फुलोरा..(माझ्या चाली सकट)
लेखनविषय:
फ़ुलोरा...
केशराचा गंध ओला शोधते खुणांखुणांतून..
आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून..
चांदव्याला जाग आली की निशेला लाज आली
का उषेच्या उंबर्याशी, रे उभी ओठंगुनी ती??
चांदणे मी शिंपले रे माझिया कणांकणांतून..
आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून..
दाट झाली सावली ती, तारकांच्या सांजवाती
अमृताचे थेंब ओठी, चंदनी गंधीत राती
पाकळ्यांचे चिंब गाणे वेळूच्या बनांबनांतून
आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून..
वादळी आवेग सारा, तप्त श्वासांचा पसारा
मखमली ओला शहारा, धुंदला एकांत सारा
मीलनाची गंधसुमने वेचते क्षणांक्षणांतून..
आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून..
- प्राजु
इथे ऐका कृपया न हसता..! :)
| fulora.wma |
वाचने
11516
वाचनखूण
प्रतिक्रिया
43
वादळी आवेग सारा, तप्त श्वासांचा पसारा मखमली ओला शहारा, धुंदला एकांत सारा मीलनाची गंधसुमने वेचते क्षणांक्षणांतून..+१ मस्त !!! --अवलिया जिसने पैरों के निशा भी नही छोडे पीछे, उस मुसाफिर का पता भी नही पूछा करते
In reply to वादळी आवेग by अवलिया
मस्तं आहे कविता...
-अनामिक
सुरेख झालीय कविता प्राजु.... सकाळ एकदम सुगंधित झाली.
मस्तच आहे कविता. शब्द खूपच सुंदर आहेत.
बिपिन कार्यकर्ते
In reply to सुरेख!!! by बिपिन कार्यकर्ते
सुरेख कविता. :)
In reply to +१ by शितल
चालीत
शोधतेऽ खुणांखुणांतून
वगैरे योग्य हेल घेतल्यामुळे आता कवितेची चाल पटते आहे.
फारच छान.
(बैठकीच्या लावणीत वृत्ताचे नियम बरेच शिथिल होतात, असे म. वा. धोंड यांच्या "मर्हाटी लावणी" पुस्तकात सांगितले आहे. हे पटण्यासारखे आहे. चालीत लघु-गुरु बदलतातच, ते चालीच्या अनुसार रचले पाहिजेत.)
In reply to चालीसह अधिक पटते by धनंजय
धन्यवाद धनंजय.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
कविता वाचून जाईचा फुलोरा दरवळला...!
अजून येऊ द्या,अशाच सुंदर-सुंदर कविता...!
-दिलीप बिरुटे
जाईचा फुलोरा छानच दरवळला आहे.
छान कविता!
--शाल्मली.
प्राजुताई,
शब्द इतके सुंदर वापरले आहेत की मला थोडावेळ, आपण शांताबाईंची किंवा पाडगांवकरांची कविता वाचतोय असं वाटलं.
क्या बात है!!
अप्रतिम फुलोरा प्राजु!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
प्राजू तै..
तू मला म्हणतेस हॅट्स ऑफ म्हणून. पण तुझ्या अशा रचना बघीतल्या की आम्ही लगेच जमीनीवर येतो. :)
अप्रतीम गीत आहे. कुणीतरी छान चाल लावा रे.. म्या गाढवाला संगीताचा संबंध फक्त ऐकण्यापुरताच जमतो. नायतर ट्राय केला असता नक्कीच.
राघव
:)
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
(मोगरा) चतुरंग
मस्त सुगंधी कविता :)
-- लिखाळ.
सुंदर कविता. आवडली.
(आस्वादक)बेसनलाडू
एक सूचना करावीशी वाटली. 'खुणाखुणांतून' न म्हणता 'खाणाखुणांतून' असे आपण म्हणतो. त्यानुसार बदल केल्यास 'मनामनातून' च्या ऐवजी 'माझ्या मनातून' (किंवा 'क्षक्ष' मनातून - क्षक्ष च्या जागी चार मात्रा) असे काहीसे करावे लागेल. त्याप्रमाणे केल्यास प्रत्येक कडव्यातील तिसरी ओळ किंचित बदलावी लागेल.
(सूचक)बेसनलाडू
In reply to सुंदर | सूचना by बेसनलाडू
विचार करतच होते तुम्हाला त्याबद्दल खरड टाकावी असा..
जमेल तितके बदल करते.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
In reply to सूचना आवडली.. by प्राजु
सूचना आवडली. प्राजु बदल करतीलच. वाट बघतो आहे.
