकारण चावणाऱ्यानी हे लक्षात ठेवले पाहिजे !).
जंगलात जे नाग राहतात ते वेगवेगळे बेडूक-सरडे , छोटे जंगली प्राणी, छोटे पक्षी इ.असे अनेक काही खातात पण पुण्यासारख्या शहरातील नागांना चविष्ट पर्याय कमी असतात. त्यांना जास्त करून काळे उंदीर, घुशी, बेडूक आणि कबुतरं,चिमण्या(माणसांनी मारून उरल्या असल्या तर ;)) इ. मिळतात. सगळे नाग १००% नॉनव्हेज खातात ,त्यामध्ये दुध, बत्तासे अश्या शाकाहारी गोष्टी येत नाहीत.
फक्त विकसित बुद्धीच्या (??) माणूस प्राण्याला माहित आहे की गाईचे दुध त्यांच्या आचळातून कसे मिळवायचे आणि त्याचा खरवस कसा करायचा, ही गोष्ट नागांना (कुठल्या पण सापाला) येत नाही. उलट या विकसित माणसाने, अंधश्रध्येमुळे त्यांना दुध कोंबून अनेक वेळा गुदमरून मारलेले आहे. नागपंचमीच्या आधी १ महिना तहानलेले ठेवून, नंतर त्यांच्या समोर दुध काय 'जेडी' जरी ठेवली तरी ते अधाश्यासारखे पितील. दुध हे निसर्गात, (आंबे येतात तसे) नैसर्गिकरीत्या उबलब्ध नसते, त्यामुळे ते कुठल्या पण सरपटणाऱ्या प्राण्याचे खाद्य असूच शकत नाही.
नागाचे विष हे मज्जासंस्थे वर हल्ला करते, म्हणजे मेंदुमधून जे आपले शरीर कार्यरत राहायला संदेशवहन चालते ते गंडवते. थोडक्यात म्हणजे जीमेल मध्ये असा व्हायरस टाकायचा की हळू हळू एक पण इमेल आपल्याला मिळणार नाही आणि शेवटी खाते बंद पडेल. नाग चावल्यावर, सुरवातीला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो, मग हळू हळू ऐक-ऐक क्रिया बंद पडत, कार्डियाक अरेस्ट होऊन माणूस दगावतो.(मिपाकर डॉ.खरे या वर जास्त प्रकाश टाकू शकतील.)
आधी मिपावर एका प्रतिक्रियेत मी लिहिल्या प्रमाणे- हे विष poison नसून venom असते, ज्याचा फक्त रक्ताशी संबध आला तरच त्याचे दुष्परिणाम होतात. हे वेनोम नागाची थुंकी असते, त्यात प्रामुख्याने प्रोटीन,enzymes असतात की जे नागाला त्याचे भक्ष पचवायला मदत करतात. त्यामुळे जर आपण जर हे वेनोम प्यायले तर तो प्रोटीन शेक सारखे काम करेल, पण जर तोंडात किंवा पोटात जखम (ulcer) असेल तर वाट लागेल आणि कोणता माणूस ते पचवू शकेल की नाही ही पण एक शंकाच आहे.
नागच्या (कोणत्याही विषारी सापाच्या) पिल्लामध्ये पण पूर्ण विकसित झालेल्या विष-ग्रंथी असतात, आणि विष पण मोठ्या नागापेक्षा जहाल असते. कारण विष-ग्रंथीचा आकार छोटा असल्यानेमुळे त्यांना कमी विषात जास्त मोठें भक्ष मारून पचवायचे असते.(त्यांना त्यांच्या आया ग्राईप वाटर पाजत नाहीत ;)). म्हणून लहान पिल्लू बघून त्याला हलगर्जी पणे हाताळायला जाऊ नका, ते पण मोठ्या नागासारखेच तुम्हाला पोचवू शकते.
मोठा नाग जास्तीत जास्त साधारण पणे ~२११ mg विष टोचू शकतो,नाग कधीच एवढे विष टोचत नाही, एखादा पूर्ण वाढ झालेला माणूस ११ mg विषामध्ये राम म्हणू शकतो. नागाचे विषाचे गणित हे त्याच्या भक्षाच्या आकारानुसार बदलत असते( म्हणजे छोटा उंदीर असेल तर थोडे आणि घूस असेल तर जास्त विष)पण माणूस समोर आला तर त्याचे हे गणित चुकते आणि 'टू बी सेफर' तो जास्त विष टाकतो किंवा टाकत पण नाही.त्यामुळे नाग चावल्यावर, एकच उपाय -सरकारी रुग्णालय, पुढचे कार्य तिकडचे डॉ. बघून घेतील.
