प्रेरणा
काल अचानक डोक्यात आले
चहा बनवून पाहू वाटले
चहा बनवायला लागतेच काय?
चहा, साखर अन थोडीशी साय
भरकन जाऊन खरेदी केली
आधणासाठी छोटी पातेली घेतली
आधी काकूला फोन केला
चहाचा चमचा (किती मोठा) विचारून घेतला
हाय! मांजर आडवं गेलं
दूधच सगळं नासकं निघालं
शोधाशोध करून झाली
दुकानदारांनी नन्ना केली
काय करावं मला समजेना
चहाची तल्लफ शांत बसू देई ना
कपाट सगळं एकदा उचकटलं
एक्स्पायरी उलटलेलं बिस्कीट मिळालं
शेवटी मिल्कमेडचा डबा सापडला
चहाचा पाठलाग सुरू झाला
पातेली घासून सुरूवात केली
आधण आणि साखर मोजली
तेव्हाच उतावळेपणा नडला
मिल्कमेडच्या डब्ब्याला हात लागला
मिल्कमेडच्या डब्यानं नाक घासलं
जमिनीवर पावडरचं साम्राज्य झालं
जाम वैतागून रंगभेद विसरले
काळ्या चहाच्या नादाला लागले
माझंच कर्म, आडवंच आलं
साखरेऐवजी मीठच घातलं
तोंडात घातलेलं घशाशी आलं
चहानं माझं नाकच कापलं
शेवटी सगळा नाद सोडला
सगळा पसारा नीट आवरला
आज जरा विचार केला
जरी कालचा बेत फसला
काय घडले तेच सांगावे
विडंबनरुपाने सादर करावे
आता हे विडंबन संपवते
पोळ्या लाटायला आत जाते
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
13567
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहाहा..
असेच म्हणतो ! :)
In reply to हाहाहा.. by प्राजु
डुर्र डुर्र डुर्र!!!
सहमत
In reply to डुर्र डुर्र डुर्र!!! by बिपिन कार्यकर्ते
अशक्य आहेस तु..
झक्कास! दुर्बीटणे बाईंनी लंबर मारला! ;)
असेच म्हणतो
In reply to झक्कास! दुर्बीटणे बाईंनी लंबर मारला! ;) by चतुरंग
आणि
In reply to असेच म्हणतो by संदीप चित्रे
:)
मस्त!
व्वा.
लै भारी
झकास!
छान .. आता
पोळ्यांची
In reply to छान .. आता by लिखाळ
हा हा .. पु
In reply to पोळ्यांची by ३_१४ विक्षिप्त अदिती
हम्म..
In reply to हा हा .. पु by लिखाळ
मस्तच झाले
मस्त जमलय
समीक्षा!
चतुरंग,
In reply to समीक्षा! by चतुरंग
या महान
In reply to समीक्षा! by चतुरंग
अरेरे!
In reply to या महान by लिखाळ
(असा संशय
In reply to अरेरे! by चतुरंग
चतुरंग आणि
In reply to अरेरे! by चतुरंग
हा हा हा!!
In reply to चतुरंग आणि by लिखाळ
आता बरे
In reply to हा हा हा!! by चतुरंग
ईदुषी
In reply to हा हा हा!! by चतुरंग
जाम
In reply to समीक्षा! by चतुरंग
साय
हुच्च
साधा तो
मास्तर
In reply to साधा तो by भडकमकर मास्तर
मस्त वाक्य!
In reply to साधा तो by भडकमकर मास्तर
प्रातःस्मरण
अति उच्च
मस्त!
मजा वाटली
चहा आवडला.
लय भारी.
हिहिहिहिह
खी खी खी
आणि हो
स्वतःच्या
धमाल आली.
भन्नाट..
जबरदस्त ..
फक्कड
बाकी
In reply to फक्कड by ऋषिकेश
चहा
चहा च सोडा,