सॉलिड रॉमेंटिक आहे. कविता :X
मोराची वाट पहात होतो, आला जाईचा फुलोरा. सुगंधी.
ठीक आहे. त्याची वाट पाहू.
In reply to प्रतीक्षा कशाची, आले काय... by श्रावण मोडक
मोरही १-२ दिवसांत येईल.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
प्राजू! शब्दांची खाण आणि प्रतिभा जरा शिल्लक ठेव गं आमच्यासारख्यांसाठी.
=D>
मनापासून आभार. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
सुंदर काव्य!
-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.
फुले हा वीक्पोइन्त असल्याने कविता खुप आव्दलि ;;)
आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून..
चुचु
प्राजू , फुलोरा अगदी टवटवित फुलला आहे.
तुझा शब्दफुलोरा असाच टवटवीत राहो गं प्राजु :) फार फार आवडली कविता !
वादळी आवेग सारा, तप्त श्वासांचा पसारा
मखमली ओला शहारा, धुंदला एकांत सारा
मस्त ग प्राजुतै.
आमचे कवितेचे ज्ञान यतातथाच आहे पण ह्या ओळी विलक्षण आवडल्या.
यतातथा परा
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
झाल्यासारखें वाटलें. या नादमयतेमुळें इतर कवितांहून वेगळी वाटली. वरील अभिप्रायांतलीं सौंदर्यस्थळें आहेतच. झकास.
सुधीर कांदळकर.
अरे वा प्राजु. तू आता संगीतकार आणि गायिकाही झालीस.
म्हणजे कवयित्री,संगीतकार आणि गायिका असा त्रिवेणी संगम.
मस्त आहे चाल आणि तुझा आवाजही.
जियो.
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
छान म्हटलीयेस कविता!
आत्ताच ऐकली.
रेवती
नेहमी प्रमाणेच उत्क्रुष्ठ झाली आहे कविता....
क्या कहने..... प्राजु टच कवितेत सगळीकडे ओसंडलाय....
फारच हळूवार आणि तरल आहे कविता....
चाल तर अप्रतिमच लावली आहे... विशेषतः शेवटचे लालाला बेष्टच....
अवांतर: इथुन पुढे प्राजुतैना चाल न लावलेल्या आणि गाउन न दाखवलेल्या कविता टाकायला बंदी करावी अशी मी तात्याना आणि संपादक मंडळाला आग्रहाची विनंती करतो.
प्रो.आंबोळी
खुप छान झालीये कविता. आवडली.
=D>
नीलकांत
मला सहन केल्याबद्दल (माझ्या आवाजाला) आपल्या सर्वांचे मनापासून आभार.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मस्त कविता आत्ताच ऐकली.
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
कविता छानच आहे, चाल मात्र ठीक वाटली..
पुढील काव्यलेखनाकरता, संगीत दिग्दर्शनाकरता आणि काव्य गायनाकरता मनोमन शुभेच्छा! :)
तात्या.
In reply to कविता छानच by विसोबा खेचर
माझ मत उलट आहे.
मला वाटत की ह्या चाली मुळे शब्द उठून आले आहेत.
अपना अपना ख्याल! :)
चाल आवडली.
खर सांगते की मला वाटल की देव काकांनी लावली आहे.
तू ही चाल लावली आहेस हे कळल्यावर मी उडालेच.
विचार आणि ते व्यक्त करणारे शब्द, या संगित यामुळे वाचनिय न राहता श्रवणिय झाले आहेत.
`वादळाचा आवेग` म्हणताना चालीत केलेला बदल स्तुत्य आहे.
'संगीत देताना शब्दाचे/त्यांच्या अर्थाचे भान ठेवणे आवश्यक आहे' ही जाण तुला आहे ते दिसले.
खूप खूप आभिनंदन.
पुढिल सर्व कविता ऐकायलाच आवडतील.
मीनल.
प्राजु,
खुपच सुंदर आहे कविता आणि चाल तर फारच सुंदर आहे. ऐकल्यावर इतक छान वाटला ग...
पुढच्या कवितांसाठी शुभेच्छा!
वा प्राजु,
तुझी कविता आधी ऐकली आणि मग वाचली.. आवडली.सुरेख,तरल झाली आहे.
स्वाती
सुन्दर कविता, मस्त चाल आणि गोड आवाज. याला म्हणतात त्रिवेणी संगम!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
क्या बात है..खुप छान..आवडली
वादळी आवेग