मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(डास)

बेसनलाडू · · जे न देखे रवी...
या तनुचा माझ्या करशी दररोजचा घास तुझा डोंबिवली वा धारावी, घरभर हा वास तुझा तू जळी अन् तू नाली, इवलासा श्वास तुझा ए.सी.च्या खालीसुद्धा रंगतो तो रास तुझा मॉर्टीन असो वा कछवा, धसका जीवास तुझा गुणगुणता कानी करती सगळे दुस्वास तुझा नाना रुपे बळावे अवतार तो, भास तुझा डेंग्यू अन् मलेरियाचा आजारी खास तुझा तारशील भवसागरी? मागे घे डास तुझा झोपु दे जरासे रात्री, प्रभु मी रे दास तुझा प्रेरणा: क्रान्ति ताईंचा दास

वाचने 4707 वाचनखूण प्रतिक्रिया 25

प्राजु 01/04/2009 - 23:59
जोरदार आगमन!!! लगे रहो!! आवांतर : (डासांच्या त्रासाच्या वेदनेतून काव्य प्रसवलं असावं हे..) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मीनल 02/04/2009 - 00:04
मी `दासा`चे रसग्रहण केले. =D> आता या `डासा`चे मी काय रसग्रहण करणार. कारण डासच `रस` ग्रहण करतात ना! :)) मीनल.

नाटक्या 02/04/2009 - 00:44
बेलाशेठ आज काम नाही वाटतं? विकांतासाठी थोडा वेळ ठेवा...

अनिल हटेला 02/04/2009 - 06:23
एकदम मजेशीर विडंबन !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मराठमोळा 02/04/2009 - 07:47
काय पण ते डासांचे महाभाग्य म्हणावे.. बेलाच्या विडंबनात प्रभुचे स्थान मिळावे.. डासांच्या दुनियेत हे महाकाव्य ठरावे.. विडंबनाचे डास तुम्हास असेच चावत रहावे.. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

मदनबाण 03/04/2009 - 04:41
हे हे हे... झक्कास्स्स्स्स्... :) मदनबाण..... मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी जालावरुन सभार...