मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फुलोरा..(माझ्या चाली सकट)

प्राजु · · जे न देखे रवी...
फ़ुलोरा... केशराचा गंध ओला शोधते खुणांखुणांतून.. आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून.. चांदव्याला जाग आली की निशेला लाज आली का उषेच्या उंबर्‍याशी, रे उभी ओठंगुनी ती?? चांदणे मी शिंपले रे माझिया कणांकणांतून.. आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून.. दाट झाली सावली ती, तारकांच्या सांजवाती अमृताचे थेंब ओठी, चंदनी गंधीत राती पाकळ्यांचे चिंब गाणे वेळूच्या बनांबनांतून आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून.. वादळी आवेग सारा, तप्त श्वासांचा पसारा मखमली ओला शहारा, धुंदला एकांत सारा मीलनाची गंधसुमने वेचते क्षणांक्षणांतून.. आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून.. - प्राजु इथे ऐका कृपया न हसता..! :)
fulora.wma

वाचने 11515 वाचनखूण प्रतिक्रिया 43

अवलिया Mon, 04/06/2009 - 18:32
वादळी आवेग सारा, तप्त श्वासांचा पसारा मखमली ओला शहारा, धुंदला एकांत सारा मीलनाची गंधसुमने वेचते क्षणांक्षणांतून..
+१ मस्त !!! --अवलिया जिसने पैरों के निशा भी नही छोडे पीछे, उस मुसाफिर का पता भी नही पूछा करते

In reply to by शितल

धनंजय Wed, 04/08/2009 - 01:07
चालीत शोधतेऽ खुणांखुणांतून वगैरे योग्य हेल घेतल्यामुळे आता कवितेची चाल पटते आहे. फारच छान. (बैठकीच्या लावणीत वृत्ताचे नियम बरेच शिथिल होतात, असे म. वा. धोंड यांच्या "मर्‍हाटी लावणी" पुस्तकात सांगितले आहे. हे पटण्यासारखे आहे. चालीत लघु-गुरु बदलतातच, ते चालीच्या अनुसार रचले पाहिजेत.)

हेरंब Mon, 04/06/2009 - 19:08
प्राजुताई, शब्द इतके सुंदर वापरले आहेत की मला थोडावेळ, आपण शांताबाईंची किंवा पाडगांवकरांची कविता वाचतोय असं वाटलं. क्या बात है!!

राघव Mon, 04/06/2009 - 19:36
प्राजू तै.. तू मला म्हणतेस हॅट्स ऑफ म्हणून. पण तुझ्या अशा रचना बघीतल्या की आम्ही लगेच जमीनीवर येतो. :) अप्रतीम गीत आहे. कुणीतरी छान चाल लावा रे.. म्या गाढवाला संगीताचा संबंध फक्त ऐकण्यापुरताच जमतो. नायतर ट्राय केला असता नक्कीच. राघव

बेसनलाडू Mon, 04/06/2009 - 22:05
सुंदर कविता. आवडली. (आस्वादक)बेसनलाडू एक सूचना करावीशी वाटली. 'खुणाखुणांतून' न म्हणता 'खाणाखुणांतून' असे आपण म्हणतो. त्यानुसार बदल केल्यास 'मनामनातून' च्या ऐवजी 'माझ्या मनातून' (किंवा 'क्षक्ष' मनातून - क्षक्ष च्या जागी चार मात्रा) असे काहीसे करावे लागेल. त्याप्रमाणे केल्यास प्रत्येक कडव्यातील तिसरी ओळ किंचित बदलावी लागेल. (सूचक)बेसनलाडू

सँडी Tue, 04/07/2009 - 07:20
सुंदर काव्य! -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

जयवी Tue, 04/07/2009 - 11:07
तुझा शब्दफुलोरा असाच टवटवीत राहो गं प्राजु :) फार फार आवडली कविता !