भारतात सगळ्यात जास्त सर्पदंशाचे मृत्यू हे नाग चावल्याने होतात, भातशेतीत बेडूक खायला नाग येतात, आणि भात कापणीच्या वेळी विळा चालवताना किंवा चुकून पाय पडून नागदंश होतो. पुण्यामध्ये जिकडे शेत जमिनी घेऊन (सिंहगड रस्ता, आंबेगाव पठार इ.)घरे बांधली गेली आहेत तिकडे अजून खूप मोठें नाग निघतात आणि नाग दंश पण होतात. आधीच्या भाग २ मध्ये लिहिल्या प्रमाणे मी सिहगड कॉलेज मध्ये खूप मोठें (५-६ फुटी) नाग पकडले आहेत. नाग स्वतःहून कोणाच्या वाटेला जात नाहीत, पण कोणीखोडी काढली किंवा त्याला कोपच्यात घेतले तर त्याच्या सारखा दुसरा मोहक लढवय्या नाही.
मावळत्या उन्हात, केवड्याच्या बनात,सळसळणारी नागीण पहायचे भाग्य नशिबात असायला लागते.
नागाबद्द्लच्या अंधश्रद्धा आणि माझे अनुभव पुढच्या भागात.... प्रतिक्रिया
नाग स्वतःहून कोणाच्या वाटेला जात नाहीत, पण कोणीखोडी काढली किंवा त्याला कोपच्यात घेतले तर त्याच्या सारखा दुसरा मोहक लढवय्या नाही. मावळत्या उन्हात, केवड्याच्या बनात,सळसळणारी नागीण पहायचे भाग्य नशिबात असायला लागते.क्या बात! भा हा री ही :)
नंतर चा हा फोटो बघाकुठे आहेत फोटो?
In reply to नेहेमीप्रमाणेच अप्रतिम!! by बाळ सप्रे
In reply to __/\__ by आदूबाळ
In reply to नाग अगदी जवळुन पाहिलेला आहे.. by मदनबाण
In reply to सापड्याला by कपिलमुनी
चुकून "स्पावड्याला " वाचले smileyअरे जर त्याने कात टाकली तर काहिच शिल्लक राहणार नाही!! :)
In reply to मस्तच ! by कपिलमुनी
( म्हणजे आम्ही गडावर कडाक्याच्या थंडीत स्लीपींग बॅग मधे झोपलो आहे , आणि कानाशी " भावा , थंडी फुस्स करतीये ..थोडा सरक" असा आवाज यायचा)." झकासच... कल्पना मस्त आहे राव!!!!
In reply to मस्तच ! by कपिलमुनी
In reply to मस्तच ! by कपिलमुनी
In reply to ह्म्म by सुधीर
In reply to आधी मिपाकर -मोदक यांच्या by जॅक डनियल्स
In reply to रॉयल प्रकार आहे. by पिशी अबोली
@ एखाद्याला कोपच्यात घेतल्या वर तो जसा आधी बॉडी फुगवत आये-माई काढतो तसा नाग फणा काढून फुत्कार टाकतो, >>>>
@ त्यामुळे जेंव्हा चावतो तेंव्हा तो मोजून-मापून चावतो.(दुसऱ्याचे डोके विनाकारण चावणाऱ्यानी हे लक्षात ठेवले पाहिजे !). >>>
@दुध हे निसर्गात, (आंबे येतात तसे) नैसर्गिकरीत्या उबलब्ध नसते, त्यामुळे ते कुठल्या पण सरपटणाऱ्या प्राण्याचे खाद्य असूच शकत नाही. >>>
त्यो तिसरा फोटू बगून लै भ्या
वाटलं !
In reply to जबरी श्टाइल मदी माहिती by अत्रुप्त आत्मा
त्यो तिसरा फोटू बगून लै भ्या वाटलं !असंच म्हण्ते.....
In reply to जबरी श्टाइल मदी माहिती by अत्रुप्त आत्मा
In reply to लै भारी by चाफा
In reply to <<<माझ्यामते घोणस फुरसे by शिल्पा ब
In reply to सर्पदंशावर प्रथमोपचार by सुबोध खरे
In reply to सर्पदंशावर प्रथमोपचार by सुबोध खरे
In reply to सर्पदंशावर प्रथमोपचार by सुबोध खरे
In reply to इथला by मीनल
In reply to थरारक लेख आहे by अमोल खरे
In reply to शिकार झालेला नाग !!! by भटक्य आणि उनाड
आमोद झांबरे याने TIFR मध्ये wildlife conservation मध्ये मास्टर केले आहे आणि आत्ता उच्चशिक्षणाचे पर्याय शोधात आहे. त्याची पेशालीटी 'भारतीय विंचू' आहे, त्याने नवीन जाती पण शोधून काढल्या आहेत.या तुझ्या "विंचूमित्रा" लाहि लिहिते कर .. नाहितर तूच त्याचा लेखविता धनी बन !
In reply to झकास लेखमाला ! by पहाटवारा
मस्त लिहिलेय.