कार विकत घेण्यासाठी मार्गदर्शन हवे आहे हा धागा मी काढला होता. तिथल्या सूचना, सल्ले व मार्गदर्शनाबद्धल सर्व व्यक्त-अव्यक्त मिपाकरांचे मनःपूर्वक आभार.
२० सप्टेंबर २०२० ला गाडी हातात आली. महिनाभर वापरल्यावर रिव्यू लिहीन असं ठरवलं होतं पण मग म्हटलं पाचेक हजार किमी वापरानंतर लिहावा (टंकाळा, दुसरं काय!). आता लिहितोय. उशीर झाल्याबद्धल क्षमस्व.
स्वतःची नवीन चारचाकी घेण्याचा पहिलाच अनुभव होता. पोटात अनेक फुलपाखरे बागडत आहेत असं उगीच वाटत होतं. पण घरून काम सुरु असल्याने रोज गाडी घेऊन ऑफिसला जाण्याचा प्रश्नच नव्हता. (१५ मार्च २०२० नंतर गच्चीबावलीला गेलोच नाहीय!) मग वीकेंड्सला खरेदी, मित्र, नातेवाईक, शे-दोनशे किमीपर्यंत पर्यटन असं इकडं तिकडं फिरणं सुरु झालं. त्यातच मग दोन महिन्याच्या आत १५०० किमी वर पहिली सर्व्हिसिंग झाली.
नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदा गाडी घेऊन तेलंगणाच्या बाहेर पडलो. हैद्राबादच्या आउटर रिंग रोडवर १०८-११० च्या (तरीही तिथे संथ वाटणाऱ्या) गतीने, डिव्हायडरवरची लाल-पिवळी फुलझाडे पाहत प्रवास एन्जॉय केला. राष्ट्रीय महामार्ग ४४ वर सुसाट निघालो अर्थात, १०० ची वेगमर्यादा पाळून गाडी चालवली; याआधी ओव्हरस्पीडींगचा ₹१०३५/- दंड लागला होता!. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यातल्या माझ्या गावी गेलो. आजूबाजूच्या खेड्यांत फिरलो. खेळाच्या मैदानात, पीक काढलेल्या शेतात, गायरानात, उंचसखल भागात, किनवट-उमरखेड दरम्यानच्या जंगलात झाडांमधून वाट काढून (हो!), गोदावरी नदीच्या वाळूत... अशी मस्त ऑफ-रोडिंग केली. २०९ मिमी ग्राउंड क्लिअरन्स इथे उपयोगी पडला.
डिसेंबरात गडचिरोली-नागपूरला गेलो. डोअर-टू-डोअर ५२५ किमी अंतर, बायको-लेकरांना घेऊन सकाळी ९ ते संध्याकाळी ५ मध्ये पार पाडले. विदर्भात फिरताना मनातल्या मनात तेलंगणा आणि महाराष्ट्रातल्या रस्त्यांच्या दर्जांची तुलना झाली. प्रवास बराचसा सुखकर होण्यात गाडीचे अप्रतिम सस्पेन्शन इथे उपयोगी पडले.
मागच्या महिन्यात तेलंगणा-आंध्र-कर्नाटक असा २०००+ किमी प्रवास केला. कर्नूल ते तिरुपती दरम्यानच्या, डिव्हायडर नसलेल्या, सव्वाशे किमीच्या पट्ट्यात लक्झरी बसला ओव्हरटेक करणे हे कौशल्याचे काम आहे. तिरुपती ते तिरुमला या घाटात गाडी चालवण्याचा अनुभव मस्त आहे. दोन्ही ठिकाणी स्पोर्ट्स मोड उपयोगी पडला.
आम्ही किराणा वगैरे सामान शक्यतो महिना-दोन महिन्यांचे एकदाच भरतो. परवा उप्पलच्या मेट्रोमधून मी आणि माझा एक मित्र, आमच्या दोन कुटुंबांचे महिनाभराचे किराणा सामान आणायला गेलो. येताना आम्ही एक क्विंटल तांदूळही घेतला. गाडीची ३५० लिटरची बूट स्पेस इथे उपयोगी पडली.
