मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(डास)

बेसनलाडू · · जे न देखे रवी...
या तनुचा माझ्या करशी दररोजचा घास तुझा डोंबिवली वा धारावी, घरभर हा वास तुझा तू जळी अन् तू नाली, इवलासा श्वास तुझा ए.सी.च्या खालीसुद्धा रंगतो तो रास तुझा मॉर्टीन असो वा कछवा, धसका जीवास तुझा गुणगुणता कानी करती सगळे दुस्वास तुझा नाना रुपे बळावे अवतार तो, भास तुझा डेंग्यू अन् मलेरियाचा आजारी खास तुझा तारशील भवसागरी? मागे घे डास तुझा झोपु दे जरासे रात्री, प्रभु मी रे दास तुझा प्रेरणा: क्रान्ति ताईंचा दास

वाचने 4708 वाचनखूण प्रतिक्रिया 25

मुक्तसुनीत 01/04/2009 - 23:55
बेला ! बर्‍याच दिवसांनी आलात ! लई भारी !

प्राजु 01/04/2009 - 23:59
जोरदार आगमन!!! लगे रहो!! आवांतर : (डासांच्या त्रासाच्या वेदनेतून काव्य प्रसवलं असावं हे..) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चतुरंग 01/04/2009 - 23:59
बेला, बरेच दिवसांनी तुला विडंबनाचा डास चावला! ;) चतुरंग

मीनल 02/04/2009 - 00:04
मी `दासा`चे रसग्रहण केले. =D> आता या `डासा`चे मी काय रसग्रहण करणार. कारण डासच `रस` ग्रहण करतात ना! :)) मीनल.

चंद्रशेखर महामुनी 02/04/2009 - 00:17
या डासा ने... लै चावलं बघा...

नाटक्या 02/04/2009 - 00:44
बेलाशेठ आज काम नाही वाटतं? विकांतासाठी थोडा वेळ ठेवा...

क्रान्ति 02/04/2009 - 06:03
काय मस्त धम्माल विडम्बन! अगदी झकास. =)) =)) =)) =)) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

अनिल हटेला 02/04/2009 - 06:23
एकदम मजेशीर विडंबन !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मराठमोळा 02/04/2009 - 07:47
काय पण ते डासांचे महाभाग्य म्हणावे.. बेलाच्या विडंबनात प्रभुचे स्थान मिळावे.. डासांच्या दुनियेत हे महाकाव्य ठरावे.. विडंबनाचे डास तुम्हास असेच चावत रहावे.. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

३_१४ विक्षिप्त अदिती 02/04/2009 - 10:14
मस्तच! अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

पल्लवी 02/04/2009 - 18:19
वा वा... काय पण सुचलंय !! हे हे हे !!!

मदनबाण 03/04/2009 - 04:41
हे हे हे... झक्कास्स्स्स्स्... :) मदनबाण..... मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी जालावरुन सभार...

ऋषिकेश 03/04/2009 - 11:29
साला एक मच्छर लड्डु को कवी बना देता है ;) खुसखशीत विडंबन :) - ऋषिकेश

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 03/04/2009 - 11:33
बेला , विडंबन झकास ! :) मनातल्या मनात : आम्ही नमोगतींच्याही उत्तम लेखनाला मनापासून दाद देतो.