फ़ुलोरा...
केशराचा गंध ओला शोधते खुणांखुणांतून..
आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून..
चांदव्याला जाग आली की निशेला लाज आली
का उषेच्या उंबर्याशी, रे उभी ओठंगुनी ती??
चांदणे मी शिंपले रे माझिया कणांकणांतून..
आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून..
दाट झाली सावली ती, तारकांच्या सांजवाती
अमृताचे थेंब ओठी, चंदनी गंधीत राती
पाकळ्यांचे चिंब गाणे वेळूच्या बनांबनांतून
आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून..
वादळी आवेग सारा, तप्त श्वासांचा पसारा
मखमली ओला शहारा, धुंदला एकांत सारा
मीलनाची गंधसुमने वेचते क्षणांक्षणांतून..
आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून..
- प्राजु
इथे ऐका कृपया न हसता..! :)
| fulora.wma |
| लेखनविषय: |
|---|
वाचने
11516
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
वादळी आवेग
+१
In reply to वादळी आवेग by अवलिया
वेड
सुरेख!!!
+१
In reply to सुरेख!!! by बिपिन कार्यकर्ते
चालीसह अधिक पटते
In reply to +१ by शितल
धन्यवाद
In reply to चालीसह अधिक पटते by धनंजय
सुंदर कविता
जाईचा
वा वा!
अप्रतिम!
क्या बात है!!
सुगंधी कविता!
मस्तच. जाईचा सुगंध घमघमला!
मस्त
सुंदर | सूचना
सूचना आवडली..
In reply to सुंदर | सूचना by बेसनलाडू
असेच म्हणतो
In reply to सूचना आवडली.. by प्राजु
सॉलिड
प्रतीक्षा कशाची, आले काय...
येतोय..
In reply to प्रतीक्षा कशाची, आले काय... by श्रावण मोडक
अद्भुत!
अद्भुत!
सर्वांचे मनापासून धन्यवाद.
सुंदर
फुले हा
आवडली
अहा...!!
वादळी आवेग
शब्द मनांत उच्चारतांना मंजुळ घंटानाद ...
क्या बात है!
छान
सुंदर
एक नंबर !
मला सहन केल्याबद्दल
मस्त
कविता छानच
चाल
In reply to कविता छानच by विसोबा खेचर
अपना अपना
In reply to चाल by मीनल
मस्त.
वा..
खास!
क्या बात