टाटा निक्सन ही दहा लाखाच्या आसपासच्या किंमतीतली खरंच मस्त गाडी आहे. १.२ लिटरचे टर्बो इंजिन, चार प्रवासी आणि त्यांचे आठ दिवसाच्या प्रवासाचे सामान अगदी सहज वाहून नेते. शहरात सिटी मोड, महामार्गावर ७० च्या पुढे गेल्यावर इको मोड आणि ओव्हरटेक करताना केवळ काही वेळा स्पोर्ट्स मोड, हे ताकद आणि माइलेजचा समतोल साधतात. गाडीचा सहावा गियर ८० च्या पुढे गेल्यावर एक लयीत, वेगाने गाडी चालवायला मदत करतो. वजनदार बॉडी असल्यामुळे ७०+ च्या वेगातही कॉर्नरिंग करताना कठीण वाटत नाही. जवळजवळ आवाजरहित असे पेट्रोल इंजिन लॉन्ग-ड्राईव्हवरही थकवा जाणवू देत नाही. तुलनेने ऐसपैस सीट्स आणि भरपूर लेग स्पेस, आरामदायक प्रवासाचा अनुभव देतात. कडक उन्हातही एसीचा गारवा अक्षरशः दोन मिनिटात केबिन थंडगार करतो.
ही बाजारातील सर्वोत्तम गाडी आहे असं काही नाही; पण मी मात्र माझ्या निक्सीवर जाम खुश आहे.
सुखद क्षण:
हैद्राबादच्या विमानतळाला जाताना, दोन्ही बाजूला हिरवीगार झाडी, विविध फुलझाडे, वृक्ष अशा मनमोहक रस्ता होता. गाडीतल्या हर्मन म्युझिक सिस्टिम वर पन्ना की तमन्ना है की हिरा मुझे मिल जाये हे गाणं ऐकत गाडी चालवत होतो. सोबत माझी प्रिय पत्नी होती. हा प्रवास कधीही संपू नये असं वाटत होतं...
फजितीचा क्षण:
गाडी शोरूममधून घरी आणली. रिव्हर्स करताना रिव्हर्स गियर टाकला तरी गाडी आचके देत पुढेच जात होती. काय होतंय ते काहीच कळेना. मग बाजूच्या एका मित्राला बोलावलं. त्याच्याकडे फियाट पुन्टो आहे. तोही दहा मिनिटे खटपट करून थकला. शेवटी पुढच्या भिंतीत आणि गाडीत फक्त काही इंचांचे अंतर राहिले. मग अचानक माझ्या लक्षात आलं, गियर रॉडच्या मुठीखाली एक बटन असतं, रिव्हर्स गियर टाकताना ते बटन दाबून गियर टाकावा लागतो नाहीतर रिव्हर्स ऐवजी सहावा गियर पडतो. डिलिव्हरीच्या वेळी सेल्सवाल्याने हे मला स्पेसिफिकली सांगितलं होतं, मी ऐनवेळी विसरलो होतो.
ठळक माहिती -
- सध्याचे ओडोमीटर - ६८००+
- आतापर्यंत भरलेले पेट्रोल अंदाजे ₹४००००/-
- टॅंक फुल पद्धतीने एसी सुरु ठेवून मिळालेला सर्वोत्तम माइलेज: १६. ७ किमी / लिटर (गाडीच्या कॉन्सोल वर १८.२ दाखविते)
- नियंत्रित व सुरक्षितपणे गाठलेली सर्वोच्च गती - १३९ किमी / तास (ही गुगल मॅपची स्पीड आहे, गाडीच्या स्पीडोमीटर वर यापेक्षा ४-५ किमी ने जास्त दाखविते)
- टाटाची सर्व्हिस (Yes, I mean it!)