वादळी आवेग सारा, तप्त श्वासांचा पसारा मखमली ओला शहारा, धुंदला एकांत सारा मस्त ग प्राजुतै. आमचे कवितेचे ज्ञान यतातथाच आहे पण ह्या ओळी विलक्षण आवडल्या. यतातथा परा ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

सुधीर कांदळकर Tue, 04/07/2009 - 18:15
झाल्यासारखें वाटलें. या नादमयतेमुळें इतर कवितांहून वेगळी वाटली. वरील अभिप्रायांतलीं सौंदर्यस्थळें आहेतच. झकास. सुधीर कांदळकर.

प्रमोद देव Tue, 04/07/2009 - 22:59
अरे वा प्राजु. तू आता संगीतकार आणि गायिकाही झालीस. म्हणजे कवयित्री,संगीतकार आणि गायिका असा त्रिवेणी संगम. मस्त आहे चाल आणि तुझा आवाजही. जियो. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

रेवती Tue, 04/07/2009 - 23:08
छान म्हटलीयेस कविता! आत्ताच ऐकली. रेवती

आंबोळी Tue, 04/07/2009 - 23:15
नेहमी प्रमाणेच उत्क्रुष्ठ झाली आहे कविता.... क्या कहने..... प्राजु टच कवितेत सगळीकडे ओसंडलाय.... फारच हळूवार आणि तरल आहे कविता.... चाल तर अप्रतिमच लावली आहे... विशेषतः शेवटचे लालाला बेष्टच.... अवांतर: इथुन पुढे प्राजुतैना चाल न लावलेल्या आणि गाउन न दाखवलेल्या कविता टाकायला बंदी करावी अशी मी तात्याना आणि संपादक मंडळाला आग्रहाची विनंती करतो. प्रो.आंबोळी

समिधा Wed, 04/08/2009 - 07:01
मस्त कविता आत्ताच ऐकली. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

विसोबा खेचर Wed, 04/08/2009 - 07:02
कविता छानच आहे, चाल मात्र ठीक वाटली.. पुढील काव्यलेखनाकरता, संगीत दिग्दर्शनाकरता आणि काव्य गायनाकरता मनोमन शुभेच्छा! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मीनल Wed, 04/08/2009 - 22:33
माझ मत उलट आहे. मला वाटत की ह्या चाली मुळे शब्द उठून आले आहेत. अपना अपना ख्याल! :) चाल आवडली. खर सांगते की मला वाटल की देव काकांनी लावली आहे. तू ही चाल लावली आहेस हे कळल्यावर मी उडालेच. विचार आणि ते व्यक्त करणारे शब्द, या संगित यामुळे वाचनिय न राहता श्रवणिय झाले आहेत. `वादळाचा आवेग` म्हणताना चालीत केलेला बदल स्तुत्य आहे. 'संगीत देताना शब्दाचे/त्यांच्या अर्थाचे भान ठेवणे आवश्यक आहे' ही जाण तुला आहे ते दिसले. खूप खूप आभिनंदन. पुढिल सर्व कविता ऐकायलाच आवडतील. मीनल.

In reply to by मीनल

विसोबा खेचर Wed, 04/08/2009 - 23:15
अपना अपना ख्याल! अगदी खरं! परंतु कविता जितकी सुरेख आहे, त्या सुरेखपणाला चाल पुरेपूर न्याय देऊ शकलेली नाही हे माझं मत.. आपला, (संगीताचा एक चाहता आणि विद्यार्थी) तात्या.

सायली पानसे Wed, 04/08/2009 - 10:46
प्राजु, खुपच सुंदर आहे कविता आणि चाल तर फारच सुंदर आहे. ऐकल्यावर इतक छान वाटला ग... पुढच्या कवितांसाठी शुभेच्छा!

स्वाती दिनेश Wed, 04/08/2009 - 11:23
वा प्राजु, तुझी कविता आधी ऐकली आणि मग वाचली.. आवडली.सुरेख,तरल झाली आहे. स्वाती

क्रान्ति Wed, 04/08/2009 - 20:46
सुन्दर कविता, मस्त चाल आणि गोड आवाज. याला म्हणतात त्रिवेणी संगम! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com