- शानदार लूक्स
- दणकट बॉडी - भारतातील सर्वोत्तम सुरक्षा
- इंजिनचा अति कमी आवाज
- उंच सीटमुळे रस्त्यावर अधिक चांगले लक्ष व गाडीवर अधिक चांगले नियंत्रण
- स्पोर्ट्स मोडवरचा भन्नाट पिकअप
- अप्रतिम म्यूजिक सिस्टम
- कार्यक्षम एसीचा सुखद गारवा
- (मागच्यादेखील) ऐसपैस आरामशीर सीट्स
- सर्वोत्तम लगेज स्पेस...
- (मारुती ब्रीझाच्या) तुलनेत कमी माइलेज
- (ह्युंदाई वेन्यूपेक्षा) किंचित कमी दर्जाचे वाटणारे इंटेरिअर्स
- अबे, टाटा की गाडी कैकू लिया भै? अशी मध्यमवयीन लोकांकडून हेटाळणी
वाचने
17889
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
Nexon ! खरंच खूप छान आहे गाडी
मी ही दोन आठवड्यांपूर्वी
In reply to Nexon ! खरंच खूप छान आहे गाडी by उगा काहितरीच
माहिती बद्दल धन्यवाद
टाटाच्या नवीन गाड्या नक्कीच चांगल्या आहेत!
झकास रिव्हीव्यू !
छान रेव्हियू.
माझ्याकडे आधी नेक्सॉन पेट्रोल होती.
ज्याला मोठी गाडी हवी आहे
सस्पेंशन आणि सुरक्षितता
In reply to ज्याला मोठी गाडी हवी आहे by सुबोध खरे
जेंव्हा एखाद्या वाहनाच्या
In reply to सस्पेंशन आणि सुरक्षितता by कानडाऊ योगेशु
स्पोर्ट मोड
In reply to जेंव्हा एखाद्या वाहनाच्या by सुबोध खरे
टीगोर मध्ये स्पोर्ट मोड नाही
In reply to जेंव्हा एखाद्या वाहनाच्या by सुबोध खरे
https://www.youtube.com/watch
In reply to टीगोर मध्ये स्पोर्ट मोड नाही by कानडाऊ योगेशु
बीएस ६
In reply to https://www.youtube.com/watch by सुबोध खरे
बरोबर ! माझ्या टिगोर BS6 मधे
In reply to बीएस ६ by कपिलमुनी
हायला हे माहिती नव्हते
In reply to बरोबर ! माझ्या टिगोर BS6 मधे by उगा काहितरीच
नेक्सॉन
सर्व नविन गाड्या मालकांचे
अरे गण्या तूच ये उज्जैन ला.
In reply to सर्व नविन गाड्या मालकांचे by गणेशा
योग्या..
In reply to अरे गण्या तूच ये उज्जैन ला. by कानडाऊ योगेशु
मस्त!
झेस्ट डिझेल चे इंजिन फियाट
In reply to मस्त! by लई भारी
धन्यवाद!
In reply to झेस्ट डिझेल चे इंजिन फियाट by सुबोध खरे
पण Harrier मस्त दिसते हे
In reply to धन्यवाद! by लई भारी
नेक्सोन एलेक्ट्रिक ऑलरेडी आहे
In reply to झेस्ट डिझेल चे इंजिन फियाट by सुबोध खरे
मी nexon xe petrol घेणार होतो
dealership(Solapur) वाल्याने
dealership(Solapur) वाल्याने गाडी विकण्यास काहीच इंटरेस्ट दाखवला नाही म्हणून ह्युंदाई ....टिपीकल टाटा !ट्रक, इंडिका!
In reply to dealership(Solapur) वाल्याने by चौथा कोनाडा
सोलापूर टाटा showroom हे
In reply to ट्रक, इंडिका! by लई भारी
अगदी डिटेल्ड रिव्ह्यू.
आभार आणि अभिनंदन
आभार आणि अभिनंदन
इलेक्ट्रिक गाड्यांच्या किंमती
निक्सी आणि रॉली
ह्युंदाई व्हेन्युचा कुणाचा